Atal Bhujal Yojana In Marathi

Atal Bhujal Yojana In Marathi
Atal Bhujal Yojana In Marathi


Atal Bhujal Yojana In Marathi 2024 भारत देश हा जरी प्रगतशील राष्ट्र असला तरी आजही आपल्या भारत देशामध्ये 60% लोक हे शेतीवर पूर्णपणे निर्भर आहेत. त्याचप्रमाणे शेती हा आपल्या देशाचा कणा मानला जातो, त्यामुळे आपल्या देशातील आर्थिक ध्येय हे पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. शेती ही आजही निसर्गावरच अवलंबून आहे, त्यामुळे हल्लीच्या झालेल्या निसर्गातील बदलामुळे शेती करणे खूप कसरतीचे झाले आहे. शेतकरी वर्ग हा पूर्णपणे या शेतीवर अवलंबून असल्यामुळे त्याला मिळणारे उत्पन्न हे शाश्वत नाही, या सर्व बाबींचा विचार करता असे लक्षात आले, की शेती ही पूर्णपणे निसर्गावर आणि पाण्यावरच अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या अतिवापरामुळे किंवा देशातील वाढत्या लोकसंख्या मुळे वातावरणावर विपरीत परिणाम होत आहे व याच कारणामुळे निसर्गाचा समतोल बिघडण्यास मदत होत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता, केंद्र शासनाने भविष्यात आणखीन मोठे संकट येऊ नये म्हणून, नवनवीन योजना राबवत आहे. आज आपण अशाच एका नवीन योजनेविषयी माहिती घेणार आहोत. तर आपण हा लेख शेवटपर्यंत वाचणे महत्त्वाचे आहे.


निसर्गामध्ये वाढते बदलामुळे शेतीवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत आहे, ज्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गातील वाढते प्रदूषण व निसर्गातील होणारा व अनैसर्गिक बदल जसे की जलप्रदूषण, वायू प्रदूषण यांच्या माध्यमातून अनियमित बदल दिसून येत आहेत. या सर्व बाबीमुळे अतिवृष्टी किंवा पाणीटंचाई अशा परिस्थिती निर्माण होत आहेत.(Atal Bhujal Yojana In Marathi)

सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे निसर्गातील अनियमित समतोलामुळे भूजल पातळी ही हळूहळू कमी होत असल्यामुळे राज्यात किंवा देशातील बऱ्याच राज्यांमध्ये भूजल पातळी संरक्षण करणे, हे खूप मोठे सरकारकडे मोठे आव्हान आहे आणि अशाच आव्हानाला सामोर जाण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना राबविण्यात आली आहे, ज्या योजनेला “अटल भूजल योजना” असे नाव देण्यात आले आहे.


निसर्गातील अनिमितीमुळे पाण्याची पातळी ही हळूहळू कमी होत असल्यामुळे केंद्र शासनाने अटल भूजल योजना ही राबवण्यात आली आहे. या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे आणि भूजल संरक्षित करणे हे होय.

अटल भूजल योजनेसाठी केंद्र सरकारने 6000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे ज्यामध्ये 3000 कोटी रुपये हे केंद्र शासनाकडून मिळणार आहेत त्याबरोबर उर्वरित 3000 कोटी हे जागतिक बँकाकडून कर्ज स्वरूपात घेण्यात येणार आहे. असे एकूण 6000 कोटी या योजनेसाठी देण्यात येणार आहेत. 3000 हजार कोटी हे कर्ज स्वरूपात घेण्यात येणे येत असल्यामुळे केंद्र सरकारवर अतिरिक्त भार पडणार आहे.

अटल भूजल योजना ही देशांमध्ये सात राज्यात राबवण्याचा उद्देश केंद्र सरकारचा आहे. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये भूजलपातळीचा विचार करता आणि सर्वेक्षणावरून काही निकष काढण्यात आले, ज्यामध्ये सात राज्य हे या योजनेअंतर्गत घेण्यात येतील या सर्वेक्षणामध्ये असे लक्षात आले की सात राज्यांमध्ये भूजल पातळी ही कमी प्रमाणात आहे व विविध राज्यातील विशिष्ट गावामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई प्रश्न हा तीव्र भासवत आहे.

या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विविध कार्यक्रमांतर्गत माहिती व मार्गदर्शन देण्यात येणार आहे ज्यामध्ये भूजल साठ्याचे संपूर्ण संकल्पना स्पष्ट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भूजल साठ्याची वैशिष्ट्य फायदे, हेही स्पष्ट करण्यात येणार आहेत. हे सर्व करत असताना केंद्र सरकारने विविध उपक्रम आयोजित केले आहेत. जसे की शेतकऱ्यांना प्रोत्साहन साठी अनुदान देणे, त्याचबरोबर त्यांना भूजल जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर 2019 ला ही योजना सुरू करण्यात आली ही योजना सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त या योजनेची घोषणा करण्यात आली आणि या योजनेला अटल भूजल योजना असे नाव देण्यात आले. सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे असा की जमिनीतील भूजल पातळी वाढवणे व शास्वत जलस्त्रोतांचा निर्माती करणे हा होय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संकल्पनेमधून शास्वत जलस्त्रोत निर्माण करणे आणि शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट कसे होईल त्याचबरोबर पाणीटंचाईग्रस्त भागांना कसे पाणी शाश्वत करता येईल या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. ही योजना राबवत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या सानिध्यामध्ये यशस्वी करण्यात येणार असून यामध्ये ग्रामपंचायत शेतकरी त्याचबरोबर स्थानिक सामुदाय यांचा महत्त्वाचा वाटा आहे.


अटल भूजल योजनेविषयी खालील काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

योजनेचे नावअटल भूजल योजना
कोणी सुरू केलीनरेंद्र मोदी
कधी सुरू केली30 डिसेंबर 2019
किती राज्ये समाविष्ट7 राज्ये

अटल भूजल योजना ही केंद्र सरकारने ठराविक राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे ज्यामध्ये खालील काही राज्यांचा समावेश करण्यात आला आहे ते आपण पाहूयात.

राज्यजिल्हेग्रामपंचायत 
गुजरात06 1873
हरियाण141656
कर्नाटक141199
मध्य प्रदेश06670
महाराष्ट्र131333
राजस्थान171139
उत्तर प्रदेश10550
एकूण 808220


Atal Bhujal Yojana Maharashtra योजनेअंतर्गत खालील काही वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात. 

1.अटल भूजल योजना ही एक भूजल पातळी वाढवण्यासाठी राबवण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत भूजलाची पातळी वाढवणे त्याचबरोबर पाण्याचे संरक्षण करणे. 

2. निसर्गातून मिळणाऱ्या स्तोत्रांमधून भूजलाचे पुनर्भरण करून शाश्वत पाणी वापरास उपलब्ध करून देणे. 

3. ही योजना विशेषतः जिथे भूजलाचे पातळी खालावलेली आहे अशा भागात राबविण्यात येणार असल्यामुळे तेथील नागरिकांना पाणीटंचाईचा प्रश्न हा मिटणार आहे.

4. अटल भूजल योजनेमध्ये ग्रामपंचायत शेतकरी आणि विविध प्रकारच्या स्थानिक समुदायांचा सहभाग घेतल्यामुळे ही योजना जास्त प्रभावशाली बनणार आहे. 

5. या योजनेमध्ये भूजल पुनर्भरणासाठी विविध उपाय योजना आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ही योजना एक प्रभावशाली योजना ठरणार आहे. 

6. ही योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, शेतकरी आणि स्थानिक समुदायांना सहभागी केल्यानंतर त्यांना प्रोत्सानावर ठराविक प्रकारचे अनुदान देण्यात येथे. 

7. अटल भूजल योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या समन्वयाने होत असल्यामुळे वित्तीय भांडवल देण्यास बँकाचाही पुढाकार आहे त्यामुळे पुरेशा निधी उपलब्ध होणार आहे. 

8. ग्रामपंचायतला जलसंवर्धनासाठी लागणारे सर्व साधने त्याचबरोबर उपकरणे पुरवली जाणार आहेत, त्यामुळे ही योजना यशस्वी होण्यास मदत होणार आहे. 

9. अटल भूजल योजना ही ग्रामपंचायत, शेतकरी आणि स्थानिक समुदायांना सशक्त करण्यावर भर देते. 

10. या योजनेची महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जेथे जेथे पाणीटंचाई आहे, अशा ठिकाणी जलस्तोत्रांचे टिकाऊ आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यात येणार आहे. 


1. महत्वाचा फायदा म्हणजे पाणीटंचाईग्रस्त भागांना शाश्वत पाणीपुरवठा करणे हा होय. 

2. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे पाणी हे शाश्वत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे. 

3. ग्रामपंचायत, शेतकरी आणि स्थानिक सामूहिक घटकांना प्रोत्साहन म्हणून अनुदान मिळणार आहे हा एक महत्त्वाचा फायदा आहे. 


1. शेतकरी :- आपला भारत देश हा कृषीप्रधान देशात असल्यामुळे 60% शेतकरी वर्ग हा पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे शेतीसाठी लागणारे पाणी हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकरी हा या योजनेचा महत्त्वाचा घटक मानला जातो. 

2. पाणीटंचाई भागातील नागरिक:- आजही बऱ्याच राज्यांमध्ये पाणीटंचाई प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाणीटंचाई भागातील नागरिक हे लाभार्थी म्हणून निवडलेले आहेत. 

3. ग्रामपंचायत:- गावातील महत्त्वाची प्रशासन यंत्रणा म्हणजे ग्रामपंचायत होय म्हणून ग्रामपंचायत सुद्धा या योजनेचा लाभार्थी म्हणून निवडण्यात आले आहे. 

4. जल व्यवस्थापन संस्था:- पाणीटंचाई भागात विविध प्रकारच्या जल व्यवस्थापन संस्था ह्या कार्यरत आहेत अशा संस्थेला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 

5. स्थानिक सामुदायिक वर्ग:- बऱ्याच राज्यांमध्ये शेतकरी हे सामुदायिक पद्धतीने शेती करतात अशाही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.


