प्रस्तावना :-
Mahila Samman Yojana 2024 In Marathi | Mahila Samman Bachat Patra Yojana | Mahila Samman Yojana 2024, नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन योजनेविषयी माहिती घेणार आहोत ती म्हणजे “महिला सन्मान बचत योजना 2024”, ही योजना भारत सरकारने विशेष करून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक प्रभावशाली योजना आहे. या योजनेमध्ये महिलांना एका बचतीच्या रकमेवर आकर्षक व्याजदर व सुरक्षितता मिळणार आहे.
मित्रांनो केंद्र सरकार व राज्य सरकार आपल्या राज्यातील महिलांसाठी नवनवीन योजना अंमलात आणत असतात. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांना सक्षम व त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा होय. केंद्र सरकार व राज्य सरकार महिलांना समाजामध्ये एक वेगळे स्थान मिळावे यासाठी सदैव तत्पर व प्रयत्नशील असते, याच अनुषंगाने आज आपण महिला सन्मान बचत योजना 2024 याविषयी माहिती घेणार आहोत.
तर चला मित्रांनो, आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत ती म्हणजे ही योजना काय आहे? या योजनेची सुरुवात कोणी केली? या योजनेचा फायदा काय आहे? त्याचबरोबर योजनेचे वैशिष्ट्ये, उद्देश, पात्रता, अटी व निकष या सर्व बाबींचा या योजनेमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचणे बंधनकारक आहे.
Mahila Samman Yojana 2024 In Marathi :-सविस्तर माहिती
आपला भारत देश हा सांस्कृतिक देश मानला जातो व या देशांमध्ये महिलांना देखील मानसन्मान दिला जातो परंतु जुन्या रुढी परंपरा पुढे महिलांना घराच्या बाहेर जाता येत नाही. त्याचबरोबर त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास करता येत नाही म्हणजेच असे की,रूढी परंपरेमुळे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्यास वेळ मिळत नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागाकडून 27 जून 2024 रोजी महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये महिलांना एक ठराविक रकमेवरती आकर्षक व्याज दिले जाते, त्याचबरोबर त्यावरती व्याजाचा परतावा देखील चांगल्या स्वरूपात असतो, त्यामुळे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्यास मदत होणार आहे.
Mahila Samman Yojana 2024 ही सार्वजनिक, खाजगी त्याचबरोबर सहकारी बँकेमध्ये लागू करण्यात आली आहे. महिला सन्मान बचत पत्र योजना ही पोस्ट ऑफिस आणि ठरवून दिलेल्या शेड्युल बँकेमध्ये सुरू करण्यात आली आहे. ही योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली आहे व या योजनेचे पूर्ण नेतृत्व पोस्टऑफिसकडे सोपवण्यात आलेले आहे. ही योजना दोन वर्षासाठी सुरू करण्यात आलेली असून म्हणजेच 31 मार्च 2025 पर्यंत लागू राहणार आहे.
Mahila Samman Yojana 2024 In Marathi :-मुद्दे
महिला सन्मान बचत पत्र योजना चे खरे काही ठळक मुद्दे कट करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात.
योजना | Mahila Samman Bachat Yojana 2024 In Marathi (महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024) |
योजनेची सुरुवात | केंद्र सरकार |
योजनेची सुरुवात केव्हा केली | 1 एप्रिल 2023 |
योजनेचे मुख्य उद्देश | आपल्या देशातील महिलांना गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर देणे व सुरक्षितता प्रदान करणे त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे. |
योजनेचे लाभ कोणाला | महिलावर्ग |
योजनेचा लाभ | बचत केलेल्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याजदर |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | येथे पाहा. |
Mahila Samman Yojana 2024 In Marathi :-गुंतवणूक व परतावा
Mahila Samman Saving Certificate Scheme या योजनेच्या माध्यमातून महिलांनी केलेल्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळतो हे सविस्तर पाहूयात.
- केंद्र सरकारने देशभरात महिलांसाठी सुरू केलेली ही एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला काही ठराविक रक्कम बचत करतात व त्यांना त्या बचतीवरती चांगला व्याज परतावा मिळतो.
- या योजनेमध्ये कमीत कमी 1000 रुपये आणि 100 पटीमध्ये रक्कम भरता येते व ही रक्कम जास्तीत जास्त 2,00,000 लाखापर्यंत असावी.
- या योजनेचा कालावधी हा 2 वर्ष इतका असतो.
- महिलांनी केलेल्या बचतीवर 7.5 % टक्क्याने व्याज परतावा महिलांना देण्यात येतो, त्यामुळे इतर बँकेचे तुलनेत हे व्याजदर अतिशय चांगला आहे.
- या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी बचत केलेली आहे. अशा महिलांना 2 वर्षाच्या पूर्वी काही कारणास्तव पैसे काढावयाची गरज भासल्यास ते जमा असलेल्या शिलकी पैकी जास्तीत जास्त 40% रक्कम काढण्यास पात्र असतील.
Mahila Samman Yojana 2024 In Marathi :-वैशिष्ट्य
Mahila Samman Bachat Patra Features योजनेचे खालील प्रकारे काही वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात.
- कमीत कमी गुंतवणुकीची मर्यादा: या योजनेअंतर्गत महिलांना बचत करावयाची झाल्यास कमीत कमी 1000 रुपये आणि कमाल 2,00,000 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते, त्यामुळे महिला त्यांच्या सोयीनुसार कमीत कमी गुंतवणूक करू शकतात.
- कमी कालावधी: या योजनेअंतर्गत ज्या महिलांना गुंतवणूक करायची आहे, त्या महिलांसाठी कार्यकाळ 2 वर्षाचा दिला आहे. त्यामुळे महिलांना कमी कालावधी पर्यंत गुंतवणूक करायची आहे.
- आकर्षक व्याजदर: महिला सन्मान योजने अंतर्गत देण्यात येणारा वार्षिक व्याजदर हा 7.5% इतका असल्यामुळे इतर खाजगी व सार्वजनिक बँकेच्या व्याजदरच्या तुलनेत हा व्याजदर अतिशय चांगला आहे त्यामुळे महिलांना फायदा होण्यास मदत होते.
- करसवलत: या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या महिलांना कर सवलतीची सूट देण्यात आली आहे, परंतु त्यासाठी महिलांनी कर नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- सुरक्षा: ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आल्यामुळे या योजनेचे अटी व नियम हे तितकेच कटिबंध आहेत, त्यामुळे महिलांसाठी सुरक्षित आणि सुनिश्चित योजना मानली जाते.
Mahila Samman Yojana 2024 In Marathi :- फायदे
Mahila Samman Saving Certificate Scheme Benefits या योजनेअंतर्गत खालील काही फायदे स्पष्ट करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात.
- महिला सन्मान योजना अंतर्गत महिलांना बचतीच्या स्वरूपात सुरक्षित पर्याय निर्माण झाला आहे, त्यामुळे महिला त्यांच्या सोयीप्रमाणे कमीत कमी 1000 रुपये ते 2,00,000 लाख रुपये पर्यंत बचत करू शकतात.
- ही योजना महिलांसाठी असल्यामुळे महिलांनी केलेल्या बचतीवर आकर्षक 7.5% व्याजदर मिळते त्यामुळे इतर बँकेत तुलनेत हे व्याजदर अत्यंत चांगले आहे.
- या योजनेच्या माध्यमातून महिलांनी ठेवलेल्या ठेवीवर बँकेकडून चक्रवाढ व्याज देखील देण्यात येते.
- या योजनेमुळे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्याची एक संधी मिळाली आहे.
Mahila Samman Yojana 2024 In Marathi :-पात्रता
Mahila Samman Bachat Patra Eligibility योजनेअंतर्गत ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या महिलांनी खालील पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारी अर्जदार ही महिला असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार ही भारतीय असणे अनिवार्य आहे.
- या योजनेचा लाभ फक्त महिला व मुलींनाच मिळणार आहे.
- अर्जदार ही अल्पवयीन मुलगी असेल तर तिचे खाते पालकांनी उघडणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या महिलांसाठी वयाची कसलीही मर्यादा नाही.
- अर्ज करताना महिलेने वैयक्तिक खाते उघडणे अनिवार्य आहे.
Mahila Samman Yojana 2024 In Marathi :- कागदपत्रे
Mahila Samman Yojana Documents अर्जदार महिलांनी खालील कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जन्म दाखला
- पासपोर्ट साईज चे फोटो
- ड्रायव्हिंग लायसन
- मतदान ओळखपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- चेक पे इन स्लीप
- जॉब कार्ड
Mahila Samman Yojana 2024 In Marathi :- अर्ज
Mahila Samman Saving Certificate Scheme Online Apply या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी खालील प्रक्रियेचा अवलंब करावा.
- सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊयात की ही प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे.
- महिला अर्जदाराला या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जदारांनी जवळच्या उशाखेत किंवा पात्र असलेल्या बँकेत भेट द्यावी.
- जर तुम्हाला अर्ज घ्यायचा असेल तर तुम्ही क्लिक here या संकेत स्थळाला भेट देऊन तुम्ही अर्ज डाऊनलोड करू शकता.
- आता तुम्हाला मिळालेला अर्ज व्यवस्थित वाचून सर्व माहिती अचूकपणे भरावी लागणार आहे.
- संपूर्ण अर्ज भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे जोडावी लागणार आहेत त्यामुळे विचारलेले सर्व कागदपत्रे तुम्ही जोडणे आवश्यक आहे.
- मिळालेल्या अर्जामध्ये स्वयंघोषणापत्र दिलेले आहेत ते भरून त्यासोबत गुंतवणूक व ठेवीचा अर्ज भरवयाचा आहे.
- सर्व अर्ज भरल्यानंतर तुम्ही तो अर्ज व्यवस्थितपणे तपासून घ्या आणि सर्व माहिती बरोबर असल्यास तो अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सादर करावा.
- तुम्ही सर्व केलेली प्रक्रिया अचूक असल्यास तुम्हाला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत एक पत्र देण्यात येईल.
- या योजनेची अंतिम मुदत ही 31 मार्च 2025 असल्यामुळे ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी निश्चित केलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
Mahila Samman Yojana 2024 In Marathi :-FAQs
महिला सन्मान बचत योजना काय आहे?
महिला सन्मान बचत योजना 2024 ही केंद्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक प्रभावी योजना आहे या योजनेमध्ये महिलांना सुरक्षित गुंतवणुकीसह 7.5 टक्के वार्षिक व्याजदर दिला जातो.. या योजनेच्या माध्यमातून. या योजनेच्या माध्यमातून महिलांना. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.
महिला सन्मान बचत योजना मध्ये कोण गुंतवणूक करू शकते?
या योजनेमध्ये मुलगी किंवा महिला गुंतवणूक करू शकतात व त्यांच्या नावाने त्यांचे पालक देखील गुंतवणूक करू शकतात.
महिला सन्मान बचत योजना मध्ये किती रक्कम गुंतवू शकतो?
महिला सन्मान बचत योजनेमध्ये कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 2,00,000 लाखापर्यंत गुंतवणूक करण्याची मर्यादा आहे.
महिला सन्मान बचत योजना मध्ये व्याजदर किती आहे?
महिला सन्मान बचत योजनेमध्ये वार्षिक व्याजदर हा 7.5% इतका दिला जातो.
महिला सन्मान बचत योजनाचा गुंतवणुकीचा कालावधी किती आहे?
महिला सन्मान बचत योजनेचा कालावधी हा 2 वर्षे इतका असतो.
महिला सन्मान बचत योजना शेवट तारीख किती आहे?
महिला सन्मान बचत योजनेची शेवट तारीख 31 मार्च 2025 जाहीर करण्यात आलेली आहे.
ही ही नक्की वाचा…👇👇👇👇
Shaikshanik Loan Yojana 2024 | येथे क्लिक करा |
PM Internship Scheme 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Smart Meter Yojana 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Saur Kumpan Yojana 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Leave a comment