Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024

Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024
Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024

प्रस्तावना:-

Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024 (मुख्यमंत्री योजना दूत), महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये विविध नवनवीन योजना काढलेल्या आहेत. अशाच आपण एका नवीन योजनेविषयी माहिती पाहणार आहोत, त्या योजनेला मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 असे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या 9 जुलै 2024 आधिवेशनात ही योजना राज्यभरात सर्वत्र राबवण्याचा उपक्रम आहे. तरी या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या दुताची निवड केली जाणार आहे व त्यांच्यामार्फत सरकारच्या ज्या काही नवनवीन योजना येतील, त्यांच्या विषयी माहिती व त्यांचा लाभ हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवता येईल यासाठी ही योजना राबविण्याचे सरकारने ठरवले आहे.

योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे राज्य सरकारने ज्या काही विविध कल्याणकारी उपक्रम राबवले जातात ते उपक्रम सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही ते पोहोचण्यासाठी या दुताची नेमणूक करून ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे. तर चला आज आपण या लेखाद्वारे भरती प्रक्रिया,योजनेविषयी संपूर्ण माहिती, त्याचबरोबर पात्रता, अर्ज, निकष, व पद याबाबत महत्त्वाची चर्चा करूयात त्यासाठी हा लेख आपण वाचणे अनिवार्य आहे.

Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024:- सविस्तर माहिती

महाराष्ट्र सरकारने राबविण्यात आलेल्या नवनवीन योजना या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्या या उद्देशाने मुख्यमंत्री योजना दुत (योजना दूत भरती महाराष्ट्र 2024)या योजनेची स्थापना केली आहे. या योजनेमुळे राज्यातील बहुतांश बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार आहे त्याच बरोबर सरकारी योजनाचा प्रसार व प्रचार होण्यास मदत होणार आहे. आजही महाराष्ट्रमध्ये अशा बऱ्याच योजना आहेत की ज्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही त्याचा महत्त्वाचा कारण म्हणजे प्रसाराचा अभाव त्याचबरोबर योजनेविषयी अचूक माहिती नसणे. या सर्व बाबीवर विचार करून महाराष्ट्र शासनाने योजना दुत हा एक प्रभावी उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे.

योजना दूत हा असा एक पात्र व्यक्ती आहे की जो विविध सरकारी योजना व त्यांची माहिती त्याचबरोबर त्या प्रश्नाचे उत्तरे देऊन लोकांना मार्गदर्शन करतो त्याचबरोबर लोकांमध्ये सरकारी योजनेविषयी जागृती निर्माण करून त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे हे त्याचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. 

योजनेमध्ये नियुक्त केलेला दुत हा तेथील स्थानिक समुदायासोबत काम करेल व ग्रामीण आणि शहरा भागातील लोकांपर्यंत योजनाची माहिती पोहोचवेल हे या योजनेचे महत्त्वाचे कार्य आहे.

 Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024:- महत्त्वाचे मुद्दे

खालील प्रकारचे मुद्दे आपण पाहुयात.

अ.क्र.योजनेचे नावमुख्यमंत्री योजना दूत (Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024)
1सुरू कोणी केलीमहाराष्ट्र सरकार.
2लाभार्थी कोण असतीलमहाराष्ट्र राज्यातील तरुण
3लाभाचे स्वरूप50,000 तरुणांना नोकरीचा लाभ .
4कोणाच्या अंतर्गतही भरती राज्य  शासनाच्या श्रेणी अंतर्गत होणार आहे.
5आधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024:- वैशिष्ट्य

  • ग्रामीण भागाकरिता ही 1 व शहरी भागांसाठी 5000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत याप्रमाणे 50,000 योजना दूतांची निवड करण्याचे सरकारने ठरवले आहे.
  • मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार आहेत.
  • मुख्यमंत्री योजने अंतर्गत पात्र उमेदवाराकडून सहा महिन्याचा करार करून घेतला जाईल व हा करार परिस्थितीनुसार वाढविण्यात येणार नाही.
  • सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना जागरूक करणे.
  • राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचे प्रशिक्षण हे दूताला दिल्यामुळे सरकारी योजना ची माहिती प्रभावीपणे जनतेला मिळण्यास मदत होणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या कल्याणकारी उपक्रमाची माहिती ही ग्रामीण व शहरी भागातील लोकापर्यंत पोहोचवणे.
  • योजना दुताची स्थापना केल्यामुळे बेरोजगार तरुणांना एक नवीन रोजगार संधी मिळाली ज्यामुळे बेरोजगार तरुणांना आर्थिक  मदत  होणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून कामगिरीवर आधारित प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे ते प्रोत्साहित होऊन अधिकाधिक काम करण्यास  परावृत्त होतील.

Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024 Eligibility :- पात्रता

  • अर्जदार हा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार असावा.
  • अर्जदार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.

Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024 Documents :- कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पदवी प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • बँक खाते
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • हमीपत्र

Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024:- महत्त्वाची कामे

  • या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या उमेदवाराने संबंधित जिल्हाधिकारी यांच्या संपर्कामध्ये राहून जिल्ह्यातील नवनवीन योजना ची माहिती नागरिकांना देणे
  • विविध प्रकारची शिबिरे आयोजित करावे लागतील.
  • दिलेल्या माहितीचे सविस्तर अहवाल सादर करणे व ते ऑनलाईन पद्धतीने अपलोड करणे.
  • सदरील योजनेची माहिती ही घरोघरी जाऊन देण्याचा प्रयत्न करणे.

Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024:-  नेमणूक प्रक्रिया (योजना दूत निवड प्रक्रिया)

Yojana Doot Online Apply

  • उमेदवाराची निवड प्रक्रिया ही प्राप्त झालेल्या विविध नमुन्याच्या आधारावर केली जाईल.
  • निवड प्रक्रिया ही पात्रतेचे निकषावर ठरवली जाईल.
  • ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर ती माहिती संबंधित जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल.
  • जिल्हा आयुक्त व कौशल्य विकास रोजगार हे संबंधित अर्जाची तपासणी करतील.
  • पात्र उमेदवार हा फक्त सहा महिन्यापर्यंतच ठरवून दिलेल्या संबंधी जागेसाठी पात्र असेल.
  • कराराचा कालावधी हा कसलाही परिस्थितीमध्ये  वाढवला जाणार नाही.
  • जिल्हा आयुक्त व कौशल्य विकास रोजगार यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीसाठी 1 तर शहरी भागातील 5000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत नेमला जाईल.
  • पात्र उमेदवारांनी सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय काम आहे असे समजू नये.
  • पात्र उमेदवाराकडून तो नेमून दिलेल्या जागेवर कसल्याही प्रकारचा हक्क दाखवला नाही याबद्दल हमीपत्र घेण्यात येईल. 
  • या योजनेअंतर्गत पात्र ठरलेले उमेदवार हा फक्त याचा कार्यकाळ हा फक्त सहा महिने इतका असेल. 

योजनेचा GR पाहण्यासाठी (CM Yojana Doot Bharti GR):- येथे क्लिक करा.

मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024: FAQs

प्रश्न 1: मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 काय आहे?

उत्तर मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 हा महाराष्ट्र सरकारची एक योजना ही या योजनेमध्ये योजना दुताची  निवड केली जाते व त्याद्वारे सरकारी योजनेची माहिती ही जनतेपर्यंत पोहोचवण्यात येते.

प्रश्न 2: मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 पात्रता काय आहे?

उत्तर: 

  • अर्जदार हा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार असावा.
  • अर्जदार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे.

प्रश्न 3: मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 अर्ज कसा करायचा?

उत्तर: अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर (https://mahayojanadoot.org/)जाऊन उमेदवारांना अर्ज भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील, परंतु अद्याप तरी कसल्याही प्रकारची संकेत स्थळाची माहिती मिळाली नाही.

प्रश्न 4: मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 निवड प्रक्रिया कशी आहे?

उत्तर: अर्जदाराच्या ठरवून दिलेल्या पात्रतेनुसार ऑनलाइन पद्धतीने(Appy Mukhymantri Yojana doot) जिल्हा आयुक्त व कौशल्य कामगार यांच्या समन्वयाने निवड करण्यात येईल.

प्रश्न 5: मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 योजना दूतांचे काम काय असते?

उत्तर: योजना दूतांचे मुख्य काम म्हणजे त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे.

प्रश्न 6: मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 योजना दूतांना मानधन किती मिळते?

उत्तर: योजना दूतांना त्यांच्या कामासाठी निश्चित  10,000 रु मानधन दिले जाते.

प्रश्न 7: मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 योजना दूतांसाठी प्रशिक्षण मिळते का?

उत्तर: होय, योजना दूतांना त्यांच्या कामासाठी उपयुक्त असे प्रशिक्षण दिले जाते.

प्रश्न 8: अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख अधिकृतसंकेतस्थळावर देण्यात येईल अद्याप कसल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही.

प्रश्न 9: मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 कागदपत्रे आवश्यक आहेत?

उत्तर:  

  • आधार कार्ड
  • पदवी प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • बँक खाते
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • हमीपत्र

हे ही नक्की पाहा.

Leave a comment

Leave a comment