प्रस्तावना:-
PM Aasha Yojana 2024 In Marathi | PM Aasha Yojana,भारत देशा हा कृषी प्रधान देश असल्यामुळे आपल्या भारत देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते व शेती हा मुख्यव्यवसाय मनाला जातो. केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर इतर नागरिकांसाठी वेळोवेळी नवनवीन योजना राबवत असते. अशाच आपण एका नवीन योजनेविषयी आज माहिती घेणार आहोत.
2024 च्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये “पीएम आशा योजना 2024” या योजनेची घोषणा करण्यात आली. ही योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती, पण त्यातील काही त्रुटी सुधारून नव्याने 2024 रोजी या योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य किंमत मिळवून देणे व त्याच्या उत्पन्नामध्ये स्थिरता निर्माण करणे, हे होय तर चला मित्रांनो या लेखाद्वारे आज आपण या योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचणे अनिवार्य आहे.
PM Aasha Yojana 2024 In Marathi : सविस्तर माहिती
पंतप्रधान आशा योजना (PM-AASHA) म्हणजेच (प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान) होय ,ही एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांने पिकवलेल्या मालाला योग्य हमीभाव देणे. थोडक्यात सांगायचे झाल्यास “हमीमुल्याची उपलब्धता” असे म्हणता येईल. ही योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती पण, त्या योजनेमध्ये बऱ्याच त्रुटी होत्या त्या त्रुटी सुधारून 2024 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्याने या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत सरकारने शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या किमान समर्थन मूल्यावर (MSP) विक्रीची हमी दिली जाते, त्यामुळे शेतकऱ्याचा माल हा हमीभावाने बाजारपेठेमध्ये खरेदी केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत असेही स्पष्ट करण्यात आले आहे की ज्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठेमध्ये योग्य किंमत मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची देखील स्पष्ट करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 35 हजार कोटी रुपयांचे बजेट देखील जाहीर करण्यात आलेले आहे.
PM Aasha Yojana 2024 Information In Marathi या योजनेचा मुख्य उद्देश स्पष्ट करावयाचा झाल्यास शेतकऱ्याला बाजारपेठेमध्ये योग्य दर मिळवून देणे व शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा होय.या योजनेमुळे आपल्या भारत देशातील कृषी क्षेत्रामध्ये आर्थिक स्थिरता कायम राखण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जाणार आहे.
PM Aasha Yojana 2024 In Marathi : मुद्दे
पीएम आशा योजना 2024 या योजनेअंतर्गत खालील काही मुद्दे स्पष्ट करण्यात येईल ते आपण पाहूयात.
योजना | प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजना (प्रधानमंत्री (पीएम) आशा योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | केंद्र सरकार |
योजना अमलात कधी आणली | सप्टेंबर 2018 मध्ये व सुधारित 2024 मध्ये |
लाभार्थी | भारतातील शेतकरी वर्ग |
कोणत्या विभागामार्फत | कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय |
योजनेचे उद्दिष्ट | शेतकऱ्याचा माल हा हमीभावाने खरेदी करून त्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे |
योजनेसाठीचे बजेट | 2024 मध्ये 35 हजार कोटी रुपये |
PM Aasha Yojana 2024 In Marathi : सुधारणा
PM Aasha Yojana 2024 Componants योजना 2018 साली सुरू करण्यात आलेली होती परंतु त्या योजनेमध्ये काही त्रुटी होत्या त्यामुळे ही योजना तितकीशी प्रभावशाली ठरली नाही. या सर्व योजनेचा सविस्तर अभ्यास करून समितीने 2024 मध्ये सर्व त्रुटी सुधारून नव्याने योजना अमलात आणली आहे. तर चला मित्रांनो 2018 मधील सुधारित योजनेचे काही मुद्दे पाहुयात
1.प्राईस डिफेन्सी पेमेंट स्कीम (Price Deficiency Payment Scheme – PDPS):
सर्वात प्रथम मुद्दा म्हणजे प्राईस डिफेन्सी पेमेंट स्कीम हा होय, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी बाजारपेठेमध्ये माल विकताना जर बाजारातील किमान दर हा किमान समर्थन मूल्यापेक्षा (MSP) कमी असल्यास त्या शेतकऱ्याला तेवढी तफावतीची भरपाई करून देण्यात येते, म्हणजेच थोडक्यात सांगावयाच्या झाल्यास बाजारभाव जर कमी झाला तर शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारची नुकसान सहन करण्याची गरज नाही. या योजनेअंतर्गत तांदूळ, गहू, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद, हरभरा, सोयाबीन, सूर्यफूल, तिळ आणि अन्य काही प्रमुख पिकांचा समावेश आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या 2024 च्या बैठकीमध्ये अतिरिक्त पिकाचा देखील समावेश करण्यात आला आहे अशा विविध पिकावरती सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येते.
2.किमान समर्थन मूल्याची (MSP) वाढ:
प्रधानमंत्री आशा योजना 2024 मधील मुख्य घटक म्हणजे एमएसपी(MSP) होय. याच्या आधारावर शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देण्यात येतो व जर हमीभाव बाजारभावापेक्षा कमी असेल तर भारत सरकारने काही प्रमुख पिकांच्या (कडधान्ये व तेल बिया ) किमान समर्थन मूल्यात वाढ केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल व बाजारपेठेतील अस्थिरता दूर होण्यास मदत होणार आहे
3.शाश्वत खरेदीचा पर्याय (Procurement Mechanism):
पीएम आशा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला आपला माल बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकरी हा त्यामालाविषयी चिंतेत राहणार नाही व त्याला त्याच्या उत्पादनावरती चांगला भाव मिळाल्यामुळे तो संतुष्ट राहील. या योजनेअंतर्गत सरकारने विविध खरेदी करणाऱ्या कंपन्यांना देखील शेतकऱ्याचा माल खरेदी करण्यासाठी आव्हान केले आहे, जसे की नाफेड (NAFED) आणि एफसीआय(FCI). या कंपनीचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याकडून माल खरेदी करून त्यांना हमीभाव देणे. जर समजा हमीभाव हा जर बाजारभाव अपेक्षापेक्षा कमी असेल तर त्यामधील तफावत ही सरकार त्या कंपन्यांना देईन किंवा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करेन. अशी तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. म्हणूनच असे देखील म्हणता येईल की शेतकऱ्याला त्याने उत्पादन केलेला माल हा शाश्वत पद्धतीने विकण्यासाठी एक शाश्वत पर्याय सरकारने उपलब्ध करून दिला आहे.
4.शेतकरी प्रशिक्षण आणि जागरूकता:
पीएम अशा योजना 2024 ही योजना यशस्वी होण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरे व जनजागृती कार्यक्रम देखील राबवण्याचे ठरवले आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांबद्दल आणि योजनेच्या सुविधांबद्दल योग्य माहिती असणे आवश्यक आहे. 2024 मध्ये, सरकारने शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी आणि त्यांना योजना कशी कार्य करते याचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध कार्यक्रम सुरू केले आहेत. यामुळे शेतकरी अधिक साक्षर आणि स्वावलंबी बनतील.
PM Aasha Yojana 2024 In Marathi : फायदे
PM Aasha Yojana Benefits योजनेअंतर्गत खालील काही फायदे स्पष्ट करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात.
- शेतकऱ्यांना शाश्वत हमी भाव: पीएम आशा योजना 2024 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला माल हा बाजारपेठेमध्ये विक्री केला असता तेथील किमान समर्थन मूल्य देण्याची हमी ही केंद्र सरकारची आहे, जर समजा बाजारभावापेक्षा किमान समर्थन मूल्य जर कमी असेल तर शेतकऱ्याच्या खात्यावरती त्या रकमेची तफावत अदा करण्याची तरतूद या योजनेअंतर्गत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शाश्वत हमीभाव मिळण्यास वाव मिळणार आहे
- शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या स्थिरता प्रदान करणे: शेतकरी हा विविध संकटांना तोंड देत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादन केलेल्या मालाला योग्य भाव मिळणे अपेक्षित असते. शेतकऱ्याला बाजारभावातील चढउतारामुळे खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा अस्थिर किंवा बाजारभावात चढ-उतार दिसून येणार नाही व शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या स्थिरता प्रधान करण्याचा निश्चय सरकारचा आहे.
- उत्पादन वाढीस वाव मिळणे:या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक स्थिर बाजार भाव मिळाल्यामुळे शेतकरी हा अति उत्साहाने शेतामध्ये उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे त्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास देखील मदत होणार आहे
- सरकार मार्फत शाश्वत खरेदी: पीएम आशा योजना योजनेअंतर्गत जर शेतकऱ्याला बाजारातून योग्य भाव न मिळाल्यास सरकार हे त्या उत्पादनाची खरेदी करून घेते, त्यामुळे शेतकऱ्याला कसल्याही प्रकारचा तोटा सहन करावा लागत नाही. या योजनेअंतर्गत दुसरा पर्याय असाही निवडण्यात आला आहे तो म्हणजे शेतकऱ्याने जर हमीभावापेक्षा कमी भावाने बाजारपेठेमध्ये माल विकला तर किमान मूल्याच्या तफावतीमध्ये जो फरक असेल तो फरक शेतकऱ्याला देण्यात येतो.
- पीएम अशा योजना प्रशिक्षण व जागरूकता: पीएम आशा योजनेअंतर्गत या योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी व या योजनेअंतर्गत त्यांचा जास्तीत जास्त लाभ कसा करता येईल यासाठी केंद्र सरकार प्रशिक्षण, शिबिरे त्याचबरोबर जागरूकता पर कार्यक्रम राबवत असतात यामध्ये विविध तंत्र त्याचबरोबर यांत्रिकीरण विभाग अशा गोष्टीचे महत्व पटवून देऊन उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ कसे करता येईल हे देखील सांगण्यात येते. हे सर्व करत असताना केंद्र सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याला साक्षर व आत्मनिर्भर बनवणे हा आहे.
PM Aasha Yojana 2024 In Marathi : FAQs
1. पीएम आशा योजना म्हणजे काय?
उत्तर: पीएम आशा योजना ही एक केंद्र शासनाने सुरू करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा पिकवलेला माल हा किमान समर्थन मूल्यावर खरेदी केला जातो आणि जर बाजारभाव हा किमान समर्थन मूल्यापेक्षा कमी असेल प्रधानमंत्री आशा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला तफावतीची भरपाई करून दिली जाते
2. पीएम आशा योजना मध्ये किमान समर्थन मूल्य (MSP) काय असते?
उत्तर: किमान समर्थन मूल्य हे केंद्र सरकारकडून निश्चित केला दर असतो ज्याला आपण हमीभाव देखील म्हणतो त्यामुळे बाजारपेठेमध्ये याच हमीभावाने हा माल व्यापाऱ्यांना खरेदी करावा लागतो. जर बाजार भाव कमी असला तर सरकार शेतकऱ्यांना तफावतीची रक्कम अदा करते.
3. पीएम आशा योजनेचे मुख्य घटक काय आहेत?
उत्तर: प्राईस डिफेन्सी पेमेंट स्कीम(PDPS),किमान समर्थन मूल्याची (MSP) आणि शाश्वत खरेदीचा पर्याय (Procurement Mechanism) तीन घटक महत्त्वाचे आहेत.
4. पीएम आशा योजनेमध्ये कोणकोणती पिके समाविष्ट आहेत?
उत्तर: पीएम आशा योजनेमध्ये तांदूळ, गहू, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद, हरभरा, सोयाबीन, सूर्यफूल, तिळ आणि अन्य काही प्रमुख पिकांचा समावेश आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या 2024 च्या बैठकीमध्ये अतिरिक्त पिकाचा देखील समावेश करण्यात आला आहे
5. पीएम अशा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो?उत्तर: शेतकऱ्याने पिकवलेला माल हा ज्यावेळेस तो बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी घेऊन जातो त्यावेळेस केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमान समर्थन मूल्याच्या भावात हमाल व्यापारणे खरेदी करावा लागतो जर समजा बाजारभावापेक्षा समर्थन किमान मूल्य हे जास्त असल्यास असलेली तफावत ही सरकारकडून शेतकऱ्याला देण्यात येते.
ही ही नक्की पाहा….
Shaikshanik Loan Yojana 2024 | येथे क्लिक करा |
PM Internship Scheme 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Smart Meter Yojana 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Saur Kumpan Yojana 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Leave a comment