Sukanya Samriddhi Yojana in Marathi

Sukanya Samriddhi Yojana in Marathi

Sukanya Samriddhi Yojana in Marathi मुलींच्या भविष्यामध्ये होणाऱ्या अनेक अडचणीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे, ही योजना ही केंद्र सरकारची आहे व या योजनेला अल्पबचत योजना असेही म्हणता येईल, या योजनेमुळे भविष्यामध्ये होणारा खर्च भागवता येईल. या योजनेची संकल्पना ही बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या भविष्यामध्ये होणारा शैक्षणिक व आरोग्याचा खर्च भागवला जावा असा आहे.

 ही योजना 01.01.2014 पासून राबविण्यात आली आहे या योजनेअंतर्गत ज्या मुलीचे वय 10 दहा वर्षाच्या खाली आहे त्यांचे बँक खात्यात पालकाच्या नावे खाते उघडली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत 250 ते 1.5 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते. ही योजना खाते उघडल्यापासून 21 वर्षापर्यंत आहे, तर चला मित्रांनो या लेख द्वारे सुकन्या समृद्धी योजना याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत देशातील मुलीचे भविष्य सुरक्षित व्हावे हा केंद्र सरकारचा मानस आहे, या योजनेअंतर्गत दहा वर्षाच्या खालील मुला मुलीचे पालक किंवा किंवा इतर पालक मुलीच्या नावावर खाते उघडून काही रक्कम जमा करू शकतात. या जमा केले रकमेवर 7.6 टक्के व्याजदर मिळते, आता या योजनेअंतर्गत फक्त दोनच मुलीचे खाते उघडू शकतात त्याचबरोबर एका वर्षात किमान 250 रुपये आणि प्रति वर्ष जास्तीत जास्त 1.50 हजार रुपये गुंतवू शकता. जर तुम्ही गुंतवणूक केली तर त्याचा फायदा आयकर कायदा कलम 80c अंतर्गत सूट देखील मिळते. या योजने योजनेअंतर्गत तुम्ही रोख पैसे चेक ट्रॅप किंवा नेट बँकिंग किंवा यु पी आय द्वारे पैसे जमा करू शकता.

या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त 15 वर्षे पैसे जमा करणार आहेत त्यानंतर तुम्हाला पुढील सहा वर्षासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही. या योजनेचा किंवा उघडलेल्या खात्याचा कार्यकाळ 21 वर्षे आहे आणि 21 वर्षे कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ही त्या त्या खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजनेची माहिती

अ. क्र.योजनेचे नावSukanya Samriddhi Yojana / सुकन्या समृद्धी योजना
1योजना कुणी सुरु केलीकेंद्र सरकार
2लाभार्थी 0 ते 10 वयोगटातील मुली
3गुंतवणूक रक्कमकिमान रु 250 कमाल गुंतवणूक रु. 1.5 लाख
4श्रेणीकेंद्र सरकारी योजना 
5वर्ष2023
6अर्ज प्रक्रियाऑफलाइन

बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये विविध प्रकारचे फायदे आहेत. नवीन माहितीनुसार या योजनेअंतर्गत खालील काही महत्त्वाचे बदल झाले आहेत.

1.सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत अर्जदारला वर्षाला किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. आता नवीन बदलानुसार जर तुम्ही 250 रुपये भरण्यास असमर्थ असताल तर तुम्हाला मिळणाऱ्या मॅच्युरिटीच्या व्याजदरात कोणताही बदल केला जाणार नाही म्हणजेच तुम्हाला डिफॉल्टर म्हणून घोषित केले जाईल.

2. सुकन्या समृद्धी योजने योजना ही फक्त कुटुंबातील दोन मुलीसाठी उघडता येते आणि नवीन बदलानुसार तिसऱ्या मुलीची मुलीचे खाते उघडण्याची तरतूद असली तरी त्या खात्याचा फायदा हा आयकर कलम कायदा 80c चा लाभघेता येणार नाही.

3.सुकन्या समृद्धी खाते हे खालील दोन कारणामुळे बंद केले जाऊ शकते.

  • एखाद्या मुलीचा अचानक मृत्यू झाला तर
  • मुलीचे लग्न जर प्रदेशात झाले तर

 परंतु आता नवीन नियमानुसार सुकन्या समृद्धी खाते हे इतर काही कारणासाठी देखील बंद केले जाऊ शकते म्हणजेच मुलगी हे एखाद्या आजाराने ग्रस्त असेल किंवा पालकाच्या मृत्यूनंतर बंद केली जाऊ शकते.

4. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलगी ही दहा वर्षे पूर्ण झाल्यावर तिचे खाते स्वतः चालू शकत होती पण आता नियमावली बदल केल्यानुसार मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर ती तिचे खाते चालू शकते.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत काही फायदे मिळू शकतात.

सुकन्या समृद्धी योजना व्याजदर

  • चांगला व्याजदर:- अन्य दुसऱ्या कर बचत योजनेच्या तुलनेत या योजनेचा व्याजदर हा अतिशय चांगला आहे म्हणजेच 2023-2024 मध्ये प्रथम तीमाही नुसार 7.6% दराने व्याजदर जाहीर केला आहे.
  • आयकर करीमध्ये सवलत:- आयकर कायदा कलम 80 अंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेत ज्या पालकांनी पैसा गुंतवला आहे त्यांना हॅकर करांमध्ये सवलग मिळते.
  • गुंतवणुकीची रक्कम एकदम सुलभ:- या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार हा 250 रुपये ते 1.5 रुपये पर्यंत रक्कम जमा करू शकतो.
  • आकर्षक व्याजदर:- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही उद्योग गुंतवणूक करू शकतात व इतर योजनेच्या व्याजदर अपेक्षा या योजनेचा व्याजदर हा चांगला आहे आणि तुम्हीही या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हालाही योग्य व्याजदर व आकर्षक परतावा मिळू शकतो. 
  •  सुलभ हस्तांतरण:-सुकन्या समृद्धी योजनेचे खाते चालवणारे खातेदार हे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खाते सहजपणे हस्तांतरित करू शकतात. 
  • हमी परतावा:- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत हमीचा परतावा हा निश्चितपणे मिळतो कारण ही योजना सरकार द्वारे चालवली जात असते त्यामुळे खातेदार मिळणाऱ्या परताव्यामध्ये निश्चित असतो. 
  • sukanya samriddhi yojana interest rate 2024

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे जमा करण्याची पद्धत ही एकदम सोपी आहे ती म्हणजे असे की तुम्ही खात्यामध्ये पैसे रोख,ड्राफ्ट,चेक किंवा UPI पेमेंट द्वारे ही जमा करू शकता.

समजा तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यावर चेक द्वारे पेमेंट जमा केले असता तो चेक क्लियरन्स ज्या दिवशी होईल त्या दिवशीपासून तुम्हाला व्याजाचा लाभ घेता येईल आणि तुम्ही जर मनी ट्रान्सफर द्वारे जमा केले असतील तरजमा झालेल्या पुढील दिवसापासून त्या पैशावर व्याज चालू होईल.

समृद्धी योजनेचे खाते हे प्रामुख्याने पोस्ट ऑफिस मध्ये उघडले जाते. याशिवाय जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सरकारी बँकेमध्ये ही या योजनेचे खाते उघडू शकता.

या योजनेअंतर्गत तुम्ही खालील बँकेमध्ये खाते उघडू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ बडोदा

पंजाब नॅशनल बँक

बँक ऑफ इंडिया

इंडियन बँक

आयसीआयसीआय बँक

ॲक्सिस बँक

 पोस्ट ऑफिस

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील काही पात्रता आहेत

  • सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भरतीचा नागरिक असणे आवश्यक आहे
  • खाते फक्त मुलीच्या नावानेच काढता येतात व खातेदार हा त्यांचा पालक असतो.
  • खाते उघडताना मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे
  • खाते उघडताना एका वेळेस एकाच मुलीचे खाते उघडता येते.
  • फक्त एका कुटुंबातील दोन मुलीच्या नावे खाते उघडता येतील.
  • दत्तक मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खातेही उघडता येते.

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी खालील काही कागदपत्राची आवश्यकता आहे 

  • पालकांचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • ओळखपत्र
  • मुलीचे आधार कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर

  • सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा जवळच्या बँकेच्या शाखेमध्ये तुम्ही हे खाते उघडू शकता. हे खाते उघडताना तुम्हाला आवश्यक्य त्या कागदपत्राची पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • पोस्टामध्ये किंवा बँकेचे शाखेत केल्यानंतर तुम्हाला खाते उघडण्याचा फॉर्म घेऊन तो व्यवस्थित भरावा लागेल.
  • भरलेली सर्व माहिती अचूक व आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • आता तुम्हाला हा अर्ज पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये जमा करायचा आहे.
  • या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला आधार रक्कम 250 रुपये कमीत कमी जमा करायचे आहे तुम्हाला जास्त रक्कम जावा करायची असल्यास हवी तेवढी रक्कम तुम्ही जमा करू शकता.
  •  हा भरलेला अर्ज कर्मचाऱ्याकडे जमा केला जातो व अशा पद्धतीने तुमचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले जाईल.

प्रश्न :- सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana in Marathi) अंतर्गत कमीत कमी किती रक्कम भरावी लागते?

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कमीत कमी 250 रुपये भरणा करणे आवश्यक आहे.

प्रश्न :- सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत जास्तीत जास्त किती रक्कम भरावी लागते?

या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 1.50 हजार रुपये भरावे लागतात.

प्रश्न :- सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत ठेवीचा कालावधी किती आहे?

या योजनेचा अंतर्गत ठेवीचा कालावधी हा 21 वर्षाचा आहे.

प्रश्न :-सुकन्या समृद्धी योजनेमधून जमा पैसे कधी काढता येतात?

या योजनेअंतर्गत जर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असेल तर जमा झालेले रकमेतून 50 टक्के रक्कम काढता येते.

प्रश्न :- सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana in Marathi) अंतर्गत कर्ज घेता येते का?

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कसल्याही प्रकारचे कर्ज घेता येत नाही.

प्रश्न :- सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद झाल्यास किती दंड आकारला जातो?

जर समजा काही कारणास्तव खातेदाराकडून त्याचे खाते बंद झाल्यास त्या खात्याला दरवर्षी 50रुपये दंड आकारला जातो.

प्रश्न :- सुकन्या समृद्धी खात्यात पैसे कोण जमा करू शकतात?

कन्या समृद्धी योजनेच्या खात्यात दहा वर्षाच्या खालील मुलीचे पालक पैसे जमा करू शकतात.

प्रश्न :- मी सुकन्या समृद्धी मध्ये 10 लाख जमा करू शकतो का?

 सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कमीत कमी 250 रुपये व जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करू शकता .