प्रस्तावना:-
Shabari Gharkul Scheme 2024 | Shabari Adivasi Gharkul Yojana | Shabari Gharkul Yojana 2024 In Marathi, नमस्कार मित्रांनो चला आज आपण एका नवीन योजनेविषयी माहिती घेणार आहोत ती योजना म्हणजे, शबरी घरकुल योजना 2024, ही योजना महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना आर्थिक साहाय्य देऊन प्रोत्साहित करण्यात येणार आहे. आपल्याला तर माहित आहे की, भारत देश हा कृषिप्रधान देश आहे त्याचबरोबर आपल्या भारत देशाच्या लोकसंख्या मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक येतो. त्यामुळे आपल्या भारत देशामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक लोकांना रोजगार मिळत नाही त्याचबरोबर ते लोक आर्थिक दृष्ट्या गरीब राहतात अशा गरीब लोकांना त्यांची स्वतःची घरे बांधता येत नाही त्यामुळे अशा लोकांचा सरकारने या योजनेमध्ये विचार केला आहे.
आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत म्हणजेच की या योजनेची पात्रता, अटी, निकष त्याचबरोबर अर्ज कसा करावा? या सर्व गोष्टींचा आपण यामध्ये समावेश केला आहे यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Shabari Gharkul Scheme 2024:- सविस्तर माहिती
महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार वेळोवेळी नवनवीन योजना अमलात आणत असतात, त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी आणि इतर बऱ्याच घटकांसाठी सरकार हे सदैव तत्पर असते. आज शबरी घरकुल योजना 2024 ही योजना अंमलात आणण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आदिवासी लोक राहतात. या लोकांचा सर्वांगीण विकास त्याचबरोबर शैक्षणिक विकास आजही झालेला दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आदिवासी लोक हे जंगलामध्ये राहतात, त्याचबरोबर खेडेगाव मध्ये राहतात परंतु त्यांना आपली उपजीविका भागवण्यासाठी व विविध सुख सुविधा भागवण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसतो, त्यामुळे अशा लोकांचा विकास हा खुंटला जातो.महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आदिवासी त्याचबरोबर इतर अनुसूचित जाती व जमातीतील लोक हे वास्तव्य करत असतात अशा लोकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.
महाराष्ट्र सरकारने गेल्या काही वर्षापासून आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबासाठी विविध योजना राबवल्या आहेत त्याचबरोबर त्यांचा आर्थिक विकास करण्यामध्ये यश आले आहे.आदिवासी समाजातील लोक हे आजही झोपडीमध्ये राहतात त्याचबरोबर, त्यांना ऊन, वारा, पाऊस अशा बऱ्याच समस्याना तोंड द्यावे लागते. त्यामुळे यांना सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे घरांची आहे ही बाब लक्षात आल्यानंतर सरकारने घरकुल शबरी योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ हा अनुसूचित जाती-जमाती त्याचबरोबर आदिवासी लोकांना होणार आहे.घरकुल शबरी योजनेअंतर्गत आदिवासी लोकांना स्वतःचे पक्के घर देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला 269 चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घर उपलब्ध करून देण्यात येणारआहे. आदिवासी लोक हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात त्यामुळे त्यांचा विकास करणे हे शासनापुढे एक महत्त्वाचे धोरण आहे या योजनेअंतर्गत या लोकांचे नक्कीच कल्याण होणार आहे.
Shabari Gharkul Scheme 2024:- मुद्दे
या योजनेअंतर्गत खालील काही मुद्दे स्पष्ट करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात.
योजना | शबरी घरकुल योजना 2024 (Shabari Gharkul Scheme 2024) |
कोणत्या विभागामार्फत | आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र |
कोणते राज्य | महाराष्ट्र राज्य |
योजनेचा मुख्य उद्देश | शबरी घरकुल योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना आर्थिक मदत देऊन त्यांना पक्के घरे बांधण्यास परावृत्त |
लाभार्थी कोण असतील | महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि वंचित असणारे नागरिक |
सुरुवात वर्ष | 2024 |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन अर्ज पद्धत |
Shabari Gharkul Scheme 2024:- उद्देश
Shabari Gharkul Yojana Purpose या योजनेअंतर्गत आपण खालील उद्देश पाहणार आहोत.
- शाश्वत निवारा: शबरी घरकुल योजना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना राहण्यासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांना पक्के घरे बांधून देण्यात येणार आहेत.
- आर्थिक साह्य: या योजनेअंतर्गत आदिवासी कुटुंबातील कुटुंबांना हे 269 चौरस मीटर इतक्या जागेमध्ये बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार 1,50,000 रुपये इतके आर्थिक साह्य करते.
- आत्मनिर्भर बनवणे: या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना पक्के घरे मिळाल्यामुळे ते स्वावलंबी व आत्मनिर्भर होण्यास मदत होईल.
- अर्ज प्रक्रिया सुलभ: शबरी घरकुल योजनेची अर्ज प्रक्रिया ही अतिशय सुलभ केले आहे कारण अशा दुर्मिळ भागातील लोकांना जास्तीत जास्त अर्ज करता यावा व अर्ज करताना त्यांना कुठलीही आडून अडचणूक अडचणी येऊ नये हा मुख्य उद्देश आहे.
- वेळोवेळी मार्गदर्शन: या योजनेअंतर्गत अर्जदाराला अर्ज कसा करायचा त्याचबरोबर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या सर्व बाबींची माहिती सांगण्यासाठी जिल्हास्तरावर विविध कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
Shabari Gharkul Scheme 2024:- लाभाचे स्वरूप
Shabari Aawas Yojana या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला लाभ मिळाल्यानंतर किती रक्कम मिळते या सर्व बाबींचा विचार आपण करणार आहोत.
ग्रामीण क्षेत्र | 1,32,000 |
नक्षलवादी व डोंगराळ भाग | 1,42,000 |
नगर परिषद क्षेत्र | 1,50,000 |
नगरपालिका क्षेत्र | 2,00,000 |
Shabari Gharkul Scheme 2024:- वैशिष्ट्य
Shabari Gharkul Yojana Features या योजनेचे खालील काही वैशिष्ट्य स्पष्ट करण्यात आले आहेत ते आपण पाहुयात.
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण त्याचबरोबर अतिदुर्गम भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब व आदिवासी कुटुंबासाठी महाराष्ट्र शासनाने शबरी घरकुल योजना सुरू केली आहे.
- या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाचा आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे.
- ग्रामीण भागातील जे कुटुंब आर्थिक दृष्ट्या गरीब असतील त्याचबरोबर ज्या कुटुंबांना घरे बांधता येत नाही अशा कुटुंबांना आर्थिक सहाय्यक करून त्यांना पक्के घरे बांधण्यासाठी परावृत केले जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत जे कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील अशा कुटुंबांना 1.50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे
- शबरी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्याची निवड ही प्राधान्य क्रमाने करण्यात येणार आहे त्यामुळे यांची निवड ही अचूक व योग्य ठरणार आहे.
- या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले आहे त्याचबरोबर त्यांनी स्वतःचे पक्के घरी बांधले आहेत अशा कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपये इतके अनुदान देखील जाहीर करण्यात आले आहे.
Shabari Gharkul Scheme 2024:- पात्रता
Shabari Gharkul Yojana Eligibility या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे खालील पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराने या अगोदर कुठल्याही घरकुल योजनेसाठी पात्र नसावी.
- अर्जदार हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला त्याचबरोबर अनुसूचित जाती व जमातीतील असणे अनिवार्य आहे.
- अर्दाराकडे स्वतःचे पक्के घर नसावे.
- अर्जदार हा कुठल्याही खाजगी किंवा सरकारी त्याचबरोबर स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
Shabari Gharkul Scheme 2024:- कागदपत्रे
Shabari Gharkul Yojana Documents या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रेशन कार्ड ‘
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबईल नंबर
- ई-मेल आयडी
- उत्पन्नाचा दाखला
- वयाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र
- ७/१२ उतारा
- ८ अ दाखला
- ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र
- बँक खात्याचा तपशील
Shabari Gharkul Scheme 2024:- अर्ज प्रक्रिया
Shabari Gharkul Yojana Application Process या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.
- प्रथमतः ही प्रक्रिया ऑफलाईन आहे त्यामुळे अर्जदाराने अर्ज डाऊनलोड करून घ्यावा
- घेतलेला अर्ज सविस्तरपणे वाचून योग्य ती माहिती भरून घ्यावी.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे जोडा असे सांगण्यात येईल.
- कागदपत्र जोडल्यानंतर भरलेली संपूर्ण माहिती पुन्हा एकदा तपासून पहा.
- सर्व माहिती योग्य असल्यास तो अर्जग्रामपंचायत कार्यालय किंवा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जमा करावा.
- अशा पद्धतीने तुमची अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
शबरी घरकुल योजना 2024 अर्ज डाऊनलोड करा. येथे पहा.
शबरी घरकुल योजना 2024 जीआर जीआर पाहण्यासाठी. येथे क्लिक करा.
Shabari Gharkul Scheme 2024:- FAQs
1. शबरी घरकुल योजना 2024 काय आहे?
शबरी घरकुल योजना 2024 ही योजना महाराष्ट्र करणे सुरू करण्यात आलेली अत्यंत कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब असणारे कुटुंब, त्याचबरोबर आदिवासी कुटुंब आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले कुटुंब अशा कुटुंबांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना पक्के घरे बांधण्यास मदत करणे हा आहे.
2. शबरी घरकुल योजना या योजनेचा उद्देश काय आहे?
शबरी घरकुल योजना 2024 चा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी समाजातील लोकांना आर्थिक दृष्ट्या मदत करून त्यांना पक्के घरे बांधून देणे हा आहे.
3. शबरी घरकुल योजनेला कोण अर्ज करू शकतो?
या योजनेसाठी अर्ज करावाच झाल्यास हरदर हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला किंवा अनुसूचित जाती व जमातीतील असणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?
या योजनेसाठी अर्ज करावयाचा झाल्यास अर्जदारांनी अर्ज हा डाऊनलोड करून घ्यावा व तो अर्ज व्यवस्थितपणे भरून जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा आदिवासी विकास कार्यालयात जाऊन हा अर्ज सादर करावा.
5. अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रेशन कार्ड ‘
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबईल नंबर
- ई-मेल आयडी
- उत्पन्नाचा दाखला
- वयाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र
- ७/१२ उतारा
- ८ अ दाखला
- ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र
- बँक खात्याचा तपशील
हे ही नक्की वाचा….👇👇👇👇👇👇
Shaikshanik Loan Yojana 2024 | येथे क्लिक करा |
PM Internship Scheme 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Smart Meter Yojana 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Saur Kumpan Yojana 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Leave a comment