Nirdhur Chul Yojana 2024 In Marathi

Nirdhur Chul Yojana 2024 In Marathi
Nirdhur Chul Yojana 2024 In Marathi

प्रस्तावना:-

Nirdhur Chul Yojana 2024 In Marathi| Nirdhur Chul Vatap Yojana,नमस्कार मित्रांनो आज आपण Nirdhur Chul Yojana योजनेविषयी माहिती घेणार आहोत.आपल्याला तर माहित आहे की, केंद्र शासन व राज्य शासन वेळोवेळी नवनवीन योजना अमलात आणत असतात. अशीच एक योजना म्हणजे निर्धूर चुल योजना. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आजही आपल्या  ग्रामीण भागातील बरेच लोक चुलीचा वापर करतात त्यासाठी लागणारे इंधन म्हणजे लाकूड, गवत, शेण यांचा वापर करून स्वयंपाक बनवत असतात. अशा पारंपरिक पद्धतीमुळे वायू प्रदूषण होते व वायू प्रदूषणामुळे अनेक आजार उद्भवतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास धूर आणि कार्बन मोनॉक्साईड सारखे घातक पदार्थ श्वसन नलिकेत गेल्यास अतिशय हानिकारक रोग उद्भवतात, त्यामुळे ही पारंपारिक पद्धत चुकीची मानली जाते. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना अमलात आणली आहे.

तर चला मित्रांनो आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत जसे की, पात्रता, अटी, निकष व योजनेचे फायदे अर्ज कुठे करावा?

Nirdhur Chul Yojana 2024 In Marathi:- सविस्तर माहिती

भारत हा कृषिप्रधान देश मानला जातो, या देशांमध्ये बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून असतात, त्याचबरोबर त्यांना शेतामध्ये इंधनासाठी लाकूड, शेण, गवत इत्यादी सहज रीतीने उपलब्ध होते त्यामुळे खेडेगावांमध्ये पारंपारिक पद्धतीने स्वयंपाक केला जातो. थोडक्यात सांगायचे झाल्यास खेडेगावातील स्वयंपाकाची पद्धत ही खूप पारंपारिक आहे. त्यामुळे आजही लोक त्याच पद्धतीचा वापर करतात परंतु असे करत असताना त्यांच्या शरीराला होणाऱ्या प्रदूषणामुळे खूप हानी देखील पोहोचते. जवळपास खेडेगावातील 90 टक्के लोक हे चुलीवरती आजही स्वयंपाक करताना दिसत आहेत. चुलीवरचा स्वयंपाक करताना धूर व त्या  धुरापासून होणारे प्रदूषण याचे विपरीत परिणाम हे महिलांना व त्यांच्या कुटुंबाला होत असते. आजही शेतामध्ये लाकूड, शेण, गवत हे जरी इंधन स्वस्त स्वरूपात मिळत असले तरी त्याचे परिणाम हे शरीरावर होतात. या सर्व बाबीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने निर्धूर चुल योजना अमलात आणली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना चुलीचे वाटप करून  त्यांच्या शरीराला होणाऱ्या हानीपासून संरक्षण करणे होय. ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक हे इंधनासाठी लाकूड वापरतात व हे लाकूड शेतामधून घरी आणतात असे करत असताना हळूहळू वृक्षतोड होऊन जमीनीचा ऱ्हास होताना दिसत आहे. मागील काही वर्षापासून पर्यावरणातील झालेले अनिश्चित बदल हे देखील वृक्षतोडीचे परिणाम असू शकतात. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना निर्धूर चुलीचे वाटप करून ग्रामीण भागातील नागरिकांचे स्वास्थ्य सुधारावे व वृक्षतोड अशा प्रथेला आळा बसावा यासाठी सरकारने ही योजना अमलात आणली आहे. ही योजना मुख्य करून ग्रामीण  भागातील लोकांसाठी आहे.

Nirdhur Chul Yojana 2024 In Marathi
Nirdhur Chul Yojana 2024 In Marathi

PM Aasha Yojana 2024 In Marathi: मुद्दे

या योजनेअंतर्गत खालील काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात

योजनाNirdhur Chul Yojana 2024 In Marathi (निर्धूर चूल योजना 2024)
योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकार
कोणत्या राज्यातमहाराष्ट्र राज्य
योजनेचे उद्देश काय आहेमहत्त्वाचा उद्देश म्हणजे महिलांचे आरोग्य सुधारणे व वृक्षतोड लागवडीस आळा बसवणे
योजनेचे लाभार्थीआर्थिक दृष्ट्या करून कुटुंबातील व अनुसूचित जाती-जमातीतील लोक
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइटयेथे पहा.

PM Aasha Yojana 2024 In Marathi : महत्व

या योजनेअंतर्गत खालील काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करण्यात आले ते पाहूयात

  • पारंपरिक चुलीचा वापर बंद करणे:- निर्धूर चूल योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील आजही बऱ्याच महिला पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक बनवतात म्हणजेच की चुलीवरती स्वयंपाक बनवतात अशा महिलांना निर्दृत चुलीचे वाटप करून पारंपारिक चुलीचे वापर बंद करण्यास  परावृत्त करणे.
  • महिलांचे आरोग्य सुधारणे:-  ग्रामीण भागातील महिला ह्या पारंपारिक पद्धतीने स्वयंपाक करतात त्यामुळे मुळे त्यांच्या घरामध्ये धूर निर्माण होऊन तो धूर श्वसन नलिकेत जाऊन  त्यांच्या आरोग्य धोक्यात येते त्यामुळे, ही योजना अशा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
  • वृक्षतोडीस  आळा घालणे:- या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार हे निर्धूर चुलीचे वाटप करण्यात आले त्यामुळे वृक्षतोडीस आळा बसणार आहे आणि या चुलीसाठी वापरण्यात येणारे इंधन देखील कमी प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे ही योजना अत्यंत महत्त्वाची  मानली जाते. 

PM Aasha Yojana 2024 In Marathi : वैशिष्ट्ये

Nirdhur Chul Yojana Features या योजनेअंतर्गत खालील काही स्पष्ट करण्यात आले आहे ते आपण पाहूयात.

  • निर्धूर योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सुधारावे व त्यांना चांगले जीवन जगता यावे यासाठी ही योजना आहे.
  • ग्रामीण भागातील बऱ्याचशा महिला चुलीवरती स्वयंपाक करतात, त्यामुळे दूर व त्यापासून निघणारा वायू हा शरीरासाठी घातक असतो व या महिला स्वयंपाक करत असताना त्यांच्या घरातील असणाऱ्या कुटुंबावरही याचा विपरीत परिणाम होतो हा थांबावा यासाठी ही योजना अत्यंत आरोग्यदायी म्हणता येईल.
  • या योजनेमुळे वायू प्रदूषणास आळा बसणार आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल हा बिघडणार नाही. 
  • ही योजना गरीब कुटुंबासाठी व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी असल्यामुळे या निर्धूर चुलीमुळे त्यांना इंधनासाठी लागणारा खर्च हा कमी होणार आहे. 
  • या योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन असल्यामुळे इतर कुठल्याही सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.

PM Aasha Yojana 2024 In Marathi : फायदे

Nirdhur Chul Yojana Benefits या योजनेचे खालील काही फायदे स्पष्ट करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात

  • दूर व प्रदूषण संरक्षण:- निर्धूर चुल योजने चा महत्त्वाचा उद्देश म्हणजे ज्या महिला चुलीवरती स्वयंपाक करतात अशा महिलांना निर्धूर चूलीचा वापर करून त्यांचे धुरापासून व होणाऱ्या प्रदूषणापासून संरक्षण करणे हे होय.
  • घातक आजारापासून संरक्षण:- या योजनेअंतर्गत महिलांना निर्धूर चूल वाटप केले जाते म्हणजेच अशी चूल की जी कसल्याही प्रकारचा धूर निर्माण करत नाही त्यामुळे त्यांना होणारे डोळ्यांचे त्याचबरोबर फुफुसांच्या आजारापासून संरक्षण होणार आहे.
  • पर्यावरण संरक्षण :- या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने निर्धूर चूल वाटप केल्यामुळे चुलीपासून निघणारा कार्बन डाय-ऑक्साइड हा आता निघणार नाही व त्यामुळे वायु प्रदूषण होण्यास आळा बसणार आहे. 
  • वृक्षतोड संरक्षण:- निर्धूर चूल वापरल्यामुळे त्यांना कसल्याही प्रकारचे इंधन वापरण्याची गरज नाही त्यामुळे वृक्षतोड थांबवण्यास मदत होणार आहे.
  • नैसर्गिक समतोल राखणे:- ग्रामीण भागातील महिलांनी वापरात येणाऱ्या चुलीच्या वापरामुळे वातावरणामध्ये वायू प्रदूषण निर्माण होऊन निसर्गाचा समतोल बिघडताना दिसत आहे. सरकारच्या योजनेमुळे आता निसर्गातील समतोल राखण्यास मदत होणार आहे.

PM Aasha Yojana 2024 In Marathi : पात्रता

Nirdhur Chul Yojana Eligibility लाभार्थ्याच्या अंगी खालील पात्रता असणे आवश्यक आहे. 

  1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  2. अर्जदाराला या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थी हा आर्थिक दृष्ट्या मागास किंवा अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.
  3. अर्जदार हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला किंवा अनुसूचित जातीचा असल्याचा जातीचा पुरावा असणे अनिवार्य आहे.
  4. अर्जदार हा ग्रामीण भागातील असणे अनिवार्य आहे त्याचबरोबर अर्जदार हा ग्रामीण भागात राहत असलेला पुरावा त्याने सादर करणे अनिवार्य आहे. 
  5. अर्जदारांनी यापूर्वी निर्दुर चूल योजनेसाठी अर्ज केलेला नसावा किंवा या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  6. या योजनेचा लाभ हा कुटुंबातील एका व्यक्तीला देण्यात येईल.

PM Aasha Yojana 2024 In Marathi : कागदपत्रे

Nirdhur Chul Yojana Documents अर्जदाराने खालील कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे

  • अर्जदाराचे आधार कार्ड 
  • अर्जदाराचे रेशन कार्ड 
  • रहिवासी  प्रमाणपत्र 
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र
  • जातीचा दाखला

PM Aasha Yojana 2024 In Marathi : अर्ज प्रक्रिया

Nirdhur chul yojana 2024 in marathi apply online अर्जदाराने अर्ज करावयाचा असल्यास खालील प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल

  • निर्धूर चूल योजनेचा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला भेट द्यावी लागेल आधिकृत संकेतस्थळ.
  • आता तुम्हाला  क्लीन कुकिंग बुक स्टोर डिस्ट्रीब्यूशन वरती क्लिक करायचे आहे. 
  • आता तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल त्यावरती काही अटी व शर्ती दिली आहेत त्या व्यवस्थित वाचून घेणे अनिवार्य आहे.
  •  हे केल्यानंतर तुम्हाला क्लिक करा असे एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला एक नवीन अर्ज दिसेल त्यामध्ये तुमची वैयक्तिक सर्व माहिती विचारली जाईल ती माहिती व्यवस्थित ने भरणे आवश्यक आहे.
  • माहिती भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे जोडा असा एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या.
  • आता तुम्हाला सबमिट या बटणावरती क्लिक करायचे आहे अशा प्रकारे तुमचा अर्ज सादर होईल.Nirdhur chul yojana 2024 in marathi online registration.
सरकारी योजनाक्लिक करा
केंद्र शासन योजनाक्लिक करा
शासन निर्णयक्लिक करा
टेलाग्रामला जॉइनक्लिक करा

PM Aasha Yojana 2024 In Marathi : FAQs

1. निर्धूर चूल योजना 2024 काय आहे?

निर्धूर चूल योजना ही महाराष्ट्र शासनाने एक सुरू केलेली महिलांसाठी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील ज्या महिला चुलीवरती स्वयंपाक करतात अशा महिलांना धूर  विरहित चुलीचे वाटप करून त्यांचे आरोग्य निरोगी बनवणे  होय.

2. निर्धूर चूल योजनेचा मुख्य उद्देश?

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य हे सुधारावे व वायु प्रदूषण कमी करणे हा आहे.

3. योजनेचे  लाभार्थी कोण आहेत?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक विशेषता म्हणजे, जे लोक आर्थिक दृष्ट्या गरीब त्याचबरोबर अनुसूचित-जाती जमातीतील असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

4. निर्धूर चूल योजनेचे फायदे काय आहेत?

  •  महिलांचे आरोग्य सुधारणे.
  •  पर्यावरणातील वायू प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखणे.
  •  वृक्षतोड थांबवणे.

हे ही नक्की पाहा.

Shaikshanik Loan Yojana 2024येथे क्लिक करा
PM Internship Scheme 2024 In Marathiयेथे क्लिक करा
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024येथे क्लिक करा
Smart Meter Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024येथे क्लिक करा
Saur Kumpan Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा
Magel Tyala Solar Pump Yojana 2024येथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment