Dussehra Information In Marathi

Dussehra Information In Marathi
Dussehra Information In Marathi

प्रस्तावना :-

Dussehra Information In Marathi | Dussehra marathi | दसरा शुभेच्छा संदेश मराठीत | Dussehra 2024 mahatva in marathi, “विजयादशमी” यालाच “दसरा” म्हणून देखील ओळखले जाते, हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सणापैकी एक सण आहे. हा सण मुख्यत्व करून शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्रदान करण्यात आले आहे. विजयादशमी दिवशी चांगुलपणाचा वाईटावर विजय झाल्यामुळे विजय दसरा साजरा केला जातो. दसरा हा साजरा करण्याचे विविध प्रकार आहेत, राज्यात विविध पद्धतीने साजरा करण्याची एक प्रथा आहे. विविध राज्यांमध्ये साजरा करण्यात आलेल्या दसरा या सणाला विशिष्ट महत्व प्रधान करण्यात आले आहे. या दिवशी काही जोडलेल्या पौराणिक कथा व पारंपारिक गोष्टीची पुनरावृत्ती करून नव्याने जगण्याची दिशा दिली जाते.

तर चला मित्रांनो आज आपण विजयादशमी विषयी संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठीहा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

Dussehra Information In Marathi :-सविस्तर माहिती

दसरा 2024 विजयादशमीलाच दसरा असे म्हटले जाते, हा सण शारदीय नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दहाव्या दिवशी साजरा केला जातो. विजयादशमीचा महत्त्वाचा अर्थ म्हणजे विजयाचा दिवस असा होतो, या दिवशी भगवान रामाने रावणाचा पराभव केला होता आणि देवी दुर्गा मातानी महिषासुरावर विजय मिळवला होता असे पौराणिक कथेमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये एक तात्पर्य असे होते, की रावण आणि महिषासुर हे दोन्ही वाईट प्रवृत्तीचे होते व त्यांच्यावर रामाने आणि माता दुर्गेने त्याचा वध केला होता, त्यामुळे या दिवशीला विजयादशमी असे नाव देण्यात आले होते. 

विजयादशमी मराठी माहिती हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो, या दिवशी हा सण आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात येतो.या दिवशी वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टीचा विजय झाला होता, त्यामुळे या दिवसाला दसरा असे म्हटले जाते, या दिवशी हिंदू धर्मातील सर्व लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण साजरा करतात. या दिवशी सोने-चांदी त्याचबरोबर नवीन कपडे खरेदी केली जातात. दुसऱ्या दिवशी सर्व लोक हे आपल्या घरांच्या दारांना आंब्याच्या पानाची व झेंडूच्या फुलाची तोरणे लावतात व देवांची मनोभावे पूजा करतात.
महाराष्ट्रामध्ये तसेच इतर राज्यांमध्ये दसरा या दिवसाला विशेष महत्त्व देण्यात येते. या दिवशी आपापसात आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देण्यात येतात,त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या शस्त्रपूजा आणि वाहन पूजा करण्याची एक पारंपारिक परंपरा आहे.त्या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन आपापसातली कटूता दूर करण्याचा प्रयत्न करतात.

Dussehra Information In Marathi :- प्रमुख कथा

विजयादशमी विषयी काही पौराणिक कथा स्पष्ट करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात

  • रामायणातील रावणवधाची कथा :- सर्वात प्रथम कथा ही रामायणातील भगवान राम अशी संबंधित आहे. आपल्याला संपूर्ण रामायण परिचित आहे व या कथेनुसार प्रभू रामाने लंकेचा राजा रावण याच्याशी युद्ध केले होते व हे युद्ध बरेच दिवस चालले होते प्रभू रामाची पत्नी सीतामातेला लंकेच्या रामाने अपहरण केले होते आणि त्यांना कैद ठेवले होते. सीता मातेला परत आणण्यासाठी राम,लक्ष्मण, हनुमान आणि संपूर्ण वानरसेना यांनी लंकेचा राजा रावणावर आक्रमण केले होते हे आक्रमण दहा दिवस चालले आणि दहाव्या दिवशी दशमीच्या दिवशी प्रभू रामानी रावणाचा वध केला व सीतेमातेला परत आणले. या सर्व पौराणिक कथेतून असे निष्कर्ष निघते की रावणाचा वध म्हणजे अधर्माचा अंत वाईट प्रवृत्तीच्या रावणाचा अंत होय. या सर्व गोष्टींमध्ये सत्याचा विजय झाल्यामुळे या दिवशी दसरा हा सन रामाचे विजयाचे प्रतीक म्हणून साजरी करण्यात येते. विविध राज्यामध्ये या दिवशी रावण, कुंभकरण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले जाते. हे सर्व करत असताना रामायणातील रामलीला देखील साजरी करण्यात येते, हे सर्व करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे रामायणामधील घडलेली घटना नाट्यरूपातून प्रकट करणे व लोकांना सत्याचा विजय कसा झाला हे दाखवून देणे हा आहे.
Dussehra Information In Marathi
Dussehra Information In Marathi
  • दुर्गा माता व महिषासुराची कथा:- पौराणिक कथेमधली ही दुसरी कथा म्हणजे दुर्गामाता व महिषासुराची कथा होय कथेनुसार महिषासुर नावाचा एक राक्षस होता, त्याने ब्रह्मदेवाकडून अमर्तत्वाचे वरदान मागून घेतले होते. हे वरदान मागून घेतल्यानंतर त्याने संपूर्ण देवलोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केला होता त्यामुळे देव व मानव त्रस्त  झाले होते. ब्रह्मदेवाने असे वरदान दिले होते की, महिषासुर रक्षसाचा वध हा मानव किंवा देवाच्या हाताने होणार नाही. हे सर्व थांबवण्यासाठी माता दुर्गेने नऊ रुपे धारण करून नऊ दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला हा वध म्हणजे मानव व देव लोकांसाठी विजयाचे प्रतीक होते, म्हणून याला दसरा म्हणून ओळखले जाते, त्याचबरोबर या दिवशी वाईट प्रवृत्तीच्या राक्षसाचा वध करण्यात आला होता व सत्याचा विजय झाला होता त्यामुळे या दिवसाला विजयादशमी असे नाव देण्यात आले आहे. या दिवसांमध्ये नऊ दिवस भावीक भक्त देवीची मनोभावे सेवा करतात व देवीला प्रसन्न करून आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मागणी घालतात. असे या नऊ दिवसाचे महत्व आहे.
Dussehra Information In Marathi
Dussehra Information In Marathi

Dussehra Information In Marathi :- महत्त्व

Dussehra 2024 Muhurta विजयादशमी हा सण हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सन मानला जातो. या दिवशी आपट्याची पाने लुटण्यासाठी गावाची वेश ओलांडून जात असतात. दसरा हा सण  साजरा करण्याची परंपरा ही खूप जुनी आहे. या दिवशी देवी दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला होता व याच दिवशी प्रभू रामचंद्र यांनी रावणाचा देखील वध केला होता. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासामध्ये होते त्यावेळेस त्यांनी त्यांची शस्त्रे शमीच्या झाडावरती ठेवली होती, ज्याला आपण हा आपटा असे म्हणतो. जेव्हा प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून परत आले असता त्यांनी आपली शस्त्रे परत घेतली व या झाडाची पूजा केली त्यामुळे आपटा देण्याचे महत्व तेव्हापासून रूढ झाले आहे. 

या दिवशी गावातील लोक हे खूप थाटामाटात हा सण साजरा करतात. यावेळी शेतामध्ये पेरलेले पहिले धान्य घरात आणतात व त्या धान्याची पूजा करून डोक्याच्या वरती टोपीवर तुरा म्हणून लावतात. ही पद्धत अनेक वर्षापासून प्रचलित आहे. तुरा लावण्याचे महत्त्व म्हणजे विजयादशमी दिवशी वाईटावर विजय करून सत्याचा विजय झाला व टोपी वरती सत्याचा तुरा लावला असेल ग्राह्य धरले जाते त्यामुळे टोपीवर तुरा लावण्याची प्रथा प्रचलित आहे.या दिवशी आपट्याची पाने देण्यासाठी एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात व घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, कटुता दूर होऊन जीवन जगण्यासाठी इच्छा व्यक्त करतात. या दिवशी अनेक लोकांच्या घरी विविध गोडधोडीचे पदार्थ सुद्धा केले जातात. आपट्याची पाने देताना लोक एकमेकांना “दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा” असे वाक्य म्हणून शुभेच्छा देतात.

Dussehra Information In Marathi :- आधुनिक काळातील संदर्भ

vijayadashami meaning in marathi दसरा किंवा विजयादशमीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आजही तितकेच टिकून आहे फक्त आजच्या जीवनशैलीत बदल झालेले दिसत आहे परंतु, दसरा या सणाचे महत्व आजही कमी होताना दिसत नाही. दुसरा सण आजच्या काळात देखील चांगुलपणा, न्याय व सत्य यांचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. 

आधुनिक काळात दसरा हा नेहमीच चांगुलपणाची आणि वाईट यावर विजयाची शिकवण देते हे आजही लोक मान्य करतात व त्याला तेवढ्याच श्रद्धेने मानतात. vijayadashami in marathi विजयादशमी हा सण नियमित चांगुलपणाची व विजयाची शिकवण देते आजही दसरा हा सन भ्रष्टाचार, अन्याय, दुष्ट व त्यांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी एक प्रेरणा ठरली जाते.

सरकारी योजनाक्लिक करा
केंद्र शासन योजनाक्लिक करा
शासन निर्णयक्लिक करा
टेलाग्रामला जॉइनक्लिक करा

Dussehra Information In Marathi :- निष्कर्ष

दसरा म्हणजे विजयाचा दिवस या दिवशी चांगुलपणाचा वाईटावर विजय झाला होता म्हणून या दिवसाला विजया दिवस आणि हा दिवस दहा दिवसांनी म्हणजे दश दिवशी आला होता म्हणून याला विजयादशमी असे म्हणतात.

Dussehra Information In Marathi :- FAQs

दसरा का साजरा केला जातो?

प्रभू रामाने रावणाचा वध व दुर्गा मताने महिषासुराचा अवगत केला होता त्यामुळे या दिवशी दसरा असं साजरा केला जातो. या दिवशी चांगुलपणाचा वाईटावर विजय झाला होता त्यामुळे दसरा हा उत्साहाने साजरा केला जातो.

दसऱ्याला काय करतात?

दुसऱ्या दिवशी दैनंदिन वापरात येणारे शस्त्रे व साधने यांची पूजा करून देवी देवतांची पूजा करण्यात येते आणि आपट्याच्या पानाची देवाण-घेवाण करून एकमेकातील कटूता शत्रुता करतात.

विजयादशमी आणि दसरा एकच आहे का?

होय विजयादशमी आणि दसरा हे एकच आहेत

महाराष्ट्रात दसरा कसा साजरा केला जातो? 

महाराष्ट्र मधील दसरा असून खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी घरांच्या दारांना आंब्याच्या पानाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे हार लावले जातात. दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणारे शस्त्र व वाहने यांची पूजा देखील केली जाते. या दिवशी देवीची खूप मोठ्या प्रमाणात मनोभावे पूजा केली जाते. 

दसरा सण 2024 कोणता दिवस आहे?

2024 मध्ये दसरा  हा सण शनिवारी  येतो व नवरात्रीच्या दहाव्या दिवशी असतो.

हे ही नक्की वाचा…👇👇👇👇👇

Shaikshanik Loan Yojana 2024येथे क्लिक करा
PM Internship Scheme 2024 In Marathiयेथे क्लिक करा
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024येथे क्लिक करा
Smart Meter Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024येथे क्लिक करा
Saur Kumpan Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा
Magel Tyala Solar Pump Yojana 2024येथे क्लिक करा