Saur Kumpan Yojana 2024 In Marathi

Saur Kumpan Yojana 2024 In Marathi
Saur Kumpan Yojana 2024 In Marathi


Saur Kumpan Yojana 2024 In Marathi | Saur Kumpan Yojana 2024 | Saur Kumpan Yojana Online Apply महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याचे  व शेतीचे वन्य जीवनापासून संरक्षण व्हावे यासाठी सौर कुंपण योजना 2024 ही अमलात आणली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याला शेतामध्ये सौर कुंपण बसवता येणार आहे आणि या बसवलेल्या सौर कुंपणना मुळे शेतीचे त्याचबरोबर शेतकऱ्याचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. बरेच वन्यजीव हे शेतीचे नुकसान यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्नधान्य हे त्याला मिळत नाही, या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत 25 टक्के खर्च हा शेतकरी आणि 75 टक्के खर्च हा राज्य सरकार अशा समीकरणे राबविण्यात येत आहे. ही योजना डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जनजीवन योजनेचा एक भाग मानला जातो या योजनेअंतर्गत सौर कुंपण योजना अमलात आणली आहे.

सौर कुंपण योजना ही योजना काय आहे या योजनेचा उद्देश काय आहे त्याचबरोबर अर्ज कसा करावा योग्य कोण पात्र आहे? या योजना कागदपत्रे पात्रता, निकष या सर्व गोष्टीचा या लेखांमध्ये आपण हा विचार करणार आहोत त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.


भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो आजही, आपल्या भारत देशामध्ये  58% लोक हे शेती करतात. येथील लोकांना शेती करत असताना बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागते जसे की अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती त्याचबरोबर अनियमित बदलामुळे होणारे परिणाम ज्यामुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकरी या आर्थिक दृष्ट्या संकटात सापडतो. अशाच सर्व गोष्टींचा विचार करून विविध राज्यांमध्ये विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात. अशाच काही योजना पैकी एक योजना म्हणजे Saur Kumpan Yojana. ही योजना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये राबविली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याचे संरक्षण व्हावे. सौर कुंपण  योजना 2024 या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकरी लोक शेती करत असताना अनेक वन्यप्राणी हे त्यांच्यावर हमला करतात, यामुळे त्यांना त्यांचा जीव धोक्यात टाकावा लागतो. या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने सौर कुंपण योजना 2024 राबवण्याचे ठरवले आहे. सौर कुंपण बसवल्यामुळे अन्य वन्य प्राण्यांचा या सौर कुंपणामुळे  कसल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही व शेतकऱ्यांना निश्चितपणे शेती करता येणार आहे.


योजनेचे नावSaur Kumpan Yojana 2024 (Saur Kumpan Yojana 2024 In Marathi)
सुरुवात कोणी केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
योजनेचा उद्देशमहाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सौर कुंपण देऊन वन्य प्राण्यापासून शेतकरी व त्याच्या शेतीचे संरक्षण करणे.
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग व नागरिक
लाभमहाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना सौर कुंपण देऊन 75 टक्के अनुदानावर
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
आधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा.


महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकरी हा शेतामध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा त्याला अनेक वन्य प्राणी यांचा धोका असतो. त्याचबरोबर असे काही प्राणी आहेत, की जे शेतीच्या पिकांचे नुकसान करतात. या सर्व गोष्टींना शेतकऱ्याला सामोरे जावे लागते व त्यामुळे त्याला बरेच मोठे नुकसान सहन करावे लागते, या नुकसानाची भरपाई म्हणून महाराष्ट्र शासनाने सौर कुंपण योजना राबवली आहे. या योजनेमध्ये  शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून शेतीच्या सर्व बाजूंनी कुंपण बसवून त्यावरती सौर चे प्लेट बसवून वन्य प्राण्यापासून नुकसान थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येतो.


आपला भारत देश हा जनगणनेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश मानला जातो त्यामुळे आपल्या भारत देशाची लोकसंख्या वर्षानुवर्ष वाढत चालली आहे. त्यामुळे मानव हा जंगलाचा ऱ्हास करत आहे, त्यामुळे जंगल हे कमी होत आहेत. या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणजे वन्यजीव हे शेती सारख्या ठिकाणी येताना दिसत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने सौर कुंपण योजना राबवली आहे. या योजनेची महत्त्वाच्या खालील काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहूयात.

1. गेल्या काही वर्षांमध्ये हजारो राहून अधिक लोकांनी वन्यजीवांच्या हल्ल्यामुळे  प्राण गमावले आहे. त्यामुळे वन्यजीवापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सौर कुंपण योजना राबविण्यात आले आहे.

2. सौर कुंपण योजनेमुळे शेतकऱ्याच्या शेतीला सौर कुंपण बसवले जाते, याच्यामुळे अन्य वन्य जीवांचा कुठल्याही प्रकारचा हल्ला होत नाही. त्यामुळे शेतकरी हा स्वतःचे त्याचबरोबर शेतीची संरक्षण करू शकतो.

3. सौर कुंपण योजनेमुळे वन्य जीवांच्या हल्ल्यामुळे त्याचबरोबर त्यांनी केलेल्या शेतामध्ये नुकसानीमुळे शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या संकटात सापडताना दिसत होता आता या योजनेमुळे शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही.

4. ही योजना नागरिकांसाठी एक कल्याणकारी योजना आहे, ज्यामुळे 25 % खर्च हा नागरिकाकडून घेण्यात येतो व 75 % खर्च हा राज्य सरकारकडून भरण्यात येतो, त्यामुळे शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये स्वतःचे व शेतीचे संरक्षण करण्यासाठी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

5. सौर कुंपण योजनेमुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्यास मदत होणार आहे, कारण आता त्याला वन्य जीवापासून होणाऱ्या हानीपासून संरक्षण मिळणार आहे.


महाराष्ट्र सरकारने श्यामप्रसाद मुखर्जी जनविकास योजना माध्यमातून सौर कुंपण योजनेला मान्यता दिली आहे. यामध्ये खालील प्रकारे काही बदल करण्यात आले आहे ते आपण पाहूया

सौर कुंपण योजनेअंतर्गत लाभार्थ्याला एकदा लाभ मिळाल्यानंतर पाच वर्षाकरिता वन्यप्राणी कडून होणारी नुकसान त्यावर कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नव्हता, असा नियम होता याच नियमाला बदलून सौर कंपनी योजनेअंतर्गत नवीन बदल करण्यात आले तो बदल म्हणजे असा आहे की सदर योजनेचा मला लाभ मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षापर्यंत वन्यप्राण्यामुळे शेतीचे नुकसान झाल्यास मी कुठल्याही परिस्थितीत नुकसान भरपाई करता अर्ज सादर करणार अशी सुधारणा करण्यात आली आहे.

Saur Kumpan Yojana 2024 In Marathi
Saur Kumpan Yojana 2024 In Marathi


महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेल्या सौर कुंपण योजनेमध्ये  जवळपास आकडेवारीनुसार 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 1173 गावातील 33 हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे व जीवितहानीचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ सौर कुंपण बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचे माध्यमातून मागील वर्षी नवेगाव नागझरी आणि ताडोबा अंधारी या ठिकाण शेतकऱ्यांना तात्काळ सौर कुंपण देण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.


सौर कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रकारचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे (Saur Kumpan Yojana Documents)

  • सातबारा
  • आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • पॅन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • नमुना आठ अ
  • पासपोर्ट साईज फोटो


solar fencing yojana Maharashtra सौर कुंपण  योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील प्रकारच्या प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो (Saur kumpan yojana online registration).

  • महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या महाडीबीटी या पोर्टल वरती लॉगिन करावे लॉगिन केल्यानंतर तुमचा युजरनेम आणि एक पासवर्ड तयार होईल हा पासवर्ड आणि युजरनेम व्यवस्थित ठेवणे बंधनकारक आहे
  • त्यानंतर तुम्ही ज्या विभागाचे रहिवासी आहात तेथील विभाग निवडा.
  • विभाग निवडल्यानंतर कृषी विभाग हा पर्याय तुम्हाला दिसेल हा कृषी विभाग पर्याय निवडा
  • नंतर सौर कुंपण हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे व विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरावी.
  • त्यानंतर तुम्हाला संपूर्ण कागदपत्रे अपलोड करा असे अर्जावरती दिसेल त्याप्रमाणे विचारलेली सर्व कागदपत्रे तुम्ही अपलोड करावीत.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट असे एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करणे अगोदर तुम्ही भरलेली सर्व माहिती परत एकदा वाचून घ्या जर काही बदल करावयाचा असल्यास तुम्ही बदल करू शकता एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर परत कसल्याही प्रकारचा बदल करण्यासाठी पोर्टल वरती पर्याय उपलब्ध नाही.
  • आता तुम्ही सबमिट बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यावरती शुल्क भरा असा एक मेसेज दिसेल त्यावरती 23.60 रुपये असा शुल्क भरणा करावा.
  • त्यानंतर तुम्ही सबमिट या बटणावरती क्लिक करून तुमचा फॉर्म हा सबमिट करावा.

 अशाप्रकारे तुम्ही तुमचा अर्ज सौर कुंपण योजनेसाठी सादर करू शकता.


सौर कुंपण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर तुम्ही अर्जाची स्थिती तुम्हाला पाहण्यासाठी दिलेल्या लिंक (https://mahadbt.maharashtra.gov.in/) वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची तपासणी करू शकता. त्याचबरोबर इथे माहिती उपलब्ध नसल्यास महसूल व वन विभाग महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत साइटवर देखील तुम्हाला माहिती मिळू शकते.

शासन निर्णय व अधिकृत जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारी योजनायेथे क्लिक करा.
केंद्र शासन योजनायेथे क्लिक करा.
शासन निर्णययेथे क्लिक करा.
जॉइन टेलेग्रामयेथे क्लिक करा.


सौर कुंपण योजना म्हणजे काय?

महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेली ही एक कल्याणकारी योजना आहे, या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतीला कुंपण करणे व या कुंपणापासून शेतीचे व नागरिकांचे संरक्षण करणे होय.

सौर कुंपण योजना कोणी सुरू केली?

सौर कंपनी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना आहे.

सौर कुंपण योजनेचा महत्त्वाचा उद्देश काय आहे?

सौर कुंपण योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकरी व शेतामधील होणारी पिकांचे नासाडी हे थांबवण्यासाठी सौर कुंपण बसवण्यात येते यामुळे अन्य वन्यजीव प्राण्यापासून संरक्षण होण्यास मदत होते.

सौर कुंपण योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?

सौर कुंपण योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदान हे महाराष्ट्र राज्य सरकारकडून मिळते त्याचबरोबर उर्वरित 25 टक्के अनुदान हे शेतकऱ्याला भरावे लागतात.


Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024येथे क्लिक करा
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024येथे क्लिक करा
Ladka Bhau Yojana 2024येथे क्लिक करा
Lek Ladki Yojanaयेथे क्लिक करा
Lakhpati Didi Yojanaयेथे क्लिक करा
Silai Machine Yojanaयेथे क्लिक करा
PM Awas Yojanaयेथे क्लिक करा
Vishwakarma Shram Samman Yojanaयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा
Shravan Bal yojanaयेथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment