Vishwakarma Shram Samman Yojana

Vishwakarma Shram Samman Yojana
Vishwakarma Shram Samman Yojana

Vishwakarma Shram Samman Yojana, नमस्कार मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये विविध जाती व धर्माचे लोक राहतात आणि आपली उपजीविका चालवण्यासाठी विविध प्रकारचे व्यवसाय करतात, हे व्यवसाय ते पारंपारिक पद्धतीने करतात आणि या व्यवसायाद्वारे आपली उपजीविका चालवतात.अशाच विविध जाती व धर्माच्या लोकांचा आर्थिक दृष्ट्या विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारने एक योजना राबवली आहे.

या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे जे लोक पारंपरिक व्यवसायात गुंतलेले आहेत अशा लोकांना विकासाच्या दृष्टीने प्रोत्साहित करणे व त्यांचा आर्थिक दृष्ट्या विकास करणे असा आहे.या अनुषंगाने आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी विश्वकर्मा योजना राबवली आहे ही योजना नुकती सुरू करण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारने या योजनेला पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना असे नाव दिले आहे. या योजनेच्या अंतर्गत पारंपारिक व्यवसाय  करणारा समाज व त्यामध्ये येणारे सुमारे 140 जातींचा समावेश केला आहे.

तर चला मित्रांनो अखेर या योजनेत काय विशेष आहे ते आपण जाणून घेऊयात.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत खालील काही संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहेत

  • देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात पीएम विश्वकर्मा योजना जाहीर करण्यात आली ही योजना प्रत्येक राज्यात राबविण्यात येईल.
  • ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंती निमित्त पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली.
  • या योजनेचा लाभ हा कारागीर व शिल्पकार यांना मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत 140 जातीचा समावेश आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कुशल सन्मान योजना ही प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंती या दिवशी या योजनेची घोषणा केली. या योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे जे लोक पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करतात अशा कारागिरांना आणि शिल्पकारांना कुठल्याही प्रकारचं तारण न घेता कमी व्याजदरावर कर्ज सहाय्य करणे व त्यांच्या व्यवसायात आर्थिक दृष्ट्या वाढ करणे असा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंमलबजावणीनंतर पीएम विश्वकर्मा योजना चालू करण्यात आली या योजनेचा फायदा हा कारागीर व शिल्पकार लोकांना होणार आहे.आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ 140 जातींना या योजनेत लाभ घेता येईल, या समाजातील लोकांना ते करत असलेल्या पारंपारिक व्यवसायामध्ये कौशल्यवाढीची संधी दिली जाणार आहे त्याचबरोबर केंद्र सरकारकडून तंत्रज्ञान शिकण्यासाठी ही मदत केली जाईल.

या योजनेअंतर्गत जे लोक पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करतात असे कारागीर व शिल्पकार यांना कमीत कमी व्याजदरावर कर्ज प्रदान करून त्यांचा आर्थिक दृष्ट्या विकास करण्याचा मानस आहे. 2023 च्या अर्थसंकल्पात पारंपरिक पद्धतीने  व्यवसाय  करणाऱ्या लोकांसाठी आर्थिक सहाय्यही जाहीर केले आहे.

येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीसाठी सुमारे 13,000 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत या योजनेचा लाभ हा विणकर सोनार लोहार लॉन्ड्री कामगार आणि नावी यांच्यासह पारंपारिक कारागिरांना लाभ होणार आहे.पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करणारे कारागीरआर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याकारणाने ते त्यांच्या व्यवसायात किंवा तयार केलेल्या उत्पन्नात गुणवत्ता वाढू शकत नाहीत, त्यासाठी सरकार त्यांना वेळोवेळी तंत्रज्ञानाद्वारे प्रशिक्षणदेणार आहेत. घेतलेल्या प्रशिक्षणाद्वारे ते त्यांच्या पारंपारिक व्यवसायातील उत्पादनामध्ये गुणवत्ता वाढवू शकतात.

या योजनेअंतर्गत पारंपारिक पद्धतीने व्यावसायिक करणारे कारागीर व शिल्पकार यांना त्यांच्या कामाचे प्रशिक्षणही देण्याचे सरकारने ठरवले आहे

  • ज्या लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना सरकारने आर्थिक मदत देण्याचे ठरवले आहे.
  • या योजनेअंतर्गत समाजातील लोकांचे रोजगाराचे प्रमाण वाढवून बेरोजगाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर त्यांचा आर्थिक दृष्ट्या विकास होण्यास मदत होईल.
  • पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत शासन लोकांना त्यांच्या व्यवसायाची प्रशिक्षण देतात व दिलेल्या प्रशिक्षणामुळे त्यांच्या पारंपारिक व्यवसायात वाढ होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

Vishwakarma Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ आणि फायदे कोणकोणते आहेत हे आपण पाहूयात,

  •  योजनेत पात्र झालेल्या व्यक्तींना त्यांचे कामानुसार कौशल्य वाढवण्यासाठी अनुभवी व्यक्तीमार्फत किंवा टीचर मार्फत ट्रेनिंग दिले जाईल. 
  • प्रत्येक ट्रेनिंग दहा ते पंधरा दिवसाचे असणार आहे आणि ट्रेनिंग दरम्यान प्रत्येक लाभार्थ्यांना प्रवास भत्ता म्हणून रुपये 500 दररोज या ठिकाणी मिळणार आहेत.
  • ट्रेनिंग दोन ते तीन तासांची असेल आणि एकूण पंधरा दिवस झालेले आणि ज्यांनी ट्रेनिंग घेतलेली उमेदवार आहेत त्यांना शासनाकडून एक शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाईल. 
  • स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी रुपये 15000 हे साहित्य खरेदीसाठी मोफत दिले जाईल म्हणजे याची परतफेड तुम्हाला करायची गरज नाही.
  • अर्जदारास व्यवसाय करण्यासाठी आर्थिक गरज भासत असेल तर अशावेळी या योजनेअंतर्गत सुरुवातीला तुम्हाला एक लाख रुपये 5 % व्याजदराने मिळणार आहे. याची परतफेड जर तुम्ही चांगल्या प्रकारे केली तर पुढच्या वेळेस तुम्हाला दुसऱ्या टप्प्यांमध्ये दोन लाख रुपये, ही 5 % व्याजदर असलेल्या सवलतीने या ठिकाणी लोनस्वरूपी मिळणार आहे. जेणेकरून लाभार्थी हा सहज आपला जो व्यवसाय आहे तो या ठिकाणी वाढवू शकेल आणि त्याला आर्थिक अडचणीवर मात करता येईल.

या योजनेअंतर्गत खालील पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या कारागीर व शिल्पकार लोकांना लाभ मिळणार आहे.

  • सुतार
  • नाविक
  • लोहार
  • कुलुपांचे कारागीर
  • सोनार
  • कुंभार
  • लोहार
  • मूर्तिकार
  • मोची
  • टेलर
  • धोबी
  • मच्छीमार
  • हातोडा इत्यादी कीट बनविणारे कारागीर
  • चटई, झाडू बनविणारे कारागीर
  • लहान मुलांची खेळणी बनविणारे कारागीर
  • वारीक म्हणजेच सलूनमध्ये काम करणारे कारागीर

 पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत खालील काही पात्रता असणे आवश्यक आहे.

  • अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
  • या योजनेअंतर्गत येणाऱ्या 140 जाती अर्ज करण्यास पात्र आहेत परंतु या योजनेत नमूद केलेल्या 18 कुटुंब आधारित पारंपारिक व्यवसायांपैकी कोणत्याही व्यवसायात गुंतलेल्या आणि असंघटित क्षेत्रात हात किंवा साधनांनी काम करणाऱ्या या व्यक्ती असतील.
  • नोंदणीसाठी अर्ज करताना किमान वय 18 वर्षे असायला हवे.
  • एखाद्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असल्यास त्याने त्या व्यवसायात काम करावे लागेल व नोंदणीच्या वेळी कामाची माहिती द्यायला हवी.
  • अर्जदाराने केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही  योजनेअंतर्गत मागील काही पाच वर्षात कसल्याही प्रकारचे कर्ज घेतलेली नसावे.
  • जे लोक सरकारी सेवेत कार्यरत आहेत अशा लोकांना या योजनेत पात्र नाहीत.

पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला प्रथमतः नोंदणी फॉर्म भरावा लागेल त्यासाठी तुम्हाला दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर (https://pmvishwakarma.gov.in/Home/HowToRegister) जाऊन तुम्ही खालील काही “स्टेप” फॉलो केल्यास संबंधित माहिती भरायची आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म मिळेल.

  • अर्जदाराने प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटला जायचे आहे त्यानंतर “How to register”.या पर्यायाला क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला त्या पर्यायावर नोंदणीसाठी काही माहिती विचारली जाईल ती तुम्ही योग्यरित्या भरणे आवश्यक आहे.
  • नोंदणी करण्यासाठी मोबाईल नंबर आणि आधार कार्ड व्हेरिफाय करून घ्यावा लागेल.
  • त्यानंतर लाभार्थी नोंदणी फॉर्म ओपन झाल्यावर तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती भरून विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि शेवटी नोंदणी फॉर्म हा सबमिट करावा लागेल.

 अशा प्रकारे तुम्ही तुमच्या योजनेचा नोंदणी फॉर्म सादर करू शकता.

या योजनेअंतर्गत अर्जदाराने रजिस्ट्रेशन केलेले असल्यास लॉगिन साठी खालील पद्धतीचा अवलंब करावा.

  • पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत तुम्ही एकदा नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड मिळेल.
  • तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या संबंधित व्यवसायाबद्दल प्रशिक्षणाची माहिती मिळेल.
  • प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रमाणपत्र देखील मिळेल.
  • तुम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या संबंधित घटकासाठी अर्ज करावा लागेल.

प्रश्न:- पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना कोणी सुरू केली?

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना ही आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरू केली  व त्याची बजावणी ही पीएम नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत राबवण्यात आली.

प्रश्न:- पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना कधी सुरू झाली?

ही योजना 2023 च्या अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली व त्याची अंमलबजावणी 17 सप्टेंबर 2023 रोजी अमलात आणण्यात आली.

प्रश्न:- पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

या योजनेअंतर्गत जे लोक पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करतात असे कारागीर व शिल्पकार त्यांना आपण विश्वकर्मा समाजातील लोक असे म्हणतो अशा लोकांना लाभ मिळणार आहे.

प्रश्न:- पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र आहे?

लोहार, सोनार, कुंभार, सुतार आणि मोची यांसारखी पारंपारिक कौशल्ये असलेल्या लोक पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी पात्र आहेत

प्रश्न:- विश्वकर्मा योजनेची नोंदणी कशी करावी?

विश्वकर्मा योजनेची नोंदणी करावयास असल्यास दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर (https://pmvishwakarma.gov.in/) जाऊन तेथे तुम्ही नोंदणी करू शकता.

हे ही वाचा….👇

Leave a comment

Leave a comment