Kojagiri Purnima 2024 In Marathi

Kojagiri Purnima 2024 In Marathi
Kojagiri Purnima 2024 In Marathi

प्रस्तावना :-

Kojagiri Purnima 2024 In Marathi | Kojagiri Purnima 2024 | कोजागिरी पौर्णिमा | kojagiri purnima 2024 marathi ,ही शारदीय नवरात्रीनंतर येणारी पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा होय. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील शरद पौर्णिमा म्हणजे देखील कोजागिरी पौर्णिमाच होय. कोजागिरी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्वाचा सण मनाला जातो, या दिवशी चंद्र पूर्णपणे गोल व तेजस्वी असतो, त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व आलेले आहे. विशेष म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा सण हा संपन्नता, समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते, या दिवशी चंद्राच्या प्रकाशच्या साह्याने दूध उकळले जाते व जोपर्यंत चंद्र उकळत्या दुधामध्ये पाहिला जात नाही तोपर्यंत ते दूध कोणीही पीत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे असे केल्याने सदृढ आरोग्य लाभते असा पारंपारिक मानस आहे. हा सण विशेषतः महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यामध्ये हिंदू धर्मातील लोक हे चंद्राच्या तेजस्वी प्रकाशाची पूजा करून लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रात्रभर जागरण करतात, असे या कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आहे. 

तर चला मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा विषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी हा लेख आपण शेवटपर्यंत वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

Kojagiri Purnima 2024 In Marathi:- सविस्तर माहिती

कोजागिरी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या सणाला शरद पौर्णिमा असेही मानले जाते, यावर्षी (kojagiri purnima 2024 date) 16 ऑक्टोंबर 2024 रोजी साजरी करण्यात येणार आहे.या शरद पौर्णिमेदिवशी चंद्र हा पूर्णपणे प्रकाशमय असतो व रात्री बारा वाजता मधोमध आल्यानंतर त्याच्या प्रकाशित किरणे हे एका सरळ रेषेमध्ये पृथ्वीवर येत असतात, याचा अनुषंगाने लोक हे दूध, खीर असे पदार्थ बनवतात व रात्री बाराच्या दरम्यान या सूर्यप्रकाशाचे किरणे या पदार्थावर पडल्यानंतर ते सेवन करतात. असे केल्यामुळे आरोग्य चांगले राहते व असलेली दारिद्र्य ही कमी होते त्याचबरोबर या पदार्थाचे सेवन केल्यामुळे देवी लक्ष्मी माता कृपादृष्टी कायम ठेवते. असाही पारंपारिक पद्धतीने सांगण्यात आले आहे. आधुनिक काळामध्ये कोजागिरी पौर्णिमेचे महत्व हे तितकेच वाढलेले दिसत आहे म्हणजेच की आधुनिक काळातील लोक हे कोजागिरी पौर्णिमा आधुनिक पद्धतीने साजरी करतात, म्हणजेच की नृत्य, गाणी म्हणणे, विविध कार्यक्रम आयोजित करणे अशा पद्धतीने ही कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते.

Kojagiri Purnima 2024 In Marathi
Kojagiri Purnima 2024 In Marathi

Kojagiri Purnima 2024 In Marathi:- कोजागिरी पौर्णिमेचा(शरद पौर्णिमा) अर्थ

“कोजागिरी” हा शब्द संस्कृत भाषेतून तयार झालेला शब्द आहे कोजागिरी म्हणजे “कोजागृती” असे होय आणि कोजागृतीचा मराठी भाषेमध्ये असा अर्थ होतो की कोण जाग आहे?. पारंपरिक रूढी परंपरेनुसार या दिवशी लक्ष्मी माता रात्री पृथ्वीवर उतरतात व लोकांवर आपली कृपादृष्टी करतात. जे लोक या दिवशी जागरण करतात त्यांच्या घरात सुख-समृद्धी ही या दिवशी लक्ष्मी मातेच्या कृपेने येते असाही मानस आहे. आज जरी हे जग आधुनिक पद्धतीने जगत असले तरी आजही ही प्रथा जिवंत आहे. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत आधुनिक काळातील कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय उत्साही व मनोभावाने साजरी करण्यात येतानाचे दृश्य दिसत आहे.

Kojagiri Purnima 2024 In Marathi
Kojagiri Purnima 2024 In Marathi

Kojagiri Purnima 2024 In Marathi:- पौराणिक कथा कथा आणि परंपरा

कोजागिरी पौर्णिमेदिवशी नेमके काय झाले होते आणि कोणत्या पौराणिक कथा आहेत ते आपण पाहूयात. 

  1. लक्ष्मी माता कथा: लक्ष्मी कथा सर्वात महत्त्वाची कथा मानली जाते असे म्हणतात, की शरद पौर्णिमेला लक्ष्मीमाता ही पृथ्वीवर येथे व जे लोक रात्रभर जागरण करत असतात, त्यांना धन, समृद्धी व संपत्ती प्रदान करते त्यामुळे या दिवशी सर्व लोक रात्रभर जागरण करत असतात बरेच लोक या दिवशी लक्ष्मी मातेची विशेष पूजा देखील करतात.
  2. चंद्रप्रकाश कथा:दुसरी कथा म्हणजे या दिवशी चंद्र हा पूर्णपणे प्रकाशमय असतो त्यामुळे चंद्राची किरणे हे रात्री बाराच्या नंतर सरळ रेषेमध्ये पृथ्वीवर प्रकाशमय होतात. त्यामुळे या दिवशी सर्व लोक दूध, खीर असे पदार्थ बनवून त्या सूर्यकिरणाला त्यांच्यामध्ये समाविष्ट करतात व त्याचे सेवन करतात. असे केल्याने शरीरातील रोग नष्ट होतात असे मानले जाते.
  3. कृष्ण गोपिका कथा: तिसरी कथा म्हणजे कृष्ण गोपिका कथा असे म्हणले की श्रीकृष्णाने गोपिका सोबत रासलीला केली होती. तो दिवस शरद पौर्णिमेचा दिवस होता म्हणून त्या दिवशी भगवान कृष्ण देवांची देखील पूजा करण्यात येते.

Kojagiri Purnima 2024 In Marathi:- धार्मिक महत्त्व

कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा हा एक फक्त धार्मिक सण नसून त्यामध्ये पारंपरिक पद्धतीमधील रूढी व परंपरा देखील समाविष्ट आहेत, जसे की धार्मिक कृती व विविध पद्धतीची कृती करण्यात येते, असे केल्यामुळे श्रद्धा व भक्ती जागृत होण्यास मदत होते.

  1. लक्ष्मी मातेची पूजा: कोजागिरी पौर्णिमे दिवशी लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा केली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी लक्ष्मी माता ही पृथ्वीवरती विराजमान होते. त्यामुळे या लक्ष्मीदेवीची पूजा करून देवीला प्रसन्न करण्याचा मानस देखील असतो व देवी कडून सुख-समृद्धी व शांतीचा आशीर्वाद मिळवणे हा होय.
  2. जागरणप्रथा: कोजागिरी पौर्णिमेदिवशी लोक हे रात्रभर जागरण करतात रात्रभर जागरण करत असताना विविध नृत्य, गाणी, भजन, कीर्तन असे उपक्रम राबतात जेणेकरून या धार्मिक गीतातून व भजन कीर्तनातून या कोजगिरी पौर्णिमेचा आनंद साजरा करता यावा. त्याचबरोबर देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करता यावं यासाठी देखील असे उपक्रम राबवण्यात येतात.
  3. दुधाचे महत्त्व: या दिवशी सर्व लोक दुध उकळून त्यामध्ये केशर, विलायची, इतर मसाले टाकून त्यामध्ये चंद्र दर्शन करून पिण्याची प्रथा पूर्ण करतात. असे मानले जाते की चंद्रप्रकाशात उकळलेले दूध हे शरीरासाठी अतिशय पौष्टिक असते त्याचबरोबर शरीरातील असलेले रोग नष्ट करण्याची या किरणामध्ये क्षमता असते. दूध व खीर असे पदार्थ तयार करून सेवन केल्या जातात. ही विधी धार्मिक आणि आरोग्यदायी असा दुहेरी महत्त्वाची आहे.

Kojagiri Purnima 2024 In Marathi:- सांस्कृतिक महत्त्व

Kojagiri Purnima 2024 हा सण केवळ धार्मिक सण नसून त्याला संस्कृतिक महत्त्व देखील प्रधान झाले आहे. भारतामध्ये विविध प्रांतामध्ये या सणाची वेगळेच महत्व असते व त्या भागात पारंपारिक रूढी परंपरेनुसार प्रमाणे साजरी करण्यात येते.

  1. समता व एकत्रिता: कोजागिरी पौर्णिमे दिवशी प्रत्येक गावात शहरात आजूबाजूचे शेजारी लोक, मित्रमंडळी एकत्र येऊन खूप मोठ्या प्रमाणात दूध गोळा करून नृत्य, विविध गाणी, त्याचबरोबर कीर्तने, भजन असे उपक्रम राबवून हा सण साजरा करतात. यामधून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते म्हणजे समता व एकत्रित वाढवण्याचे काम देखील या पौर्णिमेच्या माध्यमातून होताना दिसून येत आहेत.
  2. कलाकृती सादर करणे: कोजागिरी पौर्णिमे दिवशी एकत्र आलेल्या सर्व लोकांनी त्यांच्या अंगी असलेल्या कलाचे प्रदर्शन केले जाते, असे केल्यामुळे ज्या लोकांच्या अंगी विशिष्ट कला आहे ही कला सादर करण्यासाठी वाव मिळतो व या कलेच्या माध्यमातून लोकांना आनंद देखील घेता येतो.
  3. विविध स्पर्धेचे आयोजन: कोजागिरी पौर्णिमे दिवशी विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते व या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सहभागी घेणारे व्यक्तीस विशिष्ट पारितोषक देण्यात येते त्यामुळे या सणाला संस्कृतिक महत्त्व देखील मिळाले आहे.

Kojagiri Purnima 2024 In Marathi:- आरोग्यदायी महत्त्व

Sharad Purnima फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक असेही म्हणता येणार नाही तर या पौर्णिमेला आरोग्यदायी महत्त्व देखील प्राप्त झाले.

  1. चंद्रकिरण: कोजागिरी पौर्णिमे दिवशी चंद्र हा पूर्णपणे प्रकाशमय असतो, त्यामुळे त्याची किरणे देखील तेवढीच प्रकाशमय असतात. ही किरणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. या दिवशी दूध किंवा खिरेमध्ये चंद्र पाहून पिल्याने शरीरातील दोषाचे निवारण होण्यास मदत होते, अशी पारंपारिक रूढ आहे. आयुर्वेदिक नियमानुसार चंद्रकिरणे शरीरासाठी व मानसिक संतुलनासाठी अतिशय गुणकारी असतात. 
  2. पित्त दोष निवारण: शरद पौर्णिमेदिवशी ज्या लोकांना पित्तदोष असे आजार आहेत, अशा लोकांनी या दिवशी चंद्रकिरण पाहून दूध प्राशन केले असता पित्तदोष नष्ट होण्यास मदत होते त्यामुळे या दिवशी पित्तदोषाच्या लोकांनी अवश्य चंद्रकिरण पाहून दूध प्राशन करणे अनिवार्य आहे.
  3. मानसिक संतुलन स्थिरता: कोजागिरी पौर्णिमे दिवशी चंद्र हा अतिशय प्रकाश्मय असतो त्यामुळे त्याची किरणे देखील मानसिक संतुलन स्थिर करण्यासाठी मदत करतात.

