Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व विशेष न्याय विभागाने राज्यातील 65 वय वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि येणाऱ्या आजारावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साह्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योग उपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य ते अबाधित ठेवण्यासाठी राज्यात एक नाविन्यपूर्ण योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेला मुख्यमंत्री वयोश्री योजना असे नाव देण्यात आले आहे.

या योजनेची पात्रतेचे निकष काय असणार आहेत व त्या योजनेची अटी,शर्ती काय आहे ते आपण या लेखात पाहुयात त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 निर्णय सर्वप्रथम आपण समजून घेऊया राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात जी आहे जी औषधे असतील किंवा जी काही उपकरणे लागतात त्याविषयी आताही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला मुख्यमंत्री वयोश्री योजना नाव देण्यात आलेले आहे. नुकत्याच झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यता नुसार आता पूर्णपणे मान्यता दिली आहे आणि त्याची अंमलबजावणी ही सुरू करण्यात आली आहे.

आता ही योजना सुरू करण्यामागे म्हणजेच मुख्यमंत्री योजना सुरू करण्यामागचा महत्वाचा उद्देश असा आहे, की ज्यांचे वय 65 वर्ष आहेत असे नागरिक नागरिक की ज्यांना अशक्तपणा व अपंगत्वपंग असे आजार आहेत, त्यांच्यासाठी विविध प्रकारचे उपकरणे घेण्यासाठी आर्थिक मदत करणार आहेत.

असे उपकरणे ज्यांना खरेदी करायची असतील तर त्यांना मिळालेल्या आर्थिक मदतीमधून ते खरेदी करू शकतात. सरकारकडून ही रक्कम आता 3000 रु त्यांच्या बँक खात्यामध्ये हे थेट पद्धतीने जमा करण्यात  येईल 

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय या विभागांतर्गत 6 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे. सद्यस्थितीत 65 वर्ष व त्यावरील अंदाजीत एकूण 10 ते 12 % ज्येष्ठ नागरिक म्हणजे 1.25 ते 1.50 कोटी आहेत, त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो, या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने दारिद्र्यरेषेखालील संबंधित दिव्यांग/ अपंग त्याचबरोबर दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक क्षमतेनुसार या ठिकाणी निधी सुद्धा केंद्र सरकारने देण्याचे ठरवले आहे. अनेक केंद्र सरकारच्या माध्यमातून ठराविक जिल्ह्यामध्ये राज्यातील ही योजना राबवली जात होती परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे. 

मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या त्याचबरोबर दुर्बलताग्रस्त अशा लोकांचा या योजनेचा समावेश केला आहे. खालील प्रमाणे या योजनेचे स्वरूप स्पष्ट केले आहे.

अ. क्र.योजनेचे नाव कायमुख्यमंत्री वयोश्री योजना 2024
1सुरू कोणी केलीमहाराष्ट्र शासन
2योजनेचा महत्त्वाचा उद्देशज्येष्ठ दुर्बलग्रस्त/दिव्यांग नागरिकांना आर्थिक मदत करणे
3लाभार्थी रक्कमएकूण रक्कम 3,000 रु.
4लाभार्थी कोण असेलराज्यातील ज्येष्ठ नागरिक
5वयोमर्यादा65 वर्षांपेक्षा जास्त
5 अर्जाची प्रक्रियाऑनलाईन
6शासन निर्णययेथे क्लिक करा
7अधिकृत वेबसाईटलवकरच अधिकृत वेबसाईट कळवण्यात येईल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत काही पात्रता ठरवून देण्यात आली आहे यामध्ये अर्जदाराची पात्रता असणे आवश्यक आहे काय पात्रता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक असायला हवा ज्याचे वय 65 वर्ष किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असायला हवे.
  • मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत अर्ज करायचा झाल्यास अर्जदाराकडे आधार कार्ड किंवा आधार कार्ड काढलेल्या नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे एकूण वार्षिक उत्पन्न हे 2,00,000  लाख रुपये पेक्षा जास्त नसावे. अर्जदाराचे एकूण उत्पन्न 2,00,000 लाखाच्या वर नाही यासाठी त्या अर्जदाराने स्वयंघोषणापत्र सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • अर्जदारास या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास लाभार्थ्यांनी मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सरकारी योजनेअंतर्गत विनामूल्य  उपकरण  घेतलेली  नसावीत.
  • तीन हजार रुपये रकमेची आर्थिक मदत मिळाल्यानंतर त्याने त्या रकमेचे उपकरण खरेदी केली संदर्भात व प्रशिक्षण घेतले संदर्भातील प्रमाणपत्र 30 दिवसात संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
  • जिल्ह्यातील एकूण लाभार्थीच्या संख्येपैकी 30 % महिला प्रवर्गासाठी जागा राखीव आहेत.

मुख्यमंत्री योजनेअंतर्गत जे लोक पात्र ठरतील असे लोक शारीरिक दृष्ट्या असमर्थ व दुर्बलतेनुसार त्यांना उपकरणे देण्याचे ठरवले आहे. केंद्र शासनाच्या आणखीन एक योजना अंतर्गत धार्मिक विभागाद्वारे नोंदणी करण्यात येत आहे या नोंदणीचा फायदा असा आहे की या योजनेअंतर्गत आलेल्या नागरिकांना केंद्र मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सहभाग घेता येतो.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत खालील काही प्रकारचे उपकरणे देण्यात येतात.

  • चष्मा श्रवण यंत्र
  • ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर
  • कमोड खुर्ची
  • नि-ब्रेस 
  • लंबर बेल्ट
  • सर्वाइकल कॉलर.

Mukhyamantri Vayoshri Yojana Form PDF मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत शासनाने जो जीआर काढला आहे त्या जीआर मध्ये असे नमूद केले आहे की महाराष्ट्र राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा जीआर हा 6 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला.

लाभार्थी हा एक रकमे तीन हजार रुपये DBT प्रणाली द्वारेआधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा संपूर्ण जीआर खालील लिंक मध्ये आहे.

 GR पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत खालील प्रकारचे फायदे लाभयार्थ्याला होणार आहेत.

  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल त्याचबरोबर शारीरिक दृष्ट्या दुर्बल असणारे दारिद्र रेषेखालील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभांमुळे ज्येष्ठ नागरिक ही स्वतःचा खर्च स्वतः करून स्वावलंबी बनणार आहेत.
  •  मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळतात यामुळे अनेक आजारासाठी ते त्या आर्थिक मदतीचा फायदा करून घेऊ शकतात.
  • राज्य शासनाकडून नोंदणीकृत करण्यात आलेल्या योगउपचार केंद्र, मन स्वस्थ केंद्र मनशक्ती केंद्र/प्रशिक्षण केंद्र यासाठी सहभाग नोंदविता येईल.
  • या योजनेअंतर्गत जे नागरिक शारीरिक दृष्ट्या हतबल आहेत त्यांना आर्थिक मदत केल्यामुळे ते स्वावलंबी होऊ शकतात.

या योजनेअंतर्गत खालील प्रकारचे काही कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • पासपोर्ट फोटो
  • राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स
  • मोबाईल क्रमांक
  • अपंग असलेला प्रमाणपत्र
  • स्वयंघोषणापत्र
  • उत्पन्न दाखला

Mukhyamantri Vayoshri Yojana Official Website मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना 6 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.परंतु या योजनेची कसल्याही प्रकारची ऑनलाइन नोंदणी चालू नाही याचे मुख्य कारण म्हणजे जरी मुख्यमंत्री वयोश्री योजना निर्गमित करण्यात आलेली असली तरी तिचे ऑनलाईन नोंदणीचे काम सध्या तरी चालू नाही. शासन निर्णयानुसार राष्ट्रीय योजनेच्या धर्तीवर सुधार योजनेचे नवीन पोर्टल महाराष्ट्र तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे.

अद्यापही मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाइन सुरू नसल्यामुळे या योजनेची शेवटची तारीख शासनाकडून जाहीर करण्यात आलेले नाही किंवा कसलेही प्रकारचे नोंदणी सुरू झाली नाही.

राष्ट्रीय वयोश्री योजनेप्रमाणेच मुख्यमंत्री वयोश्री योजना प्रक्रिया असणार आहे, जर अर्जदाराला अर्ज करावयाचा असल्यास खालील प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • अधिकृत पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म वर क्लिक करावे लागेल.
  • ओपन झालेला फॉर्म काळजीपूर्वक भरून हवी असणारी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर राष्ट्रीय वयोश्री योजनेचा फॉर्म सबमिट करावा लागेल.

प्रश्न :- मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत लाभार्थ्यांना किती रुपये दिले जातात?

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्याला एकरकमी 3000 रुपये मिळतात.

प्रश्न :- महाराष्ट्र वयोश्री योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील ?

मुख्यमंत्री योजना अंतर्गत खालील कागदपत्रे आवश्यक आहेत

आधार कार्ड, मतदान कार्ड,पासपोर्ट 2 फोटो,राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स,मोबाईल क्रमांक,अपंग असलेला प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र,उत्पन्न दाखला इत्यादी.

प्रश्न :- महाराष्ट्र वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नाही.

प्रश्न :- मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे म्हणजेच ज्या नागरिकांचे वय 65 किंवा 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे.

Leave a comment

Leave a comment