प्रस्तावना:-
Bandhkam Kamgar Yojana नमस्कार मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून विविध योजना राबवण्यात आलेल्या आहेत. या योजना राबवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, आपल्या देशामधील लोकांना ज्या काही समस्या आहेत त्यांचे निवारण करून त्यांना आर्थिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे.
आपण आज या लेखाद्वारे अशाच एका घटकांचा विचार करणार आहोत. महाराष्ट्र शासनाने राज्यातील कामगारांना (महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ) आर्थिक साह्य मिळावे यासाठी एक नवीन योजना राबवली आहे त्या योजनेला बांधकाम कामगार योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या राज्यातील असणारे अनेक लोक हे बांधकाम करणारे आहेत, हे लोक पूर्णपणे त्यांच्या बांधकाम कामावर अवलंबून असतात, त्यामुळे त्यांचा आर्थिक दृष्ट्या विकास होत नाही याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम कामगार योजनेला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र शासन बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देण्याचे काम करते.
या योजनेअंतर्गत कामगार बांधवांना खूप काही योजनांचा लाभ घेता येतो, तर चला मित्रांनो आज आपण या लेखाद्वारे, पात्रता, अटी, शर्ती, निकष त्याचबरोबर अर्ज कसा करायचा? या योजनेचा मिळणारा फायदा पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024 :- माहिती
महाराष्ट्र शासनाने 18 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा मार्फत एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आले, या पोर्टलच्या (MAHABOCW) द्वारे राज्यातील बांधकाम कामगारांना लाभ देणार आहेत. हे पोर्टल मुख्यत्वाकरून बांधकाम कामगारासाठी विकसित केली आहे. या पोर्टलमध्ये कामगारांचा पूर्ण तपशील असणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कामगारांना अर्ज द्वारे सर्व माहिती पुरवली जाणार आहे व ती मिळालेली माहिती या पोर्टलमध्ये सेव्ह केलेली आहे.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही दोन हजार रुपये पासून ते पाच हजार रुपये इतकी आहे त्याचबरोबर या पोर्टल द्वारे राज्यातील इतर कामगारांना विविध सुविधांचा लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा फायदा हा बांधकाम कामगार ला होणार आहे, कारण बांधकाम कामगार घरापासून दूर राहून ऊन वारा पाऊस अशा परिस्थितीमध्ये तो काम करत असतो, त्याचे उत्पन्नही कमी असते त्यामुळे त्याला घर प्रपंच भागवणे कठीण असते. त्यामुळे अशा लोकांना शासनाकडून आर्थिक साह्य देण्यात येते. बांधकाम करणारा कामगार (Maharashtra Bandhkam Kamgar yojna) हा खूप मोठ्या संकटांना सामोरे जातो, जसं की बांधकाम करतात करत असताना जास्त उंचीवर बांधकाम करणे त्यामुळे अपघात अपघात कोणाची दाट शक्यता असते. आर्थिक परिस्थिती ही कमकुवत असल्याकारणाने ते स्वतःची सेफ्टी साठी कुठल्याही साधनांचा उपयोग करू शकत नाहीत. अशाच बऱ्याच समस्या ह्या बांधकाम कामगार जीवनात येत असतात, या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने ही योजना राबवली आहे यामध्ये विविध योजनांचा समावेश आहे.
Bandhkam Kamgar Yojana Highlights :- मुद्दे
खालील प्रकारे काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत (Maharashtra Bandhkam Kamgar yojna).
अ. क्र. | योजना | Bandhkam Kamgar Yojana |
1 | कोणाच्या अंतर्गत | महाराष्ट्र शासनाकडून |
2 | पोर्टल चे नाव काय आहे | MAHABOCW |
3 | कोणत्या विभागांतर्गत | महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ |
4 | लाभार्थी | महाराष्ट्र बांधकाम कामगार |
5 | उद्देश काय | कामगारांना आर्थिक मदत देणे |
6 | फायदा | 5000 रु व भांडी संच |
7 | राज्य | महाराष्ट्र राज्य |
8 | अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
9 | अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
Bandhkam Kamgar Yojana :- उद्देश
राज्य सरकारकडून बांधकाम कामगारासाठी ही योजना सुरू केली असल्यामुळे या योजनेचे खालील प्रमाणे उद्देश आहेत.
- महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर्फे बांधकाम कामगारांना सुरक्षा व आर्थिक साहाय्य करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.
- या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य केल्यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवणे असा आहे.
- राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचे त्यामुळे त्यांच्या कामाचा दर्जा वाढण्यास मदत होते.
- वेळोवेळी मिळालेल्या या अर्थसहाय्यामुळे त्यांना दररोजच्या अडचणीला सामोरे जाण्याची गरज नाही व आरोग्यात काही समस्या असल्यास ते शासनाद्वारेराबवलेल्या नवनवीन योजनेद्वारे लाभ घेऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या मुलांना शिक्षणासाठी सवलत त्याबरोबर विविध शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येतो त्यामुळे असे आर्थिक दृष्ट्या गरीब असणारे मुलं व मुली यांना लाभ देऊन त्यांना सक्षम बनवणे.
- राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत जर बांधकाम कामगाराचा अपघात झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास त्याचबरोबर अपंगत्व आल्यास त्याला त्या त्या परिस्थितीमध्ये विविध योजना अंतर्गत लाभ देणे.
- बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर्फे ही योजना सुरू करण्यात आली असली तरी या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना नवनवीन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
- बांधकाम कामगारांना बांधकाम कामगारांना वेळोवेळी प्रशिक्षण व कौशल्य विकासासाठी विविध कार्यक्रम राबवणे त्याचबरोबर त्या कार्यक्रमाद्वारे त्यांना प्रशिक्षण आणि कौशल्य विकास साठी वाव मिळवून देणे.
- प्रशिक्षण व कौशल्य विकासामधून बांधकाम कामगारांना त्यांच्या कामातील गुणवत्तेवर अधिक भर देण्यास भाग पाडणे.
- या योजनेअंतर्गत बांधकामक्षेत्राचा विकास आणि सुधारणा करणे.
Bandhkam Kamgar Yojana :- कामाची यादी
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या बांधकाम कामगार योजना (बांधकाम कामगार विभाग) अंतर्गत बांधकाम कामगारांना लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांना खालील प्रकारचे काम करणे आवश्यक आहे.
- इमारती
- रस्ते
- रेल्वे
- ट्रामवे
- एअरफील्ड
- सिंचन
- रेडिओ
- जलाशय
- पाण्याचे तलाव
- बोगदे
- ब्रिज
- कल्व्हर्ट
- पाणी बाहेर काढणे
- दूरदर्शन
- टेलिफोन
- टेलिग्राफ आणि परदेशी संप्रेषण
- धरण कालवे
- तटबंध आणि नेव्हिगेशन कामे
- पूर नियंत्रणाची कामे (स्टॉर्म वॉटर ड्रेनेजच्या कामांसह)
- पिढी
- विजेचे पारेषण आणि वितरण
- पाण्याची कामे (पाणी वितरणाच्या वाहिन्यांसह)
- तेल आणि वायू प्रतिष्ठापन
- वीज ओळी
- वायरलेस
- जलवाहिनी
- लाइन पाईप
- टॉवर्स
- वायरिंग, डिस्ट्रीब्युशन, टेंशनिंग इत्यादींसह इलेक्ट्रिकल काम.
- सौर पॅनेल इत्यादी ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची स्थापना.
- स्वयंपाक करण्यासारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मॉड्यूलर युनिट्सची स्थापना
- सिमेंट काँक्रीट साहित्य तयार करणे आणि बसवणे इ.
- वॉटर कूलिंग टॉवर
- ट्रान्समिशन टॉवर आणि अशी इतर कामे
- दगड कापणे, तोडणे आणि दळणे
- अग्निशामक यंत्रांची स्थापना आणि दुरुस्ती
- वातानुकूलन उपकरणांची स्थापना आणि दुरुस्ती
- स्वयंचलित लिफ्टची स्थापना इ.
- सुरक्षा दरवाजे आणि उपकरणांची स्थापना
- फरशा किंवा फरशा कापून पॉलिश करणे
- पेंट, वार्निश इ. सह सुतारकाम.
- गटर आणि प्लंबिंगचे काम
- लोखंडी किंवा धातूच्या ग्रील्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे आणि स्थापित करणे
Bandhkam Kamgar Yojana :- लाभ
महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी योजना या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना खालील प्रमाणे लाभ देण्यात येणार आहे.
1.शैक्षणिक योजना:- या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या (Imarat Bandhkam Yojana) मुलांना शैक्षणिक योजनेअंतर्गत शिक्षणासाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत.
- जसे की पहिली ते सातवी साठी 2500 रुपये लाभ मिळतो आणि आठवी ते दहावीपर्यंत 5000 रुपये इतका लाभ मिळतो.
- जर बांधकाम कामगारांच्या मुलांना अकरावी व बारावी मध्ये 50% हून अधिक गुण मिळाले तर त्यांना 10,000 रुपये शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मिळतात.
- या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराची पत्नी किंवा त्यांची मुले पदवी शिक्षण करत असतील तर त्यांना प्रत्येक वर्षी शैक्षणिक पुस्तकांसाठी 20,000 रुपये देण्यात येते.
- त्याचबरोबर जर बांधकाम कामगाराचे मुले ही वैद्यकीय शिक्षण घेत असतील तर त्यांना प्रत्येक वर्षी 1,00,000 रुपये एवढा लाभ मिळतो, त्याचबरोबर अभियांत्रिकी शिक्षणासाठी 60,000 रुपये इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते.
- पात्र असलेल्या बांधकाम कामगारांना कामगारांच्या मुलांना डिप्लोमा साठी पहिल्या दोन मुलांसाठी 20,000 रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते.
- जर बांधकाम कामगाराची मुले MSCIT करत असतील तर त्यांना 4500 रुपये शिष्यवृत्ती भेटते.
2.आरोग्य योजना:-
- बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पहिल्या दोन मुलांसाठी जर नॉर्मल प्रसूती झाली असेल तर सरकारकडून 15,000 रुपये मानधन मिळते आणि जर सिजेरिंग असेल तर तिला मानधन म्हणून 20,000 रुपये देण्यात येते.
- जे बांधकाम कामगार गंभीर आजाराने ग्रस्त असतील अशा कामगारांना 1,00,000 रुपये देण्यात येते.
- जर बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास शासनाकडून त्यांच्या कुटुंबांना 5,00,000 रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येते.
- जर बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तर 2,00,000 रुपये देण्यात येते.
- बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी शासनाकडून 10,000 रुपये देण्यात येते.
Bandhkam Kamgar Yojana :- पात्रता
- अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय हे 18 ते 60 च्या दरम्यान असावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तींनी संबंधित बांधकाम कामात 90 दिवस काम केलेले असावे.
- अर्जदाराने कामगार कल्याणकारी मंडळाकडे आपण केलेल्या कामाची नोंद असावी.
Bandhkam Kamgar Yojana :- कागदपत्रे
- आधार कार्ड
- आय प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- वय प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- ओळख प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- 90 दिवस काम केल्याचे पत्र
- पासपोर्ट साईजचा फोटो.
Bandhkam Kamgar Yojana Online Apply :- अर्ज
How to Apply Online Bandhkam Kamgar Yojana 2024
अर्जदाराला अर्ज करावयाचा असल्यास त्याने खालील प्रमाणे प्रक्रिया करावी.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला येथे क्लिक करा भेट द्यावी.
- त्यानंतर तुम्हाला एक होम पेज दिसेल त्यावरती कामगार पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर कामगार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- उघडलेल्या संबंधित पेजवर विचारलेली माहिती व संबंधित पात्रता सर्व गोष्टी व्यवस्थितपणे भरावी.
- भरलेली माहिती बघण्यासाठी तुमची पात्रता यावर क्लिक करा
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म उघडेल.
- त्या फॉर्म वरती विचारलेली सर्व अचूक माहिती भरावयाची आहे.
- भरलेली अचूक माहिती त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा यावर क्लिक करायचे आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
नवीन नोंदणी फॉर्म पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.
Bandhkam Kamgar Yojana FAQs
प्रश्न: बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कोण पात्र आहे ?
उत्तर:या योजनेअंतर्गत जे जे लोक बांधकाम क्षेत्रात काम करतात आणि त्यांनी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केली आहे.
प्रश्न:बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी काय आवश्यक आहे?
उत्तर:बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार आणि कुटुंबीय यांनी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रश्न: योजनेत काय काय लाभ मिळतात?
उत्तर:बांधकाम कामगार योजना अंतर्गत स्वतः बांधकाम कामगाराला त्याचबरोबर त्याच्या कुटुंबांना विविध योजनेचा लाभ मिळतो. जसे की, कामगार आणि कुटुंबियांना वैद्यकीय मदत मिळते.कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते.कामगारांच्या पत्नीला प्रसूतीसाठी आर्थिक मदत मिळते. कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत मिळते.कामगाराचा मृत्यू झाल्यास, कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.
प्रश्न:बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज करू शकता त्याचबरोबर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने ही अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला कामगार आयुक्त कार्यालय किंवा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात जावे लागेल.
प्रश्न: अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?
उत्तर:अधिक माहितीसाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाइट: https://mahabocw.in/mr/ त्याचबरोबर कामगार कल्याणकारी मंडळाचे हेल्पलाइन नंबर: 1800-233-5555
हे ही नक्की वाचा…👇
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Shravan Bal yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment