प्रस्तावना:-
PM Pranam Yojana 2024 In Marathi | पीएम-प्रणाम योजना PIB | PM PRANAM YOJANA नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून नवीन एका योजनेची माहिती घेणार आहोत ती म्हणजे प्रधानमंत्री प्रणाम योजना 2024 . ही योजना आपल्या भारत देशामध्ये लागू करण्यात आली असून या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खत, कंपोस्ट खत त्याचबरोबर बायोपर्टीलायझर खते यासारख्या नैसर्गिक खताचा वापर करून जमिनीची प्रत सुधारणे हा होय. गेल्या काही वर्षापासून निसर्गाचा समतोल बिघडताना दिसत आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गातील झालेला बदल. याचे मुख्य कारण म्हणजे वाढत असलेले प्रदूषण जसे की जमिनीची धूप होणे, त्याचबरोबर वातावरणातील प्रदूषण, जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण होय.
आजही आपल्या भारत देशामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावरती आहोत म्हणजेच की हळूहळू लोकसंख्या वाढत जात आहे, त्यामुळे वृक्षतोड आणि शेतीत वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खताचा अतिरिक्त वापर केल्यामुळे जमिनीचा रास होत आहे. या सर्व गोष्टीचे परिणाम हे वातावरणावर झालेल्या बदलावरती दिसून येत आहे.
तर चला मित्रांनो आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत, या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत? योजनेचा उद्देश? त्याच बरोबर योजनेचे स्वरूप आणि अर्ज कसा करावा?, पात्रता, निकष या सर्व गोष्टींचा विचार या लेखांमध्ये आपण करणार आहोत त्यासाठी हा लेख आपण शेवटपर्यंत वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
PM Pranam Yojana 2024 In Marathi :-सविस्तर माहिती
पंतप्रधान प्रणाम योजना ही नरेंद्र मोदी यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात लागू केली होती, कारण भारत देश कृषिप्रधान देश मानला जातो आणि आपल्या भारत देशामध्ये 60 ते 65 % लोक हे शेतीवर अवलंबून असतात आणि शेती हा आपल्या देशाचा कणा मानला जातो, या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी नवनवीन योजना अंमलात आणत असतात.
PM PRANAM scheme Full Form सर्वप्रथम ही योजना नेमकी काय आहे हे आपण पाहूयात, या योजनेचा अर्थ म्हणजे Promotion of Alternate Nutrients for Agriculture Management (प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट्स फॉर एग्रीकल्चर मॅनेजमेंट) या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनजागृती निर्माण करण्याचे काम केले जाते, म्हणजेच शेतीवर होणाऱ्या अनिष्ट परिणामाचे महत्व सांगण्यात येते, जसे की शेतीची उत्पादकता, जमिनीची सुपीकता, त्याचबरोबर रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर इत्यादी. पीएम प्रणाम योजना 2024 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षण देखील ही देण्यात येते, यामुळे शेतकऱ्याचे जीवनमान त्याचबरोबर शेतीतील उत्पादन हे वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने विविध प्रकारचे संशोधन केंद्रे निर्माण केली आहेत, यांच्याअंतर्गत या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षण आणि शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते.
PM Pranam Yojana 2024 In Marathi :- मुद्दे
या योजनेचे खालील प्रकारे काही ठळक मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहे ते आपण पाहूयात.
योजनेचे नाव | PM Pranam Yojana 2024 In Marathi (पंतप्रधान प्रणाम योजना 2024) |
योजनेची सुरुवात | केंद्र सरकार |
योजनेचा मुख्य उद्देश | रासायनिक खतांचा वापर कमी करून जमिनीचा स्तर वाढवणे. |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी वर्ग |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | येथे पाहा. |
PM Pranam Yojana 2024 In Marathi :- उद्दिष्टे
PM PRANAM YOJANA Features पीएम प्रणाम योजनेचे खालील काही प्रकारचे उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात.
- रासायनिक खतांचा वापर कमी करणे: पीएम प्रणाम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रासायनिक खतांचे होणारे दुष्परिणाम त्याचबरोबर वारंवार घडणारे परिणाम या सर्व गोष्टींचे महत्त्व स्पष्ट करण्यात येते. रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे जमिनीची गुणवत्ता ही कमी होऊन शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करणे, हे या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट मानले जाते.
- जैविक त्याचबरोबर नैसर्गिकतांचा वापर करणे: रासायनिक खतांचा वापर कमी केल्यामुळे त्याला पर्यायी खते म्हणजे जैविक किंवा नैसर्गिक खते. या खताचा वापर केल्यामुळे शेतीची गुणवत्ता त्याचबरोबर उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.
- प्रोत्साहन कार्यक्रम: शेतकऱ्यांना रासायनिक व जैविक खताचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध प्रकारचे प्रोत्साहन कार्यक्रम घेण्यात येतात व यामधून जनजागृती करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करण्यात येत होता.
- पर्यावरण संरक्षण करणे: या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी परावृत्त केले जाते, त्यामुळे जमिनीचा वाढता ऱ्हास कमी होणार आहे व जमिनीचा समतोल न बिघडल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.
- उत्पादन व जीवनमान सुधारणे: शेतकरी हा वेळोवेळी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करत असल्यामुळे त्याने उत्पादन केलेले अन्न हेही तीतचकेच शरीरासाठी घातक असते, त्यामुळे आजही बरेच लोक हे वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात.या सर्व बाबींचा विचार करून सरकारने ही योजना अमलात आणली आहे. आता जैविक व नैसर्गिक खताचा वापर केल्यामुळे उत्पादन ही वाढण्यास मदत होणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्याचे जीवनमान सुधारणार आहे.
PM Pranam Yojana 2024 In Marathi :- महत्त्वाचे बदल
पीएम प्रणाम योजना 2024 या योजनेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात.
- अनुदान व प्रोत्साहन: या योजनेमध्ये काही स्वरूपात अनुदान हे रासायनिक खतांना वापरासाठी देण्यात येत होते आता ते बदलून जैविक खतांसाठी दिले जाणार आहेत व प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात खते ही वितरित करण्यात येणार आहेत.
- तांत्रिक शेती: पीएम प्रणाम योजना च्या अंतर्गत शेतकऱ्यांना जैविक शेतीचे तंत्रज्ञान शिकवण्यात येते व विविध कार्यक्रम राबवण्यात येते त्याचबरोबर जैविक शेती करताना विविध नवनवीन तंत्र कसे वापरावे हेही स्पष्ट करण्यात येते.
- खत वितरण पडताळणी: या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी किती रासायनिक खताचा शेतकऱ्यांनी वापर करण्यात आलेला आहे, यासाठी प्रत्येक राज्यामध्ये खते वितरण करणाऱ्या डीलर कडून माहिती गोळी गोळा करण्यात येणार आहे.
PM Pranam Yojana 2024 In Marathi :- फायदे
PM PRANAM YOJANA Benefits पीएम प्रणाम योजनेअंतर्गत खालील प्रकारे काही फायदे स्पष्ट करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात
- शेतकऱ्यांना रासायनिक खताचा अतिवापर केल्यामुळे काय परिणाम होतात व जैविक खते वापरल्यामुळे काय परिणाम होतात याची संपूर्ण मार्गदर्शन केले जाते, त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.
- जैविक आणि नैसर्गिक खताचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले अन्न हे विषमुक्त असल्याकारणाने मानवाला मोठ्या आजारांना बळी पडण्यास आळा बसणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.
- पीएम प्रणाम योजना च्या अंतर्गत शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर होणार आहे.
- या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्याला अनुदान देण्यात येईल व हे अनुदान बचत केलेल्या पैशाच्या 50% अनुदान हे या योजनेला वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे जैविक खताचा दर कमी होणार आहे व याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
आता मिळालेल्या निधीपैकी 70% निधी हा पर्याय खते म्हणून वापरण्यात येईल आणि 30 % निधीचा वापर शेतकरी पंचायत शेतकरी उत्पादन संस्था आणि बचत गट यांना वितरित करण्यात येईल.
PM Pranam Yojana 2024 In Marathi :- पात्रता
या योजनेच्या माध्यमातून आपण कोणती पात्रता असणे आवश्यक आहे ते पाहूयात
- ही योजना केंद्र सरकारने सुरू केली असल्यामुळे आपल्या भारत देशातील विविध राज्यामध्ये लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातील शेतकरी वर्ग हा या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- पीएम प्रणाम योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचा वापर व जैविक तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन हवे आहेत अशी शेतकरी पात्र असणार आहेत
- या योजनेसाठी फक्त शेतकरी वर्गच पात्र असेल.
PM Pranam Yojana 2024 In Marathi :- कागदपत्रे
PM PRANAM YOJANA Documents या योजनेच्या लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जदाराने खालील कागदपत्राची पूर्तता करणे अनिवार्य आहे.
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- सातबारा
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईजचे फोटो
PM Pranam Yojana 2024 In Marathi :- अर्ज
Pm pranam yojana apply online या योजनेला अर्ज करावयाच्या झाल्यास अर्जदाराने खालील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
- सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊयात की ही योजना ऑफलाइन पद्धतीने आहे म्हणजेच, अर्जदाराने सर्व डॉक्युमेंट्स हे ऑफलाइन पद्धतीने द्यावे लागतात.
- अर्जदाराने सर्वप्रथम सीएससी सेंटरला भेट द्यावी लागेल, तेथे या योजनेअंतर्गत एक अर्ज दिला जाईल तो अर्ज भरावा लागेल.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरणे अनिवार्य आहे.
- सर्व माहिती भरल्यानंतर विचारलेली सर्व कागदपत्रे ही जोडून तो अर्ज सबमिट करावा.
अशा पद्धतीने तुमची पंतप्रधान प्रणाम योजना ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण होईल.
PM Pranam Yojana 2024 In Marathi :- FAQs
1. पीएम प्रणाम म्हणजे काय?
उत्तर: पीएम प्रणाम योजना (PM PRANAM Yojana) ही केंद्र सरकारद्वारे सुरू केलेली एक योजना आहे, या योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे रासायनिक खतांचा वापर कमी वापरणे आणि शेतकऱ्याला जैविक व नैसर्गिक खताकडे वळण्यास परावृत्त करणे होय.
2. पीएम प्रणाम योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
उत्तर: या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी-कमी करणे व जैविक खतांचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवणे हा आहे.
3. पीएम प्रणाम योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात.
उत्तर: या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुख्यत्वाकरून शेतकरी वर्ग आहेत, त्याचबरोबर जे शेतकरी रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक व नैसर्गिक खताचा वापर करू इच्छिता अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
4. पीएम प्रणाम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळतात?
उत्तर: जे शेतकरी रासायनिक खतांचा वापर कमी करतात त्यांना प्रोत्साहन दिले जाते, त्याचबरोबर जैविक व नैसर्गिक खतांचा वापर करण्यासाठी आर्थिक अनुदान सुद्धा देण्यात येते.
5. पीएम प्रणाम योजनेअंतर्गत जैविक खतांबद्दल अधिक माहिती कशी मिळेल?
उत्तर: या योजनेची माहिती देण्यासाठी सरकारने विविध कृषी विज्ञान केंद्र त्याचबरोबर कृषी विभागामार्फत जनजागृती मोहीम, प्रशिक्षण शिबिरे त्याचबरोबर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
हे ही नक्की वाचा…👇👇👇👇👇
Shaikshanik Loan Yojana 2024 | येथे क्लिक करा |
PM Internship Scheme 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Smart Meter Yojana 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Saur Kumpan Yojana 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 | येथे क्लिक करा |