प्रस्तावना :-
Bail pola | Bail pola in marathi 2024 आपल्या संस्कृतीतील बहुतांशी सण हे शेतीशी निगडित आहेत, त्यातीलच एक प्रमुख सण म्हणजे बैलपोळा होय. बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मात्र या सणाचे काही पौराणिक महत्व देखील आहे. विशेषतः विदर्भात लाकडी आणि मातीच्या बैलाची पूजा केली जाते या सणाविषयी सविस्तर माहिती आपण आज इथे घेणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Bail pola :- बैलपोळा सण सविस्तर माहिती
भारत हा कृषिप्रधान देश आहे, याच्यामध्ये 80 टक्के लोक हे शेतीवर निर्भर आहेत व ते आजही गावांमध्ये राहतात. त्यांचे मुख्य काम म्हणजे शेती करणे हे आहे. त्याचबरोबर ते काम करत असताना त्यांच्यासोबत काम करणारे बैल देखील असतात. याच बैलांसाठी समर्पित करण्यात येणारा एक दिवस म्हणजे बैलपोळा हा होय. या दिवशी बैलांची मनोभावी पूजा करण्यात येते व त्यांना गोडधोड नैवेद्य देण्यात येतो. महाराष्ट्रामध्ये या सणाला खूप महत्त्व आहे. बैल पोळा शुभेच्छा मराठी 2024 बैलपोळा सण हा प्रामुख्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटका आणि महाराष्ट्र. आपल्या राज्यात शेतकरी वर्ग हा बैल पोळा मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. त्याचबरोबर मध्य प्रदेश व तेलंगणा भागात देखील पोळा हा सण साजरा करण्यात येतो. तेलंगणामध्ये या सणाला बेंदूर असे देखील नाव देण्यात आले आहे. मद्य आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये प्रामुख्याने हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. तसेच दक्षिण भारतामध्ये सुद्धा ह्या सणाला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. दक्षिण व उत्तर भागामध्ये या सणाला पोंगल आणि गोधन असे म्हटले जाते.
Bail pola :- बैलपोळा सणाविषयी पौराणिक माहिती
पोळा या नावाचे काही रहस्यमय गोष्टी आहेत ते आपण पाहूयात.
विष्णू देवाने धरतीवर येण्यासाठी जो जन्म घेतला होता तो कृष्णाच्या रूपात होता आणि कृष्णाला मारण्यासाठी कंसाने अनेक षडयंत्र रचले होते. त्यामध्ये त्याने विविध राक्षीसांना पाठवले ज्यामध्ये एक राक्षस होता पोलासुर नावाचा, त्या पोलासुराने धरतीवरती खूप तांडव माजवला होता. याचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने एक दिवस निवडला होता तो दिवस म्हणजे श्रावण मास ज्याला आपण श्रावण महिना असे म्हणतो आणि अमावस्याच्या दिवशी श्रीकृष्णांनी पोलासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून त्या दिवशी त्याला पोळा असे म्हटले जाते.
Bail pola :- बैलपोळा संकल्पना
Bail pola 2024 in maharashtra जेव्हा आपली नांगरणी व वाखारवणी करणे हे सर्व कामे चालू असतात व या कामासाठी दोन महिने बैलांना खूप मेहनत घ्यावी लागते त्याचप्रमाणे मृग नक्षत्रामध्ये पेरणी झाल्यानंतर भरपूर पाऊस पडतो. ज्यामध्ये या बैलाने केलेल्या कामाची मेहनतीचे फळ मिळणार असते, त्यामुळे शेतकरी हा या दोन महिन्यात केलेल्या बैलाच्या कामाची परतफेड म्हणून एक दिवस ठरवून त्याला खूप श्रद्धा भावाने पूजा करत असतो. त्याच श्रद्धेला बैलपोळा असे म्हणतात.आता हा बैलपोळा हा श्रावण महिन्यामध्ये पिठोरी अमावस्या दिवशी म्हणजेच श्रीकृष्णाने पोलासुराचा वध केलेल्या दिवशी असतो म्हणून त्याला बैलपोळा असे नाव देण्यात आले.
Bail pola :- बैलपोळा महत्व
बैलपोळा हा दिवस अतिशय श्रद्धावान दिवस मानला जातो कारण शेतकऱ्यांनी दोन महिने करून घेतलेल्या अफाट कष्टाची परतफेड या दिवशी तो करणार असतो, त्यामुळे या सणाला खूप श्रद्धावान दिवस असे मानले जाते.
या दिवशी बैलांचा खूप मान केला जातो त्याला तोऱ्यामोऱ्यात सजवले जाते. शेतकरी हा या दिवशी त्या बैलाला नदीला घेऊन जाऊन तेथे त्याला व्यवस्थित आंघोळ घालतो. त्यानंतर त्याला रंगरंगोटी सजावट म्हणजे जसे की शिंगाणा कलर लावणे, अंगावरती झूली काढणे, त्याचबरोबर पायात घुंगरू बांधणे असे विविध गोष्टींनी सजवण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी हा पूर्णपणे सजावट झाल्यानंतर बैलाला खूप ताटामटात घरी आणतो व घरी आणताना गाजा वाजा, ढोल, ताशे डीजे, डॉल्बी असे विविध उपकरणे वाजवून त्याची जय्यत स्वागत करत असतो.
Bail pola :- बैल पूजा विधि
बैलांना घरी गाजावाजात आल्यानंतर त्यांची पूजा ही खूप मनोभावे केली जाते याची विधी कशी असते ते आपण जाणून घेऊयात.
1.घरातील ज्या सुवासिनी असतात त्या व्यवस्थित साडी चोळी लुगडे वगैरे घालून त्या बैलांची स्वागत करतात.
2.महिलांनी केलेल्या स्वागतनंतर त्याला हळदीकुंकू ओवाळणी अशा सर्व विधी करून घेतात.
3.या विधीनंतर त्या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन त्यांना कृतज्ञ करण्याचा प्रयत्न केला जातो.
4.नैवेद्य खाऊन झाल्यानंतर या बैलांची गावांमध्ये मिरवणूक काढली जाते व आनंदाने सर्व शेतकरी त्यांना थाटामाटात गावामध्ये मिरवत असतात.
5.बैलांना ज्या ज्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले जाते, त्या त्या घरी त्या शेतकरी मालकाला व त्या बैलांना नैवेद्य देण्यात येतो.
अशा पद्धतीने या बैलांची गावांमध्ये खूप थाटामाटा मध्ये पूजा केली जाते. आजच्या परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे बैल नसतात असे लोक हे मातीचे किंवा लाकडाची बैल आणून त्यांची पूजा करत असतात, त्याला सुद्धा तेवढ्याच श्रद्धेने सजवतात आणि तेवढ्याच मनोभावाने त्याची पूजा करतात व त्याला मान देतात.
Bail pola :- बैलपोळा सणाचा उद्देश
बैलपोळा या सणाचे महत्व म्हणजे येणाऱ्या पिढीमध्ये आपल्या बैलांप्रती एक श्रद्धा वाढावी किंवा येणाऱ्या पिढीमध्ये आपल्या बैलाचे महत्व असेच टिकून राहावे यासाठी हा सण वर्षानुवर्ष चालू ठेवण्यात येतो. या सणामुळे वर्षभर कष्ट करणाऱ्या बैलांना एक दिवस खूप मान मिळवून देण्यात येतो त्यामुळे तो हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो.
Bail pola :- बैलपोळा सणाचा कालावधी
श्रावण महिन्यातील अमावस्या दिवशी हा सण साजरा केला जातो. ज्याला आपण पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतो याच दिवशी श्रीकृष्णा ने पोलासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे पोळा आणि बैल यांच्या एकत्रीकरणामुळे त्याला बैल पोळा नाव देण्यात आले आहे.
सरकारी योजना | येथे क्लिक करा. |
केंद्र शासन योजना | येथे क्लिक करा. |
शासन निर्णय | येथे क्लिक करा. |
जॉइन टेलेग्राम | येथे क्लिक करा. |
Bail pola :- FAQs
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात?
बैल पोळ्या दिवशी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो त्याचबरोबर त्यांना ज्वारी गहू हेही खाण्यास दिले जाते.
बैलाच्या अंगावरील कापडाला काय म्हणतात?
बैलाच्या अंगावरील कापडाला विविध भागात विविध अशी नावे आहेत जसे की जुंपणी, झूली इत्यादी.
पोळा हा सण का साजरा केला जातो?
बैल हे वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात त्यामुळे त्याला एक दिवस मानपान देण्याच्या उद्देशाने हा सण साजरा केला जातो.
बैलांना शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात?
शेतकरी आणि बैल हे एकमेकास पूरक असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा मित्र असे म्हटले जाते.
बेंदूर आणि बैल पोळा एकच आहेत का?
बेंदूर आणि बैलपोळा हे एकच आहेत त्यांची नावे विविध भागांमध्ये विविध अशी ठरवून दिले आहेत बेंदूर हे नाव कर्नाटक जिल्ह्यामध्ये आणि तेलंगणामध्ये प्रसिद्ध आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बैलपोळा हे नाव प्रचलित आहे.
हे ही नक्की वाचा…👇👇👇👇
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Shravan Bal yojana | येथे क्लिक करा |
Kishori Shakti Yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment