प्रस्तावना :-
Beti Bachao Beti Padhao Yojana भारत देश हा जरी प्रगतशील देश असला तरी आजही आपल्या देशामध्ये स्त्री वर्गाचे प्रमाण खूपच कमी आहे आपल्या देशामध्ये स्त्रीभ्रूण हत्या हा खूप चिंतेचा विषय ठरला आहे. कारण आजही आपल्या समाजातील लोकांना मुलीचा जन्म नको असा वाटतो त्याचे मुख्य कारण म्हणजे होणारा शैक्षणिक त्याचबरोबर भविष्यातील इतर खर्च यामुळे स्त्रीभ्रूण हत्या खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आजही आपल्या देशामध्ये स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी 8 ते 9 % हत्या आजही या देशांमध्ये होताना दिसते, याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजातील लोकांमध्ये असलेली मुली विषयी क्लिष्ट भावना त्यामुळे ते मुलीचा जन्म देण्यास टाळाटाळ करतात या कारणामुळे स्त्री भून हप्त्याचे प्रमाण वाढत आहे.मुलगा आणि मुली यांच्यातील असलेला भेदभावामुळे मुलीस जन्म घेता येत नाही त्याचबरोबर आपल्या भारत देशामध्ये मुलीचे प्रमाण घटताना दिसते भारत सरकारने मुलगा आणि मुली यांच्या जन्मानंतर दोघालाही समान आकार अधिकार दिला असल्यामुळे मुलगी किंवा मुलगा यांच्यात जास्त फरक नाही
आपल्या देशामध्ये होणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्याला आळा बसण्यासाठी सरकारने विविध योजना राबविण्यात आले, आहेत तर चला मित्रांनो आज आपण अशाच एका योजनेविषयी माहिती घेऊयात.
केंद्र सरकारने 22 जानेवारी 2015 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली देशातील मुलींचे भविष्य उज्वल करण्यासाठी एक नवीन योजना राबविण्यात आलेली आहे त्या योजनेचे नाव आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना.या योजनेअंतर्गत मुलींना सुरक्षितता व सामाजिक पद्धतीने जगण्याचा दर्जा देण्यात येणार आहे.या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे मुलगा आणि मुली यांच्यातील लिंगभेद कमी करणे त्याचबरोबर मुलींना त्यांच्या भविष्यातील सुरक्षित पासून ते शैक्षणिक मुदतीपर्यंत आर्थिक मदत ही सरकारद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभ घेतल्यानंतर मुलींना उच्च शिक्षण घेऊन त्यांना स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनता येणार आहेया योजनेअंतर्गत आज आपण या योजनेची वैशिष्ट्ये, विशेष पात्रता, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज करावा करायची प्रक्रिया ,या सर्व गोष्टीचा विचार करणार आहोत तरी हा लेख आपण शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Beti Bachao Beti Padhao Yojana Highlights :- मुद्दे
केंद्र सरकारने चालू केलेल्या या योजनेअंतर्गत मुली आणि मुलांमध्ये समानता प्रस्थापित होणार आहे त्यामुळे आपल्या समाजातील मुली विषयी असणारी क्लिष्ट भावना दूर होण्यास मदत होणार आहे.
अ. क्र. | योजनेचे नाव काय आहे | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना |
1 | योजनेची सुरुवात | भारत सरकार |
2 | लाभार्थी पात्रता | महिला |
3 | उद्दिष्ट | लिंग गुणोत्तर सुधारणे आणि मुली आणि मुलांमधील असमानता दूर करणे. |
4 | अधिकृत संकेतस्थळ | https://wcd.nic.in/bbbp-schemes |
Beti Bachao Beti Padhao Yojana Details :- माहिती
आपल्या भारत देशामध्ये असणारा मुली आणि मुलगा यांच्यातील लिंग भेदामुळेसमाजामध्ये मुली विषयी नकारात्मक भावना निर्माण झाली आहे याच गोष्टीमुळे आपल्या देशातील मुलीचे प्रमाण हे घटत्या दिसत आहेत अशाच घटत्या प्रमाणाला आळा बसवण्यासाठी केंद्र शासनाने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना राबवण्यात आली आहे.
एका मुलीसाठी सरकारी योजना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे त्याचबरोबर शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि तिचे राहणीमान व जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्या देशातील महिलांची सुरक्षा वाढावी यासाठी केंद्र सरकारने या योजनेमध्ये विचार केलेला आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या शिक्षणासाठी त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विविध प्रकारचे शर्तीचे प्रयत्न सरकारद्वारे करण्यात आले आहेत.
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 2014-15 यामध्ये केवळ 100 जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली होती परंतु एकंदरीत विचार करता सरकारने 2015-16 मध्ये या योजनेमध्ये आणखीन 61 जिल्हे समावेश करण्यात आले आहे. आता जवळजवळ आपल्या भारत देशामध्ये सर्व जिल्ह्यात ही योजना लागू आहे Beti bachao beti padhao yojana in marathi pdf.
Beti Bachao Beti Padhao Yojana :- योजनेचे स्वरूप
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2024 या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास(मुलींना) कशा पद्धतीने या योजनेचा लाभ घेता येईल हे आपण खालील बाबी मधून लक्षात घेऊयात.
- लाभार्थी मुलीला बँक खात्यामध्ये दरमहा 100 रुपये जमा करत असल्यास तुम्ही एका वर्षामध्ये 12 हजार रुपये जमा केले तर तुमच्या मुलीच्या वयाच्या 14 वर्षी मुलीच्या बँकेत 1,68,000 हजार रुपये जमा होतील.
- लाभार्थी मुलीला या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे या योजनेची पूर्णपणे हकदार ही ती मुलगी असते.
- लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यास त्या मुलीला रक्कम काढावयाची झाल्यास ती जमा झालेले लेखणीच्या फक्त 50 %रक्कम काढू शकते आणि उर्वरित रक्कम ही तिच्या लग्नाच्या वेळी काढण्यात येऊ शकते.
- मुलीला या रकमेचा लाभ घ्यावयाचा असल्यास मुलीचे वय हे 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
Beti Bachao Beti Padhao Yojana 2024 :- योजनेचे उद्दिष्ट
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारणे आणि लिंग भेद या प्रणालीला आळा बसवणे असा आहे. खाली काही महत्त्वाच्या उद्दिष्टांचा विचार केलेला आहे आपण ते पाहूया.
- योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लिंग भेद प्रणालीला प्रतिबंध घालने आणि मुलींचे जीवनमान सुधारणे.
- लिंग भेदामुळे मुलीच्या प्रमाणात घट होत असल्यामुळे लिंग अनुपातामध्ये वाढ करणे. 2011 मध्ये 1000 मुलांच्या मागे 940 इतकी मुलीची संख्या होती ती आता या योजनेमुळे 1000 पर्यंत वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
- मुलांप्रमाणे मुलींनाही शैक्षणिक दर्जा हा समान मिळाला पाहिजे यासाठी या योजनेचा मुख्य घटक मुलींचे शिक्षण हा आहे आणि या योजनेअंतर्गत मुलींना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देणे हा आहे.
- मुलींच्या आरोग्याच्या सोयीसाठी त्यांना आर्थिक मदत करणे.
- मुलींना समाजामध्ये समान दर्जा निर्माण करून देणे व त्यांना सशक्त बनवणे.
- आपल्या भारत देशामध्ये मुली विषयी झालेल्या नकारात्मक दृष्टिकोनात बदल करून त्यांना समान दर्जा देऊन त्यांना आदर सन्मान त्याचबरोबर स्वावलन बनवणे.
- मुलींचे शिक्षण व आरोग्य सुधारण्यासाठी विविध योजना राबवणे.
- मुलीचे घटते प्रमाण लक्षात घेऊन विविध अभियान राबवून लिंग निवडीला प्रतिबंध लावणे.
Beti Bachao Beti Padhao Yojana Eligibility :- पात्रता
Beti Bachao Beti Padhao Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत अर्जदारास अर्ज करावयाचा असल्यास खालील प्रकारच्या पात्रता असणे आवश्यक आहेत.
- सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
- लाभ घ्यावयाचा असल्यास मुलीचे वय हे जास्तीत जास्त दहा वर्ष इतके असायला हवे.
- लाभार्थ्याचे समृद्धी सुकन्या योजनेमध्ये(SSY) खाते असणे आवश्यक आहे.
- मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाख पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदारास या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वयाची नोंदणी शाळेत करणे गरजेचे आहे.
- लाभार्थी मुलगी ही शारीरिक दृष्ट्या दुर्बल किंवा आजारी नसावी.
- अर्ज हा कुठल्याही राज्याचा रहिवासी असू शकतो.
Beti Bachao Beti Padhao Yojana Documents :- कागदपत्रे
बेटी बचाओ बेटी पढाओ ऑनलाइन अर्ज लागणारे आवश्यक ते कागदपत्रे अर्जदाराने देणे गरजेचे आहे कारण दिलेला अर्ज द्वारे त्या अर्जाची पूर्तता करून लाभार्थ्यास या योजनेचा लाभ मिळतो.
- पालकांची ओळखपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन
- अधिवास प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो
- मुलीचा जन्म दाखला
- मुलीचे आधार कार्ड
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
- बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
- अधिवास प्रमाणपत्र
- मुलीच्या शाळेचे प्रमाणपत्र.
Beti Bachao Beti Padhao Yojana Online Apply :- अर्ज कसा करावा?
सदरील योजनेचा अर्ज करावयास असल्यास खालील काही गोष्टीचा पर्याय निवडता येतो.अर्जदाराने अर्ज करते वेळी ऑनलाइन किंवा ऑफलाईन करण्याची सुविधा सरकारकडून देण्यात आली आहे.
ऑनलाइन:-
- अधिकृत संकेतस्थळाला(https://wcd.nic.in/bbbp-schemes) भेट देऊन तुम्ही अर्ज घेऊ शकता.
- तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल होम पेजवर “महिला समीक्षीकरण योजना” या पर्यावर क्लिक करा
- त्यानंतर “बेटी बचाओ बेटी पढाओ” या योजनेवर क्लिक करा.
- त्यानंतर “अर्ज करा” या बटनला निवडा.
- विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरा आणि योग्य ती कागदपत्रे जोडा.
- शेवटी “सबमिट” या बटनावर क्लिक करा.
ऑफलाइन:-
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयास असल्यास जवळच्या अंगणवाडी केंद्रातकिंवा महिला बाल विकास केंद्रात जाऊन अर्ज घ्यावा.
- मिळालेला अर्ज घेऊन आवश्यक ती माहिती व्यवस्थितपणे भरून लागणारे सर्व कागदपत्रे जोडावीत.
- भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तपासून घ्यावी.
- तपासलेला अर्ज योग्य असल्यास तो अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा.
GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Beti Bachao Beti Padhao Yojana :- FAQs.
प्रश्न:- बेटी बचाओ बेटी पढाओ योजना काय आहे?
बेटी बचाओ बेटी पढाओ (BBBP) ही केंद्र सरकारची योजना आहे या योजनेमध्ये मुलींची संख्या वाढवणे, त्यांचे शिक्षण आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यावर केंद्रित आहे.या योजनेअंतर्गत लिंगभेद आणि मुलगा आणि मुलगी यांच्यातील समता राखण्यासाठी ही अनेक उपायोजना योजना राबविण्यात आल्या आहेत..
प्रश्न:- बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची सुरुवात कधी झाली?
केंद्र शासनाने दिनांक 22 जानेवारी 2015 रोजी या योजनेची सुरुवात केली आहे.
प्रश्न:- बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता आहे?
- मुलीचे वय हे दहा वर्ष किंवा दहा वर्षाच्या कमी असायला हवे.
- या योजनेसाठी लाभ घ्यावयाचा असल्यास मुलगी लाभार्थी ही भारतीय नागरिक असावी.
- लाभार्थी मुलीच्या नावे समृद्धी सुकन्या योजना (SSY) खाते असणे आवश्यक आहे.
प्रश्न:- बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक आहेत?
पालकांची ओळखपत्र,आधार कार्ड,पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, अधिवास प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, मुलीचा जन्म दाखला, मुलीचे आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, अधिवास प्रमाणपत्र,मुलीच्या शाळेचे प्रमाणपत्र.
प्रश्न:- बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे लाभ कोणाला मिळतात?
सदर योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास लाभधारक हा मुलगी असावी आणि ही भारतीय नागरिक असायला हवी.
हे ही नक्की पाहा….👇
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Ladka Bhau Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Lek Ladki Yojana | येथे क्लिक करा |
Lakhpati Didi Yojana | येथे क्लिक करा |
Silai Machine Yojana | येथे क्लिक करा |
PM Awas Yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment