प्रस्तावना:-
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 Online Registration | Magel Tyala Saur Krushi Pump Online Apply महाराष्ट्र शासन वेळोवेळी नवनवीन योजना अमलात आणत असतात, त्यामधीलच एका योजने विषयी आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक कल्याणकारी योजना राबवली आहे,ती म्हणजे शेतकरी हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतो त्यामुळे शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा हा खंडित असतो, त्यामुळे त्याला बऱ्याच वेळा नुकसानीला सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने “मागेल त्याला सोलार पंप” ही योजना राबविण्याचे ठरवले आहे.
या योजनेअंतर्गत सौर कृषी पंप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये बसवता येणार आहे आणि त्यासाठी नवीन ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. या योजनेची सविस्तर माहिती आज आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 :- सविस्तर माहिती
गेल्या काही वर्षापासून शेतकरी हा विजेसाठी त्रस्त आहे, त्यामुळे त्याला शेतीमधून मिळणारे उत्पन्न हे घटताना दिसून येत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने “मागेल त्याला सोलार पंप योजना“सुरू केली आहे. या कल्याणकारी योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा जो काही महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे यामध्ये सर्वजण शेतकरी अर्ज करू शकतात. जर तुम्ही एससी/ एसटीचे कॅटेगरी म्हणजेच अनुसूचित जाती/ जमातीमध्ये येत असाल तर तुम्हाला पाच टक्के रक्कम फक्त भरावी लागणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी पर्यंतचे पंप मिळणार आहेत, तसेच महत्त्वाचे म्हणजे पाच वर्षाची दुरुस्तीची हमी सुद्धा मिळणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्याला इन्शुरन्स सुद्धा दिला जाणार आहे.
या योजनेमध्ये जर तुमची 2.5 एकरापर्यंत जमीन असेल तर तुम्हाला 3 एचपी चा पंप दिला जाईल आणि 2.5 एकरापेक्षा जास्त म्हणजे 5 एकर पर्यंत जर तुमची शेती असेल जमीन असेल तर तुम्हाला 5 एचपी चा पंप तुम्हाला दिला जाणार आहे आणि जर 5 एकरापेक्षा जास्त तुमची जमीन असेल तर तुम्हाला 7.5 एचपी चा जो काही पंप आहे तो दिला जाणार आहे.
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 :- मुद्दे
योजनेचे नाव | Magel Tyala Solar Pump Yojana 2024 |
सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करता यावा त्याचबरोबर त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे. |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग |
लाभ | महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना लाभ हा सोलार पंपाच्या माध्यमातून मिळणार |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन |
आधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा. |
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 :- वैशिष्ट्य
महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे खालील प्रमाणे काही वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत.
- शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
- सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
- अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के
- उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
- जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
- पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
- वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
- सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 :- निवड व निकष
- २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
- ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
- अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 :- पात्रता
Magel tyala krushi pump yojana या योजनेअंतर्गत अर्जदाराकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही सौर कृषी पंपाचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदाराकडे स्वतःच्या नावे किंवा भागीदारी पद्धतीने जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे सामायिक क्षेत्र असलेली जमीन असल्यास त्यामधील असणारे भोगवाटेदार यांचे संमती पत्र असणे आवश्यक आहे.
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 :- कागदपत्रे
Magel tyala krushi pump yojana 2024 अर्जदाराने खालील प्रकारचे कागदपत्रे देणे अनिवार्य आहे.
- आधार कार्ड
- जमिनीचा सातबारा
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 :- ऑनलाईन अर्ज
Magel tyala krushi pump yojana 2024 online registration ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील काही स्टेपचा अवलंब करावा लागतो.
1.ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला लिंक दिलेली आहे येथे क्लिक करा. होम पेजवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजना.
2.मराठी लँग्वेज आपण करूयात त्यानंतर इथे दोन नंबरचा ऑप्शन योजनेची माहिती योजनेची माहिती ऑप्शन वर क्लिक करून योजनेची सर्व माहिती सविस्तरपणे वाचून घ्या.
3.आता चार नंबरचा ऑप्शन लाभार्थी सुविधा वरती क्लिक करायचे ते तीन ऑप्शन दिसतील
4.आता अर्ज करा या वर क्लिक करा Magel tyala krushi pump yojana 2024 online registration form
5.त्यानंतर खालील फॉर्म भरण्यासाठी अर्जदाराची वैयक्तिक माहिती आणि जमिनीचा तपशील लागेल. आधार कार्डचा क्रमांक टाकायचा आहे ज्या व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरताय त्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे नाव तुम्हाला दिसेल – Magel tyala krushi pump yojana 2024 online registration apply
6.त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे आता इथे जिल्हा निवडताना ज्या ठिकाणचा सातबारा आहे ज्या ठिकाणी सोलर पंप बसवायचा आहे. तो जिल्हा आणि त्यानंतर तालुका त्यानंतर गावाचे नाव अर्जदाराला ज्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवायचा आहे त्या गावाचं नाव इथे टाकायचे आहे.
7.आता आपल्याला मुख्य संरक्षण क्रमांक गट क्रमांक विचारेल अर्जदारच्या सातबारा वरती जो गट क्रमांक आहे तो गट क्रमांक इथे टाका, त्यानंतर येथे उपगट क्रमांक पुन्हा एकदा निवडायचे आहे त्यानंतर शेतीचा प्रकार विचारला जाईल. आता ही तुमची शेती कशी आहे म्हणजेच स्वतःच्या मालकीची असेल तर सेल्फ सिलेक्ट करा आणि जर सामाईक वगैरे असेल किंवा शेअर केली असेल तर तुम्ही शेअर सिलेक्ट करू शकता. त्यानंतर जमीन मालकाचं नाव आता या गट नंबर मध्ये तुमचं नाव म्हणजे शेतकऱ्याचे काही नावे दिसतील या मध्ये अर्जदाराचे नाव सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर जमिनीचं एकूण क्षेत्रफळ एकर मध्ये तुम्हाला ॲटोमॅटिकली इथे येईल ही माहिती बरोबर आहे का ऑटोमॅटिक आलेली निश्चित करायचे आहे.
8.त्यानंतर आता आपल्याला अर्जदाराचे नाव त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि अर्जदाराचं आडनाव अशा प्रकारची इथे माहिती भरायची आहे पहिल्यांदा अर्जदारचं नाव टाकायचे त्यानंतर वडिलांचे नाव आणि त्यानंतर आडनाव अशी माहिती इथे टाईप करायची आहे
9.त्यानंतर लिंग विचारलाय पुरुष का स्त्री आहात मेल / फिमेल ऑदर किंवा ऑप्शन सिलेक्ट करायचा नंतर जात वर्गवारी एससी /एसटी /ओबीसी/ जनरल सर्व ऑप्शन दिलेले आहेत एन टी मध्ये येत असेल तर ओबीसी सिलेक्ट केला तर अशा पद्धतीने कॅटेगरी सिलेक्ट करा
10 मोबाईल नंबर अर्जदाराचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. व्यवस्थित मोबाईल नंबर टाकून घ्या ई-मेल आयडी असेल तर टाकून घ्या आणि जर नसेल तर सोडून दिला तरी चालेल, ही वैयक्तिक माहिती आणि आपल्या जमिनीची माहिती ही भरायची त्यानंतर रहिवासी पत्ता व ठिकाण अर्जदार हा ज्या ठिकाणी राहतो तेथील त्याचा घर क्रमांक माहीत असेल तर टाका किंवा गावाचं नाव सुद्धा टाकू शकता. त्यानंतर जिल्हा आणि तालुका भरावयाचा आहे. अर्जदराचा पिनकोड विचारला जाईल तिथे भरपूर असे पिन कोड येत असतील.,तर व्यवस्थित जो काही पिन कोड असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक विचारला जाईल मोबाईल नंबर जो असेल अर्जदाराचा तो इथे टाकायचा त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक हे मॅनडेटरी नाही. पॅन कार्ड नंबर नाही टाकला तरी चालेल.
11.खाली आल्यानंतर आणि सिंचनाची माहिती द्यायची आहे. पहिला आहे जलस्तोत्राचा प्रकार पाण्याचा प्रकार वेल/ बोरवेल ठिकाण जे काही असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता याची सातबारा वरती नोंद असणं गरजेचं आहे गोष्ट लक्षात ठेवा बोरवेल आहे का विहीर आहे ते तुम्ही सिलेक्ट करा.
12.सिंचनाचा प्रकार काय आहे मायक्रोसिंचन आहे ओपन आहे का पाईपने तुम्ही सिंचन करता पाणी देता ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचा.
13 त्यानंतर पाण्याची गुणवत्ता आता पाण्याची गुणवत्ता निवडा हा ऑप्शन विचारलाय तर यामध्ये हार्ड की सॉफ्ट आहे का पाणी जी गुणवत्ता असेल यापैकी एक निवडा.
14.त्यानंतर खोली फुटामध्ये सांगितली आहे जे काही जलस्तोत्राचा प्रकार त्यानंतर पावसाळी हंगामात जल स्तोत्र किती खोली फुटामध्ये आहे. उन्हाळी हंगामात किती फुटामध्ये आहे ते टाकू शकता आणि जर नसेल टाकायचे तर सोडून द्या. त्यानंतर विद्यमान शेत तलाव आहे का जर शेततलाव असेल तर तुम्ही येस/नो करू शकता आणि जर शेत तलाव नसेल तर नो करू शकता.
15.घोषित तपशील आता कृषीचा तपशील म्हणजेच आपण पिकांचा प्रकार मागील वर्षी तुम्ही कोणतं पीक घेतलं होतं खरीप पिक घेतलं होतं का रब्बी पिक घेतलं होतं ऑप्शन तुम्हाला विचारला जाईल जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करा.
16.नंतर विद्यमान पंपाचा तपशील द्यायचा आहे विद्यमान पंप वापरता करत आहे का? आता तुमच्याकडे पंप असेल तर येस करायचा आहे आणि विद्यमान पंपाचा जो प्रकार आहे एसी आहे का डीसी आहे ते सिलेक्ट करायचा आहे. उपप्रकार जो असेल सबरमिसल किंवा सर्फेस असेल किती एचपीचा आहे ते निवडायचे आहे. आता डिझेल पंप तसेच यामध्ये कार्यक्षम पंप आहे का? नसेल तर तुम्ही कोणताच पंप वापरत नसाल तर डायरेक्टली नो ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मग काहीही माहिती भरायची गरज नाही. त्यानंतर खाली या आवश्यक पंपाचा तपशील आता तुम्हाला सौर पंप तुमच्या शेतात बसवायचा आहे तर तो डीसी पंप असेल.
17.त्यानंतर आवश्यक पंपाची श्रेणी तर इथे वॉटर सिलेक्ट करायचं त्यानंतर एचपी मध्ये आवश्यक पंपाची क्षमता आता जेवढी जमीन असेल त्यानुसार तुम्हाला इथे एचपी निवडायला येईल 2.50 पर्यंत असेल तर तुम्ही 3 एचपी आणि 2.50 एकरापेक्षा जास्त असेल जमीन तर 5 एचपी असे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करता येतील
18.त्यानंतर आवश्यक पाणी लिटर मध्ये टाकायचा आहे किती पाणी उपसा लिटर मध्ये टाकल्यानंतर बँकेचा तपशील द्यायचा आहे.
19.बँकेचा तपशील देताना सर्वात पहिल्यांदा बँकेचा खाते नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खातेधारकाचे पूर्ण नाव टाकल्यानंतर आयएफसी कोड आणि आयएफसी कोड टाकून बँक तपशील शोधावरती क्लिक करायचे आहे आता तुम्हाला बँकेचे नाव इथे ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर शाखेचे नाव टाकायचे आहे आणि शाखेचे गाव व टाकायचे आहे.
20.खाली घोषणापत्र आहे इथे जे काही अकरा पॉईंट आहे ते सगळे वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्व भरलेली माहिती आहे तपासून पाहायची आहे. आता मी सहमत आहे या तिन्ही बॉक्स वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. विचारलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत ही कागदपत्रे तुम्ही 500 kb पर्यंत अपलोड करू शकता.
21.पहिलं कागदपत्र म्हणजे सातबारा उतारा तुम्हाला सातबारा उतारा डाऊनलोड करून घ्यायचा आहे ता त्या सातबारावरती विहीरची नोंद असेल किंवा कुपणालिकीची नोंद असेल आणि जर बोरवेलची नोंद असेल. एकापेक्षा जास्त सातबारा मध्ये शेतकरी असतील तर तुम्हाला दोनशे रुपयांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल
22.त्यानंतर दोन नंबरच्या ऑप्शन मध्ये अर्जदराचा आधार कार्ड इमेज द्यायची आहे.
23.त्यानंतर तीन नंबरच्या ऑप्शन मध्ये चेकबुक किंवा पासबुक देऊ शकता. सगळी डॉक्युमेंट पीडीएफ असायला हवीत.
24. चार नंबरच्या ऑप्शन मध्ये पासपोर्ट आकाराचा फोटोलागेल द्यावा अशा पद्धतीने सर्व जे काही डॉक्युमेंट आहेत ते पीडीएफ मध्ये अपलोड करायचे आहेत.
त्यानंतर उजव्या साईडला अपलोड बटणावरती क्लिक करायचं आहे वरील चार ही डॉक्युमेंट्स 100% अपलोड करायचे आहेत.
25. त्यानंतर खालील पर्यायामध्ये आता जे काही इतर कागदपत्र आहेत ते लागू असल्यास द्यायचे आहे जसं की आता पाणी प्रभावित क्षेत्र असेल तर त्या संबंधित नहारकताचा दाखला.
26.जर सामाईक असेल तर त्याचे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागेल म्हणजे दोनशे रुपये चे दोन स्टॅम्प वरती सुद्धा तुम्ही देवू शकता.
27. त्यानंतर जर अनुसूचित जाती जमातीचे असेल तर कास्ट सर्टिफिकेट तीन नंबरला अपलोड करायचे आहे. अशा पद्धतीने कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करायचे आहे. रिफ्रेश करू नका कोणत्याही कीबोर्डचं बटन दाबू नका असा एक मेसेज दिसेल तर ओके बटणावरती इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण बरोबर खरोखर अशी नोंदणी करत आहात का हे विचारले असता ओके बटणावरती क्लिक करायचं आहे.
28 त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लाभार्थी क्रमांक, लाभार्थ्याचं नाव, आधार कार्डचा क्रमांक आणि भ्रमणध्वनी मोबाईल नंबर दिसेल त्याचबरोबेर अर्ज कधी केलेला आहे त्याची दिनांक दिसेल.प्रिंट तुम्ही काढून ठेवा कारण काही दिवसांनी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दिला जाणार आहे,त्यावेळेस सर्व गोष्टी तुम्हाला लागतील, अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता.
ऑनलाइन GR पाहण्यासाठी :- Click Here.
सरकारी योजना | येथे क्लिक करा. |
केंद्र शासन योजना | येथे क्लिक करा. |
शासन निर्णय | येथे क्लिक करा. |
जॉइन टेलेग्राम | येथे क्लिक करा. |
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 :- FAQs
प्रश्न मागेल त्याला सोलार पंप योजना ही योजना कोणी सुरू केली?
मागेल त्याला सोलार पंप योजना ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक प्रभावी योजना आहे
प्रश्न या योजनेचा महत्त्वाचा उद्देश काय आहे?
मागेल त्याला सोलार पंप योजना योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना अखंडित स्वरूपाचा वीज पुरवठा करणे हा होय.
प्रश्न या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?
मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत कसल्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही अनुदानाच्या स्वरूपामध्ये कृषी पंप जोडणी करून शेतकऱ्याकडून दहा ते पाच टक्के रक्कम भरून घेतले जाते.
प्रश्न: मागेल त्याला सौर पंप योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकतो?
मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत शेतकरी वर्ग अर्ज करू शकतो.
हे ही नक्की वाचा…..👇👇👇👇👇👇
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Ladka Bhau Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Lek Ladki Yojana | येथे क्लिक करा |
Lakhpati Didi Yojana | येथे क्लिक करा |
Silai Machine Yojana | येथे क्लिक करा |
PM Awas Yojana | येथे क्लिक करा |
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment