Godam Anudan Yojana 2024 In Marathi

Godam Anudan Yojana 2024 In Marathi
Godam Anudan Yojana 2024 In Marathi

प्रस्तावना:-

Godam Anudan Yojana 2024 In Marathi | Warehouse Subsidy Yojana, नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन योजनेविषयी माहिती घेणार आहोत, ती म्हणजे गोदाम योजना 2024 ही योजना केंद्र सरकारने सुरू करण्यात आलेली एक शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाची साठवणूक त्याला करता येत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा त्या मालाची नुकसानी होते. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला गोदाम बांधणीसाठी अनुदान देण्यात आले त्यामुळे शेतकरी या अनुदानाच्या साह्याने गोदाम तयार करून आपला माल गोदाम मध्ये साठवून ठेवू शकतो. 

तर चला मित्रांनो, या योजनेअंतर्गत आपण सविस्तर माहिती पाहूयात म्हणजेच पात्रता, अटी, निकष व अर्ज कोठे करावा? त्याचबरोबर अनुदान किती मिळते? या सर्व गोष्टींचा विचार या लेखांमध्ये आपण करणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

Godam Anudan Yojana 2024 In Marathi:- सविस्तर माहिती

भारत देश हा भारत देश हा कृषिप्रधान देश आहे,आपल्या देशांमध्ये असंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहेत, त्यामुळे शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय मानला जातो.शेतकरी हा अनेक संकटाला सामोरे जात असतो बऱ्याच वेळा शेतकऱ्यांनी टिकवलेल्या मालाची साठवण करण्यासाठी त्याच्याकडे पुरेशी जागा नसते, त्याचबरोबर निवारा नसतो. त्यामुळे त्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. केंद्र सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करून गोदाम अनुदान योजना 2024 ही सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलेला माल साठवून ठेवण्यासाठी नवीन गोदामाची निर्मिती करणे व शेतकऱ्याला त्या मालाचे संरक्षण करता यावे हा आहे.

गोदाम अनुदान योजना 2024 ही योजना 2002 पासून अमलात आलेली आहे परंतु मागील काही वर्षापासून हवा तितका ती प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्या योजनेमध्ये काही बदल करून तीच योजना 2024 मध्ये पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला गोदाम बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते, त्यामुळे शेतकरीही त्याच्या मदतीने नवीन गोदाम बांधण्यासाठी तयार असतो. हे अनुदान दोन वर्गात दिले आहे एक म्हणजे सर्वसाधारण वर्गाला 40% सबसिडी त्याचबरोबर अनुसूचित जाती व जमातीसाठी 50% म्हणजेच अनुक्रमे पाच लाख 50 हजार आणि सात लाख रुपये देण्यात येते. या अनुदानाची रक्कम ही किती मात्र गोदामाचे बांधकाम झाले याच्यावर देण्यात येते म्हणजेच 100 मॅट्रिक टन गोदाम बांधण्यासाठी 40 टक्के अनुदान म्हणजे आठ लाख रुपये व 50 टक्के अनुदान म्हणल्यानंतर दहा लाख रुपये असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

Godam Anudan Yojana 2024 In Marathi:- मुद्दे

Gramin Bhandaran Yojana या योजनेचे खालील काही मुद्दे स्पष्ट करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात.

योजनाGodam Anudan Yojana 2024(गोदाम अनुदान योजना 2024)
योजनेची अंमलबजावणीकेंद्र सरकार
योजनेची सुरुवातसन 2002 मध्ये
राज्यसंपूर्ण भारत देश
कोणत्या विभागामार्फतकेंद्रीय कृषी विभाग
मुख्य उद्देशशेतकऱ्यांना गोदाम बांधणीसाठी आर्थिक साह्य देणे
लाभार्थीशेतकरी वर्ग
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइटयेथे पाहा.

Godam Anudan Yojana 2024 In Marathi:- उद्देश

Warehouse Subsidy Yojana Purpose योजनेचा मुख्य उद्देश खालील प्रमाणे स्पष्ट करण्यात आला आहे ते आपण पाहूयात. 

  • गोदाम योजना 2024 माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाची साठवणूक करण्यासाठी केंद्र शासन कडून अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्यात येते.
  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाची त्याला साठवणूक करता यावी हा आहे.
  • नव्याने उभारण्यात आलेल्या गोदामामुळे शेतकऱ्याच्या मालाची नासाडी कमी होईल व त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होईल. 
  • बऱ्याच वेळा शेतकऱ्याचा पिकवलेला माल हा चालू हंगामामध्ये कमी भावात घेतला जातो त्यामुळे त्याला साठवणीसाठी पर्याय नसल्यामुळे तो माल त्याच हंगामात विकावा लागतो. शेतकऱ्यांनी गोदामाची निर्मिती केल्यानंतर त्याला हा माल विकण्याची गरज नाही. 
  • आपला भारत देशा कृषिप्रधान देश असल्यामुळे आपल्या देशामध्ये अनेक शेतकरी शेतीवर अवलंबून असतात, त्यामुळे या गोदाम योजनेअंतर्गत त्यांना सशक्त्व व आत्मनिर्भर बनवण्याचा शासनाचा उद्देश आहे.
  • शेतकऱ्यांना गोदाम बांधण्यासाठी कर्ज देखील उपलब्ध करून देण्याची सुविधा केंद्र शासनाने केली आहे.
Godam Anudan Yojana 2024 In Marathi
Godam Anudan Yojana 2024 In Marathi

Godam Anudan Yojana 2024 In Marathi:- वैशिष्ट्य

Warehouse Subsidy Scheme Features या योजनेअंतर्गत खालील काही आपण वैशिष्ट्य पाहणार आहोत.

  • उत्तम साठवण सुविधा:- गोदाम अनुवाद योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येईल कारण केंद्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेमध्ये शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे गोदाम बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देणाऱ्या आहे, त्यामुळे शेतकऱ्याला उत्तम साठवण सुविधा मिळणार आहे.
  • अनुदान व कर्ज:- या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला गोदाम बांधण्यासाठी सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक साह्य देण्यात येते. 40% अनुदान हे सर्वसाधारण व 50 % अनुदान हे अनुसूचित जाती व जमाती यांना देण्यात येते, त्याचबरोबर विविध बँका गोदाम बांधण्यासाठी कर्ज देखील देण्यासाठी तयार असतात, त्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्याला सहजासहजी कर्ज उपलब्ध होऊ शकते.
  • दीर्घकाळ साठवणूक करणे:- शेतकऱ्यांनी पिकवलेला माल या गोदामाच्या माध्यमातून त्याला दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवता येणार आहे. त्यामुळे शेतकरी हा बाजारातील किमतीवर अवलंबून न राहता तो त्याचा माल कधी विक्री करायचा याचे नियोजन करू शकतो.
  • आत्मनिर्भर व कार्यक्षम:- गोदाम अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला गोदामाची निर्मिती केल्यामुळे त्याने पिकवलेला माल हा योग्य ती त्यावेळेस त्याला विकण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकरी हा बाजारातील चढ-उतार किमतीवर आपला माल विकू शकतो व अधिक नफा मिळवू शकतो. चांगला नफा मिळाल्यामुळे शेतकरी हा आत्मनिर्भर व कार्यक्षम बनण्यास मदत होणार आहे.

Godam Anudan Yojana 2024 In Marathi:- फायदे

Rural Godown Scheme या योजनेअंतर्गत खालील काही फायदे आपण पाहणार आहोत.

  • गोदाम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाची साठवणूक ही दीर्घकाळापर्यंत करता येते.
  • साठवणूक केलेल्या मला दीर्घकाळ ठेवल्यामुळे पिकाची गुणवत्ता कायम राहते त्याचबरोबर नासाडी न होण्यास मदत होते.
  • या गोदामाच्या सुविधेमुळे शेतकऱ्याला त्याच्या पिकाची गुणवत्ता कायम टिकून त्याला अधिकचा नफा मिळवता येतो.
  • गोदामात माल साठवून ठेवल्यामुळे बाजारपेठेतील किमतीवर नियंत्रण मिळवून दर वाढले असता त्याला त्याचा माल त्यावेळी विकता येतो त्यामुळे त्याला अधिकचा नफा मिळवता येतो. 
  • जे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम नसतात अशा शेतकऱ्यांना अनुदान त्याच बरोबर विविध बँकेकडून कर्ज मिळते त्यामुळे कर्ज व अनुदानाच्या आर्थिक साह्यामुळे तो गोदाम बांधण्यासाठी समर्थ असतो.

Godam Anudan Yojana 2024 In Marathi:- अधिकृत बँका

Warehouse Subsidy Yojana 2024 In Marathi शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांनी खालील बँकेकडे अर्ज किंवा कर्जासाठी मागणी करू शकतो. खालील बँकेचा समावेश केला आहे ते आपण पाहूयात.

  • स्टेट को-ऑपरेटिव्ह एग्रीकल्चर डेव्हलपमेंट फायनान्स कमिटी
  • स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक
  • खाजगी बँका
  • अर्बन को-ऑपरेटिव बँक
  • रीजनल रुलर बँक
  • नॉर्थ ईस्ट डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन
  • स्टेट को-ऑपरेटिव्ह एग्रीकल्चर फंड रुलर डेव्हलपमेंट बँक

Godam Anudan Yojana 2024 In Marathi:- पात्रता

Warehouse Subsidy Yojana Eligibility या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • Godam Anudan Yojana 2024 च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदार हा भारत देशाचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी वैयक्तिक शेतकरी व शेतकरी संबंधित गट किंवा संबंधित संस्था अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अर्जदाराकडे स्वतःची शेती असणे अनिवार्य आहे.

Godam Anudan Yojana 2024 In Marathi:- कागदपत्रे

Warehouse Subsidy Yojana Documents या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील कागदपत्राची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातप्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • शेती संबंधित कागदपत्रे
  • जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो

Godam Anudan Yojana 2024 In Marathi:- अर्ज प्रक्रिया

Warehouse Subsidy Yojana Apply गोदाम अनुदान योजना 2024 या योजनेचा अर्ज करावयाचा असल्यास खालील प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

  1. अर्जदारांनी अर्ज करावयाचे झाल्यास सर्वप्रथम राष्ट्रीयकृत बँक आणि ग्रामीण विकास नाबार्ड यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
  2. त्यानंतर तुम्हाला एक होम पेज ओपन होईल त्या होमपाची वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पर्याय दिसेल वेअर हाऊस सबसिडी स्कीम यावर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावयाची आहे.
  4. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे जोडा असा एक पर्याय दिसेल त्याला क्लिक करून विचारलेली सर्व कागदपत्रे तुम्ही जोडणे आवश्यक आहे.
  5. आता संपूर्ण माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या. 
  6. भरलेली सर्व माहिती अचूक असेल तर तुम्ही सबमिट या पर्यावरण तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता.

सरकारी योजनाक्लिक करा
केंद्र शासन योजनाक्लिक करा
शासन निर्णयक्लिक करा
टेलाग्रामला जॉइनक्लिक करा

Godam Anudan Yojana 2024 In Marathi:- FAQs

1. गोदाम योजना 2024 म्हणजे काय?

गोदाम योजना 2024 ही भारत सरकारने सुरू केलेली एक शेतकऱ्यासाठी कल्याणकारी योजना आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक अनुदान देऊन गोदामे उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

2. गोदाम योजना 2024 योजनेचा उद्देश काय आहे?

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे व्यवस्थित साठवणूक करता यावी त्याचा माल दीर्घकाळ सुरक्षित ठेवता यावा हा आहे.

3. गोदाम योजना अंतर्गत अर्ज कसा करावा?

या योजनेचा अर्ज करावयास झाल्यास दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला जाऊन भेट द्यावी लागेल किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन तेथून तुम्हाला अर्ज भरावा लागेल.

4. शेतकऱ्यांला गोदाम बांधण्यासाठी किती अनुदान मिळू शकते?

शेतकऱ्याला गोदाम बांधण्यासाठी सामान्य वर्गातील शेतकऱ्यांसाठी 40 % व अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी 50 % अनुदान देण्यात येते.

5. गोदाम बांधण्यासाठी शेतकऱ्यांना किती कर्ज मिळू शकते?

गोदाम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर कर्ज दिले जाते. कर्जाची रक्कम गोदामाच्या आकारावर आणि शेतकऱ्यांच्या आवश्यकतांवर अवलंबून असते.

हे ही नक्की पाहा….👇👇👇👇👇

Shaikshanik Loan Yojana 2024येथे क्लिक करा
PM Internship Scheme 2024 In Marathiयेथे क्लिक करा
Sampoorna Grameen Rozgar Yojana 2024येथे क्लिक करा
Smart Meter Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा
MahaDBT Biyane Anudan Yojana 2024येथे क्लिक करा
Saur Kumpan Yojana 2024 In Marathiयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा
Magel Tyala Solar Pump Yojana 2024येथे क्लिक करा