Labour Card 2024 | Labour card registration  ऑनलाइन अर्ज, रजिस्ट्रेशन, आणि स्टेट्स चेक

Labour Card 2024
Labour Card 2024

प्रस्तावना :-

Labour Card 2024 | Labour registration maharashtra आपल्या भारत देशामध्ये बरेच लोक हे मोठ्या प्रमाणात मजुरी आणि कंत्राटी कामगार म्हणून ओळखले जातात.आपला भारत देश आजही जगात लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे आपल्या भारत देशामध्ये मजूर आणि कामगार (Labour registration maharashtra) हे खूप मोठे प्रमाण आहेत. हे कामगार शेती, इमारतीचे आणि बांधकाम त्याचबरोबर इतर अन्य काही कामे करतात. या कामगारांसाठी भारत सरकारने कामगार विविध विभाग नेमलेले आहेत. या विभागामार्फत प्रत्येक राज्यात विविध योजना राबविण्याचे काम हे, त्या राज्याच्या कामगार विभागाअंतर्गत राबवले जातात.

अशाच आपण एका योजनेविषयी आज माहिती आपण पाहणार आहोत.भारत सरकारने अशा कामगारांच्या कुटुंबांना मदत आणि सक्षम करण्यासाठी लेबर कार्ड देण्याचे ठरवले आहे .लेबर कार्डद्वारे त्यांच्या कुटुंबांना विविध घटकांचा लाभ घेता यावा हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. 

लेबर कार्ड म्हणजे भारत सरकारने कामगारांच्या हितासाठी देण्यात आलेले कार्ड होय. भारतात, जेथे कामगार मोठ्या प्रमाणात विविध उद्योगांमध्ये कार्यरत आहेत, त्यांना समर्थन आणि मदत करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हे कार्ड देण्याचे ठरवले आहे. हे कार्ड कामगारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आणि विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे.

तर चला आता आपण लेबर कार्ड म्हणजे काय त्याचे फायदे पात्रता कागदपत्रे व त्यासाठी अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टींचा आपण येथे विचार करणार आहोत. त्यासाठी हा लेख आपणाला संपूर्ण वाचणे आवश्यक आहे.

Labour Card :- लेबर कार्डचे उद्दीष्ट

भारत सरकारने जारी करण्यात आलेल्या लेबर कार्डचा उपयोग हा भारतातील बहुसंख्य लोक ज्यांचे उत्पन्न हे कमी आहे व त्यांना दररोज रोजगार केल्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांना एक ओळखपत्र देण्यात येते त्यालाच लेबर कार्ड असे म्हटले जाते.

लेबर कार्ड मध्ये कामगार हा तो करत असलेल्या कामाचा पूर्ण तपशील असतो ज्यामुळे तो भविष्यामध्ये दुसरीकडे काम करण्यास गेला असता त्याला त्याच्या कामाची ओळख मिळते. लेबर कार्डमुळे तो करत असलेल्या कामाच्या स्वरूपावरून त्याच्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या मदत त्याबरोबर विविध योजनांचा लाभ मिळतो

लेबर कार्ड मुळे कामगार वर्गाला त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत त्याचबरोबर शैक्षणिक मदत आणि सामाजिक मदत देण्याचे उद्दिष्ट भारत सरकारचे आहे आणि असे त्या कार्डमध्ये नमूद केलेले आहे. या कार्डच्या अंतर्गत तो सर्व काही गोष्टींचा लाभ घेऊ शकतो.

लेबर या कार्डच्या मदतीने जर काही त्याच्या कुटुंबाला किंवा त्याला आरोग्याची काही समस्या असल्यास त्या लेबर कार्ड द्वारे तो आरोग्याच्या सर्व समस्या कमी खर्चामध्ये भागू शकतो.

Labour Card :- लेबर कार्ड चे प्रकार

भारत सरकारने लेबर कार्ड जरी देण्यात आले असले तरी त्यांचे दोन प्रकार पाण्यात आलेले असून ते खालील प्रमाणे आहेत

1.बिल्डिंग लेबर कार्ड

2.सोशल लेबर कार्ड.

1.बिल्डिंग लेबर कार्ड : – बिल्डिंग लेबर कार्ड म्हणजे, जे कामगार परवानाधारक कंत्राट दराच्या मार्गदर्शनाखाली काम करतात व आपला उदारनिर्वाह करतात असे कामगार हे अर्ज करण्यास पात्र आहेत.

2.सोशल लेबर कार्ड :- सोशल लेबर कार्ड अंतर्गत, जे कामगार कृषी रोजगार किंवा शेतीमध्ये काम करतात असे लोक या कार्डसाठी अर्ज करू शकतात व भारत सरकारने दिलेल्या विविध योजनांची लाभ घेऊ शकतात.

Labour Card Highlights :- मुद्दे

योजनालेबर कार्ड
सुरुवात कोणी केली.भारत सरकार
अधिकृत वेबसाईटराज्यानुसार वेगवेगळ्या वेबसाईट
लाभार्थी कोण असतीलदेशातील कामगार
विभागकामगार आणि रोजगार मंत्रालय
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
उद्देश्य काय आहे.कामगार आणि कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत प्रदान करणे
लागू कसे केले जाते.राज्यनिहाय
सरकार श्रेणीकेंद्र सरकारी योजना
चालू वर्ष2023/2024

Labour Card :- फायदे

  1. मोफत शिक्षण सुविधा :- लेबर कार्ड अंतर्गत येणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना मोफत शिक्षणाचा लाभ घेता येतो.
  2. जीवन विमा सुविधा :- लेबल कार्ड धारकाला व त्याच्या असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य विषयी काही समस्या असल्यास ते जीवन विम्या अंतर्गत विम्याचा फायदा घेऊ शकतात.
  3. आरोग्य विमा सुविधा :- लेबर कार्डधारक पीएम आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आणि, बिजू स्वाथ्य कल्याण योजना इत्यादी अंतर्गत लाभ घेवू शकतो.
  4. गर्भधारणेसाठी मदत:- लेबर काम करणाऱ्याच्या कुटुंबातील महिलांना गर्भधारणेच्या वेळेस किंवा बाळंतपणाच्या वेळी या कारच्या अंतर्गत बऱ्याच सुख सुविधा दिले जातात.
  5. अपघातामुळे मदत व मृत्यू :- कामगार काम करते वेळेस त्याचा अपघात झाला किंवा मृत्यू झाला तर सरकारने देण्यात आलेल्या लेबर कार्ड च्या माध्यमातून त्याला आर्थिक मदत देण्यात येते. त्याचबरोबर गंभीर आजारी पडल्यास त्या गंभीर आजाराचे निदान होईपर्यंत होणारा सर्व खर्च हा या लेबर कार्ड अंतर्गत देण्यात येतो.
  6. शिष्यवृत्तीचा लाभ :- कामगाराच्या कुटुंबातील मुली किंवा मुलं हे जर शिक्षण करत असतील तर त्यांना शिक्षणासाठी विशिष्ट प्रकारची शिष्यवृत्ती या लेबर कार्डच्या अंतर्गत देण्यात येते.
  7. सामग्री खरेदीसाठी सहाय्य :- कामगाराला त्याच्या कामासाठी लागणाऱ्या विशिष्ट उपकरणासाठी देखील या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळते उदाहरणार्थ पावडे टोपले उधळ खोऱ्या इत्यादी.
  8. गृहकर्ज सुविधा :- कामगाराला जर स्वतःचे घर बांधावयाचे असल्यास त्याला विविध बँकेकडून कर्जाची सुविधा देण्यात येते.
  9. कौशल्य विकास सुविधा :- कामगार हा जर विशिष्ट काम करत असेल तर त्याला त्या कामात पारंगत होण्यासाठी प्रशिक्षण आणि मदत सुद्धा देण्यात येते.
  10. मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत:- लेबर कार्ड कुटुंबात असणाऱ्या फक्त मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत देण्यात येते म्हणजेच फक्त मुलीच्या लग्नासाठी देण्याची नमूद केलेले आहे

Labour Card :-पात्रता निकष

लेबर कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, तुमच्याजवळ खालील पात्रता निकष असावे लागतात:

  • अर्जदाराचे वय हे 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे.
  • असंघटित कामगार (Contract Worker) असणे आवश्यक आहे.
  • भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा संघटित क्षेत्रात नोकरी करणारा नसावा किंवा EPF/NPS/ESIC चे सदस्य नसावा.
  • अर्जदाराची पगार ही रु. 15,000 पेक्षा जास्त नसावी.
  • अर्जदाराने कसल्याही प्रकारची आयकर टॅक्स भरलेली नसावी.
  • अर्जदार हा ज्या राज्यातील रहिवासी आहे त्याला त्याच राज्यामध्ये अर्ज करण्यास परवानगी आहे.

Labour card Documents :- कागदपत्रे

लेबर कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:

  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका: (पर्यायी).
  • बँक खाते क्रमांक
  • ई-मेल आयडी
  • कुटुंबातील सदस्यांचा आधार कार्ड क्रमांक: कुटुंबीयांची माहिती.
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो

Labour card 2024 apply online :- ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

लेबर कार्डसाठी (labour card online apply) अर्ज करण्यासाठी, तुम्ही खालील पद्धतीचा अवलंब करू शकता:

  1. सर्वात प्रथम तुम्हाला त्या त्या राज्यातील संबंधित राज्याच्या कामगार विभागाच्या अधिकृत वेबसाइटला (Click Here) भेट द्यावी लागेल.
  2. त्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावर “New Labour Card Registration” असा एक पर्याय दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  3. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज उघडेल तुम्हाला त्यामध्ये जिल्हा निवडा, आणि तुमचे वैयक्तिक तपशील भरा, ज्यामध्ये आधार कार्ड क्रमांक, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी इत्यादी गोष्टी भरावे लागतील हा फॉर्म भरत असताना विचारलेल्या पर्यायांमध्ये अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.
  4. त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय यावरती क्लिक करा.
  5. तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये टाकून सबमिट या बटणावर क्लिक करा.
  6. आता भरलेली सर्व माहिती परत एकदा तपासून घ्या आणि सबमिट या बटणावर क्लिक करा (labour card registration) अशा पद्धती तुमचा अर्ज सादर करण्यात येईल.

Labour card check status :- लेबर कार्ड स्टेट्स तपासण्याची प्रक्रिया

तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी पुढील पायऱ्याचा अवलंब करू शकता:-

1.अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा :-
संबंधित राज्याच्या कामगार विभागाच्या अधिकृत वेबसाइटला द्यावी लागेल

2.स्टेट्स तपासण्यासाठी खालील बटन वरती क्लिक करा:-
‘Click here to know Labour Registration Status’ वर क्लिक करा.

3.खाली विचारलेली माहिती अचूकपणे भरा:-
आधार कार्ड क्रमांक, अर्ज क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाका.

4.विचारलेला कॅपच्या भरा:-
त्याचा कॅपचा कोड अचूकपणे भरावा लागेल.

5.सर्च बटनचा वापर करा.
सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर ‘Search’ बटणावर क्लिक करा.

Labour Card Download करण्यासाठी येथे क्लिक करा.

Labour card :-निष्कर्ष

लेबर कार्ड योजना असंघटित कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक भविष्य सुधारण्यासाठी भारत शासनाने ही एक व्यापक योजना कामगारासाठी राबविण्यात आले. या योजनेअंतर्गत कामगार वर्गाचे आर्थिक भविष्य सुधारण्यास मदत होणार आहे व त्यांना चांगले जीवन जगण्याची एक संधी या योजनेअंतर्गत मिळणार आहे.

FAQs

Q. लेबर कार्ड म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत?
लेबर कार्ड हे विशिष्ट प्रकारचे ओळखपत्र आहे, ज्यामध्ये कामगारांना आर्थिक व संरक्षित बाबींचा फायदा करून देण्यात येतो.

Q. लेबर कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो?
लेबर कार्ड साठी अर्ज करण्यासाठी तो कामगार असणे आवश्यक आहे, म्हणजेच बिल्डिंग किंवा सोशल कामगार असणे अनिवार्य आहे.

Q. लेबर कार्ड हे नरेगा जॉब कार्ड सारखेच आहेत का?
लेबर कार्ड आणि नरेगा जॉब कार्ड हे दोन्ही वेगवेगळे आहेत व त्यांची उद्दिष्टे ही वेगळी आहेत

Q. मी लेबर कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो का?
होय, तुम्ही तुमच्या संबंधित राज्याच्या कामगार विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लेबर कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

Q. अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रिया संबंधित तपशील कोठे मिळेल.
नमूद केलेल्या अधिकृत वेबसाईट:- [येथे क्लिक करा] ला भेट देणे आवश्यक आहे.

हे ही नक्की वाचा…..👇👇👇

Leave a comment

Leave a comment