प्रस्तावना :
Drone Anudan Yojana 2024 In Marathi | Drone Anudan Yojana Apply, नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन योजनेविषयी माहिती घेणार आहोत, ती म्हणजे ड्रोन अनुदान योजना 2024. ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू करण्यात आलेली एक प्रभावशाली योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतीसाठी ड्रोन चा वापर करून पिकांच्या व्यवस्थापनात औषध फवारणीसाठी त्याचबरोबर, पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि जमिनीचा अचूक मोजमाप करण्यासाठी केला जाणार आहे. या दोनच्या वापरामुळे शेती औद्योगिक आणि विविध सरकारी कामांमध्ये विशिष्ट छाप पडणार आहे
चला मित्रांनो या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात म्हणजेच की ड्रोन खरेदीसाठी लागणारे कागदपत्रे, पात्रता, अटी, निकष त्याचबरोबर अर्ज कसा करावा? या सर्व गोष्टींचा या लेखांमध्ये आपण विचार करणार आहोत त्यामुळे, हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Drone Anudan Yojana 2024 In Marathi:- सविस्तर माहिती
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असल्यामुळे आपल्या देशातील बरेच नागरिक हे शेतीवर अवलंबून असतात व ते पारंपारिक पद्धतीने शेती करतात त्यामुळे त्यांना म्हणावे तितके उत्पादन होत नाही, त्यामुळे शेतकरी हा संकटात सापडताना दिसत आहे. या सर्व बाबीवर उपाय नियोजन म्हणून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी 5 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहेत या योजनेअंतर्गत महत्त्वाचा मुद्दा म्हणज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेती ही प्रगतशील होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही एक शेतकऱ्यासाठी महत्त्वाची योजना आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी ड्रोन खरेदीसाठी 50 ते 75 टक्के अनुदान हे महाराष्ट्र शासन देणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेती करत असताना बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते, जसे की फवारणी त्याचबरोबर पाणी खताचे नियोजन हे करत असताना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सर्पदंश. विंचुदश होत असतात, त्याचबरोबर फवारणी करत असताना फवाऱ्यामार्फत उडणारे औषधी त्यांच्या नाका तोंडात गेल्यामुळे त्यांना स्वतःचा कधी कधी जीव ही गमवा लागतो. या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ड्रोन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे. या अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी हा ड्रोन खरेदी करून या सर्व संकटावर मात करू शकेल.
Drone Anudan Yojana 2024 In Marathi:- मुद्दे
PM Kisan Drone Yojana या योजनेअंतर्गत खालील काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत आपण ते पाहुयात
योजनेचे नाव | Drone Anudan Yojana 2024(ड्रोन अनुदान योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | महाराष्ट राज्य सरकार. |
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली | 2023 |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
विभाग | कृषी विभाग |
योजनेचे मुख्य उद्देश | योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना ड्रोन घेण्यासाठी अनुदान देणे व त्यांची शेती प्रगतशील बनवणे |
योजनेचे लाभार्थी कोण असतील | राज्यातील सर्व शेतकरी वर्ग |
योजनेतून मिळणारा लाभ | या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात येते |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा. |
Drone Anudan Yojana 2024 In Marathi:- वैशिष्ट्य
Drone Anudan Yojana Features या योजनेअंतर्गत कधी काही वैशिष्ट्य स्पष्ट करण्यात आलेले आहे ते आपण पाहूयात
- खरेदीसाठी अनुदान: ड्रोन अनुदान योजना 2024 या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना किंवा लघु उद्योगांना ड्रोन खरेदी करायचे असेल त्यांना 50% ते 75 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येईल. हे अनुदान ड्रोन च्या किमती वरती गृहीत धरले जाईल.
- निकषाच्या आधारावर अनुदान: या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना किंवा लघु उद्योजकांना ड्रोन खरेदी करायचे आहे, त्यांना कोणत्या कामासाठी ड्रोन लागणार आहे या निकषावर अनुदान जाहीर करण्यात येईल. ज्यावेळेस ही योजना अमलात आली होती त्यावेळेस प्रथम स्थान हे शेतकऱ्याला देण्यात आलेले आहे त्यामुळे या बाबी मध्ये शेतकरी व लघुउद्योग यांच्या वापरावर ते अनुदान ठरवले जाईल.
- प्रशिक्षण सुविधा: या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करायचे असे आहे अशा शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी केल्यानंतर ते कसे वापरावे, त्याचबरोबर त्याचा वापर कसा करावा? या सर्व गोष्टीचे प्रशिक्षण हे त्या ड्रोन कंपनीकडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हे ड्रोन वापरण्यासाठी कोणतीही अडचणी येणार नाही.
- कर्ज सुविधा: महाराष्ट्र शासनाने या योजनेअंतर्गत ड्रोन योजना जरी अमलात आणली असली तरी या योजनेमध्ये मिळणारे अनुदान हे 50 ते 75 टक्के पर्यंत असल्यामुळे उर्वरित रक्कम ही शेतकऱ्याला भरावयाची आहे ही रक्कम भरताना जर शेतकऱ्याकडे आर्थिक भांडवल नसेल तर शेतकऱ्यांनी थेट बँकेतून कर्जाची मागणी करून त्याची पूर्तता करता येणार आहे.
Drone Anudan Yojana 2024 In Marathi:- फायदे
Drone Anudan Yojana Benefits काही फायदे स्पष्ट करण्यात आलेले आहे ते आपण पाहूयात.
- कमी वेळात जास्त: शेतकरी हा बराच वेळा तंत्रज्ञानाचा न वापर केल्यामुळे त्याला दैनंदिन कामांमध्ये जास्त वेळ लागतो म्हणजेच की शेतकरी हा पारंपारिक पद्धतीने शेती करत होता आता त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे हेच काम कमी वेळात करता येणार आहे.त्याचबरोबर या कामाची अचूकता ही मानवी कामापेक्षा जास्त अचूक असणार आहे
- कमी खर्चिक: ड्रोन संकल्पना वापरल्यामुळे शेतकऱ्याला एकरी किती खात त्याचबरोबर बियाणे आणि रासायनिक औषधे वापरावी याचे अचूक माप आल्यामुळे त्याला यावर होणारा खर्च हा कमी होण्यास मदत होणार आहे.
- आरोग्याचे संरक्षण: शेतकरी हा बराच वेळा मानवाने फवारणी करत असताना फवारणी द्वारे उडणारे औषध हे त्याच्या नाका तोंडामध्ये जाऊन त्याला विविध आजार होत होते. आता या ड्रोनच्या फवारणीमुळे या सर्व गोष्टींना आळा बसणार आहे व त्याच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.
- रोजगाराची साधन: या योजनेअंतर्गत सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ड्रोन अनुदानामुळे शेतकऱ्याला कमी पैशांमध्ये एक नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
- उत्पादनात वाढ: ड्रोन अनुदान योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी एक कल्याणकारी योजना मानली जाणार आहे. कारण या ड्रोनच्या साह्याने शेतकरी हा आपल्या शेतातील विविध कामे करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कीड रोग नियंत्रण त्याचबरोबर पाण्याचे आर्थिक नियोजन करण्यासाठी अचूक मदत होणार आहे. या सर्व गोष्टींचा फायदा हा शेतकऱ्याच्या उत्पादन वाढीवर होणार आहे.
Drone Anudan Yojana 2024 In Marathi:- अनुदान स्वरूप
Drone Anudan Yojana Benefisiors या योजनेचे अनुदानाचे स्वरूप हे खालील प्रकारे पष्ट करण्यात आलेले आहे ते आपण पाहूयात
पात्र संस्था | अनुदान रक्कम |
विद्यापीठ व सरकारी संस्था यांच्याकडून100 % अनुदान देण्यात येते | 10 लाखांपर्यंत |
शेतकरी उत्पादक संस्था यांच्याकडून 75% | 75 % अनुदान (7 लाख 50 हजार) |
शेतकरी उत्पादन संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास प्रति हेक्टर दराने भाडे आकारण्यात येते | 6 हजार रुपये |
संस्थांनी कृषी ड्रोन राबविल्यास किंवा भाड्याने ड्रोन दिल्यास | 3 हजार रुपये अनुदान |
अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदी करताना एकूण रकमेच्या 50% अनुदान देण्यात येते | 50 % अनुदान (5 लाख) |
कृषी पदवीधारकांनी अवजारे सेवा केंद्र सुरू केल्यास त्यांना एकूण रकमेच्या 50 टक्के अनुदान देण्यात येते | 5 लाख |
Drone Anudan Yojana 2024 In Marathi:- पात्रता
Drone Anudan Yojana Eligibility या योजनेअंतर्गत खालील काही पात्रता स्पष्ट करण्यात आलेले आहे ते आपण पाहूयात.
- ड्रोन अनुदान योजना 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हे पात्र असतील.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार हा शेतकरी असणे अनिवार्य आहे.
- महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाच्या ड्रोन योजनेअंतर्गत शेतकऱ्याने लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदार शेतकऱ्याने ड्रोनसाठी अर्ज केले असता त्यांच्या इतर कुटुंबांना परत अर्ज करता येणार नाही.
- अर्जराकडे स्वतःच्या नावे शेतजमीन असणे अनिवार्य आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र शेतकरी उत्पादन संस्था कृषी विद्यापीठ भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था, कृषी यंत्र व अवजारे तपासणी संस्था हे यासाठी पात्र असतील.
Drone Anudan Yojana 2024 In Marathi:- कागदपत्रे
Drone Anudan Yojana Documents या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- बँक खात्याचा तपशील
- ड्रोन चे कोटेशन बिल
- संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
- कृषी पदवी/शैक्षणिक प्रमाणपत्र
- स्वयंघोषणा पत्र
- पूर्वसंमती पत्र
- पासपोर्ट साईज फोटो
Drone Anudan Yojana 2024 In Marathi:- अर्ज प्रक्रिया
Drone Anudan Yojana Apply अर्जदाराने या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जदाराने खालील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
- ड्रोन अनुदान योजना 2024 च्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे अशा शेतकऱ्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने हा अर्ज जवळील जिल्हा कृषी कार्यालयातून घ्यावा लागेल.
- तुम्हाला कृषी कार्यातून ड्रोन अनुदान अर्ज मिळाल्यानंतर तो अर्ज व्यवस्थितपणे भरावा लागेल.
- हा अर्ज भरल्यानंतर विचारलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला जोडावी लागतील.
- हे जोडले कागदपत्रे त्याचबरोबर भरलेला अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्यावा.
- जर हा अर्ज अचूक असेल तर तुम्हाला तो अर्ज संबंधित कृषी अधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची ड्रोन अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Drone Anudan Yojana 2024 In Marathi:- FAQs
1. ड्रोन अनुदान योजना 2024 काय आहे?
उत्तर: ड्रोन अनुदान योजना 2024 ही महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेली एक शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान देऊन त्यांचे उत्पादन अधिकाधिक वाढण्यासाठी मदत करणे हा आहे.
2. ड्रोन अनुदान योजना 2024 योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
उत्तर: ड्रोन अनुदान योजना 2024 या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना ड्रोन साठी अनुदान देणे व आधुनिक तंत्रज्ञाने शेती ही प्रगतशील बनवणे हा आहे.
3. ड्रोन योजनेचा अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहे?
उत्तर: ड्रोन योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथमतः शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर आता नवीन नियमानुसार लघुउद्योजकांना पण औद्योगिक उद्योगासाठी ड्रोन साठी अनुदान मिळते.
4. ड्रोन अनुदान योजना 2024 साठी किती टक्के अनुदान देण्यात येते
उत्तर: या योजनेसाठी कमीत कमी 50 टक्के ते 75 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते.
5. ड्रोन अनुदान योजना 2024 साठी अर्ज कसा करावा?उत्तर: या योजनेचा अर्ज सादर करावयाचा असल्यास अर्जदाराने प्रथमतः कृषी कार्यालयात जाऊन अर्ज सादर करावे लागतात.
हे ही नक्की पाहा…👇👇👇👇👇👇
Shaikshanik Loan Yojana 2024 | येथे क्लिक करा |
PM Internship Scheme 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Smart Meter Yojana 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Saur Kumpan Yojana 2024 In Marathi | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Magel Tyala Solar Pump Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Leave a comment