अटल भूजल योजना यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार हे एकत्र येऊन काम करत असल्यामुळे ही योजना यशस्वी खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे या योजनेमध्ये बऱ्याच घटक विविध पातळीवर काम करत आहेत जसे की ग्रामपंचायत शेतकरी स्थानिक सामुदाय इत्यादी.

ही योजना यशस्वी करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम त्याचबरोबर योजनेची संकल्पना उद्दिष्टे कार्यशाळा जनजागृती अभियान अशा विविध कार्यपद्धती राबविण्यात आले आहेत ज्यामुळे अटल भूजल योजना ही यशस्वी होण्यास मदत होणार आहे.


अटल भूजल योजना यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने एकत्र येऊन खालील प्रकारे निधीची तरतूद केली आहे.

अ. क्रनिधीचे स्वरूपरु. कोटी
केंद्र सरकार3000 हजार कोटी
2जागतिक बँका3000 हजार कोटी


Atal Bhujal Yojana 2024 Maharashtra ही एक अतिशय महत्त्वाची योजना आहे, या योजनेमध्ये सर्वात मोठा भाग हा जलसंधारण करणे असून वाढत्या निसर्गातील असंतुलनामुळे राज्यात बऱ्याच भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा घटकांना शाश्वत पाणी पुरवठा करणे ही या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. या योजनेमुळे पाणीटंचाईग्रस्त भागातील नागरिकांना शाश्वत पाणी मिळणार आहे त्याचबरोबर तेथील शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळाल्यामुळे त्यांच्या शेतातील उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. (Atal Bhujal Yojana pdf)

अटल भूजल योजना प्रोजेक्ट pdf पाहण्यासाठी :- येथे क्लिक

अटल भूजल योजना GR पाहण्यासाठी :- Click Here


प्रश्न : अटल भूजल योजना काय आहे?

अटल भूजल योजना ही भारत सरकारद्वारे सुरु केलेली एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश भूजल व्यवस्थापन सुधारणे आणि पाण्याच्या पुनर्भरणाला प्रोत्साहन देणे हा आहे. ही योजना विशेषतः पाणी टंचाईग्रस्त भागांमध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी राबवण्यात आलेली योजना आहे.

प्रश्न : अटल भूजल योजना कोणत्या राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे?

अटल भूजल योजना ,ही भारतामध्ये एकूण सध्या 7 राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे ती म्हणजे उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आणि राजस्थान.

प्रश्न : अटल भूजल योजनेचे महत्वाचे उद्दिष्ट काय आहेत?

अटल भूजल योजनेचे मुख्य उद्दिष्ट भूजल पातळी सुधारणे, पाण्याचा शाश्वत पर्याय उपलब्ध करणे त्याचबरोबर जलस्रोतांचे संरक्षण करणे, आणि स्थानिक समुदायाचा जल व्यवस्थापनामध्ये सहभाग वाढवणे हे आहे.

प्रश्न : अटल भूजल योजनेसाठी अर्ज कसा करावा?

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत किंवा स्थानिक जलसंपदा विभागाशी संपर्क साधावा. अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, आणि पात्रता निकष याबद्दल सर्व काही माहिती ही त्या त्या राज्यातील जलसंपदा विभागात मिळेल.

प्रश्न : अटल भूजल योजनेसाठी कोण पात्रता काय आहे?

अटल भूजल योजनेसाठी त्या भागातीलग्रामपंचायत शेतकरी आणि स्थानिक सामूहिक घटक पात्र आहेत जिथे भूजल पातळी कमी आहे आणि जलसंकटाची स्थिती जास्त आहे असा भागसुद्धा पत्र आहे.

प्रश्न : अटल भूजल योजनेत कोणते प्रमुख घटक आहेत?

या योजनेमध्ये प्रमुख घटकांमध्ये भूजल पुनर्भरण, जलसंवर्धन, समुदाय आधारित जल व्यवस्थापन, आणि पर्यावरणीय स्थिरता राखणे यांचा समावेश आहे.

प्रश्न : अटल भूजल योजनेची वित्तीय तरतूद किती करण्यात आली आहे?

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार आणि विश्व बँकेकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध आहे.

प्रश्न : योजनेतून कोणते फायदे मिळू शकतात?

योजनेतून भूजल पातळी सुधारली जाते, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले जाते, पाण्याचा शाश्वत वापर सुनिश्चित केला जातो, आणि पर्यावरणाचे संरक्षण केले जाते.

प्रश्न : योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणते प्रशिक्षण दिले जाते?

शेतकऱ्यांना जल व्यवस्थापन, भूजल पुनर्भरण, आणि पाणी संवर्धनाच्या तंत्रज्ञानाबद्दल प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाने शेतकरी जलसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन करू शकता

सरकारी योजनायेथे क्लिक करा.
केंद्र शासन योजनायेथे क्लिक करा.
शासन निर्णययेथे क्लिक करा.
जॉइन टेलेग्रामयेथे क्लिक करा.

हे ही वाचा…👇👇👇👇👇

Vishwakarma Shram Samman Yojanaयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा
Shravan Bal yojanaयेथे क्लिक करा
Kishori Shakti Yojanaयेथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment