Shaikshanik Loan Yojana 2024

Shaikshanik Loan Yojana 2024
Shaikshanik Loan Yojana 2024

प्रस्तावना:-

Shaikshanik Loan Yojana 2024 | Shaikshanik Loan Yojana 2024 In Marathi आज आपण शैक्षणिक लोन योजना 2024 याविषयी माहिती घेणार आहोत महाराष्ट्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी नवनवीन योजना राबवत असतात, या अगोदर आपण अशाच बऱ्याच योजना पाहिल्या आहेत, ज्या योजनेमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार आपल्या भारत देशातील जनतेसाठी या योजनेच्या माध्यमातून उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.शैक्षणिक लोन योजना 2024 ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली एक प्रभावी योजना आहे, या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्यात येते ज्यामुळे विद्यार्थी हे त्यांच्या शिक्षणासाठी या कर्जाचा उपयोग करतील.

Shaikshanik Loan Yojana 2024 :- सविस्तर माहिती

केंद्र शासन व महाराष्ट्र शासन वेळोवेळी नवनवीन योजना राबवत असते, त्यामधली ही एक नवीन योजना आहे. या योजनेला “शैक्षणिक लोन योजना 2024” असे नाव देण्यात आले आहे. या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्या भारत देशामध्ये बरेच लोक हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल त्याचबरोबर मागासलेले आहेत अशा लोकांचे पाल्य हे शिक्षण करू इच्छिता पण त्यांना शिक्षणासाठी लागणारा पैसा हा त्यांच्याकडे नसल्या कारणास्तव ते या शिक्षणापासून वंचित राहतात. आपल्या भारत देशामध्ये आजही 38.60% लोक हे पूर्णपणे दैनंदिन रोजगारीवर जगत असतात, त्याचबरोबर उर्वरित काही लोक हे शेतीवर अवलंबून असतात पण हल्लीच्या वाढत्या  निसर्गाच्या बदलामुळे शेती करणे ही अत्यंत अवघड झाले आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम हा त्यांच्या कुटुंबावर होतो म्हणजेच असे की शेती शाश्वत नसल्यामुळे त्यांना मिळणारे उत्पन्न ही शाश्वत नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जे कोणी पाल्य शिक्षण करू इच्छितात त्यांना या शिक्षणापासून वंचित राहो राहावे लागते. म्हणजेच असे की जर वैद्यकीय त्याचबरोबर तांत्रिक व इतर शैक्षणिक वर्गात शिक्षण घ्यावयाचे झाल्यास त्याचा खर्चही खूप मोठा असतो, त्यामुळे हा खर्च सर्वसामान्य लोकांना परवडणारा नसतो. त्यामुळे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये असे पाल्य भाग घेण्यास असमर्थ असतात. या सर्व गोष्टींचा विचार केंद्र सरकार व राज्य सरकारने करून त्या त्या राज्यामध्ये शैक्षणिक लोन योजना 2024 ही राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Shaikshanik Loan Yojana 2024 या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे असा की जे नागरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल त्याचबरोबर मागासलेले किंवा अत्यंत गरीब कुटुंबातील असतील व त्यांच्या पाल्यांना शिक्षण करावयाचे झाल्यास या योजनेअंतर्गत  ठरवून दिलेल्या बँकेकडून कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य मिळवू शकतात व ते त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतात. 

तर चला मित्रांनो आज आपण या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ अर्ज कसा करायचा शर्ती अटी त्याचबरोबर उद्देश या सर्व गोष्टींचा विचार आपण या योजनेच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा लेख पूर्णपणे वाचणे अनिवार्य आहे.

Shaikshanik Loan Yojana 2024
Shaikshanik Loan Yojana 2024

Shaikshanik Loan Yojana 2024 :- मुद्दे

योजनाShaikshanik Loan Yojana 2024(शैक्षणिक कर्ज योजना 2024)
योजनेची सुरुवातकेंद्र सरकार / महाराष्ट्र राज्य सरकार
राज्यमहाराष्ट्र
विभागाअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
मुख्य उद्देशराज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब  आणि अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थी या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
योजनेचे लाभार्थीराज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी
योजनेचा लाभ1 लाख ते 1.5 लाख आणि उच्चशिक्षणासाठी  10 ते 20 लाखांपर्यंत कर्ज सुविधा
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइटयेथे पाहा.

Shaikshanik Loan Yojana 2024 :- उद्देश

Shaikshanik Loan Sahay Yojana Features या योजनेअंतर्गत खालील प्रकारे काही उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात.

  • आर्थिक दृष्ट्या गरीब त्याचबरोबर मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे.
  • शैक्षणिक लोन योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण त्याचबरोबर उच्च शिक्षण घेण्यासाठी एक नवीन संधी निर्माण करून देण्यात आले आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना कर्ज स्वरूपात आर्थिक साह्य मिळाल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी हे सुशिक्षित होणार आहेत.
  • या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
  • शैक्षणिक कर्ज योजनेच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनण्यास वाव मिळणार आहे
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थी हे शिक्षित त्याचबरोबर उच्चशिक्षित झाल्यामुळे त्यांना एक नवीन रोजगाराची संधी मिळणार आहे. 
  • जे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना बँकामार्फत व्याजदर हे अत्यंत कमी स्वरूपाचे असते. 
  • शैक्षणिक लोन योजना एक कर्ज स्वरूपाची योजना आहे, त्यामुळे जोपर्यंत विद्यार्थी हा शिक्षण शिकत आहे तोपर्यंत त्याला कसल्याही प्रकारचा व्याज द्यावा लागत नाही त्याचबरोबर एकदा का शैक्षणिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ते नोकरी करतील त्यावेळेस त्यांना घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास सुरुवात करावी लागते.

कर्ज स्वरूपात घेतलेले अर्थसहाय्य हे ठराविक काळापूर्वी असते म्हणजे त्या कर्जाची परतफेड ही नोकरी लागल्यापासून 1 ते 6 वर्षापर्यंत असते.

Shaikshanik Loan Yojana 2024 :- फायदे

Education Loan Scheme Benefits या योजनेच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना कोणते फायदे मिळणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत

  •  शिक्षण व उच्च शिक्षणाची संधी :- आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आजही बरेच असे विद्यार्थी आहेत की, ज्यांना शिक्षण करण्याची अत्यंत गरज आहे परंतु आर्थिक अडचणीमुळे ते शिक्षण त्याचबरोबर उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यासाठी लागणारा खर्च आणि इतर काही आर्थिक गोष्टीमुळे ते या गोष्टीपासून वंचित राहतात त्यामुळे या योजनेअंतर्गत त्यांना एक नवीन संधी मिळणार आहे.
  • व्याजदरावर सवलत :- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील नॅशनल त्याच बरोबर सहकारी आणि सरकारी बँका कमी व्याजामध्ये कर्ज पुरवठा करतात त्यामुळे परतफेड करताना विद्यार्थ्यांना अतिरिक्त चा जादा व्याजदर देण्याची गरज नाही
  • सुलभ परतफेड योजना :- जे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेणार आहेत, त्यांना शिक्षण पूर्ण झाल्यापासून 1 ते 5 वर्षापर्यंत कर्ज फेड करण्याची संधी मिळते, त्यामुळे शैक्षणिक वर्षांमध्ये कुठलाही ताणतणाव येत नाही.
  • तारण :- ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा तारण  ठेवण्याची आवश्यकता नाही या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कर्ज परतफेड न केल्यास त्यांचे पालक या कर्जासाठी जबाबदार असतील.
  • शिष्यवृत्ती आणि अनुदानाचा लाभ :- जे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात अशा विद्यार्थ्यांना शासनातर्फे शिष्यवृत्ती व काही अनुदानाच्या स्वरूपामध्ये लाभ देण्यात येतो हा देण्यात  येतो  आणि विद्यार्थी हा या लाभाचे रूपांतर हे कर्ज फेडण्यासाठी सुद्धा करू शकतो त्यामुळे कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होणार आहे 
  • परदेशातील शिक्षणाची संधी :- विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केल्यामुळे विद्यार्थीही आपल्या देशामध्ये त्याचबरोबर प्रदेशामधील उच्च शिक्षण घेण्यासाठी परावर्त होणार आहे व त्यासाठी त्यांना कर्ज सुविधा ही अत्यंत कमी व्याजारामध्ये दिली गेल्यामुळे आपल्या भारत देशातील विद्यार्थी हे प्रदेशातही चांगल्या प्रकारची छाप पाडू शकतील. आजही आपल्या भारत देशामध्ये जे विद्यार्थी परदेशात शिक्षण करू इच्छितात असे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्वरूपात कर्ज पुरवठा करताना दिसत आहेत.
  • सर्व शैक्षणिक खर्चाचा समावेश :- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारे कर्ज हे कुठल्याही शैक्षणिक खर्चासाठी वापरू शकतात म्हणजेच की ट्युशन फीस, पुस्तके, प्रकल्प खर्च, त्याचबरोबर राहण्याची व जेवणाची सुविधा होय.
  • सार्वजनिक आणि खासगी बँकांकडून उपलब्धता:- राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खासगी बँका या विद्यार्थ्यांसाठी कर्ज देतात. त्यामुळे कोणत्याही बँकेत अर्ज करण्याचे स्वातंत्र्य मिळते.

Shaikshanik Loan Yojana 2024 :- पात्रता

शैक्षणिक कर्ज योजनेसाठी लाभार्थ्याकडे खालील प्रकारची पात्रता असणे आवश्यक आहे. 

  • शैक्षणिक कर्ज  योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा आर्थिक दृष्ट्या गरीब मागासलेला त्याचबरोबर अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्यांक प्रवर्गातील असणे अनिवार्य आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय हे 18 ते 30 वर्ष दरम्यान असावे.
  • लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाख किंवा पाच लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.
  • लाभार्थ्यांनी कर्ज घेण्यासाठी यापूर्वी कोणत्याही बँकेकडे किंवा संस्थेकडे कर्ज मागणी केलेली नसावी किंवा त्यांचे कर्ज नसावी. 
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वडील किंवा आई ही कुठल्याही सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करणारे नसावेत.
  • लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास जामीनदार म्हणून त्यांना आई वडील हे असतील. 
  • लाभार्थ्यांनी शिक्षणासाठी कर्ज घेतले असता चालू शैक्षणिक वर्षात जर त्याने शिक्षण सोडून दिले असता त्याला त्या दिवसापासून कर्जाचे पैसे व्याजाच्या स्वरूपात भरावे लागतात. 

Shaikshanik Loan Yojana 2024 :- बँक अर्थसाहाय्य

खालील बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कर्ज पुरवठा केला जातो यासाठी बँकेने नमूद केलेल्या पात्रता आणि आवश्यक किती कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.

  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • युनियन बँक
  • आयडीबीआय बँक
  • पंजाब नॅशनल बँक
  • बडोदा बँक
  • स्टेट बँक ऑफ हैदराबाद
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
  • युनायटेड बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ इंडिया
  • सिंडिकेट बँक
  • इंडियन बँक
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • एचडीएफसी बँक
  • कॅनरा बँक

याव्यतिरिक्त  जिल्हास्तरावरील खाजगी त्याचबरोबर सरकारी आणि पतसंस्था देखील कर्जपुरवठा करत असतात. वरील सर्व बँकेचे व्याजदर हे ठराविक नसते त्या त्या बँकेच्या नियमानुसार कमी जास्त होत असतात. जसे की 3% पासून ते 8% पर्यंत शैक्षणिक कर्ज पुरवठा केला जातो.

Shaikshanik Loan Yojana 2024 :- कागदपत्रे

Shaikshanik Loan Sahay Yojana Documents या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जदाराकडे खालील प्रकारचे कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • ओळखपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • इतर कोणत्याही बँकेतून यापूर्वी कर्ज न घेतल्याचे प्रमाणपत्र
  • मागील वर्षीची गुणपत्रिका
  • शैक्षणिक खर्चाची आकडेवारी व अभ्यासक्रम कालावधीचा पुरावा
  • बँक पासबुक
  • हमीपत्र
  • पालकांचे आधार कार्ड पॅन कार्ड

Shaikshanik Loan Yojana 2024 :- अर्ज

Shaikshanik loan yojana 2024 apply online अर्जदारला या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याने खालील पद्धतीचा अवलंब करावा ही पद्धत ऑफलाईन आहे

  • Education Loan Scheme Apply (शैक्षणिक कर्ज योजना 2024) अर्जदाराला या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जरानी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालय जाऊन तेथील समाज कल्याण व शैक्षणिक विभागात भेट द्यावी लागेल व अर्ज घ्यावा लागणार आहे.
  • अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व बाबी अचूकपणे भरणे अनिवार्य आहे. 
  • अर्जामध्ये विचारलेल्या सर्व बाबी अचूकपणे भरल्यानंतर कागदपत्रे जोडायचे आहेत.
  • आता भरलेला सर्व अर्ज हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे आणि तो योग्य असल्यास संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे. 
  • पद्धतीने तुमची शैक्षणिक लोन योजना 2024 चे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

सरकारी योजनाक्लिक करा
केंद्र शासन योजनाक्लिक करा
शासन निर्णयक्लिक करा
टेलाग्रामला जॉइनक्लिक करा

Shaikshanik Loan Yojana 2024 :- FAQs

1. शैक्षणिक कर्ज योजना  काय आहे?

शैक्षणिक कर्ज योजना ही एक महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेली नवीन योजना आहे या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येते की मदत कर्जाच्या स्वरूपात असते आणि कर्ज हे बँकेकडून दिले जाते घेतलेले कर्ज हे विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परतफेड करावे लागते. 

2. शैक्षणिक कर्ज कोणासाठी आहे?

शैक्षणिक कर्ज योजना ही जय विद्यार्थी बारावी उत्तीर्ण किंवा भारतामधील आणि परदेशांमधील ज्या काही शैक्षणिक संस्था  यामध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही योजना आहे. 

3. कर्ज घेण्यासाठी कोणती पात्रता असते?

  • शैक्षणिक कर्ज  योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा  आर्थिक दृष्ट्या गरीब मागासलेला त्याचबरोबर अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्यांक प्रवर्गातील असणे अनिवार्य आहे.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय हे 18 ते 30 वर्ष दरम्यान असावे.
  • लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाख किंवा पाच लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.
  • लाभार्थ्यांनी कर्ज घेण्यासाठी यापूर्वी कोणत्याही बँकेकडे किंवा संस्थेकडे कर्ज मागणी केलेली नसावी किंवा त्यांचे कर्ज नसावी.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वडील किंवा आई ही कुठल्याही सरकारी किंवा निमसरकारी  नोकरी करणारे नसावेत.
  • लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास जामीनदार म्हणून त्यांना आई वडील हे असतील.
  • लाभार्थ्यांनी शिक्षणासाठी कर्ज घेतले असता चालू शैक्षणिक वर्षात जर त्याने शिक्षण सोडून दिले असता त्याला त्या दिवसापासून कर्जाचे पैसे व्याजाच्या स्वरूपात भरावे लागतात.

4. कर्जाची रक्कम किती मिळू शकते?

अर्जदाराला त्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेवर कर्जाची रक्कम दिली जाते म्हणजेच अर्जदार हा बारावी उत्तीर्ण असेल तर त्याला 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते आणि अर्जाला उच्च शिक्षणासाठी दहा ते वीस लाखापर्यंत कर्ज देण्यात येते.

5. कर्जाचे व्याजदर किती असते?

कर्जाचे व्याजदर हे त्या त्या बँकेच्या नियमानुसार ठरवलेले असते, काही बँका 3% पासून 8% पर्यंत कर्ज पुरवठा करतात, त्यामुळे निश्चित असा कुठल्याही बँकेचा व्याजदर गृहीत धरता येत नाही.

ही ही नक्की पाहा…👇👇👇👇👇👇👇

Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024येथे क्लिक करा
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024येथे क्लिक करा
Ladka Bhau Yojana 2024येथे क्लिक करा
Lek Ladki Yojanaयेथे क्लिक करा
Lakhpati Didi Yojanaयेथे क्लिक करा
Silai Machine Yojanaयेथे क्लिक करा
PM Awas Yojanaयेथे क्लिक करा
Vishwakarma Shram Samman Yojanaयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा
Shravan Bal yojanaयेथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment