प्रस्तावना:-
Kishori Shakti Yojana नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत, त्या योजनेचे नाव आहे “ किशोरी शक्ती योजना ”.आपल्या राज्यामध्ये बऱ्याच अशा काही मुली आहेत की ज्या शारीरिक, मानसिक दृष्ट्या सक्षम नाहीत अशा किशोरवयीन मुलीसाठी ही योजना सरकारने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते,अशा मिळालेल्या प्रशिक्षणामधून किशोरवयीन मुली स्वतःच्या पायावरती उभे कसे राहतील यासाठी राज्य सरकारने किशोरी शक्ती योजना सुरू केलेली आहे.
या योजनेचा लाभ कोणत्या मुलींना मिळणार आहे? त्याचे काय निकष आहेत? काय पात्रता आहेत? संपूर्ण आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. किशोरवयीन मुलींना शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे, कारण स्त्रीचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास किशोरावस्थेतच होत असतो त्यामुळे या बाबीचा विचार लक्षात घेऊन महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वयोगटातील मुलींना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
किशोरी शक्ती योजनेअंतर्गत राबवले जाणारे विविध उपक्रमाची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Kishori Shakti Yojana Details :- माहिती
Kishori Shakti Scheme महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्याच्या खाली कुटुंबातील किशोरवयीन मुलींच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने केशव शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे उपक्रम आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातून दिले जाणार आहे. या उपक्रमाद्वारे किशोरवयीन मुलींचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुलींना त्यांच्या सर्वात मोठ्या क्षमतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संधी प्रदान करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
गरीब परिस्थितीमुळे राज्यातील अनेक महिलांना, मुलींना लहान वयातच शिक्षण सोडावे लागते, त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील असलेली जबाबदारी म्हणजेच आई-वडील कामावर गेल्याने काही जनावर कुटुंबाची जबाबदारी सुद्धा येऊन पडलेली असते.अशा शिक्षण प्रवाहातून बाहेर पडलेल्या 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींना निरोगी रहावे, प्रशिक्षणाद्वारे स्वतःच्या पायावर उभे राहावे, त्यांच्या हक्काचे माहिती मिळावे आणि आरोग्याच्या प्रश्न कसे सोडवावे यासाठी किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे.
अ. क्र. | योजनेचे नाव | किशोरी शक्ति योजना |
1 | वर्ष | 2024 |
2 | योजनेची सुरुवात | महाराष्ट्र सरकार |
3 | उद्देश | किशोरवयीन मुलींचा शारीरिक, सामाजिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या विकास करणे हा आहे. |
4 | लाभार्थी पात्रता | महाराष्ट्र राज्यातील किशोर वयीन मुली |
5 | योजना अंतर्गत विभाग | महिला व बाल विकास |
6 | आधिकृत संकेतस्थळ | येथे पाहा. |
Kishori Shakti Yojana 2024 :- उद्दिष्ट
महाराष्ट्र किशोरी शक्ति योजना 2024 योजनेचे खालील प्रकारे काही उद्दिष्ट आहेत आपण ते सविस्तर पद्धतीने पाहूयात.
- मुलींचे पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारणे
- या योजनेअंतर्गत त्यांना घरगुती आणि व्यवसायामध्ये प्रशिक्षण देऊन पैसे कमवण्यास सक्षम करणे संवेदनशील करणे.
- आरोग्य पोषण कौटुंबिक कल्याण गृह व्यवस्थापन बालसंगोपन वैयक्तिक अतिपरिचित स्वच्छता राखणे याबाबत माहिती देणे.
- महिलांना व मुलींना त्यांच्या जवळवाडी जवळच्या अंगणवाडीत प्रशिक्षण दिले जाणार असल्यामुळे ते त्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होतील.
- अंगणवाडी केंद्रामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहेत, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची माहिती देऊन त्यांची तपासणी करणे.
- किशोरवयीन मुलींना आठवड्यातून एकदा लोहगोळ्या म्हणजे आयएफसी टॅबलेटदेऊन त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा करणे.
- या योजनेअंतर्गत निवड झालेल्या किशोरवयीन मुलींना सहा महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या दिल्या जातात त्याचबरोबर त्यांचे वजन नियमित करण्यात येते त्याचबरोबर मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासले जाते त्यांना अंगणवाडीच्या मदतीने हे प्रशिक्षण दिले जाते त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक संतुलन योग्य राहते.
- या योजनेअंतर्गत आरोग्य पोषण शिक्षण वैयक्तिक स्वच्छता पर्यावरण स्वच्छता सामुदायिक पोषण मासिक पाळी विज्ञान स्वच्छता गैरसमज पूर्वीची गर्भधारणा शरीरशास्त्र गर्भनिरोधक बालविवाहाचे प्रमाण आणि लैंगिक अत्याचार अशावेळी कुणाची मदत घ्यावी याविषयी माहिती दिली जाते
- किशोरवयीन मुलींना पूरक पोषण आहार दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक किशोरवयीन मुलीसाठी कार्ड तयार केले जाते जेणेकरून त्यांना या योजनेअंतर्गत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.
Kishori Shakti Yojana :- प्रमुख मुद्दे
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या किशोरी शक्ती योजना (Kishori Shakti Yojana Benefits) मध्ये खालील प्रमाणे काही जिल्ह्यात समावेश आहे.
- औरंगाबाद
- अहमदनगर
- अकोला
- भंडारा
- चंद्रपूर
- धुळे
- हिंगोली
- परभणी
- जळगाव
- जालना
- लातूर
- नंदुरबार
- धाराशिव
- पुणे
- रायगड
- रत्नागिरी
- सांगली
- सिंधुदुर्ग
- सोलापूर
- ठाणे
- वर्धा
- वाशिम इत्यादी.
वरील सर्व जिल्ह्यांमध्ये किशोरी शक्ती योजना राबविण्यात येणार आहे, ही योजना (Kishori Shakti Yojana Benefits) महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत अंगणवाडी केंद्रात संपूर्णपणे राबविण्यात येईल.
- किशोरवयी मुलींची आरोग्य तपासणी ही दर तीन महिन्याला अंगणवाडी केंद्रात केली जाईल.
- मैत्रिणींनो यामध्ये एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध महिलांचे कायदे आणि हक्क विवाह कायदा आणि त्याची माहिती आणि या सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
- यासाठी अंगणवाडीमध्ये पुस्तके पत्रके यांचा वापर करण्यात येणार आहेत.
- या योजनेत मेहंदी काढणे टिकाऊ वस्तू पासून करा निर्माण करणे, सेंद्रिय शेती गांडूळ खत प्रशिक्षण, अकाउंटिंग करणे, केक बनवणे, गृहपयोगी उपकरणे दुरुस्ती इत्यादींचे प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत.
- हिरव्या पालेभाज्या खाण्याचे महत्त्व या योजनेअंतर्गत सांगण्यात येणार आहे.
- ज्या मुलींना आपले शालेय शिक्षण सोडावे लागले आहे त्यांना अंगणवाडीच्या मदतीने शिक्षणाचे महत्त्व समजून सांगून त्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी मदत केली जाणार आहे.
- योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून दरवर्षी 3.8 लाख कोटी रुपये दिले जाणार आहेत.
Kishori Shakti Yojana 2024 :- वैशिष्ट्ये
- किशोरवयीन मुलीच्या आरोग्याची तपासणी दर 3 महिन्यांनी अंगणवाडी केंद्रामध्ये केली जाणार आहे त्यासाठी त्यांची आरोग्य पत्रिका बनवली जाईल
- किशोर शक्ती योजनेअंतर्गत मुलींची उंची, वजन, शरीराचे वस्तुमान नित्या दिवशी नोंद या कार्डमध्ये ठेवली जाणार आहे
- ही योजना ज्या मुली शाळा किंवा महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या मुलींना सक्षम करेल आणि त्यांना शिक्षण आरोग्य स्वच्छता आणि दैनंदिन जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम करेल.
- महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मुलींची निवड करून त्यांना महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून विभागीय पर्यवेक्षण ए एन एम आणि अंगणवाडी सेविकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- मुलींचा शारीरिक विकास होण्यासाठी निवडक किशोरवयीन मुलींना पोषक तत्वे दिली जाणार आहेत.
- निवडक किशोरवयीन मुलींना औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण दिले जाणार आहे
- घरगुती व्यवस्थापन उत्तम स्वयंपाक आणि खाण्याच्या सवयी वैयक्तिक स्वच्छता आणि मानसिक पाळीची काळजी याबाबतही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- आत्मशक्ती विकसित करण्यासाठी मानसिक पद्धती शिकवणार आहे त्याचबरोबर रोजगार आणि व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून देणार आहेत.
Kishori Shakti Yojana 2024 Eligibility :- पात्रता
महाराष्ट्र शासनाने काही पात्रता ठरवली आहे ते आपण खालील प्रमाणे आहेत त्या आपण पाहुयात.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय 11 ते 18 वयोगटात असावे.
- या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील मुली अर्ज करण्यास पात्र असतील.
- अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) कुटुंबातील मुलींनाही प्राधान्य देण्याची महाराष्ट्र शासन ठरवले आहे .
- अर्जदार हा किशोरवयीन मानसिक व शारीरिक दृष्ट्या निरोगी असणे गरजेचे आहे.
- अर्जदारास या योजनेचा लाभ घ्यावयास असल्यास त्याने कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
Kishori Shakti Yojana Documents :- कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
- जन्माचा दाखला
- दारिद्र्यरेषेखाली असलेले BPL रेशन कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला.
- शाळेत न गेल्यास वयाचा दाखला देणे आवश्यक आहे.
- जात प्रमाणपत्र
Kishori Shakti Yojana Online Apply :- अर्ज
या योजनेअंतर्गत अर्जदारास अर्ज करावयास असल्यास (किशोरी शक्ति योजना 2024: ऑनलाइन अर्ज) त्याने खालील पद्धतीचा अवलंब करावा
- अर्जदाराने आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा.
- या योजनेअंतर्गत अर्जदाराने अर्ज करावयास असल्यास त्याने आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज व्यवस्थितपणे भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडावी.
- पूर्णपणे भरलेला अर्ज हा अंगणवाडीतील सेवेकडे जमा करावा.
Kishori Shakti Yojana FAQs
प्रश्न १: किशोरी शक्ती योजनासाठी कोणत्या मुली पात्र आहेत?
उत्तर: या योजनेअंतर्गत ज्या मुलींचे वय ११ ते १८ वर्ष आणि अविवाहित मुली या योजनेसाठी पात्र आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १ लाख पेक्षा कमी असावे.
प्रश्न २: किशोरी शक्ती योजनेचा उद्देश काय आहे?
उत्तर: या योजनेचा मुख्य उद्देश हा किशोरवयीन मुलींचे आरोग्यामध्ये सुधारणा करणे, त्यांचे पोषण वाढवणे, त्यांना कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करून त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना त्यांच्या सामाजिक घटकांची जाणीव करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत.
प्रश्न ३: किशोरी शक्ती योजने अंतर्गत कोणता लाभ मिळतो?
उत्तर: या योजनेअंतर्गत मुलींना पूरक आहार, आरोग्य तपासणी, लोहयुक्त गोळ्या, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्व-रोजगारासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक मदत मिळते.
प्रश्न ४: किशोरी शक्ती योजनासाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: या योजनेसाठी अर्ज करावयास झाल्यास अर्जदाराने त्याच्या जवळील अंगणवाडी केंद्राच्या सेविका यांच्याशी संपर्क साधावा.केंद्रावरील सेविका सदरील अर्जदार हा पात्र असल्यास त्या मुलींची नोंद करून घेतील.
हे ही वाचा 👇
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Shravan Bal yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment