Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojana

प्रस्तावना :-

Lek Ladki Yojana नमस्कार मित्रांनो, तर चला आपण आज एक नवीन योजनेविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लेक लाडकी योजना ही एक योजना आहे या योजनेमध्ये गरीब व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाकडून एक लाख एक हजार रुपये आर्थिक  मदत जाहीर  करण्यात येणार आहे. या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे की ज्या मुली आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत किंवा मागास आहेत त्यांना त्यांचा भविष्यासाठी लागणारा खर्च हा भागवता येईल हा आहे.

 2023-2024 च्या अर्थसंकल्पातआपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केली आहे. 2023 च्या अर्थसंकल्पात ज्या मुली गरीब आहेत अशा 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना रुपये 75 हजार रोख रक्कम देण्याचेही जाहीर केले आहे.

लेक लाडकी योजना 2024 विशेषतः मुलींसाठीच सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत  ही सरकारकडून जाहीर करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ हा फक्त मुलींसाठी आहे अशा मुली ज्या आर्थिक दृष्ट्या गरीब व मागास आहेत.

लेक लाडकी योजनेअंतर्गत लागणारे कागदपत्र पात्रता फायदे या सर्व गोष्टींचा विचार आपण या लेखात करणार आहोत त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

Lek ladki yojana marathi

लेक लाडकी योजना 2024 अंतर्गत जर या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास 1 एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म झाल्यास त्या मुलीच्या जन्माची नोंद ही ग्रामीण  किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये असायला हवी, त्यानंतर त्या नोंदीची आवश्यकता कागदपत्रे अंगणवाडीतील सेविकेजवळ सादर करावीत.

लेक लाडकी योजना या योजनेची अंमलबजावणी 2023-2024 यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केली आहे या योजनेमध्ये ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब व मागास आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमध्ये मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंत एकूण 5 हप्त्यांमध्ये आर्थिक मदत करण्यात येईल.

Lek Ladki Yojana Marathi ज्या मुली आर्थिक लाभासाठी पात्र असतील अशा मुली ते त्यांचे उज्वल भविष्य सुरक्षित करू शकतात जेणेकरून शिक्षणामध्ये प्रगती करून रोजगार व तंत्रज्ञान क्षेत्रात यशाची नवीन शिखरे गाठण्यास मदत होईल.

या योजनेमुळे मुलींचा सामाजिक स्तरांमध्ये प्रगती होऊन स्त्रीभ्रूणहत्या कमी  होण्यास मदत होईल.

Lek Ladki Yojana Keypoints :- मुद्दे

Lek Ladki Yojana 2024 :- उद्दिष्ट

महाराष्ट्र राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेचे खालील प्रकारचे उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले आहेत.

  • आर्थिक दृष्ट्या गरीब व मागास मुलींना आर्थिक मदत करून देणे, त्याचबरोबर या मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब मागास असलेल्या अशिक्षित मुलींना शिक्षण देऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
  • आर्थिक दृष्ट्या या मुलींना मदत करून स्त्रीभृणहत्या पासून संरक्षण करणे.
  • या योजनेतून आर्थिक दृष्ट्या मदत करून त्या मुलींना स्वावलंबी बनवणे.
  • अंतर्गत मुलींना उच्च व दर्जेदार शिक्षण देणे.
  • केलेल्या आर्थिक मदतीमुळे ते स्वावलंबी बनून ते भविष्यासाठी योग्य दिशा निवडतील.
  • या योजनेअंतर्गत मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहून आपले भविष्य उज्वल करण्यास मदत करणे.

Lek Ladki Yojana Benifts :- फायदे

महाराष्ट्र लेक लाडकी 2024 या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व गरीब आणि मागास मुलींना शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे.

  • लेक लाडकी योजनेअंतर्गत गरीब कुटुंबात जर मुलगी जन्मास आली तर तिला जन्मल्यानंतर रुपये 5000 रुपये मिळतात.
  • या  योजनेअंतर्गत जर मुलगी पहिली वर्गात जाणार असेल तर तिला रुपये 6000 मिळतात.
  • जेव्हा मुलगी सहावीच्या वर्गात प्रवेश करते त्यावेळेस तिला 7000 रुपये मिळतात
  • या योजनेअंतर्गत जर मुलगी अकरावी मध्ये प्रवेश करणार असेल त्यावेळेस तिला रुपये 8000  मिळतात.
  • आता जेव्हा मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईल तेव्हा तिला पुढील अभ्यासासाठी रुपये 75000 मिळतात.
  • या योजनेअंतर्गत मुलीला चांगले शिक्षण मिळाल्यामुळे तिला रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होणार आहे.

Lek Ladki Yojana :- लाभाचे स्वरूप

 लेक लाडकी योजनेअंतर्गत खालील टप्प्यात लभाचे वाटप केले जाणार आहेत.

अ. क्र.मुलीचे वयमिळणारी रक्कम
1मुलीच्या जन्मावर₹ 5000
2पहिली वर्गात प्रवेश घेण्यासाठी₹ 6000
3सहाव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी₹ 7000
4अकरावीत प्रवेश घेण्यासाठी₹ 8000
5मुलगी 18 वर्षांची झाल्यावर₹ 75000
6एकूण प्राप्त रक्कम
₹101000 (एक लाख एक हजार रुपये)

Lek Ladki Yojana Eligibility :- पात्रता

महाराष्ट्र लेक लाडकी योजना पात्रता योजनेअंतर्गत खालील काही सरकारने पात्रता ठरवून दिल्या आहेत ते आपण पाहूयात.

  • लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी ही महाराष्ट्राची असावी.
  • या योजनेअंतर्गत त्या मुलीच्या कुटुंबाचे शिधापत्रिका ही पिवळी किंवा केसरी रंगाची असावी.
  • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कुटुंबप्रमुख हा गरीब किंवा मागास असावा.
  • लेक लाडकी योजना अंतर्गत कुटुंब प्रमुखाकडे कसल्याही प्रकारचे चार चाकी वाहन नसावी.
  • या योजनेअंतर्गत कुटुंबप्रमुखांनी कसल्याही प्रकारचा कर भरलेला नसावा.
  • अर्जदार हा कुठल्याही खाजगी किंवा सरकारी कार्यालयात कार्यरत  नसावा.
  • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 पेक्षा जास्त नसावी.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील आई किंवा वडील यांनी दुसऱ्या अपत्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा एक मुलगी असल्यास त्यांना योजनेचा लाभ घेता येतो.
  • दुसऱ्या प्रस्तुतिच्या वेळेस जर जुळी आपत्ती जन्मल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Lek Ladki Yojana Document :- कागदपत्रे

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 कागदपत्रे या योजनेअंतर्गत खालील प्रकारचे सर्व  कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • शिधापत्रिका पिवळ्या किंवा  केशरी रंगाचे.
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  • लाभार्थ्याच्या आईचे आधार कार्ड.
  • लाभार्थ्याचा जन्माचा दाखला
  • लाभार्थ्याची आयात नसल्यास पालकाचे आधार कार्ड
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखला.
  • कुटुंब नियोजन  प्रमाणपत्र.
  • लाभार्थ्याच्या शाळेचे बोनाफाईड  प्रमाण प्रमाणपत्र
  • पाचवा हप्ता घेण्यासाठी अविवाहित असल्याबद्दल लाभार्थ्याची प्रमाणपत्र
  • स्वयघोषणा प्रमाणपत्र
  • बँक पासबुक झेरॉक्स.
  • मतदान ओळखपत्र.

Lek Ladki Yojana :- वैशिष्ट्ये

आपण आता खालील प्रकारचे वैशिष्ट्ये पाहणार आहोत.

  • आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीला लाभ मिळणार आहे.
  • मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा आर्थिक मदत मिळणार आहे.
  • मुलीच्या पालकाचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • मिळालेल्या लाभांमुळे मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचण येणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म हा सरकारी रुग्णालयात झाला  पाहिजे.
  • या योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभांमुळे गरीब कुटुंबातील लोकांना मुलीचा जन्म होणे हे ओझे मानता येणार नाही.
  • ही योजना राबवल्यामुळे गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत होईल व तिचे भविष्य उज्वल होईल.
  • समाजामध्ये मुलगी म्हटलं की एक विषमता निर्माण झालेली आहे त्यामुळे ही विषमता दूर होईल.
  • लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभ मिळाल्यामुळे समाजामध्ये सकारात्मक विचार विकसित होईल.

Lek Ladki Yojana 2023 Online Apply

महाराष्ट्र शासनाच्या lek ladki yojana marathi योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज दाखल करायचा असल्यास त्यासाठी काही गोष्टीची पूर्तता होणे आवश्यक आहे त्या खालील प्रमाणे आहेत.

  • लेक लाडकी घोषणा अर्ज सादर करण्यासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म झालेला असावा
  • मुलीचे जन्माची नोंद ही संबंधित ग्रामीण किंवा नागरिक क्षेत्रातील संस्थेत असावी.
  • केलेली नोंदी व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेवेकडे सादर करणे गरजेचे आहे.
  • या योजनेसाठी सर्व अर्ज राज्यातील ग्रामीण आणि नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा कार्यक्रमाधिकारी जिल्हा परिषद जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विभागीय उपायुक्त महिला बाल विकास कार्यालयात उपलब्ध आहेत.

Lek Ladki Yojana 2024 FAQ.

लेक लाडकी योजना काय आहे?

लेक लाडकी योजनाही महाराष्ट्र सरकारने चालू केलेली योजना आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या गरीब व मागास कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत देण्यात येते.या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत सर्व खर्च सरकार पाच हप्त्यामध्ये देतात आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण आल्यात एक रकमे 75000  देतात.

लेक लाडकी योजना कधी सुरू झाली?

लेक लाडकी योजनाही महाराष्ट्र सरकारच्या 2023-2024 च्या अर्थसंकल्पातमंजूर करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणी 1 एप्रिल 2023 करण्यात आली.

लेक लाडकी योजना 2023 चे फॉर्म कसे मिळवायचे.?(Lek ladki yojana 2023 online apply)

राज्यातील ग्रामीण आणि नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम,जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास कार्यालयात उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेत किती पैसे मिळणार?

लेक लाडकी योजनेअंतर्गत एकूण 1,01,000 रुपये मिळणार आहेत. ते पाच टप्प्यात मिळतात.

लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे?

लेक लाडकी योजनेसाठी फक्त मुली पात्र आहेत तेही अशा मुली ज्या अर्थी दृष्ट्या गरीब आणि मागास आहेत आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका आहे.

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?

लेक लाडकी योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथमतः अंगणवाडी  सेविकेकडे सादर करावा लागेल.

Lek Ladki Yojana Online Apply

हे ही नक्की वाचा...

Leave a comment

Leave a comment