PM Solar Yojana | सोलर रुफटॉप योजना 2024

PM Solar Yojana
PM Solar Yojana

PM Solar Yojana | सोलर रुफटॉप योजना 2024 नमस्कार मित्रांनो,आपल्या भारत देशामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे होणार विजेचा अतिरिक्त वापर व त्यामुळे पारंपारिक पद्धतीने केला जाणारा पुरवठा हा हळूहळू कमी होत चालला आहे. या परिस्थितीचा विचार करून सरकारने सौर उर्जेवर अधिकाधिक विचार केला आहे, म्हणजेच पारंपारिक पद्धतीने उपलब्ध होणारा वीज पुरवठा हा अखंडित राहावा यासाठी सौर ऊर्जा ही संकल्पना सुरू करण्यात आली. या संकल्पनेचा उपयोग करून होणारा अतिरिक्त वीज पुरवठा हा भरून काढला जाऊ शकतो. सरकार देखील सौरऊर्जेला चालना देण्यासाठी सज्ज आहे.

सरकार आपल्या राज्यातील नागरिकांना सुविधा सवलती त्याचबरोबर मदत मिळावी यासाठी विविध योजना राबवत असतो अशाच एका योजनेविषयी आपण आज माहिती घेणार आहोत.

भारत सरकारद्वारे सौर ऊर्जेचा वापर करून नागरिकांना वीज पुरवठा केला जाऊ शकतो यासाठी सरकारने नागरिकांसाठी “ सोलर रुफटॉप योजना ” राबवण्याचा मनास आहे. या योजनेद्वारे ज्या लोकांची घरे हे स्लॅबची आहेत अशा लोकांच्या घरावरती सोलर पॅनल बसून त्याद्वारे निर्माण होणारे ऊर्जा ही त्यांना वापरात आणता येईल, असं केल्यामुळे होणाऱ्या पारंपारिक वीजपुरवठा कमी वापरात येईल.या योजनेमुळे मिळणारा प्रकाश हा अखंडित असतो व त्यापासून मिळणारी वीज ही सुद्धा अमर्यादित असणार आहे.सौर ऊर्जा ही आपल्यासाठी एक महत्त्वाचा स्त्रोत राहील त्यामुळे या स्तोत्राचा वापर करून आपण हवी तेवढी ऊर्जा होऊ शकतो.

आज आपण अशाच सोलर रुफटॉप योजना 2024 योजनेविषयी माहिती घेणार आहोत. या योजनेची माहिती घेण्यासाठी तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचणे गरजेचे आहे.

सोलर रूफटॉप सब्सिडी योजना या योजनेअंतर्गत खालील काही मुद्दे स्पष्ट केलेले आहेत ते आपण पाहुयात.

सोलर रूफटॉप सब्सिडी योजना मराठी आजही आपल्या भारत देशामध्ये बरेच असे लोक राहतात की जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल त्याचबरोबर कमकुवत असतात अशा लोकांना बऱ्याच वेळा लाईट बिल भरता येत नाही त्यामुळे अशा लोकांचा विचार करून आणि वाढता विजेचा वापर या सर्व बाबींचा विचार करून सरकारने सोलार रूफटॉप योजना सुरू केली आहे.

solar rooftop subsidy scheme in Marathi या योजनेअंतर्गत लोकांना कुठल्याही प्रकारचा विजेचे बिल भरण्याची गरज नाही त्यामुळे ज्या लोकांना स्वस्त पर्याय हवा होता त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत भारत सरकारकडून जे लोक या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात अशा लोकांना सोलार पॅनल बसवले जाऊन त्यांना सबसिडी सुद्धा देण्यात येते. मिळालेल्या सबसिडीमुळे सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळणार आहे. ज्या लोकांना स्वतःच्या घरावरती सौर पॅनल बसवायचे आहेत अशा लोकांना सरकार अनुदानावर सौर पॅनल उपलब्ध करून देते.

या योजनेअंतर्गत सरकार 3 किलो वॅट पर्यंत सौर रूफटॉप पॅनल स्थापनेवरती 40% आणि 3 किलो वॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत 20% अनुदान देते.

सोलर रूफटॉप सबसिडीचे खालील प्रकारे उद्दिष्टे सांगण्यात आले आहेत.

  • केंद्र सरकारच्या या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे देशात सौर ऊर्जेच्या वापरात प्रोत्साहन देणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना त्यांच्या घराच्या वरती सौर पॅनल बसवण्यास प्रवृत्त करणे.
  • या योजनेअंतर्गत लोकांनी सौर ऊर्जेचा वापर केल्यास मिळणारा पारंपारिक पद्धतीने वीजपुरवठा हा कमी प्रमाणात वापरला जाईल खंडित वीजपुरवठ्यावरती आळा बसेल.
  • सौर ऊर्जेचे वापरामुळे देशातील लोकांची विजेवरील अवलंबून राहणे कमी होणार आहे.
  • सौर ऊर्जा ही अमर्यादित असल्यामुळे वापर करण्यासाठी कुठल्याही वापरण्याची मर्यादा नाही.
  • या योजनेच्या अंमलबजावणीमुळे जनरेटर सारख्या आधुनिक उपकरणाचा वापर ही कमी होणार आहे.
  • या योजनेमध्ये नागरिकांना सबसिडी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर विज बिल कपात करणे.

