MahaDBT Biyane Anudan Yojana 2024

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024


MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 | Biyane anudan yojana online apply | Mahadbt Farmer Portal Biyane Yojana Online Form महाराष्ट्र शासन हे आपल्या राज्यामधील जनतेसाठी विविध योजना राबवित असतात, ज्यामुळे जनतेला त्याचा फायदा होईल. अशाच आपण एका योजनेविषयी आज माहिती घेणार आहोत 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत 97.05 कोटी देशातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्यदेण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सज्ज आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी त्याचबरोबर काही अनुदानाच्या स्वरूपात बियाण्याची वाटप करून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे.

नुकत्याच जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार महाडीबीटी बियाणे वाटप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे अनुदानाच्या स्वरूपात देण्यात येत आहे. या योजनेची सविस्तर माहिती आपण खालील लेखामध्ये घेणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.


महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अंतर्गत विविध बियाण्याचे वितरण करण्यात येणार आहे. हे वितरण अनुदानाच्या स्वरूपात मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे वाण मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन त्याला चांगला नफा मिळवून देणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याने महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा लागतो. ज्यामध्ये लॉटरी स्वरूपात निवड केली जाईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या शेतकऱ्यांनी अर्ज लवकरात लवकर भरावा.


महाराष्ट्र शासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वाटपासाठी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना करडई, गहू, जवस, मोहरी आणि हरभरा अशा पद्धतीचे अनुदानावर बियाणे वाटप केले जाते.

MahaDBT Biyane Anudan Yojana 2024
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024



योजनेचे नाव
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे वितरण अनुदानयोजना)
लाभार्थी कोण असतील महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग
योजनेची सुरुवात कधीपासून झाली2007-08 
लाभाचे स्वरूपविविध पिकांचे बियाणे 50% अनुदानावर देणे
कोणाच्या अंतर्गतमहाराष्ट्र शासन
कोणती पिकेअन्नधान्य, कडधान्य, तृणधान्य आणिफळबाग यासाठी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटClick Here


या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रकारचे कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • जमिनीचा 7/12 उतारा
  • 8 अ प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • पूर्वसंमती पत्र
  • योजनेचा अर्ज
  • मोबाईल क्रमांक
  • आधार कार्ड


महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड ही खालील निकषावर होते.

  • या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांस सर्व बियाण्यांसाठी 50% अनुदान देण्यात येणार आहे .
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे 2 हेक्टर पर्यंत जमीन असणे आवशक्य आहे.
  • पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची निवड ही ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यात येईल ज्या शेतकऱ्याचे नाव लॉटरी मध्ये असेल त्यांनाच या योजनेचा लाभ घेत येईल.


चला मित्रांनो महाडीबीटी पोर्टल (Biyane anudan yojana 2024 apply online) वरून याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया.

1.आपल्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला प्रथमतः दिलेल्या लिंक वरती क्लिककरायचे आहे.(ऑनलाइन अर्ज )आपल्या जर पेज इंग्लिश मध्ये दिसून येत असेल तर वरती उजाव्या कोपऱ्यामध्ये लँग्वेज चेंज करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इंग्लिश ची मराठी भाषा निवडाली जाईल.

2.आता पहिल्यांदा तुम्हाला लॉगिन करावा लागणार आहे, जर तुम्ही महाडीबीटी पोर्टल वरती पूर्वी अकाउंट ओपन केलेला असेल तरी या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आधार क्रमांकाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही लॉगिन करू शकता. जर तुम्ही आतापर्यंत या पोर्टल वरती अकाउंट ओपन केलेलं नसेल तर तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करावा लागणार आहे.

3. या ठिकाणी लॉगिन करण्यासाठी दोन प्रकार देण्यात आलेले आहेत जर तुमच्याकडे तुमचा तुमचा युजर आयडी असेल तर या ठिकाणी वापरकर्ता ऑप्शन वरती क्लिक करा.

4. त्यानंतर तुमचा वापर वापरकर्ता आयडी म्हणजेच तुमचं युजर नेम टाका तुमचा पासवर्ड टाका आणि खाली दिलेल्या कॅपच्या कोड टाकून लॉगिन बटन वरती क्लिक करा. जर तुमच्याकडे तुमचा युजर आयडी पासवर्ड नसेल तर या ठिकाणी आधार क्रमांक या ऑप्शन वरती क्लिक करा. 

5. मित्रांनो जर तुम्हाला आधार क्रमांकाच्या माध्यमातून लॉगिन करायचा असेल, तर तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला लॉगिन करता येईल, किंवा तुम्हाला बायोमेट्रिकच्या माध्यमातून सीएससी सेंटर वरती लॉगिन करावा लागेल. जर तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर रजिस्टर असेल, तर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाका मित्रांनो तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी ओटीपी ऑप्शन वरती क्लिक करा. ओटीपी ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा ओटीपी पाठवा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या आधार कार्ड सोबत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल. या ठिकाणी तुमच्या समोर आलेल्या मेसेजला ओके करा. आता मित्रांनो तुमच्या आधार कार्ड सोबत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी तुम्हाला या ठिकाणी इंटर ओटीपी च्या ठिकाणी टाकायचा. ओटीपी तपासा या बटन वरती क्लिक करायचा आहे. 

6. मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी या ठिकाणी टाईप केल्यानंतर ओटीपी तपासा या बटन वरती क्लिक करा.

7. त्यानंतर आता तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन झालेला असाल. मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुमच्या प्रोफाईलची स्थिती पूर्ण आहे का नाही हे पहा जर तुमची प्रोफाइल 100% पूर्ण नसेल, तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी प्रोफाइल पूर्ण करून घ्या. 

8.मित्रांनो अर्ज करण्यासाठी या ठिकाणी आता ऑप्शन देण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता अर्ज करा या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे.

9. त्यानंतर पुढील पेज वरती तुम्ही आलेला असाल आता या पेज वरती तुम्ही पाहू शकता, भरपूर ऑप्शन देण्यात आलेले आहेत जसे कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा आणि 3 नंबरला बियाणे औषधे व खते या ऑप्शनच्या समोर बाबी निवडा हे ऑप्शन देण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे.

10. मित्रांनो बाबी निवडा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पुढे पाहू शकता अशा पद्धतीचा अर्ज तुमच्या समोर आलेला असेल आता या ठिकाणी तुमचा तालुका, तुमचं गाव, तुमचा सर्वे नंबर आणि तुम्हाला ज्या घटकासाठी अर्ज करायचा आहे तो मुख्य घटक सुद्धा या ठिकाणी निवडून आलेला असेल.

11. अनुदानावर बियाणे औषधे व खते आणि पुढे बाब निवडाच्या ठिकाणी बियाणे ही बाब आपोआप निवडून आलेले असेल, आता या ठिकाणी आपल्याला पीक निवडायचा आहे निवड करा या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला कोणत्या बियाण्यासाठी अर्ज करायचा आहे ते पहा करडई, गहू, जवस, मोहरी आणि हरभरा या पाच बियाणासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 

12. मित्रांनो आता आपल्याला हरभऱ्याच्या बियाण्यासाठी अर्ज करायचा आहे, त्यासाठी आपण हरभरा बियाणे वरती क्लिक केल्यात्यानंतर अनुदानावर हवे असलेली बाब या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे 

13.प्रमाणित बियाण्यांचे वितरण किंवा पीक प्रत्यक्ष या ठिकाणी प्रमाणित बियाण्यांचे वितरण या ऑप्शन वरती क्लिक करा

14.त्यानंतर बियाण्यांचा प्रकार या ठिकाणी आपोआप निवडून आलेला असेल उच्च उत्पादन क्षमतेचे बियाणे त्यानंतर आपल्याला वाणांची निवड करायची आहे नवे वाण किंवा जुने वाण हे तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. जर तुम्ही नवीन वाण निवडले तर हरभरा बियाण्यांच्या ज्या नवीन व्हरायटी आहेत त्या संपूर्ण व्हरायटींची लिस्ट तुमच्या समोर येईल त्यातून तुम्ही एक व्हरायटी सिलेक्ट करून घ्या

15. त्यानंतर मित्रांनो तुमचे जे संपूर्ण क्षेत्र आहे तुमच्या नावे असलेले संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी दिसून येईल आता या ठिकाणी तुम्हाला या बियाण्यासाठी किती क्षेत्राची पेरणी करायची आहे. या ठिकाणी क्षेत्र तुम्हाला हेक्टर मध्ये निवडून घ्यायचा आहे. एक एकर च्या पुढे आणि दोन हेक्टर पर्यंत तुम्हाला हे अनुदानावर बियाणे मिळते त्यामधून तुम्हाला जेवढे क्षेत्र पेरणी करायचे आहे ते क्षेत्र या ठिकाणी निवडून घ्या.

16. मित्रांनो क्षेत्र निवडल्यानंतर तुम्ही निवडलेल्या क्षेत्रासाठी किती बियाण्याची आवश्यकता असेल एक एकर साठी 30 किलो मिळण्याचे आवश्यकता असते या ठिकाणी पहा आपोआप सिलेक्ट झालेला आहे.

17. आता या ठिकाणी आपण अर्ज केलेले वाण उपलब्ध नसल्यास आपणास सदर पिकाचे अन्यवान उपलब्ध करायचा आहे का? या ठिकाणी टिक करायचे आहे आणि जतन करा बटन वरती क्लिक करायचं आहे

18. मित्रांनो जतन करा बटन वरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्या समोर अशा पद्धतीचा मेसेज येईल जर आणखी घटक निवडायचे असतील तर एस वरती क्लिक करा नसतील तर नो वरती क्लिक करा.

19. मित्रांनो तुम्हाला जे घटक निवडायचे आहे ते संपूर्ण घटक निवडून झाल्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. 

20. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मेसेज येईल “आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची खातर जमा करा अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेन्यू वर जा बटन वरती क्लिक करा अन्यथा अर्ज सादर करा या बटन वरती क्लिक करून अर्ज सादर करा” म्हणजेच तुम्हाला आणखी काही बाबी निवडायच्या असतील तर मेन मेनू वर जाऊन निवडा किंवा या ओके बटन वरती क्लिक करा. ओके बटन वरती क्लिक करा.

21. तुम्ही जेवढ्या बाबी निवडलेल्या आहेत त्या संपूर्ण बाबी दिसून येतील, आता या ठिकाणी आपल्याला प्राधान्य क्रमांकाचा आहे तर यातील अनुदानावर बियाणे औषध व खतांचे वाटप याला आपल्याला पहिला क्रमांकाचे प्राधान्य द्यायचा आहे. मनुष्यचलित अवजारे याला दोन नंबर चा प्राधान्य द्यायचा आहे. 

22. मित्रांनो अशा पद्धतीने प्राधान्य दिल्यानंतर “योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती किंवा मार्गदर्शक सूचना लागू राहतील” यावरती आपल्याला टिक करायची आहे. टिक केल्या नंतर अर्ज सादर करा या ऑप्शन वरती क्लिक करायचचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा पद्धतीचा मेसेज येईल आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केलेला आहे.

23.आता मित्रांनो ज्या शेतकऱ्याचं पूर्वी पेमेंट झालेला आहे, त्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा मेसेज येईल ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत एकही अर्ज केलेला नाही आणि नवीन या पोर्टल वरती जे शेतकरी अर्ज करतात, त्यांना पेमेंटसाठी ऑप्शन येईल 23 रुपयाचं त्या शेतकऱ्यांना पेमेंट करावा लागेल.

24.”आपला अर्ज सबमिट यशस्वीपणे सादर झालेला आहे” यावरती ओके करा आता मित्रांनो यापुढे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही तुमचा अर्ज हा सादर झालेला आहे. 

25.तुम्ही पाहू शकता छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शनमध्ये तुमचे अर्ज पाहू शकता. तुम्ही आता केलेले अर्ज दिसून येतील एलिजिबल फॉर लॉटरी त्या अर्जाचा अशा पद्धतीचे स्टेटस दिसून येईल. 

26. जर तुमची लॉटरीमध्ये निवड झाली तर या ठिकाणी विनर असा ऑप्शन येईल किंवा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक मेसेज सुद्धा येईल. मित्रांनो आपली निवड झाली अशा पद्धतीचा मेसेज आल्यानंतर आपल्याला कृषी ऑफिसमध्ये जायचं आहे. कृषी ऑफिसमध्ये गेल्यानंतर कृषी सहाय्यकाकडून तुम्हाला एक टोकन दिला जाईल आणि त्या टोकांच्या आधारे तुम्हाला अनुदानावरती बियाण्याचे वाटप केलं जाईल.

सरकारी योजनायेथे क्लिक करा.
केंद्र शासन योजनायेथे क्लिक करा.
शासन निर्णययेथे क्लिक करा.
जॉइन टेलेग्रामयेथे क्लिक करा.


महाडीबीटी बियाणे अनुदान कोणासाठी आहे?

महाडीबीटी  बियाणे अनुदान हे शेतकऱ्यांसाठी आहे ज्या शेतकऱ्याने ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला आहे व ज्या शेतकऱ्यांचे लॉटरीमध्ये नाव आलेले आहे असे शेतकऱ्यांना महाडीबीटी द्वारे 50 टक्के अनुदानावर बियाणे मिळते. 

महाडीबीटी बियाणे योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?

महाडीबीटी बियाणे योजनेअंतर्गत 50 टक्के बियाणे खरेदी वरती अनुदान मिळते त्याचबरोबर 50% हा लाभार्थी भरतो. 

महाडीबीटी बियाणे  घेण्यासाठी पात्रता काय आहे?

या योजनेचा लाभ घ्यावयाचा झाल्यास लाभार्थ्याचे लॉटरी मध्ये नाव आले पाहिजे त्याचबरोबर त्याच्या नावे जमीन असायला हवी.

महाडीबीटी बियाणे अनुदान ही योजना कोठे सुरू आहे?

महाडीबीटी बियाणे अनुदान योजना ही महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.


Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024येथे क्लिक करा
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024येथे क्लिक करा
Ladka Bhau Yojana 2024येथे क्लिक करा
Lek Ladki Yojanaयेथे क्लिक करा
Lakhpati Didi Yojanaयेथे क्लिक करा
Silai Machine Yojanaयेथे क्लिक करा
PM Awas Yojanaयेथे क्लिक करा
Vishwakarma Shram Samman Yojanaयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा
Shravan Bal yojanaयेथे क्लिक करा