प्रस्तावना:-
E-Peek Pahani 2024 | E pik pahani kashi karavi 2024 आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे येथील 70 ते 80 % लोक हे प्रामुख्याने शेती या व्यवसायावर अवलंबून असतात. निसर्गाच्या वाढत्या बदल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे आता खूप अडचणीचे झालेले आहे. जसे की हवामानातील बदल पाण्याची अनउपलब्धता, कीड, रोग त्याचबरोबर नैसर्गिक संकटे यामुळे शेतातील उत्पादनावर एकूणच परिणाम होताना दिसत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र शासन त्याचबरोबर राज्य शासन वेगवेगळ्या योजना राबवीत असतात. 2002 ते 2024 पर्यंत निसर्गामध्ये विविध प्रकारचे बदल आढळून आलेले आहेत. ज्यामुळे शेतीवर परिणाम झालेले आहेत याच परिणामाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी या हातबल होत आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने E-Peek Pahani 2024 हा एक नव्याने प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. तर चला मित्रांनो आज आपण असेच एका योजनेविषयी माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
E-Peek Pahani 2024 :- ई पीक पाहणी म्हणजे काय?
E-Peek Pahani 2024 ई पिक पाहणी ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतामध्ये लागवड केलेल्या पिकांची सध्याची स्थिती कशी आहे, त्याच बरोबर पिकांची नियमित तपासणी करण्यात येते, त्या प्रकारच्या प्रक्रियेला ई पीक पाहणी असे नाव दिले आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास हे एक प्रकारचे एप्लीकेशन आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंद या एप्लीकेशन मध्ये ठेवण्यात येते. त्याचबरोबर ठेवलेल्या पिकाची नोंद ही त्यांच्या सातबारा वरती नोंदवली जाते ज्याच्यामुळे सरकारने देण्यात आलेले अनुदान त्याच बरोबर विमा हे याच नोंदीच्या आधारावर गृहीत धरले जाते. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे एप्लीकेशन आहे. महाराष्ट्र शासनाने “माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझ्या पीक पेरा” अशी घोषणा देऊन या आपलिकेशन ला मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी सरकारने ही E-peek Pahani DCS 3.0 हे आपलिकेशन नव्याने लॉन्च केले आहे.ज्यामध्ये सविस्तर पद्धतीने शेतकऱ्यांना माहिती नोंदणी करण्यात येते. त्याचबरोबर हे आपलिकेशन कसे वापरायचे याचेही सविस्तर माहिती या आपलिकेशनच्या हेल्प या बटनामध्ये दिलेली आहे. तर चला मित्रांनो आपण या ॲप्लिकेशनची नोंदणी कशी करायची आहे हे सविस्तर आपण जाणून घेऊया.
E-Peek Pahani 2024 :- महत्व
निसर्गातील वाढत्या बदल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या आपल्या पिकाची माहिती या आपलिकेशन मध्ये त्याने सादर केलेले असते त्याचे द्वारे शेतकऱ्याची किती प्रमाणात नुकसान झाले आहे हेही दिसते त्यामुळे सरकार द्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या योजनांचा आणि नुकसानीची भरपाई या नोंदीवर आधारित आहे त्यामुळे खूप महत्त्वाचे झालेले आहे.
E-Peek Pahani 2024 :- मुद्दे
प्रकल्पाचे नाव | E-Peek Pahani 2024 | ई-पीक पाहणी 2024 |
कोणत्या प्रकल्पांतर्गत | महाराष्ट्र कृषी व महसूल विभाग |
लाभ | पिक विमा रक्कम |
2024 मधील ई पिक पाहणी सुरुवात | 01 ऑगस्ट 2024 |
2024 मधील ई पीक पाहणी अंतिम मुदत | 15 सप्टेंबर 2024 |
E-Peek Pahani 2024 :- नोंदणी
E Pik Pahani Online Registration भारत देश हा कृषीप्रधान देश आसल्यामुळे आपल्या भारत देशामध्ये बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून आहेत, त्यामुळे त्यांना निसर्गातील झालेल्या बदलामुळे बऱ्याच संकटातून तोंड द्यावे लागते. यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये बऱ्याच ठिकाणी पावसामुळे अतिवृष्टी त्याचबरोबर काही भागांमध्ये खंड व दुष्काळ निर्माण झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याने काढलेल्या पिक विमा सारख्या सोयीमुळे सध्या तरी तो संतुष्ट हे परंतु हे सर्व करताना E-Peek Pahani 2024 ही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजेच ई पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी वरती नोंदणी करणे आवश्यक आहे. केलेल्या नोंदणी द्वारे विमा कंपनी ही ज्या ज्या पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना ती रक्कम देण्यासाठी बांधील राहील. 1 ऑगस्ट 2014 पासून ई पीक पाहणी ही ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन अप्लिकेशन लॉन्च केले आहे. ज्याला E-peek Pahani DCS 3.0 असे नाव देण्यात आले आहे. या आपलिकेशन द्वारे शेतकरी हा लागवड केलेल्या पिकाची माहिती नोंदवू शकतो. शेतकऱ्यांना हे ॲप्लिकेशन वापरायचे असल्यास खालील काही स्टेप चा अवलंब करावा लागतो.(E pik pahani kashi karavi 2024)
1.सर्वप्रथम वापरकर्त्यांनी हे ई पीक पाहणीचं एप्लीकेशन हे गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करावे आणि डाउनलोड करता वेळेस E-peek Pahani DCS 3.0 हेच वर्जन घ्यावे.
2.ज्यावेळेस वापर करता हे एप्लीकेशन डाऊनलोड करतो त्यावेळेस त्याला आपलं मनःपूर्वक स्वागत अशी एक माहिती स्क्रीन वरती दाखवण्यात येते त्यानंतर त्या स्कीनला उजव्या बाजूला स्क्रोल करावी.
3.वापरकर्त्याला स्क्रीनवरती आता नोंदणीसाठी खालील बाबींची मदत होऊ शकेल असा मजकूर दिसेल त्यानंतर खाली एक ऑप्शन दिसेल ज्यामध्ये तुमचा महसूल विभाग निवडा असे सांगण्यात येईल.
4.महाराष्ट्र शासनाने खालील प्रकारचे काही महसूल विभाग दिलेले आहेत यापैकी तुमचा जिल्हा ज्या महसूल विभागात येतो ते महसूल निवडावे लागेल 1.अमरावती 2.छत्रपती संभाजी नगर 3.कोकण 4.नागपूर 5.नाशिक 6.पुणे
5.आता महसूल विभाग निवडल्यानंतर तुम्हाला लॉगिन पद्धत निवडा असे दोन पर्याय दिसतील
6.आता तुम्हाला शेतकरी म्हणून लॉगिन करा या ऑप्शनला निवडायचे आहे.
- शेतकरी म्हणून लॉगिन करा
- इतर
7.त्यानंतर तुम्हाला एक नवीन ऑप्शन दिसेल ज्यामध्ये मोबाईल नंबर प्रवेश करा असे सांगण्यात येईल आता तुम्ही तुमचा सदर मोबाईल नंबर टाकून पुढे जा या बटनला क्लिक करायचे आहे.
8.आता तुम्हाला गाव निवडा असे स्क्रीन वरती दिसेल त्यामध्ये तुम्हाला खालील काही ऑप्शन दिसतील.
- विभाग
- जिल्हा
- तालुका
- गाव
9.वरील सर्व ऑप्शन भरल्यानंतर समोरील भागावरती क्लिक करून पुढे जावे.
10.वरती तुम्हाला खातेदार निवडा असे दिसेल ज्यामध्ये खालील ऑप्शन पैकी एक ऑप्शन निवडावे लागेल
- पहिले नाव
- मधले नाव
- आडनाव
- खाते क्रमांक
- गट क्रमांक
11.वरील पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय निवडून तुम्ही शोधा या बटन वरती क्लिक करावे.
12.शोधा या बटनच्या खाली तुम्हाला खातेदार निवडा असा एक ऑप्शन दिसेल यामध्ये खातेदाराची संपूर्ण माहिती दिसते तुम्हाला ई पीक पाहणी करायची आहे त्या खातेदाराचे नाव निवडावे.
13.आता तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्ही विचारलेल्या पर्यायांमध्ये टाकून पुढे जा या बटन वरती क्लिक करा.
14.आता तुम्हाला हे पीक पाहणीच्या होम पेज दिसेल ज्यामध्ये एकूण सहा पर्याय आहेत.
- कायम पड / चालू पड नोंदवा:- शेतकऱ्याला जर आपल्या जमिनीवर कायम पड किंवा चालू पड नोंदवायचे असल्यास या एक नंबरच्या पर्यायाचा त्याने अवलंब करावा त्यामध्ये सर्व माहिती अचूकपणे भरून कायमची पड किंवा चालू नोंदवावी लागेल.
- पीक माहिती नोंदवा:- या पर्यायाला निवडले असता स्क्रीन वरती पीक पेरणीची माहिती भरा असे बरेच ऑप्शन दिसतील ज्यामध्ये तुम्हाला खाते क्रमांक, भूमापन गट क्रमांक, हंगाम पिकाचा वर्ग, पिकांची झाडांची नावे, क्षेत्रभरा, जलसिंचनाचे साधन, सिंचन पद्धती आणि लागवडीचा दिनांक या सर्व माहिती तुम्हाला विचारले जातील त्या तुम्ही व्यवस्थित भरणे आवश्यक आहे.(ई पीक पाहणी नोंदणी 2024)
- बांधावरची झाडे नोंदवा:- जर शेतकऱ्याला आपल्या शेतामधील बांधावरील काही झाडे नोंदवायची झाल्यास त्याने या पर्यायाचा अवलंब करावा व बांधावरची झाडांची नोंद ही पीक पाहणी मध्ये नोंदवावी.
- अपलोड:- पीक माहिती नोंदवल्यानंतर सर्व माहितीही अपलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर सेव होते त्यामुळे पिकाची माहिती नोंदवल्यानंतर अपलोड बटन दाबणे हे आवश्यक आहे.
- पीक माहिती मिळवा:- या पर्यायांमध्ये शेतकऱ्यांनी जी काही माहिती नोंदवलेले आहे ती माहिती या पर्यायांमध्ये उपलब्ध झालेली असते व याची नोंद सातबारा वरती 48 तासानंतर दिसली जाते.
- गाव खातेदारांची पीक पाहणी:- हा शेवटचा पर्याय आहे यामध्ये पिकांची नोंदवलेली माहिती त्याचबरोबर गट क्रमांक खाते क्रमांक असे सर्व पर्यायाची माहिती तुम्हाला शेवटी दिसेल. ही माहिती तुम्हाला तुमच्या गावच्या खातेदार यादीमध्ये ही पीक पाहणी मध्ये दिसेल.(E pik pahani last date 2024)
वरील सर्व माहिती तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला 48 तासांची मुदत देण्यात येते ज्यामध्ये तुम्ही हवी असलेले बदल किंवा काही माहिती नष्ट करू शकता 48 तासानंतर तुम्ही कोणताही पर्याय निवडला तरी कुठलाही बदल तुम्हाला करता येत नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी माहिती भरताना अचूक माहिती भरणे खूप महत्त्वाचे आहे.
15.आता तुम्हाला तुम्ही किती तारखेला पिकाची लागवड केली आहे ते निवडायचे आहे.
16.पुढे जा या बटन वरती क्लिक केल्यानंतर छायाचित्र एक व छायाचित्र दोन असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील प्रथमतः तुम्ही छायाचित्रे एक वर क्लिक करून सदरील गट क्रमांक मधील पिकाचे कॅमेरा द्वारे छायाचित्र घेऊन सेव बटनवर क्लिक करावे त्यानंतर छायाचित्र दोन वर ठराविक पिकाचे छायाचित्र घेऊन सेव या बटनाला क्लिक करावे.
17.हे सर्व केल्यानंतर शेवटी तुम्हाला सबमिट या बटणावरती क्लिक करायचे आहे.
18.आता तुम्हाला स्क्रीन वरती एक मेसेज दिसेल तुमची माहिती प्राप्त झाली आहे.
19.परत तुम्हाला फोन करून पेज वरती येऊन अपलोड या बटनावरती क्लिक करायचा आहे तुम्ही अपलोड बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज दिसेल यामध्ये तुमच्या पिकाची माहिती प्राप्त झाली आहे असे सांगण्यात येईल.
20.हे सर्व केल्यानंतर तुम्ही पिकांची माहिती पहा या बटन वरती क्लिक करून आपण भरलेली माहिती अचूक आहे का नाही हे सर्व पाहिजे आहे.
21गावाचे खातेदारांची पीक पाहणी या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव शोधायचे आहे आणि जर तुमचे नाव ग्रीन कलर मध्ये आलेले असेल तर तुम्ही केलेली ही पीक पाहणी ही अचूक मांडण्यात येईल व सदरील पिकांची नोंद ही सातबारा वरती नोंदवण्यात येईल.
ई पीक पाहणी PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ई पीक पाहणी एप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
सरकारी योजना | येथे क्लिक करा. |
केंद्र शासन योजना | येथे क्लिक करा. |
शासन निर्णय | येथे क्लिक करा. |
जॉइन टेलेग्राम | येथे क्लिक करा. |
E-Peek Pahani 2024 :- FAQs
1. ई-पिक पाहणी म्हणजे काय?
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला एक नवीन प्रकल्प आहे ज्यामध्ये शेतकरी आपल्या शेतातील पिकांची नोंद एका एप्लीकेशन मध्ये नोंदवितो आणि मिळणाऱ्या विविध योजनेचा लाभ या नोंदीवरच मिळत असतो अशा प्रकल्पाला ई पीक पाहणी असे म्हणतात.
2. ई-पिक पाहणीचे फायदे काय आहेत?
ई-पिक पाहणीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे नैसर्गिक संकटामध्ये शेतकऱ्याची बरीच नुकसान होते त्याला त्याची भरपाई ही विम्याच्या स्वरूपात मिळते त्यामुळे जर तुमची ई-पिकची नोंद नसेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येत नाही.
3. ई-पिक पाहणी कशी केली जाते?
ई-पिक ही मोबाईल वर करण्यात येते मोबाईल मध्ये E-peek Pahani DCS 3.0 हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यावे लागते आणि ज्या गट क्रमांक ची ई-पिक पाहणी करायचे आहे त्या गट नंबर मध्ये जाऊन एक पीक पाहणी करावी लागते.
4. ई-पिक पाहणीसाठी कोणत्या साधनांची आवश्यकता आहे?
ई-पिक पाहणी करण्यासाठी एक अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे.
हे ही नक्की वाचा…..👇👇👇👇👇👇
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Ladka Bhau Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Lek Ladki Yojana | येथे क्लिक करा |
Lakhpati Didi Yojana | येथे क्लिक करा |
Silai Machine Yojana | येथे क्लिक करा |
PM Awas Yojana | येथे क्लिक करा |
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment