प्रस्तावना :-
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 | शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 (शरद पवार ग्राम समृद्धी योजना) शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो त्यामुळे सरकार हे शेतकऱ्याच्या हिताविषयी विविध योजना राबवत असतात, ज्यामध्ये शेतकऱ्याचा आर्थिक दृष्ट्या विकास व्हावा हे महत्त्वाचे उद्दिष्ट सरकारचे असते याच अनुषंगाने. 12 डिसेंबर 2020 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “Sharad Pawar Gram Samruddhi Yojana” सुरुवात करण्यात आली. ही योजना शेतकऱ्यांसाठी एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या प्रबल करणे हा होय.
महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे, या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विविध योजना अंतर्गत आर्थिक सहाय्य देखील केले जाते.ज्यामध्ये शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावली जाते त्याचबरोबर शेतकऱ्याचे उत्पन्न हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे व हल्ली निसर्गातील वाढत्या बदल्यामुळे शेतकरी हा खूप कठीण परिस्थितीमध्ये जगत आहे, या गोष्टीचा विचार करून सरकार हे विविध उपक्रमांतर्गत शेतकऱ्याची प्रगती करण्यास पुढाकार घेत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी शेड बांधणी,शेळीपालन, कुक्कुटपालन आणि इतर अनेक योजना राबवली जातात ज्यामुळे ते आपला उदारनिर्वाह सुव्यवस्थेत करू शकतील. तर चला मित्रांनो या लेखाद्वारे आज आपण सर्व माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा लेख आपण पूर्णपणे वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 :- सविस्तर माहिती
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana In Marathi शेतकरी हा सर्वस्वीपणे शेतीवर अवलंबून असतो, त्याचे मिळणारे उत्पन्नही शेतीवरच अवलंबून आहे. गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्याला मिळणारे उत्पन्नही अनियमित स्वरूपात दिसून येत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गातील वाढत्या बदलामुळे शेतीवर अनिष्ट परिणाम होत आहेत या परिणामाचा झळा ह्या शेतकऱ्याला बसत आहेत. या सर्व बाबीमुळे शेतकरी हा अत्यंत चिंतेत व संकटात दिसत आहे. महाराष्ट्र शासनाने शेतीला जोडधंदा म्हणून विविध योजनाचे नियोजन सरकार करत आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन, कुक्कुटपालन असे विविध जोडधंदे शेतकऱ्यांनी करावे ज्याच्यामुळे तो आपला दैनंदिन जीवनातील खर्च भागवू शकेल.
महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आपल्या शेतीच्या जोडीने पशुपालन, कुक्कुटपालन इत्यादी जोडधंद्यांवर अवलंबून असतात. यामुळे त्यांचे उत्पन्न स्थिर राहते, परंतु जनावरांच्या देखभालीसाठी पुरेशा संसाधनांची कमतरता, योग्य शेड नसणे, ऊन, पाऊस, थंडी यापासून संरक्षण मिळवण्याची समस्या आणि जनावरांच्या आरोग्यविषयक अडचणी यांसारख्या समस्यांमुळे अनेकदा शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 :- माहिती
शरद पवार ग्राम समृद्धी योजना याविषयी खालील काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत.
योजनेचे नाव | Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 | शरद पवार ग्राम समृद्धी योजना |
सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचाजोडधंदा निर्मिती करणे त्याचबरोबर त्यांचा आर्थिक दृष्टी विकास करणे. |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील सर्वशेतकरी वर्ग/ मजूर वर्ग/ नागरिक |
लाभ | महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना लाभ हा अनुदानाच्या स्वरूपात देतात |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 :- उद्देश
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे त्याचबरोबेर ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान, सामाजिक आणि आर्थिक विकास साधने हे आहे. या योजनेतून मिळणारे अनुदान शेतकऱ्यांना शेतीबरोबर पशुपालन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आहे. जसे की शेड बांधणी, कुकूटपालन, शेळीपालन करणे यासाठी लागणारा खर्च हा शेतकऱ्याला पर्वदणारा नसतो, त्यामुळे अनुदानाचे स्वरूपात मदत करून देण्यात येते. खालील काही महत्त्वाच्या बाबी आपण पाहुयात.
1.योजना अंतर्गत पशुपालनाचे संरक्षण करणे:
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना जनावरांसाठी पक्के शेड बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान स्वरूपामध्ये मदत मिळते, ज्यामुळे शेतकरी आपल्या जनावरांचे ऊन, पाऊस, वारा आणि थंडी यापासून संरक्षण करू शकतो. जनावरांचे शेडमुळे आरोग्य चांगले राहते ज्यामुळे त्याच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
2. शेतीला जोडधंद्यांचे प्रोत्साहन:
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता जोडधंदे निर्माण करून शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पशुपालन, शेळीपालन, कुकूटपालन अशा उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना
अधिक अधिक उत्पादन मिळून त्याला प्रोत्साहित करण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे शेतकऱ्याचे जीवन स्तर उंचावणार आहे तसेच उत्पन्नामध्ये सुद्धा भर पडणार आहे.
3. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास:
या योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या कुटुंबांना त्याच बरोबर बऱ्याच लोकांना त्या शेडमध्ये काम करण्यासाठी रोजगार संधी मिळणार आहे त्यामुळे इतर मजुरांनाही या योजनेअंतर्गत काम मिळण्यास मदत होणार आहे.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 :- फायदे
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारने दिलेल्या अनुदानामुळे शेतकरी पक्के शेड बांधण्याचा सरकारचा मानस आहे ज्यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते या योजनेमुळे शेळीपालन, कुक्कुटपालन आणि इतर जोडधंद्यांमध्ये आर्थिक मदत मिळतेत्याचबरोबर जनावरांचे आरोग्य सुधारण्यास मदतहोणार आहे.
1. गोठा बांधण्यासाठी अनुदान:
शेतकऱ्यांना गाई-म्हशींसाठी गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्याला
2 ते 6 गुरांसाठी 77,188 रुपये
6 पेक्षा जास्त जनावरे असतील तर त्याच प्रमाणात अनुदानही वाढवले जाते
उदा. 12 गुरांसाठी दुप्पट आणि 18 गुरांसाठी तिप्पट अनुदान दिले जाते.
2. शेळीपालनासाठी शेड बांधणे अनुदान:
10 शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिले जाते.त्याचबरोबर शेतकऱ्याकडे 10 पेक्षा अधिक शेळ्या असतील, तर त्या प्रमाणात अनुदान देखील देण्यात येते.
3. कुक्कुटपालन शेड बांधणे अनुदान:
कुकुट पालन शेड बांधणी साठी एकंदरीत 100 कोंबड्यांसाठी शेड बांधावयाचे असल्यास एकूण 49,760 रुपये अनुदान दिले जाते. त्याचबरोबर शेतकऱ्याकडे 100 पेक्षा जास्त कोंबड्या असतील, तर त्याच प्रमाणात अनुदान देखील देण्यात येते
4. नाडेप कंपोस्टिंगसाठी अनुदान:
नाडेप ही एक कचऱ्याच्या खतामध्ये रूपांतर करण्याची पद्धत आहे. याद्वारे शेतकऱ्यांना शेतामध्ये खत होण्यास मदत होते, ज्यामुळे शेतातील दर्जा हा वाढला जातो हे करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना एकूण 10,537 रुपये अनुदान दिले जाते. यामुळे शेतकरी हा जैविक शेतीला प्रोत्साहन देऊ शकतात आणि त्यांच्या उत्पादनात सुधारणा करू शकतात.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 :- पात्रता
अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी खालील पात्रता असणे आवश्यक आहे
- अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही सरकारी पशुपालन योजनेचा लाभार्थी नसावा.
- अर्जदाराचा मुख्य व्यवसाय शेती असावा.
- अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा आणि त्याच्याकडे शेती असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे कमीत कमी दहा गुंठे जमीन असणे बंधनकारक आहे.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 :- अनुदान
या योजनेअंतर्गत खालील 4 प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना अनुदान देते हे अनुदान त्यांना डीबीटीमार्फत त्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. या अनुदानाचे स्वरूप हे त्या त्या प्रकल्पावर निर्धारित आहे म्हणजेच कुक्कुटपालनासाठी आणि शेळीपालनासाठी वेगवेगळे अनुदान महाराष्ट्र सरकारने जाहीर केले असून त्या प्रमाणात अनुदानही शेतकऱ्यांना देण्यात येते.
- कुक्कुट पालन शेड बांधणे.
- गाय व म्हशी गोठा बांधणे.
- शेळी पालन शेड बांधणे.
- भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 :- कागदपत्रे
या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जदाराने खालील कागदपत्राचे पूर्तता करणे आवश्यक आहे
1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. जातीचे प्रमाणपत्र
4. उत्पन्न प्रमाणपत्र
5. ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र
6. नरेगा ओळखपत्र (लघुधारक असलेल्यांसाठी)
7. पॅन कार्ड
8. बँक खाते पुस्तक
9. ई-मेल आयडी
10.जन्माचा दाखला
11.मोबाईल नंबर
12.शेड साठी अर्जदाराने बजेट जोडणे आवश्यक आहे.
13.पासपोर्ट साईज फोटो.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 :- अर्ज प्रक्रिया
sharad pawar gram samridhi yojana form अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. या योजनेसाठी अर्जदाराने त्याच्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अर्ज घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरावी आणि त्यासोबत लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी आणि शेवटी अर्जाची पडताळणी केल्यानंतर अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात येईल (Sharad Pawar Gram Samridhi Yojana Online Apply)
- शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराने आपल्या नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन अर्ज घ्यावा.
- मिळेल अर्ज व्यवस्थित वाचून विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरावी.
- आता माहिती भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे जोडावयाचे आहेत अर्जामध्ये नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- कागदपत्रे जोडल्यानंतर तो अर्ज सदरील वरिष्ठ ग्रामपंचायत मधील अधिकाऱ्याकडे एक वेळेस पडताळणी करून घ्यावा.
- अर्ज पडताळणी झाल्यानंतर तो अर्ज ग्रामपंचायत मध्ये जमा करावा व जमा केल्यानंतर ग्रामपंचायतीकडून जमा केल्याची पोचपावती घेणे अनिवार्य आहे.
- अशा प्रकारे शरद पवार ग्रामीण समृद्धी योजने अंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्जाची प्रक्रिया केली जाते.
फॉर्म Download करण्यासाठी येथे क्लिक करा.
नवीन अर्ज डाउनलोड करण्यासाठी click here
Sharad Pawar Gram Samridhi Yojana gr येथे क्लिक करा.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 :- निकष
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याच्या जनावरांची संरक्षण करता येणार आहे त्याचबरोबर त्याला त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करता येणार आहे या सर्व गोष्टींमुळेवाढीवर होणार आहे.. यायोजनेमुळे शेतकरी या आर्थिक दृष्ट्या सक्षम त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांनाही रोजगाराची संधी मिळणार आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी अनेकदा आर्थिक संकटात सापडतात. शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या बाबतीत अनेक अडचणी निर्माण होतात. परंतु या योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे त्यांना शेतीबरोबरच पशुपालन, कुक्कुटपालन यासारखे जोडधंदे सुरू करण्यास मदत होते. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारते.
योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या मदतीमुळे शेतकरी त्यांच्या शेळ्या, गाई-म्हशी यांसारख्या जनावरांचे संगोपन चांगल्या प्रकारे करू शकतात. शेडमुळे जनावरांना संरक्षण मिळते, ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांची उत्पादन क्षमता वाढते. यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो आणि त्यांचे उत्पन्न स्थिर राहते.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 ही एक आदर्श योजना आहे जी शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमता आणि स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ही योजना एक प्रभावी साधन ठरू शकते.
सरकारी योजना | येथे क्लिक करा. |
केंद्र शासन योजना | येथे क्लिक करा. |
शासन निर्णय | येथे क्लिक करा. |
जॉइन टेलेग्राम | येथे क्लिक करा. |
हे ही नक्की वाचा…👇👇👇👇👇👇📰📰📰
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Shravan Bal yojana | येथे क्लिक करा |
Kishori Shakti Yojana | येथे क्लिक करा |
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024:- FAQs
प्रश्न 1: शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 काय आहे?
उत्तर: शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनावरांसाठी शेड बांधणी पशुपालन शेतकऱ्यांना जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी आणि पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारख्या जोडधंद्यांमध्ये आर्थिक सहाय्य दिले जाते.
प्रश्न 2: शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
उत्तर: या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण शेतकऱ्यांना शेतीबाह्य उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे, आणि त्यांच्या जनावरांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे आहे.
प्रश्न 3: कोणत्या प्रकारच्या जोडधंद्यांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते?
उत्तर: शरद पवार ग्राम समृद्धी योजनेत शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन, गाई-म्हशी पालन आणि इतर पशुपालनासंबंधित उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाते, जे जनावरांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे.
प्रश्न 4: गोठा किंवा शेड बांधण्यासाठी किती अनुदान मिळते?
उत्तर: गाई-म्हशींसाठी शेड बांधण्यासाठी 2 ते 6 गुरांसाठी 77,188 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. शेळीपालनासाठी 10 शेळ्यांसाठी 49,284 रुपये आणि 100 कोंबड्यांसाठी शेड बांधण्यासाठी 49,760 रुपये अनुदान दिले जाते.
प्रश्न 5: शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी पात्रता काय आहे?
उत्तर: अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा, मुख्य व्यवसाय शेती असावा, आणि अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही सरकारी पशुपालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
Leave a comment