प्रस्तावना :-
Atal pension yojana | Atal pension yojana scheme sbi | APY sbi नमस्कार मित्रांनो, आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे बरेच लोक शेतीवर निर्भरित असतात त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना राबवले आहेत या शेती व्यवसायाबरोबर मजूर वर्ग हा ही एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशातील मजूर वर्गाला सहाय्य करण्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी जून 2015 मध्ये एक योजना सुरू केली आहे त्या योजनेचे नाव Atal Pension Yojana असे आहे.
अटल पेन्शन योजना (Atal pension yojana scheme sbi | apy sbi)एक प्रकारची राष्ट्रीय पेन्शन योजना आहे (National Pension Scheme).ही योजना मुख्यत्वे करून पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण संस्थेद्वारे प्रशासित केली जाते.
तर चला मित्रांनो,आज आपण अटल पेन्शन योजनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये काय त्याचे उद्दिष्ट निकष फायदे पात्रता अर्ज करण्याची पद्धत हे सर्व आपण पाहणार आहोत त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.
Atal Pension Yojana details :- सविस्तर माहिती
अटल पेन्शन योजना ही एक पेन्शन योजना आहे.योजना अमलात आणण्याचे मुख्य कारण म्हणजे जे लोक असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात जसे कारागीर आणि मजूर यांना कसल्याही प्रकारचा पेन्शनचा लाभ घेता येत नाही किंवा ते स्वतः काढू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही योजना लाभदायक आहे.कामगार वर्गातील लोकांना किंवा मजूर लोकांना त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या अवलंबून राहावे लागते त्यामुळे केंद्र सरकारने त्यांची ही समस्या लक्षात घेऊन अटल पेन्शन योजना सुरुवात केली आहे.
जे लोक असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना कसल्याही प्रकारची पेन्शन लागून असते त्यामुळे त्यांना त्यांच्या उतरत्या वयामध्ये कसलाही आधार राहत नाही त्यामुळे या योजनेअंतर्गत लोकांना एक बचतीची सवय लागून ते त्यांच्या उतरत्या वयात बचत केला पैसा वापरू शकतात.
आपल्या भारत देशांमध्ये एकूण कार्यक्षेत्रामध्ये असंघटित कामगार हा 88 % आहे म्हणजेच जवळपास आजच्या जनगणनेनुसार 47.29 करोड लोकसंख्या ही आजही असंघटित क्षेत्रात कार्यरत आहे.
असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना येणाऱ्या त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या वर उपाय म्हणून केंद्र सरकारने ही योजना राबवली आहे म्हणजेच त्यांच्या निवृत्तीनंतर ते या योजनेअंतर्गत केली बचत वापरू शकतात व आपला पुढील जीवनातील प्रवासा सुखकर बनवू शकतात.
ही योजना 2015- 2016 या वर्षाच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आली होती.
Atal Pension Yojana Eligibility :- पात्रता
अटल पेन्शन योजनेअंतर्गत केंद्र शासनाने खालील काही पात्रता ठरवून दिलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे आहेत ते आपण पाहूयात.
- पेन्शन योजना घेणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा.
- 18 ते 40 वर्ष वयोगटातील सर्व नागरिक.
- या योजनेसाठी अर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा कुठल्याही सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभार्थी नसावा.
- अर्ज करणारा व्यक्ती हा संघटित/असंघटित कामगार असावा.
- अर्जदार हा जर संघटित कामगार असेल आणि त्याला पेन्शन लागू असेल तर तो या योजनेस पात्र नाही.
Atal Pension Yojana benefits :- फायदे
Atal pension yojana scheme sbi अंतर्गत खालील प्रकारचे काही फायदे आहेत तर मित्रांनो चला ते आपण पाहूयात.
- सेवानिवृत्तीनंतर सरकारकडून हमीभावाच्या स्वरूपात रक्कम मिळते.
- सेवानिवृत्तीनंतर मिळणारी रक्कम ही सदस्यांनी केलेल्या वर्गणीच्या आधारावर ठरते त्यामुळे सदस्य जितकी जास्त प्रमाणात रक्कम जमा करतात त्या रकमेच्या आधारावर त्यांना रिटर्न मिळतात.
- ज्या सदस्यांनी APY अंतर्गत वर्गणी जमा केले असेल त्यांना आयकर कायदा 1961 व कलम 80 CD (1) अंतर्गत ते कर सवलतीसाठी पात्र आहेत.
- आपल्या देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप सोपे आहे कारण बरे ते स्वयंरोजगार असो किंवा नोकर वर्गात असोत.
- APY अंतर्गत सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याचा जोडीदार किंवा त्याच्या नॉमिनीला लाभ मिळतो.
- या योजनेमध्ये पेन्शन रक्कम ही सबस्क्रिप्शन सबस्क्राईब वरच्या निवडीनुसार अपग्रेड किंवा डाऊन ग्रेड करता येते.
- अटल पेन्शन योजना ही योजना मासिक त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर घेतली जाते.
- APY संघटित किंवा असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे.
Atal pension yojana scheme sbi खाते उघडण्याची प्रक्रिया
- APY खाते उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखेत नोंदणी फॉर्म भरू शकता.
- त्या फॉर्म वरती तुमचा बँक खाते क्रमांक आधार क्रमांक मोबाईल क्रमांक द्यावा लागतो
- खाते उघडण्याच्या वेळी तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून तुमची पहिली रक्कम वजा केली जाईल.
- त्यानंतर तुम्ही ज्या बँकेत खाते उघडले आहे त्या बँकेत तुम्हाला पावती क्रमांक मिळेल.
- फॉर्म वरती वर्गणीचा प्रकार जो तुम्ही निवडला आहे त्या त्याप्रमाणे तुमच्या खात्यातून वर्गणी स्वयं डेबिट केली जाईल.
Atal Pension Yojana :- फॉर्म डाउनलोड
APY योजनेसाठी तुम्हाला फॉर्म हा योजनेची जोडलेल्या बँक शाखेत सहजपणे अप्लाय ऑफलाइन पद्धतीने मिळू शकतो किंवा पेन्शन फंड रेग्युलिटरी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी(PFRDA) यांच्या अधिकृत वेबसाईटवरून(PFRDA वेबसाइटवरून APY अर्ज डाउनलोड करा) APY हा अर्ज विनामूल्य डाऊनलोड केला जाऊ शकतो.
नवीन मिळालेल्या माहितीनुसार अटल पेन्शन योजना फॉर्म विविध बँकेच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहेत ज्यात खाजगी व सर्वजनिक क्षेत्रातील बँकेचा समावेश आहे.
Atal Pension Yojana वर्गणी देण्याची पद्धत आणि देय तारीख
- अटल पेन्शन योजना अंतर्गत तुम्हाला तुमच्या बँकेचे सेविंग अकाउंट चे डिटेल्स त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे जेणेकरून बँक ही प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून ध्येय रक्कम वजा करू शकेल.
- या योजनेअंतर्गत तुम्ही मासिक त्रेमासिक किंवा सहामाही पद्धतीने वर्गणी देऊ शकता त्यासाठी तुम्ही ऑटोडिबिट चा वापर करू शकता.
- ज्यावेळेस तुम्ही अटल पेन्शन योजनेचे खाते काढता त्यावेळेस देयतारीख ही वर्गणीच्या पहिल्या तारखेपासून गृहीत धरली जाते त्याच आधारावर पुढील वर्गणी ते ठरते.चला एक उदाहरण बघुयात समजा तुमची वर्गणी दिली तारीख ही 10 फेब्रुवारी आहे तर तुम्ही पुढील 10 मार्चला वर्गणी देय असाल.
- या योजनेअंतर्गत देय तारखेला तुमच्या सेविंग खात्यावर देय रक्कम शिल्लक असायला हवी.
Atal Pension Yojana योजनेत वर्गणी कशी भरावी?
अटल पेन्शन योजना अंतर्गत तुम्ही तुमच्या बँकेसोबत ऑटो डेबिट सूचना सेट करून तुमची ध्येय रक्कम वजा करू शकता. वर्गणी देण्याचा हा एकमेव मार्ग आहे आणि या ऑटोडिबिट प्रणाली द्वारे तुम्ही तुमची ध्येय रक्कम वजा करण्यासाठी खात्यामध्ये पुरेशी शिल्लक रक्कम ठेवणे अनिवार्य आहे.
या ऑटो डेबिट प्रणाली द्वारे जर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये शिल्लक रक्कम ठेवू शकला नाहीत तर तुम्हाला खालील प्रमाणे दंड आकारला जाईल.
- जर तुम्ही दरमहा रु 100 देय असाल तर दंड रु 1 आकारण्यात येईल.
- दरमहा जर तुमची वर्गणी रुपये 101 ते रुपये 500 यांच्या दरम्यान असेल तर तुम्हाला ध्येय रकमेवर रुपये 2 असा दंड आकारला जाईल.
- जर तुमची दरमहा वर्गणी रुपये 501 ते 1000 यांच्या दरम्यान असेल तर रुपये दंड 5 रुपये आकारला जाईल.
- जर तुमची वर्गणी रुपये 1001 पेक्षा अधिक असल्यास रुपये 10. दंड आकारण्यात येईल.
Atal Pension Yojana :- वर्गणी देण्यात अयशस्वी झाल्यास काय होईल?
अटल पेन्शन योजना अंतर्गत नागरिकांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना राबवली आहे. जर समजा या योजनेअंतर्गत तुम्ही सदस्य स्वीकारले असेल आणि ऑटो डेबिट प्रणालीनुसार तुम्ही नियमितपणे वर्गणी भरण्यास असमर्थ झालात तर पुढील प्रमाणे प्रक्रिया राबवली जाते.
- वर्गणी भरलेल्या तारखेपासून 6 महिने पर्यंत तुम्ही वर्ग न भरल्यास अटल पेन्शन योजना खातील हे ब्लॉक केले जाईल.
- 12 महिन्यापर्यंत वर्गणी न भरल्यास तुमचे APY खाते इनॲक्टिव केले जाईल.
- 24 महिन्यानंतर वर्गणी न भरल्यास तुमचे APY खाते आपोआप बंद होईल,
अटल पेन्शन योजना अंतर्गत देय वर्गणी वेळोवेळी जमा व्हावी यासाठी बँका सदस्यांना मोबाईल अलर्ट पाठवत असतात.
Atal Pension Yojana :- मधून पैसे काढण्याची प्रक्रिया
अटल पेन्शन योजनेअंतर्गत जर सदस्यांना हे खाते बंद करायचे असेल तर ते बंद करू शकत नाही. काही अपवादत्मक परिस्थितीमध्ये या खात्यातून सदस्यत्व काढता येऊ शकते ते म्हणजे जर सदस्य हा गंभीर आजारामध्ये असेल तर सदस्याच्या विनंतीने खाते बंद केले जाऊ शकते. त्यासाठी स्वइच्छेने APY खाते बंद करण्याचा फॉर्म सबमिट करावा लागतो.
सदस्याकडून मिळालेला फॉर्म प्राप्त झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा असलेली रक्कम त्यावरील व्याज यांचा हिशोब केला जातो आणि जमा रक्कम ही तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात एक रकमी जमा केली जाते.
Atal Pension Yojana सदस्यांसाठी कर लाभ
अटल पेन्शन योजनेअंतर्गत आयकर कायदा 1961 च्या अंतर्गत कलम 80C त्यानुसार 1.5 लाख रुपये पात्र आहे.तसेच आयकर कायदा 1961 च्या नवीन कलम 80CCD(1) नुसार APY रुपये 50,000 पर्यंत वाढवता येऊ शकते.
Atal Pension Yojana :- खाते कसे बंद करावे
अटल पेन्शन योजना अंतर्गत तुम्हाला या योजनेमधून बाहेर पडावयाचे असल्यास त्यासाठी केवळ गंभीर आजार किंवा मृत्यू या गोष्टीचा समावेश आहे. जर सदस्याचा मृत्यू झाला तर फॉर्ममध्ये दिलेल्या नोमिनीला जमा रक्कम ही पूर्णपणे दिली जाईल.
Atal Pension Yojana GR पाहण्यासाठी | येथे क्लिक करा. |
Atal Pension Yojana FAQs
प्रश्न :- अटल पेन्शन योजनेत गुंतवणुकीचे काही कर लाभ आहेत का?
होय अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला आयकर कायदा 1961 नुसार कलम 80CCD प्रमाणे सूट मिळते.
प्रश्न :- मी एक स्वयंरोजगार व्यक्ती आहे. मी अटल पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनसाठी पात्र आहे का?
होय ज्या नागरिकांचे वय 18 वर्षे ते चाळीस वर्षे आहे आणि ते भारताचे रहिवासी असेल असतील तर त्यांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येतो.
प्रश्न :- माझे बँक खाते नाही. मला APY साठी बँक खाते हवे आहे का?
होय, APY योजनेसाठी सदस्याचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
प्रश्न :- अटल पेन्शन योजनेचा लाभ कधी सुरु होतो?
सदस्याच्या वयाच्या 60 वर्षा नंतर सुरू होते
हे ही वाचा….👇
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Ladka Bhau Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Lek Ladki Yojana | येथे क्लिक करा |
Lakhpati Didi Yojana | येथे क्लिक करा |
Silai Machine Yojana | येथे क्लिक करा |
PM Awas Yojana | येथे क्लिक करा |
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment