Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना मानली जाते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वीज पुरवठा ही मोफत देण्याचा निर्णय शासनाचा आहे. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असल्यामुळे बळीराजा हा देशाचा कणा मानला जातो. या बळीराजाला संतुष्ट करण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारणे हा आहे.

मोफत वीज योजनेचा लाभ नेमका कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे तर मित्रहो 25 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊजा, कामगार व खनिकर्म विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे, मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याची दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राज्यामध्ये घोषित करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून, राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या साडेसात 7.5 एचपी क्षमतेपर्यंतच्या शेती पंंपाना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल याकरिता 14760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतकरी हा आपल्या राष्ट्राचा कणा मानला जातो.गेल्या काही वर्षात आढावा घेतला असता शेतकऱ्याला बऱ्याच आव्हानाला सामोरे जावे लागले आहे जसे की असंतुलित, पाऊस कमी पाऊस किंवा अतिवृष्टी यामुळे शेतकरी वर्ग हा खूप अतिदृष्ट्या आणलेला दिसत आहे या बाबीचा विचार करता राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अमलात आणली आहे या योजनेअंतर्गत राज्य शासनाने राज्यातील 7.5 एचपी पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मोफत पुरवठा करण्याची धोरण ठरवली आहे

मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना या मध्ये शेतकऱ्यावर येणाऱ्या वीज बिलाचा भार राज्य सरकारने उचलण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची कृषी पंप पाणी नसल्याकारणाने बंद दिसून येतात,या योजनेमुळे अनेक कृषी पंपांना वीज बिलातून सुटका करण्यात आलेली असून आता या कृषी पंपांना मोफत वीज शासनाकडून दिल्या जाणार आहे. 

मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की थकीत विज बिल माफ करण्यात आलेले नसून तर इथून पुढचे जे विज बिल येणार आहे ते या ठिकाणी मोफत करण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे मागील थकीत विज बिल आहे ते मात्र त्यांना भरावे लागणार आहे. एकापेक्षा जास्त कृषी पंप करीता वीज घेतलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये जितक्या वीज जोडण्या असतील 7.5 एचपी  व त्याखालील वीज जोडण्याकरिता विज बिल शासनाकडून आकारल्या जाणार नाही,आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे का? तर याचे उत्तर आहे ते म्हणजे, कृषी पंपाचे वीज जोडणी घेतानाच ती वीज जोडणे कृषी पंपाची आहे, याची सविस्तर माहित विद्युत विभागाकडे नमूद असते. यामुळे कोणती बीज जोडणी कृषी पंपाची आहे व ती किती एचपी ची आहे याची माहिती शासनाकडे या आधीच उपलब्ध आहे यामुळे शेतकऱ्यांना स्वतः अर्ज करण्याची आवश्यकता नसून 7.5 एचपी  पर्यंतच्या कृषी पंपाची विज बिल शासनाकडून त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या आधारावर ग्राह्य धरली जाणार आहे.

अ. क्र.योजनासुरुवात
1.योजनेचे नावमुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना.
2.कोणी सुरुवात केलीमहाराष्ट्र शासना अंतर्गत.
3.कधी सुरुवात केली25 जुलै 2024.
4.लाभार्थीकृषीपंप धारक 7.5 एचपी पर्यंत चे सर्व शेतकरी.
5.Official Website Linkअद्याप जाहीर झाली नाही.

नुकत्याच जुलै 2024 मधील झालेल्या पावसाळी अधिवेशनात असे जाहीर करण्यात आले आहे की,सदरील योजना ही पाच वर्षासाठी असणार आहे.या योजनेचा कार्यकाळ वर्ष हे एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राहील सदरील योजनेच्या काळातील 3 वर्षानंतर योजनांचा आढावा घेऊन पुढील 2 वर्षासाठी ही योजना राबविण्यात बाबत निर्णय घेण्याचा स्पष्टपणे सांगण्यात आला आहे, म्हणजेच की 2027 पर्यंत शेतकऱ्याला वीज मोफत देण्याचे निश्चित आहे,परंतु 2027 नंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील वर्षासाठी योजना लागू करणे किंवा काही बदल करणे हे त्यावेळेस ठरवण्यात येईल.

मुख्यमंत्री मोफत वीज योजना 2024 या योजनेअंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार सदर योजनेची जबाबदारी ही महावितरण कंपनीची आहे या योजनेबद्दल आवश्यक ती कार्यपद्धती कशी अमलात येईल याची जबाबदारी महावितरण कंपनी कडे दिली आहे व त्याबाबतचा अहवाल हा राज्य शासनाकडे सादर करण्यास सांगितला आहे.

या योजनेबाबत  लागणारी आवश्यक ती माहिती त्याच बरोबर ग्राहक माहिती महावितरण कंपनीने राज्य शासनाकडे सादर करणे अनिवार्य आहे मिळालेल्या माहितीनुसार महावितरण कंपनीने जिल्हा निहाय यादी सादर करून ही योजना लवकरात लवकर कशी अमलात आणता येईल याचा विचार करण्यास सांगितले आहे. 

या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास खालील प्रकारची पात्रता असणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गासाठी आहे.
  • राज्यातील 7.5 एचपी पर्यंत शेतीपंपाचा वापर करणारे सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. 
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी वीज जोडणी आणि स्वतःचे नावे असलेले लाईट बिल असावे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत खालील प्रकारचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड.
  • रहिवाशी प्रमाणपत्र.
  • किसान कार्ड.
  • लाईट बिल.
  • मोबाईल नंबर.
  • पासपोर्ट साईजचा फोटो.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे का? तर याचे उत्तर आहे ते म्हणजे कृषी पंपाचे वीज जोडणी घेतानाच ती वीज जोडणे कृषी पंपाची आहे, याची सविस्तर माहित विद्युत विभागाकडे नमूद असते. यामुळे कोणती वीज जोडणी कृषी पंपाची आहे व ती किती एचपी ची आहे याची माहिती शासनाकडे या आधीच उपलब्ध आहे यामुळे शेतकऱ्यांना स्वतः अर्ज करण्याची आवश्यकता नसून 7.5 एचपी पर्यंतच्या कृषी पंपाची विज बिल शासनाकडून त्यांच्याकडे उपलब्ध माहितीनुसार मग माफ करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा किंवा त्या संदर्भातील कसलेही प्रकारची माहिती अद्याप सादर झालेली नाही, सदरील योजनेबद्दल माहिती आम्हास मिळाल्यास आम्ही या लेखाद्वारे आपणास नक्की आपणास कळवू.

आम्ही सादर केलेल्या माहितीनुसार जर काही त्रुटी किंवा शंका असतील तर आम्हाला नक्की कमेंट द्वारे कळवा. 

शासन जीआर पाहण्यासाठीयेथे क्लिक करा.

प्रश्न:मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कोणी सुरू केली? 

उत्तर:- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. 

प्रश्न:-मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या योजनेसाठी कोण पात्र आहे? 

उत्तर:- या योजनेसाठी वीज धारक शेतकरी त्याचबरोबर ज्याचे 7.5 एचपी पर्यंत कनेक्शन आहे असे लोक पात्र आहेत. 

प्रश्न:- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अर्ज कसा भरावा?

उत्तर:- या योजनेचा अर्ज भरण्यासाठी कुठलेही संकेतस्थळ अद्याप उपलब्ध नाही मिळालेल्या माहितीनुसार तुमचे वीज कनेक्शन ची सर्व माहिती महावितरण कंपनीकडे असल्यामुळे त्या आधारावर तुमचे वीज बिल माफ करण्यात येणार आहे. 

प्रश्न:- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे का?

उत्तर:- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी आहे ज्या शेतकऱ्याचे कृषी पंप 7.5 एचपी पर्यंत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्यात येणार आहे. 

प्रश्न:-  मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना शहरी भागात लागू आहे का?

उत्तर:- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही फक्त ग्रामीण तसेच शेतकरी वर्गासाठी आहे. 

प्रश्न:- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कधी लागू होणार आहे?

उत्तर:- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही 25 जुलै 2024 आलेल्या शासन निर्णयानुसार महावितरण कंपनीला लवकरात लवकर लागू  करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

हे ही नक्की पहा..

Leave a comment

Leave a comment