प्रस्तावना:-
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 | Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 In Marathi, नमस्कार मित्रांनो, आज आपण आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. आपल्याला तर माहित आहे, की आचार्य जांभेकर हे मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखतात. त्याचबरोबर त्यांनी मराठी भाषेमध्ये पहिले वृत्तपत्र सुरू करून समाजामध्ये चालू असलेल्या घडामोडीची माहिती सर्व जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी वृत्तपत्र सुरू केले होते. केंद्र शासन व महाराष्ट्र शासन वेळोवेळी नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबवित असतो तर याच संकल्पनेतून सरकारने जे लोक पत्रकार म्हणून काम करत होते त्यांना त्यांच्या काळामध्ये या योजनेच्या अंतर्गत
आर्थिक मदत केली जाणार आहे.चला मित्रांनो, आज आपण Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊयात, जसे की योजनेचे महत्त्व, वैशिष्ट्य, फायदे, अर्ज प्रक्रिया त्याचबरोबर मिळणारा लाभ इत्यादिवशी आपण आज माहिती घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा आहे.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:- सविस्तर माहिती
आपल्याला तर माहित आहे की पत्रकारिता ही आपल्या भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो, त्यामुळे पत्रकार लोकांना देखील खूप मोलाचे स्थान आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर पत्रकारिता ही समाजातील एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे व्यवस्था मानली जाते. पत्रकार हे सत्याचा शोध घेऊन सर्व माहिती समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आजच्या काळात पत्रकारिता फक्त माहिती पुरती मर्यादित नसून यामुळे समाजामध्ये चाललेल्या घडामोडी, त्याचबरोबर समाज बदलण्याची शक्ती देखील म्हणता येईल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पत्रकाराची कामगिरी ही समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे व चुकीला वाचा फोडण्याचे काम करते. यामध्ये बऱ्याच वेळा समस्यावर चर्चा घडवण्याचे काम देखील पत्रकार करत असतात.
पत्रकार हा समाजाचा एक आधारस्तंभ म्हणता येईल अशा सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या त्यांच्या कामाबद्दल महाराष्ट्र शासनाने आचार्य दाभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 ची रचना केली आहे.
या योजनेअंतर्गत जे पत्रकार हे सन्मानित होणार आहेत, त्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र त्याचबरोबर स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्याचा माणूस देखील महाराष्ट्र शासनाचा आहे. त्याचबरोबर जे पत्रकार त्यांच्या कामात सत्यशील पारदर्शक त्याचबरोबर गुणवत्ता आणि समाजसुधारणाच्या भावनांनी काम करतात. अशा लोकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ही योजना अमलात आणली आहे.
महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा 11 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही योजना 2018-19 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यावेळेस महाराष्ट्र शासनाचे 15 कोटी रुपये इतकी गुंतवणूक होती आणि 2021-22 मध्ये 10 कोटी रुपये देण्यात आली होती त्यामुळे एकूण 25 कोटी रुपये हे आतापर्यंत जेष्ठ पत्रकार नागरिकांना वाटप करण्यात आले आहे.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:- मुद्दे
योजना | Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024 (आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024) |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र राज्य सरकार |
योजनेची सुरुवात कधी | 2 फेब्रुवारी 2019 |
कोणते राज्य | महाराष्ट्र राज्य |
योजनेचा मुख्य उद्देश काय आहे | महाराष्ट्र राज्यातील पत्रकार त्यांना आर्थिक मदत देणे |
योजनेचे लाभार्थी कोण असतील | महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ पत्रकार |
योजनेच्या माध्यमातून किती लाभ मिळतो | दरमहा 11,000/- रुपये आर्थिक सहाय्य मिळणार |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | येथे पहा |
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:- वैशिष्ट्य
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Features या योजनेचे खालील प्रकारे काही वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यात आले आहेत.
- ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार:- महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे, ज्या पत्रकारांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये चांगले कामगिरी केली आहे. अशा ज्येष्ठ पत्रकारांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करणे व त्यांना दरमहा रोख रक्कम 11 हजार रुपये देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले.
- आर्थिक मदत:- या योजनेअंतर्गत जे पत्रकार हे 60 वर्षांपुढील असतील अशा सर्व जेष्ठ पत्रकारांना दरमहा 11 हजार रुपये देण्यात येणार आहे यामुळे त्यांना आर्थिक मदत होणार आहे.
- राज्यस्तरावरील पुरस्कार:- जेष्ठ पत्रकारांना देण्यात आलेला हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे जेष्ठ नागरिकांचे या पुरस्कारामुळे राज्यामध्ये वेगळीच छाप पडणार आहे.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:- फायदे
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Benifits या योजनेअंतर्गत आपण काही खालील प्रकारे फायदे पाहुयात.
- प्रोत्साहन:- या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना दरमहा 11 हजार रुपये इतकी आर्थिक मदत देखील करत करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर जे तरुण पत्रकार असतील त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
- उत्कृष्ट कामगिरी:- आचार्य जांभेकर पत्रकार योजना 2024 या योजनेअंतर्गत ज्या पत्रकारांनी चांगली कामगिरी केली आहे, अशा पत्रकारांना गुणगौरविण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे जे पत्रकार आजही प्रामाणिकपणे काम करतात अशांना या पुरस्काराने गौरवण्यात येते त्यामुळे प्रामाणिकपणेला महत्व प्रदान करण्यात आले.
- सत्य परिस्थिती:- या योजनेअंतर्गत पत्रकार हे आपल्या राज्यातील वेळोवेळी घडणाऱ्या घटना विषयी सत्य माहिती देत असतात. त्यामुळे समाजामध्ये एक सकारात्मक बदल घडत असतो.
- जागरूकता:- या योजनेच्या माध्यमातून सरकारने लाभ दिल्यामुळे या क्षेत्रामध्ये भाग घेण्यासाठी तरुण पिढी आता जागरूक होणार आहे व सत्य आणि प्रामाणिक यासाठी अधिक लोक काम करण्यासाठी परावृत्त होतील.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:- पात्रता
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Eligibility या योजनेअंतर्गत आपण खालील काही पात्रता पाहुयात.
- अर्ज करणारा हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराचे वय हे अर्ज करण्यापूर्वी साठ वर्षापेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराने कमीत कमी 30 वर्ष वृत्तपत्र किंवा इतर वृत्तपसर माध्यमाच्या माध्यमातून काम केलेले असावी.
- अर्जदार हा एखाद्या गुन्ह्यांमध्ये दोषी असेल तर त्या पत्रकाराला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास पत्रकाराने फक्त पत्रकार म्हणूनच काम केलेले असावे म्हणजेच की, त्याने कुठल्याही खाजगी किंवा सरकारी नोकरीत काम केलेले नसावे.
- अर्जदार हा आयकर भरणारा नसावा.
- या योजनेचा लाभ हा फक्त तो हयात असेपर्यंतच मिळणार आहे
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:- सविस्तर माहिती
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Documents घ्यावयाचा असल्यास पत्रकाराने खालील काही कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- वयाचे प्रमाणपत्र
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- अनुभव असल्याचा पुरावा
- बँक खात्याचा तपशील
- माध्यमांमध्ये काम करत असताना मिळालेल्या वेतनाचा पुरावा
- स्वयंघोषणापत्र
- नमूना अर्ज
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:- सविस्तर माहिती
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana Apply या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अर्ज प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल.
- सर्वात प्रथम आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने ऑफलाइन पद्धतीचा अवलंब करावा. परंतु या योजनेचा अर्ज करावयाचा झाल्यास प्रथमतः हा अर्ज ऑनलाईन डाउनलोड करून घ्यावा लागेल.
- घेतलेला अर्ज हा पूर्णपणे वाचून त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती सविस्तरपणे भरणे अनिवार्य आहे.
- सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतात ती जोडून घ्यावीत.
- संपूर्ण अर्ज परत एकदा तपासून घ्यावा.
- तुमचा बरोबर असल्यास तुम्ही हा अर्ज संबंधित जिल्हा माहिती अधिकारी उपसंचालक विभागीय माहिती या कार्यालय त्याचबरोबर उपसंचालक उत्तम मुंबई यांच्याकडे सादर करावा.
- अशा पद्धतीने तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तुमचा अर्ज सादर करू शकता.
Acharya Jambhekar Patrakar Sanman Yojana 2024:- FAQs
1. आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 योजना काय आहे?
उत्तर: आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेमध्ये पत्रकार लोकांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित केले जाते व त्यांना दरमहा 11 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्यात येते.
2. आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
उत्तर: आचार्य जांभेकर योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे पत्रकारांनी त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल सन्मानित करणे व प्रोत्साहन देण्यात येते त्यामुळे समाजामध्ये पत्रकाराविषयी सकारात्मक भावना निर्माण होईल.
3. आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 या योजनेच्या अंतर्गत कोणते पुरस्कार दिले जातात?
उत्तर: या योजनेअंतर्गत पत्रकारांना रोख रक्कम प्रमाणपत्र त्याचबरोबर स्मृतीचिन्ह देऊन त्यांना दरमहा अकरा हजार रुपये इतके वेतन देखील देण्यात येईल.
4. आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 या योजनेसाठी पात्रता काय आहे?
उत्तर: अर्जदार हा पत्रकार असायला हवा त्याचबरोबर त्याने त्याच्या कार्यकाळामध्ये चांगली कामगिरी केली असावी आणि अर्जदाराचे वय हे साठ वर्षापेक्षा जास्त असायला हवे.
5. आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 अर्ज कसा करावा?
उत्तर: आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024 या योजनेला अर्ज करावयाचा झाल्यास अर्जदाराने प्रथमतः ऑनलाइन पद्धतीने अर्ज डाऊनलोड करून घ्यावा व तो अर्ज सविस्तरपणे वाचून विचारलेली सर्व गणपती जोडून तो संबंधित कार्यालयात जमा करावा.
ही ही नक्की पहा….👇👇👇👇👇👇👇
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Ladka Bhau Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Lek Ladki Yojana | येथे क्लिक करा |
Lakhpati Didi Yojana | येथे क्लिक करा |
Silai Machine Yojana | येथे क्लिक करा |
PM Awas Yojana | येथे क्लिक करा |
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment