Smart Meter Yojana 2024 In Marathi

Smart Meter Yojana 2024 In Marathi
Smart Meter Yojana 2024 In Marathi


Smart Meter Yojana 2024 In Marathi | Smart Meter 2024 Information In Marathi | स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना 2024 महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असतो. या योजनेमुळे जनतेला फायदा होण्यास मदत होतो त्याचबरोबर जे काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मागासलेल्या असतात अशा लोकांना या योजनेमुळे लाभ मिळतो. महाराष्ट्र राज्य सरकारने महावितरण विभागाकडे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना सुरू करण्याचे धोरण हाती घेतले आहे. या योजनेचा महत्त्वाचा फायदा म्हणजे खंडित वीज पुरवठा म्हणजेच की वाढत्या लोड शेडिंग मुळे सामान्य जनतेला खंडित वीज मिळत होती त्यामुळे त्यांना याचा त्रास होत होता, आता हा त्रास या योजनेमुळे कमी होणार आहे. म्हणजेच की तुम्हाला अखंडित स्वरूपाचा वीज पुरवठा मिळणार आहे. परंतु त्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक आट घालून दिली आहे ती अट म्हणजे अशी की तुम्हाला मिळणारे वीज बिल प्रीपेड मीटर द्वारे देण्यात येईल म्हणजेच की जेवढे तुम्ही मीटरला रिचार्ज करतात तेवढेच तुम्हाला अखंडीत स्वरूपाची वीज मिळणार आहे.

महाराष्ट्र सरकारने Smart Meter 2024 ही योजना सुरू करण्याचे धोरण हाती घेतले आहे. याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येते येणार आहे, त्यामुळे या योजनेविषयी सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचे आहे.

Smart Meter 2024 या योजनेच्या माध्यमातून वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर मोबाईल रिचार्ज प्रमाणे रिचार्ज करावे लागेल तरच त्यांना वीज पुरवठा होईल. जेवढे तुम्ही पैसे भराल तेवढीच तुम्हाला वीज वापरता येईल. या योजनेच्या माध्यमातून स्मार्ट प्रीपेड मीटर मध्ये आपण किती विजेचा वापर केला आहे. याची माहिती ग्राहकाला त्याचा मोबाईलवर ॲपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. पैसे भरले तरच वीजपुरवठा होईल अशी सुविधा या प्रीपेड मीटर मध्ये करण्यात आली आहे.


महाराष्ट्र शासनाने नागरिकांना अखंडित वीज पुरवठा मिळावी यासाठी नवीन एक कल्याणकारी योजना सुरू करण्याचे धोरण ठरवले आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर योजना ही योजना अशी आहे, की या योजनेमध्ये नागरिक जसे मोबाईलला महिन्याला रिचार्ज मारतात त्याचप्रमाणे नागरिकांनी प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट प्रकारचा रिचार्ज मारावे लागेल, त्याला त्याच्याद्वारे ठराविक युनिट देण्यात येतील ज्याद्वारे नागरिक हे अखंडित वीज मिळवू शकतील. या योजनेमुळे होणारा वीज पुरवठा ही थांबवला जाईल व जे नागरिक नियमितपणे विज बिल भरतो ते त्यांना आता अखंडीत स्वरूपाचा वीज पुरवठा केला जाणार आहे.

आपल्या भारत देशामध्ये लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने वीज पुरवठा हा अखंडित स्वरूपाचा मिळतो, यामध्ये आपल्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात विज बिल ही थकवली जातात यावर उपाय म्हणून केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना अमलात आणण्याचे ठरवले आहे, या योजनेमुळे वीज चोरी तसेच वीज बिल न भरणाऱ्या लोकांवर पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

Prepaid Smart Meter ही योजना प्रीपेड योजना असल्यामुळे ग्राहक किती रुपयांचा रिचार्ज करतात त्यावर ठरवून दिलेले युनिट दराप्रमाणे वीज पुरवठा केला जाईल एकदा का हा रिचार्ज संपला की त्यांची वीज ही ऑटोमॅटिक बंद होईल व ज्यावेळेस ग्राहक नवीन रिचार्ज करेल त्यावेळेस पुन्हा ते सुरळीत चालू होईल.महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना लवकरात लवकर अमलात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे सध्या तरीही योजना कुठल्याही राज्यात लागू नाही परंतु प्रायोगिक तत्त्वावर काही डेमो घेण्यात आले आहेत ज्यामध्ये ही योजना यशस्वी झालेली आहे त्यामुळे ही योजना लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य मध्येही लागू करण्यात येईल.


योजनेचे नावSmart Meter Yojana 2024 In Marathi
सुरुवात कोणी केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
योजनेचा उद्देशमहाराष्ट्र राज्यातील नागरिकांना अखंडित स्वरूपाचा वीज पुरवठा करता यावा त्याचबरोबर पारदर्शक वीज बिल देणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभया योजनेमार्फत कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही. 
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन /  ऑफलाईन  सध्या तरी निश्चित नाही
आधिकृत वेबसाइट सध्या तरी कसलीही माहिती मिळाली नाही.


मुख्यतः स्मार्ट मीटर चे खालील तीन प्रकार पडतात ते आपण पाहूयात.

  1. विज मीटर (Electricity Smart Meter): वीज मीटर हे एक असे मीटर आहे की जो आपल्या घरातील किंवा इतर व्यवसायाच्या ठिकाणी विजेचा किती वापर झाला हे सांगण्यासाठी बसवण्यात येते, त्यामुळे त्याला वीज मीटर असे नाव देण्यात आले आहे.
  1. पाणी मीटर (Water Smart Meter): पाणी मीटर हे पाण्याचा वापर किती झाला हे मोजण्यासाठी वापरण्यात येते याचा वापर घरामध्ये किंवा विविध व्यवसायिक किंवा उद्योगांमध्ये पाण्याचा वापर किती झाला हे मोजण्यासाठी वापरले जाते. 
  1. वायू मीटर (Gas Smart Meter):वायु मीटरचा वापर दैनंदिन जीवनामध्ये स्वयंपाकासाठी त्याचबरोबर औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रामध्ये किती वापरले जाते याचे मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येते. 

आज आपण महाराष्ट्र सरकारच्या स्मार्ट प्रीपेड मीटर या योजनेविषयी माहिती घेणार आहोत.


आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जुन्या पद्धतीचे वीज मीटर लावलेले असल्यामुळे विजेचा वापर हा अतिरिक्त केला जातो व त्याचे बिल हे कमी प्रमाणात येते, त्यामुळे महावितरण कंपनीला बराच तोटा सहन करावा लागतो. आता या नवीन योजनेमुळे सर्व जुन्या पद्धतीची वीज मीटर बंद करण्यात येऊन नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत. यामुळे ग्राहकांनी किती वीज वापरली हे अचूकपणे मीटर द्वारे दर्शविण्यात येणार आहे व या सर्व बाबीची नोंद ठेवण्यासाठी महावितरण कंपनीने एक कर्मचारी नेमलेला आहे. जो वेळोवेळी या सर्व मीटरची देखरेख त्याचबरोबर विज बिल ग्राहकांना पाठवेल.

स्मार्ट प्रीपेड मीटर योजना 2024 ही योजना मोबाईल प्रमाणे काम करते म्हणजे की जेवढा आपण मोबाईल रिचार्ज करतो व तो तेवढ्याच रिचार्ज पुरता मर्यादित असतो, तसेच या योजनेची संकल्पना आहे, म्हणजेच की महावितरण कंपनीने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे ठरलेले युनिट व रिचार्ज केलेला म्हणून या प्रमाणात विज बिल आकारण्यात येईल व जेवढे रिचार्ज केले आहे त्या प्रमाणात वीज पुरवठाही अखंडित स्वरूपाचा त्या ग्राहकाला देण्यात येईल.


(Smart Prepaid Electricity Meters)या योजनेअंतर्गत खालील काही स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात.

  1. रिअल-टाइम ट्रॅकिंग: रियल टाईम ट्रेकिंग या सिस्टीम मुळे तुम्ही दररोज किती प्रमाणात वीज वापरली आहे, हे तुम्हाला मोबाईलच्या ॲप मध्ये किंवा ऑनलाईन पोर्टल द्वारे समजले जाते त्यामुळे तुम्ही कोणत्या वेळेला किती वीज वापरली हे तुम्हाला समजू शकते.
  2. अचूक बिलिंग: या योजनेमुळे ग्राहकांना नियमित बिल भरले असता ही अतिरिक बिल महावितरण कडून येत होते, त्याचबरोबर बऱ्याच वेळा जास्त वापर केला असता ही वीज बिल कमी येत होते. या सर्व बाबीवर पर्याय म्हणून स्मार्ट मीटर ही योजना राबवली आहे यामुळे अचूक बिलिंग होऊन कुठल्याही पद्धतीचा विजेचा गैरवापर किंवा बिल न भरणे अशा समस्या निर्माण होणार नाहीत.
  3. स्वयंचलित मीटर रीडिंग: स्मार्ट प्रीपेड मीटर मध्ये प्रत्येक महिन्याला तुम्हाला ऑटोमॅटिक किती वीज खर्च केली याचा डेटा तुमच्या मोबाईल नंबर वरती पाठवण्यात येईल, त्यामुळे तुम्हाला कोणत्या दिवशी किती वीज वापरले हे समजण्यात येईल. हे मीटर स्वयंचलित असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची रीडिंग स्वतःहून नोंद करून ठेवण्याची गरज नाही.
  4. ऊर्जा बचत: स्मार्ट प्रीपेड मीटर मुळे ग्राहक हे त्यांना जेवढा पाहिजे तेवढाच विजेचा वापर करतील त्याचबरोबर अतिरिक्त वापर केल्यास त्यांना अतिरिक्त रिचार्ज करावे लागेल या सर्व बाबीचा विचार करून ग्राहक आवश्यक तेवढेच वीज वापरतील त्यामुळे विजेचा अतिरिक्त वापर थांबण्यास मदत होणार आहे.


महाराष्ट्र सरकारने राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेमध्ये ग्राहक जेवढे रिचार्ज करतील तेवढ्या रुपयाच्या दारामध्ये त्यांना बीज युनिट देण्यात येणार आहेत. त्यामुळे जितका रिचार्ज तितके युनिट त्यांना ठरवून दिले जातील. त्यामुळे त्या ठरवून दिलेल्या विजेच्या युनिटचा वापर कसा करायचा आणि किती करायचा हे त्या ग्राहकावर अवलंबून आहे. एकूण महिन्याच्या शेवटी ग्राहकाने किती वीज वापर केली हे त्याला एका मेसेज द्वारे किंवा मोबाईलच्या ॲपद्वारे त्याचबरोबर ऑनलाईन पोर्टल द्वारे पाहता येईल. एखाद्या ग्राहकांनी जर ठराविक रकमेचा रिचार्ज केला असता एका महिन्याच्या अगोदर जर रिचार्ज संपला तर त्या दिवशीपासून त्याला ऑटोमॅटिक वीज पुरवठा बंद केला जाईल. जोपर्यंत तो नवीन रिचार्ज करत नाही तोपर्यंत. रिचार्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे तुम्ही मोबाईल द्वारे रिचार्ज करू शकता.


  1. पारदर्शकता: या योजनेमुळे ग्राहकांनी विजेचा वापर किती करायचा किंवा किती केला आहे, हे सर्व एका मोबाईलच्या द्वारे त्याचबरोबर ऑनलाईन पोर्टलवरही पाहता येते त्यामुळे ही योजना अतिशय पारदर्शक मानली जाते.
  1. उच्च कार्यक्षमता: या योजनेमध्ये महावितरण कंपनीने मागील काही वर्षांमध्ये आलेल्या त्रुटीचा अभ्यास करून उच्च कार्य पद्धतीची सिस्टीम तयार केली आहे, त्यामुळे ग्राहकांची कुठल्याही प्रकारची गैरसोज होणार नाही. वीज वितरणामध्ये काहीही अडचण आल्यास जलद पद्धतीने शोध लावता येणार आहे.
  1. पर्यावरण संरक्षण: स्मार्ट मीटर प्रीपेड योजनेमुळे वीज ऊर्जेमध्ये बचत होऊन वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे आणि पर्यावरण संरक्षणाला वाळू मिळणार आहे.
  1. स्वयंचलित सेवा: योजना स्वयंचलित असल्यामुळे तुम्ही किती वीज वापरता त्याचबरोबर तुमचे रिचार्ज कधी संपणार आहे. जर तात्काळ रिचार्ज केल्यानंतर कनेक्शन परत चालू करण्यात येणार आहे त्यामुळे ही एक स्मार्ट योजना मानली जाणार आहे.या सर्व बाबीमध्ये कसल्याही प्रकारे कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करायची गरज नाही. 

स्मार्ट प्रीपेड मीटर हे एक आधुनिक मोजमाप यंत्र असल्यामुळे पारंपारिक मीटर पेक्षा अधिक प्रगतशील आहे, त्याचबरोबर अचूक मोजमाप यंत्र असल्यामुळे वीज बिलामध्ये कसल्याही प्रकारचे त्रुटी निर्माण होणार नाही त्याचबरोबर ग्राहक व महावितरण कर्मचाऱ्यांसोबत वादविवाद होण्यास आळा बसणार आहे.

सरकारी योजनायेथे क्लिक करा.
केंद्र शासन योजनायेथे क्लिक करा.
शासन निर्णययेथे क्लिक करा.
जॉइन टेलेग्रामयेथे क्लिक करा.


स्मार्ट प्रीपेड मीटर योजना म्हणजे काय?

स्मार्ट प्रीपेड मीटर योजना ही  महाराष्ट्र सरकारने राबविण्यात येणारी योजना आहे या योजनेमध्ये ग्राहकांना रेचार्जद्वारे वीज पुरवठा देण्यात येईल, म्हणजेच जेवढे रिचार्ज तेवढाच त्यांना वीज वापरता येईल म्हणून या योजनेला स्मार्ट प्रीपेड मीटर योजना असे म्हणतात. 

स्मार्ट प्रीपेड मीटर योजना कोठे लागू आहे?

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सध्या तरी महाराष्ट्रामध्ये कुठेही योजना राबवण्यात आलेले नाही परंतु याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेले आहेत. 

स्मार्ट प्रीपेड योजनेचा मुख्य फायदा काय?

स्मार्ट प्रीपेड योजनेचा मुख्य फायदा म्हणजे ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देणे त्याचबरोबर अचूक व पारदर्शक वीज आकारणी करणे होय. 

स्मार्ट प्रीपेड योजनेमध्ये काही अनुदान मिळते का?

स्मार्ट प्रीपेड योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही.


Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024येथे क्लिक करा
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024येथे क्लिक करा
Ladka Bhau Yojana 2024येथे क्लिक करा
Lek Ladki Yojanaयेथे क्लिक करा
Lakhpati Didi Yojanaयेथे क्लिक करा
Silai Machine Yojanaयेथे क्लिक करा
PM Awas Yojanaयेथे क्लिक करा
Vishwakarma Shram Samman Yojanaयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment