Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024

Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024
Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024

प्रस्तावना :-

Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024| Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024 In Marathi| Gopinath Munde Shetkari Apghat Sanugrah Vima Yojana, भारत देशा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, त्याचबरोबर शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो, त्यामुळे आपल्या भारत देशातील 63% लोक हे शेतीवर अवलंबून असतात. हल्लीच्या वाढत्या निसर्गाच्या बदल्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ त्याचबरोबर वातावरणातील अनियमित बदल अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. निसर्गातील वाढलेल्या असंतुलामुळे शेतकऱ्याचे जीवन हे खूपच अनिश्चित व आर्थिक दृष्ट्या हालाखीचे मानले जाते. याचा परिणाम हा त्याच्यावरच नाही तर त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्या वरती होत असतो. अशा सर्व परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र सरकार वेळोवेळी नवनवीन योजना अंमलात आणत असतात आज आपण अशाच एका योजनेविषयी माहिती घेणार आहोत ती म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2024 होय.
तर चला मित्रांनो आज आपण या लेखाद्वारे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना काय आहे? पात्रता, अटी, निकष व अर्ज कसा करायचा हे आपण पाहणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचणे अनिवार्य आहे.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024 :  सविस्तर माहिती

शेती करत असताना शेतकऱ्याला अनेक अडचणी यांना तोंड द्यावे लागते जसे की, सर्पदंश विंचुदोष, विजेचा शॉक बसणे, उष्माघात, रस्त्यावरील अपघात. या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन शेतकरी हा दैनंदिन जीवन जगत असतो. या सर्व गोष्टींचा तो सामना करत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा विमा उपलब्ध नसतो, त्यामुळे त्याला आर्थिक व झालेल्या जीवित हानी बद्दल कुठलीही आर्थिक विमा सहाय्य मिळत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह विमा योजना 2024 सुरू करण्यात आले आहे. 
गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह विमा योजना 2024 (gopinath munde farmers accident safety relief grant scheme) या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे जे शेतकरी शेतामध्ये काम करत असतात, त्याचबरोबर त्यांनी पीकवलेला माल बाजारपेठेमध्ये घेऊन जात असताना जर काही अपघात झाला तर त्याना या योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते. शेतकरी हा शेतामध्ये काम करून आपला उदारनिर्वाह करत असतो, हे करत असताना त्याच्या घरातील सर्व कुटुंब हे त्याच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे घरातील कर्त्या व्यक्तीला जर काही हानी झाली जसे की अपंगत्व येणे, मृत्यू होणे किंवा अंधत्व येणे असे झाल्यानंतर त्याच्या घरातील कुटुंबावर संकट येऊ शकते, या योजनेअंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याला अपघात झाला तर त्याला दोन लाखाचे अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्यात येते आणि या रकमेच्या साह्याने त्याचे कुटुंब अनिश्चित घडलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतात.

गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह विमा योजना 2024 ही योजना मुख्यत्वाकरून स्वर्गीयवासी गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने सुरू करण्यात आली याचे मुख्य कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले होते व वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करत होते याच अनुषंगाने या योजनेला हे नाव देण्यात आले आहे. Apghat Vima ही योजना 2005-06 या साली सुरू करण्यात आली होते परंतु गेल्या काही काळामध्ये या योजनेमध्ये त्रुटी आढळूनआल्यामुळे ही योजना  नोव्हेंबर 2014 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. मागील काही वर्षाची माहिती पाहिली असता जवळपास लाखो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास प्रत्येक घरातील एका कुटुंबातील दोन सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024
Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024

Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024 : मुद्दे

या योजनेअंतर्गत खालील काही ठळक मुद्दे स्पष्ट करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात.

योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थी कोण असेलमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग
लाभ अंतर्गत मिळणारी रक्कम2,00,000/- रुपये विमा
योजेनचे मुख्य उद्देशमहाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विमेच्या स्वरूपात आर्थिक साह्य देणे
कोणत्या विभागामार्फतकृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य
अर्ज प्रक्रियाऑफलाइन अर्ज पद्धत

Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024 : वैशिष्ट्य

या योजनेअंतर्गत खालील काही वैशिष्ट्य स्पष्ट करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात.

  • शेतकरी लाभार्थी: ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत कल्याणकारी योजना आहे, म्हणजेच की ज्यावेळेस शेतकरी शेतामध्ये काम करतो त्यावेळेस त्याला काही अपघात झाल्यास किंवा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्याचबरोबर अपंगत्व आणि इतर काही अवयवावर परिणाम झाल्यास पात्र असलेल्या शेतकऱ्याला व कुटुंबातील एका सदस्याला या विम्याच्या  अंतर्गत रक्कम देण्यात येते, त्यामुळे शेतकरी व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळण्यास मदत होते.
  • अपघात व मृत्यू विमा हमी संरक्षण: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेअंतर्गत जर शेतकऱ्याचा अपघात किंवा मृत्यू झाला तर त्याला दोन लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते, त्याचबरोबर अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबाच्या सदस्यांना त्या विम्याची रक्कम ही अदा करण्यात येते त्यामुळे ही योजना निश्चित स्वरूपाची  मानली जाते.
  • विमाधारक व कुटुंब सदस्य वारसा हक्क: या योजनेअंतर्गत विमाधारकाचा काही कारणास्तव मृत्यू झाल्यानंतर कुटुंबातील विमा भरताना दिलेल्या सदस्याच्या नावे या विम्याची आर्थिक मदत देण्यात येते.
  • सुलभ नोंदणी प्रक्रिया: शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांनी प्रथमतः नोंदणी करणे आवश्यक आहे व नोंदणी ही अत्यंत सुलभ पद्धतीची आहे,त्यामुळे ही नोंदणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची शुल्क आकारले जात नाही. 2014 पासून कमीत कमी रुपयांमध्ये नोंदणी केली जात आहे, त्यामुळे ही नोंदणी शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आहे काही भागांमध्ये नोंदणी करण्यासाठी शुल्क आकारले जात नाहीत.

  • भरपाईची रक्कम: या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा मृत्यू किंवा तो कायमस्वरूपी अपंग झाल्यास विमाधारकाला एक रकमी दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात येते बऱ्याच वेळा शेतकऱ्याचा अपघात झाला असता काही व कारणास्तव अपंगत्व आले असेल तर अपंगाचे प्रमाण व विम्याची रक्कम ही त्या त्या अपंगाच्या प्रमाणावर देण्यात येते.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024 : फायदे

gopinath munde shetkari apghat vima yojana या योजनेअंतर्गत खालील प्रकारचे फायदे स्पष्ट करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात.

  • शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण आणि जीवन संरक्षण: या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघात झाला असता, शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत मिळते आणि या अपघातामध्ये जर शेतकऱ्याला अपंगत्व आले तर हे रक्कम शेतकऱ्याला अदा करण्यात येते, या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्याची व कुटुंबाची आर्थिक स्थिरता कायम राहण्यास मदत होते.
  • आर्थिक आधार: या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आले असल्यास त्याच्या कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणात संकट येऊ शकते त्यामुळे या योजनेअंतर्गत त्यांना व त्याच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळतो.
  • आत्मनिर्भर बनवणे: या योजनेद्वारे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या जीवनाचा विचार करते, त्याच बरोबर त्यांना या विम्याच्या अंतर्गत आर्थिक सुरक्षा प्रदान करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करते. या सर्व बाबीमुळे शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनण्यासाठी वाव मिळतो.

  • आत्महत्यांचे प्रमाण कमी  करणे: महाराष्ट्र सरकारने ही योजना अमलात आणताना शेतकरी आत्महत्या करण्याचे कारण देखील समजून घेतले आहे म्हणजेच की अशा नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या हातबल होतो व त्याला आत्महत्या करणे  हा एकमेव पर्याय उरतो त्यामुळे राज्य सरकारने ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेमुळे आत्महत्याचे प्रमाण कमी होणार आहे.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024 : लाभाचे स्वरूप

farmer vima maharashtra या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला खालील टप्प्यामध्ये विम्याच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्यात येते ते आपण पाहूयात.

अपघातलाभ(रक्कम)
अपघाती मृत्यू 2 लाख रु.
अपघातामुळे डोळे, हात किंवा पाय निकामी2 लाख रु.
अपघातामुळे एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी1 लाख रु.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024 : कागदपत्रे

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे या योजनेअंतर्गत  मयत किंवा अपघात ग्रस्त व्यक्तीला लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांनी खालील प्रकारची कागदपत्रे देणे आवश्यक आहे. (Gopinath Munde Apghat vima Yojana documents)

  • शेतीचा सातबारा
  • मृत्यूचा दाखला
  • वारस नोंद.
  • वारसदाराचे ओळखपत्र (आधार कार्ड/पॅनकार्ड /बँक पासबुक/ निवडणूक ओळखपत्र
  • मयत किंवा अपघातग्रस्त व्यक्तीचा वयाचा दाखला :- जन्म दाखला /शाळा सोडल्याचा दाखला /शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र /ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र /आधार कार्ड /पॅन कार्ड /वाहन चालविण्याचा परवाना /पारपत्र /निवडणूक ओळखपत्र या पैकी कोणतेही एक कागदपत्र
  • प्रथम माहिती अहवाल,पंचनामा,पोलिस पाटील माहिती अहवाल

Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024 : अर्ज प्रक्रिया

Gopinath munde apghat vima yojana form या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला लाभ घ्यावयाचा असल्यास खालील प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल ही प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे.

  • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह विमा योजना 2024 या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांनी जवळच्या जिल्हा कृषी कार्यालयात जाऊन तेथे या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरावयाची आहे.
  • आता विचारलेली माहिती भरल्यानंतर काही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत ती सर्व कागदपत्रे तुम्ही जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर तो अर्ज तुम्हाला परत एकदा तपासून घ्यायचा आहे. 
  • सर्व माहिती अचूक असल्यास तो अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्याकडे द्यावयाचा आहे

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2024 अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल.

Gopinath munde shetkari apghat vima yojana form pdf परिपत्र डाऊनलोड करा

सरकारी योजनाक्लिक करा
केंद्र शासन योजनाक्लिक करा
शासन निर्णयक्लिक करा
टेलाग्रामला जॉइनक्लिक करा

Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2024 : FAQs

1.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना काय आहे?

उत्तर:- महाराष्ट्र सरकारने सुरू करण्यात आलेली ही एक शेतकऱ्यासाठी कल्याणकारी योजना आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्याला व त्याच्या कुटुंबास विम्याच्या अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.

2.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2024 मुख्य उद्देश काय आहे?

उत्तर: या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा या अपघातामध्ये अपंगत्व आल्यास त्याला आर्थिक संरक्षण देण्यासाठी व मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते त्यामुळे त्याची किंवा त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिरता कायम राहते.

3.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2024 कोण सहभागी होऊ शकते?

उत्तर: महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी वर्ग व त्यांच्या कुटुंबातील सदस्य या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.

4.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2024 किती विमा रक्कम मिळते?

उत्तर:

अंशतः अपंगत्वाच्या: 1 लाख.

अपघाती मृत्यू: २ लाख.

कायमस्वरूपी अपंगत्वाच्या: २ लाख.

5.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2024 नोंदणी कशी करावी?

उत्तर: शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी जवळच्या जिल्हा कृषी कार्यालयात जाऊन नोंदणी करावी लागते.

हे ही नक्की वाचा..👇👇👇👇

Shaikshanik Loan Yojana 2024येथे क्लिक करा
PM Internship Scheme 2024 In Marathiयेथे क्लिक करा
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024येथे क्लिक करा
Smart Meter Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024येथे क्लिक करा
Saur Kumpan Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा
Magel Tyala Solar Pump Yojana 2024येथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment