प्रस्तावना :-
Pm Awas Yojana नमस्कार मित्रांनो आजही आपल्या भारत देशामध्ये असे बरेच लोक राहतात की ज्यांची परिस्थिती ही आर्थिक दृष्ट्या कमकुवत किंवा दुर्बल आहे असे लोक त्यांच्या परिस्थितीमुळे स्वतची घरे बांधू शकत नाहीत व किंवा त्यांच्या घराची दुरुस्ती करून घेऊ शकत नाहीत. अशाच आर्थिक दृष्ट्या कमकुवत व दुर्बल लोकांचा कुठेतरी विकास व्हावा या दृष्टिकोनाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सुरू केली आहे. ही योजना केंद्र सरकारने राबवली आहे व आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सन 2015 मध्ये सुरू केली होती.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांना नवीन घरे किंवा जुन्या घराची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक मदत देऊन त्यांचा आर्थिक विकास करणे असा आहे, या योजनेअंतर्गत केंद्र सरकार ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक मदत म्हणून मैदानी भागासाठी एक लाख वीस (1,20,000) हजार तसेच डोंगराभागासाठी एक लाख तीस (1,30,000) हजार रुपये असे देते.
मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत देशातील बऱ्याच गरीब कुटुंबातील नागरिकांना घरे दिली जात आहेत आणि या योजनेचा लाभही बरेच लोक घेत आहेत तसेच अनेक असे लोक आहेत की या योजनेपासून वंचित आहे, याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना माहीत नसलेले काही घटक, तर चला मग आपण पंतप्रधान ग्रामीण योजनेच्या योजनेअंतर्गत सविस्तर माहिती घेऊया.
Pm Awas Yojana 2024 :- ग्रामीण महाराष्ट्र
ही योजना पूर्ण राज्यांमध्ये लागू आहे तर चला मग आपण पंतप्रधान आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र याविषयी माहिती घेऊयात.या योजनेअंतर्गत एकूण खर्च 130075 कोटी रुपये आहे PMAY ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या खर्चाचे स्वरूप हे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या दोघांमध्ये आहे यांच्या दोघात 60:40 आणि 90:10 हा डोंगराळ भागासाठी करायचा निर्णय दोन्ही सरकारने घेतला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमकुवत व दुर्बल असणाऱ्या घटकांना गरिबांचे काम हे 2022 पर्यंत पूर्ण केले जाणार होते पण या योजनेची मर्यादा ही आता 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे
Pm Awas Yojana 2024 :- योजनेचा विस्तार
शिल्लक घरे:- 155.75 लाख. घरे बांधली जातील. हे गरिबासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.95 कोटी घरे बांधण्यात मदत होणार आहे.
एकूण खर्च:- 155.75 लाख गरिबांसाठी सरकारला 198581 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.
Pm Awas Yojana 2024 Heighlights :- मुद्दे
अ. क्र. | योजनेचे नाव | प्रधान मंत्री ग्रामीण आवास योजना |
1 | संबंधित विभाग | ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार |
2 | योजनेचा प्रारंभ | वर्ष 2015 |
3 | उद्देश | सर्व असहाय कुटुंबांना घर देण्यासाठी |
4 | कोणाच्या अंतर्गत | केंद्र सरकारने ही योजना चालवली आहे |
5 | लाभार्थीची निवड | SECC-2011 Beneficiary |
6 | अनुदानाची रक्कम | 120000/- |
7 | राज्याचे नाव | महाराष्ट्रातील सर्व जिल्हे |
8 | अधिकृत वेबसाइट | pmayg.nic.in |
Pm Awas Yojana 2024 :- उद्दिष्ट
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे व येथील 60 ते 70% नागरिक शेतीवर अवलंबून राहतात, त्यांची उपजीविका ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते काही अनियमित नैसर्गिक बदलामुळे त्याला पर्याय संकटाला सामोरे जावे लागते, त्यापासून त्याला मिळणाऱ्या उत्पन्नात पुरेसा फायदा होत नाही त्यामुळे ते अर्थदृष्ट्या दुर्बल राहतात. अशा कारणामुळे त्यांना आपल्या जीवनामध्ये सर्वांगीण विकास करता येत नाही.अन्न, वस्त्र, निवारा या जशा माणसाच्या प्रमुख गरजा आहेत त्यामुळे सरकारने ग्रामीण भागातील लोकांचा विकास व्हावा यासाठी पक्के घर बांधून देऊन त्यांना निवाराच्या स्वरूपात मदत करण्याचे ठरवले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वतःचे पक्के घरे बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते या मदतीबरोबर शौचालय बांधण्यासाठी सरकार प्रत्येकी 12 हजार रुपयांची मदत ही मिळते.
Pradhan Mantri Awas 2024 :- लाभार्थी
Pm Awas Yojana ग्रामीण महाराष्ट्र यामध्ये कोणत्या प्रवर्गाला या योजनेचा लाभ घेता येईल हे खालील प्रमाणे स्पष्ट करण्यात आले आहे.
- आर्थिक दृष्ट्या कमकुवत व दुर्बल असे नागरिक.
- ज्या लोकांचे उत्पन्न हे कमी आहेत असे लोक.
- या योजनेमध्ये लाभ घेणारा व्यक्ती कोणत्याही जाती किंवा धर्माचा असावा.
- मध्यमवर्ग 1.
- मध्यमवर्ग 2.
- अनुसूचित जाती.
- अनुसूचित जमाती.
Pradhan Mantri Awas Yojana :- वैशिष्ट्ये
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महाराष्ट्रया योजनेअंतर्गत सरकारने एक कोटी घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्याची ठरवले आहे
- या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्याकमकुवत व दुर्बल नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- जर समजा ग्रामीण भागात नागरिक हे मैदानी भागात राहत असतील तर त्यांना युनिट्स म्हणून 1.20 लाख आणि जर नागरिक हे डोंगराळ भागात राहत असतील तर त्यांना युनिट साह्य म्हणून रुपये 1.30 इतके देण्याचे सरकारने ठेवले आहे
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेमध्ये स्वयंपाक घरासाठी जागाही 20 मीटर करण्यात आली होती.पण आता ती 25 चौरस मीटर पर्यंत वाढवण्यात आले आहे.
- प्रधानमंत्री ग्रामीण महाराष्ट्र योजना त्याची एकूण किंमत ही 1,30,075 रुपये इतकी आहे जी केंद्र सरकार ही 60% व राज्य सरकार 40% या गुणोत्तर प्रमाणात घेतील.
- या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना एक प्रणाली राबवली आहे त्याप्रणालीला SECC 2011 असे म्हणतात.
- या प्रणालीचा उपयोग करून ग्रामीण भागातील लोकांचा डेटा गोळा केला जाईल व आर्थिक निकषावर निश्चित करून योग्य त्या कुटुंबाला लाभ देता येईल.
Pradhan Mantri Awas Yojana 2024 :- माहिती
या योजनेअंतर्गत काही महत्त्वाची माहिती आपण खालील प्रमाणे घेणार आहोत.
- एखाद्या नागरिकाला पक्के घर बांधण्यासाठी जर काही मदत मिळाली असेल आणि त्याने शौचालय बांधले नसेल तर ते घर पूर्ण मानले जाणार नाही, याची कारण म्हणजे असे की प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या योजनेमध्ये फक्त पक्के घर बांधण्याचा निकष आहे व याच निकषाला धरून शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून 12000 रुपयाची रक्कम मिळत असते, म्हणजेच जर तुम्ही ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर बांधले,तर तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून मदत मिळते.
- मनरेगा अंतर्गत घर बांधण्यासाठी 90/95 दिवसांच्या अकुशल कामगारांच्या तरतूदही निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये स्वतः नागरिक काम करून मजुरीचे पैसे मिळवू शकतो.
- ज्या घरांचे काम पूर्णपणे झाले आहे त्यांना ऊर्जा मंत्रालयाची दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योत योजना यानुसार त्यांना घरामध्ये विद्युतीकरण करण्यात येईल.
- त्याचबरोबर प्रधानमंत्री उज्वला योजनेद्वारे मोफत एलपीजी कनेक्शन देखील प्रदान करण्यात येणार आहे.
- जलजीवन अभियानांतर्गत ज्या लोकांना घर मिळाले आहेत त्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घराच्या बांधकामाचे गुणवत्ता ही योग्य असावी यासाठी विविध साहित्याचा वापर करावा लागतो.त्याचबरोबर कुशल गवंडींना प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
- गवंडींना प्रशिक्षण देण्यात आलेला आकडा खालील प्रमाणे आहे.
- 8 एप्रिल पर्यंत -1.18 लाख.
- प्रशिक्षणा अगोदर एका दिवसामध्ये बांधकाम 125 दिवसात पूर्ण व्हायचे ते आता 40 ते 60 दिवसात पूर्ण होत आहे.
Pradhan Mantri Awas Yojana Eligibility :– पात्रता
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या अंतर्गत खालील काही पात्रता दर्शविले आहेत.
- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराच्या नावावर देशात कुठेही पक्के घर नसावे
- अर्जदार हा दारिद्र रेषेखालील (BPL) असावा.
- आर्थिक दृष्ट्या कमकुवत (LIG) असावा.
- अर्जदार व त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी 3 ते 6 लाख दरम्यान असावे.
- या योजनेअंतर्गत कुटुंबातील एका व्यक्तीला एकदाच बांधकामाची परवानगी दिली जाईल.
- कुटुंबातील एका व्यक्तीने एकदाच अर्ज केलेला असावा.
Pradhan Mantri Awas Yojana Documents :- कागदपत्रे
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या अंतर्गत खालील काही कागदपत्रे आवश्यक आहेत.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- राहत्या घराचा पत्ता
- घर नसल्याचा प्रतिज्ञापत्र
- जात प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- रेशन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- दारिद्र रेषेखालील नंबर (BPL/LIG)
- योजनेचा अर्ज
Pradhan Mantri Awas Yojana Online Apply :- ऑनलाइन अर्ज
प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारला ऑनलाइन अर्ज करण्याची गरज आहे यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा.
- अर्जदाराला सरकारने दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर (https://pmaymis.gov.in) जावे लागेल.
- तुमच्या त्या वेबसाईटच्या स्क्रीनवर तुम्हाला PMAYG फॉर्मवर क्लिक करायचे आहे.
- यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील
1. शहरी ऑनलाइन अर्ज
2. ग्रामीण ऑनलाईन अर्ज.
- ग्रामीण ऑनलाईन अर्जला क्लिक केल्यानंतर फॉर्म उघडेल व विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा.
- त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज दाखल करू शकता.
चला मित्रांनो आपण आपला फॉर्म सबमिट केला आहे, परंतु तुम्हाला या योजनेच्या संदर्भात जर काही समस्या असेल तर तुमच्या समस्याचे निवारण करण्यासाठी सरकारने हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे. दिलेल्या क्रमांकावर तुम्ही कॉल करून तुमच्या समस्याचे निवारण करू शकता.
हेल्पलाईन क्रमांक हा टोल फ्री आहे, जर समजा या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकला नाही तर तुम्ही स्वतःच्या मेल आयडी वरून अधिकृत सपोर्ट सिस्टीमला मेल करू शकता व तुमच्या समस्याचे निवारण करू शकता.
- Toll-Free Number- 1800116446
- Email Id- support- pmayg@gov.in
Pradhan Mantri Awas Yojana FAQs
प्रश्न :- आवास योजनेची लिस्ट कुठे चेक करावी?
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या जर योजनेची यादी तुम्हाला तपासायचे असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईटला(pmayg.nic.in) भेट देऊ शकता.
प्रश्न :- या योजनेअंतर्गत नागरिकांना किती निधी मिळेल?
प्रधानमंत्री आवास योजना यामध्ये डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना 1.30 हजार रुपये आणि मैदानी भागातील लाभार्थ्याला 1.20 हजार रुपये दिले जातील.
प्रश्न :- आवास योजना कधी सुरु झाली?
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली.
प्रश्न :- आवास योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
या योजनेमध्ये आर्थिक दृष्ट्या कमकुवत व दुर्बल घटक यामध्ये
1. मध्यम उत्पन्न गट
2.अनुसूचित जाती/जमाती.
प्रश्न :- प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन फॉर्म 2024 अर्ज कसा करावा?
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत एक अधिकृत वेबसाईट(https://pmaymis.gov.in) सरकारने दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता
.प्रश्न :- मी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो का?
होय तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
हे ही नक्की वाचा..
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | Click Here |
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | Click Here |
Ladka Bhau Yojana 2024 | Click Here |
Lek Ladki Yojana | Click Here |
Lakhpati Didi Yojana | Click Here |
Silai Machine Yojana | Click Here |
Leave a comment