प्रस्तावना :-
Lakhpati Didi Yojana नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वेळोवेळी महिलांना विविध योजना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करत असते तर चला मित्रांनो आज आपण अशाच एका नवीन योजनेविषयी माहिती घेऊयात, नुकत्याच झालेल्या आर्थिक संकल्पना मध्ये आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात लखपती विधी योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
ही योजना नेमकी काय आहे, याबद्दल आपण या पाहणार आहोत. ही योजना महिलांसाठी आहे आणि या योजनेची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 या रोजी घोषणा केली आहे. ही योजना सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक गावात गावात अंगणवाडी वाली दीदी, बँक वाली दीदी, दवाखान्यावाली दीदी, असे असतात तसेच प्रत्येक गावात लखपती दीदी असायला पाहिजे म्हणून, ही योजना राबविण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे व फक्त आर्थिक मदतच नाही तर त्यांना प्रशिक्षण देखील दिले जाते त्यात प्लंबिंग, एलईडी बल्ब, बनवणे तसेच ड्रोन चालवणे याबद्दलची प्रशिक्षण दिले जाते.
यासाठी एकूण 83 लाख स्वयंसहायता गट कार्यान्वित असून याद्वारे ट्रेनिंग दिले जात आहे, तसेच महिलांच्या आर्थिक परिस्थिती पाहणी करून 5,00,000 लाखापर्यंत पैसे देखील दिले जातात.
Lakhpati Didi Yojana Maharashtra
लखपती दीदी योजना ही योजना 15 ऑगस्ट 2003 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली ही योजना महिलांच्या स्वयंसाहाय्यता गटाशी संबंधित आहे व या योजनेअंतर्गत तीन कोटी महिलांना स्वयं रोजगार निर्माण करून देण्याचे उद्दिष्टे केंद्र शासनाचे आहे. महिलांसाठी एक ते दीड लाख रुपये बिनव्याजी आर्थिक मदत म्हणून मिळतात. केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली लखपती दीदी योजना मित्रांनो नुकत्याच देशांमध्ये 77 व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बऱ्याचश्या योजनांच्या घोषणा केलेल्या आहेत त्याच पैकी ही एक योजना आहे तिचं नाव आहे, लखपती दीदी योजना ही योजना काही राज्यांमध्ये खूप आधीपासूनच सुरू आहे मित्रांनो पण या योजनेमध्ये सरकारने अजून अपडेट केलेला आहे आता केंद्र शासनाकडून दोन करोड महिलांना लखपती बनवण्यासाठी ही योजना पुन्हा एकदा अपडेट केलेले आहे. पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे
मित्रांनो आपल्या देशातील महिला या खेड्यापासून शहरापर्यंत कुठल्याही क्षेत्रामध्ये अगदी अग्रस्थानी काम करताना दिसून येतात प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व गाजवणाऱ्या या महिला अशा महिलांसाठी आपले पंतप्रधान देशाला संबोधित करत असताना म्हणाले की गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना विविध कौशल्याचा प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्टा सक्षम व स्वावलंबी बनवून त्यांना लखपती करणे आहे
मित्रांनो प्रशिक्षणामध्ये महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब, निर्मिती चालवणे विविध यंत्र दुरुस्ती अशा प्रकारची विविध कौशल्य प्रशिक्षणातून देण्यात येणार आहे मित्रांनो शासनाच्या या निर्णयामुळे महिलांच्या कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे त्यामुळे महिला सक्षम व स्वावलंबी बनतील आणि हाच एकमेव उद्देश आहे.
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 Key Points
अ. क्र. | योजनेचे नाव काय | Lakhpati Didi Yojana |
1 | योजनेचा महत्त्वाचा उद्देश काय | बचत गटांशी संबंधित असलेल्या ३ कोटी महिलांना विविध कौशल्याचा प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्टा सक्षम व स्वावलंबी बनवणे. |
2 | योजनेची सुरुवात | 15 ऑगस्ट 2023. |
3 | कोणी सुरुवात केली. | केंद्र सरकार |
4 | योजना मंत्रालय | ग्रामीण विकास मंत्रालय |
5 | योजनेचे लाभार्थी | देशातील सर्व महिला बचत गटांशी संबंधित आहेत, आशा महिलांचा समावेश केला जातो. |
6 | अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
7 | अधिकृत संकेतस्थळ | https://www.india.gov.in/spotlight/lakhpati-didi-portal |
Lakhpati Didi Yojana Benifits :- फायदे
- लखपती दीदी योजना ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ज्या महिला उद्योजक बनू इच्छितात अशा महिलांना व्यवसाय करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन त्याचबरोबर आर्थिक सहाय्य करणे.
- या योजनेअंतर्गत ज्या महिला कर्ज घेऊ इच्छितात अशा महिलांना महिला बचत गटांतर्गत कर्जाची सुविधा देण्यात येते त्याचबरोबर ज्या महिलांना व्यवसाय शिक्षण आणि इतर काही गरज असते सहज कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
- ज्या महिला बचत गटा अंतर्गत काही कर्ज विचारतात अशा महिलांना प्रोत्साहन पर आर्थिक मदत दिली जाते
- लखपती दीदी योजना अंतर्गत महिलांना पडणारे विमा संरक्षण सुविधा देण्यात येते ज्यामुळे या महिला त्यांची व कुटुंबाची सुरक्षाही करू शकतात.
- या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी बनवणे.
- या योजनेअंतर्गत महिलांना विविध प्रकारचे प्रकारचे मार्गदर्शन केल्यामुळे त्यांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढतो.
- लघु उद्योगासाठी विविध प्रकारचे मार्गदर्शन त्याचबरोबर योजना यांची प्रशिक्षण देण्यात येते.
Lakhpati Didi Yojana Eligibility :- पात्रता
लखपती दीदी योजना अंतर्गत ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा महिलांचे खालील प्रकारच्या पात्रता असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 50 वर्ष यामध्ये असावे.
- या योजनेअंतर्गत फक्त महिलांना सहभागी होता येते.
- या योजनेअंतर्गत महिला ग्रामीण भागातील असू शकतात.
- स्वयंसहायता गटाची महिला.
Lakhpati Didi Yojana Documents :- कागदपत्रे
या योजनेअंतर्गत अर्जदारास अर्ज करायचा असल्यास त्याने विहित नमुन्यात अर्ज करावा व आवश्यक ती कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे त्यासाठी खालील कागदपत्राची पूर्तता करावी.
- अर्जदाराच्या आधार कार्ड
- आय प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- ईमेल आयडी
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट साईज चे फोटो
- बँक पासबुकची झेरॉक्स
Lakhpati Didi Yojana Online Apply :- अर्ज कसा करावा?
लखपती योजना (Lakhpati Yojana) ही योजना केंद्र सरकारने जरी सुरू केली असली तरी अद्यापही कसल्याही प्रकारची अर्जाची प्रक्रिया सुरू नाही त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी कुठलीही अधिकृत वेबसाईट जाहीर करण्यात आलेली नसून जेव्हा अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट करणार आहोत.
लखपती दीदी योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे तरी या योजनेचा अर्ज करायचा असल्यास खालील प्रकारची प्रक्रिया करावी लागेल.
- अर्जदाराने प्रथमतः अर्जदाराच्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जावे लागेल.
- संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्याकडून लखपती दीदी योजनेचा अर्ज घेऊ शकता.
- सदरील अर्ज मिळाल्यानंतर तुम्ही तो अर्ज पूर्णपणे वाचून विचारलेली सर्व माहिती तुम्ही त्यामध्ये भरावी.
- अर्जामध्ये आवश्यक असणारे कागदपत्राची पूर्तता करावी.
- या अर्जाची तपासणी ही संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्याकडून तपासून घ्यावी.
- अर्ज तपासून झाल्यावर तुम्ही तो अर्ज कार्यालय जमा करावा.
अशा पद्धतीने तुम्ही लखपती दीदी योजनेअंतर्गत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. (lakhpati didi scheme maharashtra)
Lakhpati Didi Yojana Gr पाहण्यासाठी | Click Here |
Lakhpati Didi Yojana FAQ
प्रश्न १: लखपती दीदी योजना म्हणजे काय?
उत्तर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी लखपती दीदी योजनेची घोषणा केली ही ग्रामीण महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे..
प्रश्न २: लखपती दीदी योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळतो?
उत्तर:लखपती दीदी योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थी हा ग्रामीण भागातील स्वयं-सहायता गटांशी संबंधित महिलांना मिळतो. यामध्ये बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघटना, महिला मंडळ इत्यादींचा समावेश होतो.
प्रश्न ३: लखपती दीदी या योजनेअंतर्गत महिलांना काय फायदे होतात?
उत्तर: या योजनेअंतर्गत महिलांना अनेक फायदे होतात, जसे की:
- भारतातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत केली जाते व त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते.
- ज्या महिला आर्थिक दृष्ट्या मागास किंवा गरीब आहेत अशा महिलांना लघुउद्योग करण्यास कर्ज देण्यात येते.
- या योजनेअंतर्गत महिलांना विशेष स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येते.
- मिळालेल्या प्रशिक्षणामधून महिलांना आत्मविश्वास व आत्मसन्मान मिळतो.
प्रश्न ४: लखपती दीदी या योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास सध्या तरी ऑनलाईन पद्धतीचा कुठलाही पर्याय नाही अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो त्यासाठी अर्जदाराने प्रथमतः अर्जदाराच्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जावे लागेल.संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्याकडून लखपती दीदी योजनेचा अर्ज घेऊ शकता.
प्रश्न ५: लखपती दीदी या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
उत्तर:लखपती दीदी या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे. यामुळे महिला स्वावलंबी बनतील आणि त्यांच्या कुटुंबाचा दर्जा सुधारेल असा यामागे हेतू आहे.त्याचबरोबर आपल्या आपल्या समाजातील महिला विषयी असलेला नकारात्मक दृष्टिकोन बदलून त्या आत्मविश्वासाने आणि आत्मसन्मानाने समाजात मान मिळवू शकतील.
हे ही वाचा:-
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | Click Here |
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | Click Here |
Ladka Bhau Yojana 2024 | Click Here |
Lek Ladki Yojana | Click Here |
Leave a comment