सोलर रूफटॉप योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत.

  • सोलर पॅनल हा घराच्या वरती बसत असल्यामुळे त्याला लागणारी जागा खूप कमी असते आणि कुठल्याही अतिरिक्त जागेचा वापर न करता हे सोलार पॅनल बसवण्यात येते.
  • ही योजना सुरू झाल्यामुळे बरेच लोक जनरेटरचा वापर करत असतात त्यांना आता जनरेटर वापराची गरज नाही त्यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होणार आहे आणि पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही.
  • आपल्या देशातील बरेच लोक मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात त्यांना त्या व्यवसायासाठी खूप मोठ्या प्रमाणात वीज लागते त्यांच्यासाठी ही योजना खूप योग्य आहे.
  • जे लोक या योजनेचा लाभ घेतात त्यांना कुठल्याही वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या उद्भवत नाही.
  • या योजनेचा महत्वाचा फायदा म्हणजे होणारा वीज बिलावर खर्च हा कमी केला जाईल.
  • ज्या लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशा लोकांना कर लाभ सुद्धा देण्यात येतो.
  • या योजनेमध्ये लाभार्थ्याला सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे त्याला नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या खंडित विजेपासून संरक्षण मिळते.

या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थ्याला खालील प्रकारच्या पात्रता असणे आवश्यक आहेत.

  • लाभार्थ्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यासाठी अर्जदाराची वय किमान 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या नावे घर असणे आवश्यक आहे.
  • घरावरती पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.

सौर रूफटॉप या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रकारच्या कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे

  • आधार कार्ड
  • फोन नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईजचे रंगीत फोटो
  • ड्रायव्हिंग लायसन
  • लाईट बिल
  • रेशन कार्ड
  • बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
  • आयकर विवरणपत्र
  • छताचा नकाशा

Pm solar yojana apply online अर्जदाराला या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जदारांनी खालील प्रकारच्या स्टेपचा अवलंब करावा.

  • अर्जदाराने प्रथमतः अधिकृत वेबसाइटला ( येथे क्लिक करा ) भेट द्यावी
  • अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्या मुख्य पृष्ठावर जावे त्याचबरोबर आलेल्या पर्यायांमध्ये अर्जदाराचे राज्य निवडावे
  • राज्य निवडल्यानंतर अर्जदाराने कंपनी निवडावी ज्यांच्याद्वारे सौर पॅनल ग्राहक सुविधा देण्यात येत आहे
  • ग्राहक क्रमांक निवडून तुम्ही तुमच्या छतावरती सौर पॅनल बसवायचे आहे तेथील पत्ता द्यावा
  • नेक्स्ट पर्यावरण क्लिक करा.
  • नोंदणी करण्यासाठी तुमच्या मोबाईल फोनवर SANDES APP QR CODE या नावाचे एप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यावे.
  • आता मिळालेल्या एप्लीकेशन वर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा आणि ओटीपी बटन वर क्लिक करावे
  • तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी मिळेल तो टाकून सत्यापित करावा.
  • अशा प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या होमपेज वरती जावे लागेल.
  • होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉगिन विभागात जाऊन घ्या खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
  • यानंतर लॉगिन बद्दल क्लिक करा
  • अशा प्रकारे वरील प्रक्रियेच्या अनुसरण करून घरबसल्या तुम्ही ऑनलाईन करू शकता.

PM Solar Yojana चा GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रश्न :- सौर रूफटॉप योजना काय आहे?

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 ही योजना भारत सरकारने सर्व राज्यांमध्ये सुरुवात केली आहे ज्यामध्ये नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या योजनेअंतर्गत, सरकार सौर पॅनेल स्थापित करण्यासाठी अनुदान देते.

प्रश्न :- मला या योजनेचा लाभ कसा मिळू शकेल?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराची वय किमान 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या नावे घर असणे आवश्यक आहे
  • घरावरती पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.

प्रश्न :- सोलर रूफटॉप सब्सिडी योजना 2024 या योजनेला किती अनुदान मिळेल?

सोलर योजना महाराष्ट्र 2024 या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला तुमच्या सौर पॅनेल प्रणालीच्या क्षमतेवर अवलंबून असेल.

  • 1 KW पर्यंतच, 40% अनुदान उपलब्ध आहे.
  • 1 KW ते 2 KW पर्यंत 30% अनुदान उपलब्ध आहे.
  • 2 KW पेक्षा जास्त क्षमतेपर्यंत, 20% अनुदान उपलब्ध आहे.

प्रश्न :- या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेचा अर्ज करावा असल्यास दिलेल्या अधिकृत वेबसाईट द्यावी.

  • ऑनलाइन: तुम्ही https://pmsuryaghar.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.

प्रश्न :- PM Surya Ghar Yojana या योजनेचे काय फायदे आहेत?

या योजनेची खालील प्रमाणे फायदे आहेत.

  • तुम्ही तुमच्या विजेच्या बिलावर पैसे वाचवू शकता.
  • तुम्ही स्वच्छ ऊर्जा निर्माण करून पर्यावरणाला मदत करू शकता.
  • तुम्हाला सरकारकडून अनुदान मिळेल.

हे ही वाचा….👇

Leave a comment

Leave a comment