Kojagiri Purnima 2024 In Marathi:- कोजागिरी पौर्णिमा

Kojagari Laxmi Puja 2024 आजही आपल्या भारत देशामध्ये कोजागिरी पौर्णिमेचे महत्व कमी झाले नसून आधुनिक काळामध्ये वाढल्याचे दिसून येत आहे या दिवशी आजही लोक लक्ष्मीपूजन करतात त्याच बरोबर चंद्र प्रकाशाच्या सानिध्यामध्ये दूध प्राशन करून आपल्या शरीरातील रोग नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात. 

  • शहरातील व गावातील कोजागिरी सण: कोजागिरी पौर्णिमे दिवशी शहरी भागातील लोक हे आपल्या असलेल्या शेजारी, मित्रमंडळी, कुटुंब परिवार यांना एकत्र करून खूप मोठ्या प्रमाणात दूध आणून ते दूध एका ठिकाणी उकळतात व ते प्राशन करतात बऱ्याच वेळा विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते. काही शहरी भागात इमारतीच्या गच्चीवर किंवा अपार्टमेंटच्या मोकळ्या ठिकाणी हा कार्यक्रम राबविण्यात येतो. या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येते. 
  • गावातील कोजागिरी पौर्णिमा: ही, गावातील असलेली सर्व लोक एखाद्या मंदिराच्या मोकळ्या ठिकाणी येऊन खूप मोठ्या प्रमाणात दूध साठवून ते उकळतात व कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात.गावाच्या ठिकाणी भजन, कीर्तन त्याचबरोबर विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतात व गावातील लोक कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात.

सरकारी योजनाक्लिक करा
केंद्र शासन योजनाक्लिक करा
शासन निर्णयक्लिक करा
टेलाग्रामला जॉइनक्लिक करा

Kojagiri Purnima 2024 In Marathi:- FAQs

1. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय?

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शारदीय पौर्णिमा होय, या दिवशी दूध व खीर तयार करून त्याचे सेवन केले जाते व हे केलेले सेवन आरोग्यासाठी चांगले असते. या दिवशी लक्ष्मी मातेची देखील पूजा केली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवरती विराजमान होते, त्यामुळे सर्व लोक रात्रभर जागरण करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याची एक प्रथा आहे.

2.कोजागिरी पौर्णिमा 2024 मध्ये कधी साजरी होईल ? 

कोजागिरी पौर्णिमा ही 2024 मध्ये 16 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येईल.

3. कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात?

कोजागिरी पौर्णिमा साजरी केल्यामुळे लक्ष्मी देवी जे लोक जागरण करतात अशा भक्तावरती प्रसन्न होते, त्याचबरोबर चंद्रप्रकाशच्या सानिध्यामध्ये दूध प्राशन केल्यानंतर शरीरातील रोग नष्ट होतात म्हणून ही पौर्णिमा साजरी केली जाते.

4. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दुध का पितात आहे?

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्णपणे प्रकाशमय असतो व चंद्राचे किरण हे दुधामध्ये पाहून दूध प्राशन केल्यानंतर शरीराला अतिशय गुणकारी परिणाम मिळतो त्यामुळे पौर्णिमेच्या रात्री दूध पिण्याची परंपरा आहे. 

5. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या देववीची पूजा केली जाते?

कोजागिरी पौर्णिमे दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते व देवीला प्रसन्न करून तिच्याकडून आशीर्वाद देखील संपन्न केला जातो.

हे ही नक्की वाचा…👇👇👇👇

Shaikshanik Loan Yojana 2024येथे क्लिक करा
PM Internship Scheme 2024 In Marathiयेथे क्लिक करा
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024येथे क्लिक करा
Smart Meter Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024येथे क्लिक करा
Saur Kumpan Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा
Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024येथे क्लिक करा
PM Pranam Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा
Mahila Samman Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment