Kukut Palan Yojana Maharashtra 2024

Kukut Palan Yojana Maharashtra 2024
Kukut Palan Yojana Maharashtra 2024


Kukut Palan Yojana Maharashtra 2024 भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे या देशातील 60 टक्के नागरिक हे पूर्णतः शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांना शेती हा एक पूरक व्यवसाय मानला जातो परंतु मागील काही वर्षापासून झालेल्या निसर्गातील बदलामुळे सध्या शेतीही काहीशी तोट्यामध्ये दिसून येत आहेत म्हणजेच शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे शाश्वत नसल्यामुळे शेतकरी हातबल झालेला आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी त्याच बरोबर इतर नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि या योजने मागचा उद्देश हा शेतकऱ्याचे व बेरोजगार नागरिकांचे उत्पन्न वाढवणे हे असते.

मागील काही वर्षांमध्ये शेतीला जोडधंदा म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी विविध योजनांचे आयोजन केलेले आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याचे उत्पन्न हे वाढण्यास मदत होणार आहे. तर मग चला मित्रांनो आज आपण अशाच एका योजनेविषयी माहिती घेणार आहोत त्यासाठी हा लेख पूर्णपणे वाचणे महत्त्वाचे आहे.


शेतीला जोडधंदा म्हणून केंद्र शासन व राज्य शासन वेगवेगळ्या योजना राबवत असतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ करता यावी हा महत्त्वाचा उद्देश असतो. गेल्या काही वर्षापासून नवनवीन योजना राबवण्यामध्ये महाराष्ट्र सरकार खूप अग्रेसर आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या शेतकरी वर्गाला त्याच बरोबर बेरोजगार लोकांना उत्पन्नाचा स्त्रोत्र निर्माण व्हावा यासाठी कुकुट पालन योजना राबविण्यात आले आहे.

कुकुट पालन अनुदान 2024 या योजनेचा महत्वाची दोन उद्देश आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा मिळावा आणि बेरोजगार तरुणांना या योजनेच्या अंतर्गत उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे. ही योजना 2023 मध्ये राबविण्यात आलेली आहे. कुक्कुटपालन योजनेअंतर्गत शेतकरी त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना कर्ज सुविधा त्याचबरोबर अनुदान ही सरकारकडून देण्यात येते.


Kukut Palan Yojana Maharashtra 2024 या योजनेला महाराष्ट्र सरकारने अधिकाधिक चालना मिळावी यासाठी नवनवीन सुविधा अनुदान कर्ज सुविधा या देण्यात आलेले आहे. ज्यामुळे शेतकरी त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना एक नवीन संधी मिळणार आहे.

1. आर्थिक नफ्यात वाढ:- शेतकरी वर्ग किंवा बेरोजगार तरुणांना कुक्कुटपालन योजनेअंतर्गत त्यांना अधिक अधिक नफा मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास वाव मिळणार आहे.

2. कमी गुंतवणुकीमध्ये जास्त नका:- कुकुट पालन योजना अंतर्गत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळाल्यामुळे त्याचबरोबर कमी काळामध्ये लवकरात लवकर नफा मिळाल्यामुळे शेतकऱ्याचे व बेरोजगार लोकांचे आर्थिक स्थैर्य हे स्थिर राहण्यास मदत होणार आहे .

3. रोजगार निर्मितीस चालना मिळणे:- कुक्कुटपालन योजनेअंतर्गत शेतकऱ्याला व बेरोजगार लोकांना नफ्याबरोबर त्या शेडमध्ये काम करण्यास येणाऱ्या मजुरांनाही रोजगार मिळणार असल्यामुळे ही योजना एक प्रभावशाली योजना ठरली आहे.

4. पौष्टिक उत्पन्न निर्मिती:- कुकुट पालन योजना ही प्रभावी योजना आहे, या योजनेमध्ये शेतकरी किंवा बेरोजगार नागरिक मांस, अंडी त्याचबरोबर कुकुट विक्री करून एक पौष्टिक उत्पादन निर्माण करण्यास मदत होणार आहे.


कुकुट पालन योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू करण्यात आले या योजनेमध्ये काही घटक ही ठरवून देण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात.

  1. शासकीय अनुदान :- कुकुट पालन योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू करण्यात आलेली एक प्रभावी योजना आहे या योजनेमध्ये शासन हे 40 टक्के ते 50 टक्के आणि 1.60 लाखापर्यंत अनुदान देते, ज्यामुळे शेतकरी व बेरोजगार नागरिकांना आर्थिक मदत व्हावी हा उद्देश आहे. 
  2. मार्गदर्शन व साधन सामग्री पुरवठा:- या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार हे फक्त अनुदान देत नाही तर कुक्कुटपालन विषयी सविस्तर माहिती त्याचबरोबर, लागणारी साधन सामग्री सुद्धा पुरवते. जसे की शेड ड्रॉईंग, पक्षांची माहिती, विक्रीची माहिती, औषधांची माहिती इत्यादी.
  3. प्रशिक्षण सुविधा:- कुकुट पालन योजना ही शेतकरी व बेरोजगार नागरिकांना नवीन असल्यामुळे कुकूटपालन व्यवसाय हा कसा आहे याविषयी संपूर्ण माहिती आणि प्रशिक्षण दान देण्याची जिम्मेदारी ही राज्य सरकारची आहे.
  4. औषधे व खाद्य पुरवठा:- शेडमध्ये कुक्कुटपालन केल्यानंतर त्यांना कुठल्या औषधी द्यायची, त्याचबरोबर कुठला खाद्यपदार्थ दिला जावा यासाठी संपूर्ण मार्गदर्शन देण्यात येते.


Kukut Palan Yojana Maharashtra 2024 महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेल्या या कुक्कुटपालन योजनेचे खालील काही महत्त्वाचे उद्देश ते आपण पाहुयात.

1. शेतकरी व बेरोजगार यांचा आर्थिक विकास:- या योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे शेतकरी व बेरोजगार तरुणांना एक शाश्वत उत्पन्न निर्माण करून, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करून देणे हा आहे. त्यामुळे ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे.

2. सशक्तिकरण:- महाराष्ट्र सरकारने सुरू करण्यात आलेल्या कुक्कुटपालन योजनेअंतर्गत येणारे शेतकरी आणि बेरोजगार करून त्याच बरोबर महिला आणि लहान वर्गातील शेतकरी हे सशक्त बनवण्यात येणार आहेत.

3. आर्थिक सुधारणा:- महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे लहान वर्गातील शेतकरी त्याचबरोबर बेरोजगार तरुण यांना एक रोजगाराची संधी निर्माण करून देऊन त्यांच्या राहणीमानात त्याच बरोबर त्यांच्या आर्थिक बाबींमध्ये सुधारणा करणे हा आहे.


Kukut Palan Yojana Maharashtra 2024

योजनेचे नावकुकुट पालन योजना 2024 (Kukut Palan Yojana Maharashtra 2024)
उद्देश्यशेतकरी व बेरोजगार तरुणांना आर्थिक उत्पन्न वाढ करणे.
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी व बेरोजगार तरुण.
लाभ किती मिळतोया योजनेअंतर्गत 1.5 लाखापर्यंत अनुदान मिळते.
राज्यमहाराष्ट्र.
अर्ज प्रक्रियाऑफलाइन/ऑनलाइन.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा


कुकुट पालन योजना सुरू करण्यासाठी शेतकरी त्याचबरोबर बेरोजगार नागरिकांना कर्ज घ्यायचं असेल तर राज्य सरकारने खालील काही बँकाचा समावेश करण्यात आला आहे.

  • प्रादेशिक ग्रामीण बँक
  • व्यापारी बँक
  • सहकारी बँक
  • राज्य सहकारी बँक
  • ग्रामीण विकास बँक

बरेच शेतकरी हे अल्पभूधारक असतात. त्यामुळे त्यांना भांडवलासाठी आर्थिक मदत हवी असते, त्यासाठी राज्य सरकारने यावरील बँका नेमून दिले आहेत. ज्याद्वारे या कुकूटपालन योजनेअंतर्गत ते कर्ज स्वरूपात मदत घेऊ शकतात.


पंचायत समिती कुक्कुटपालन योजना अंतर्गत खालील काही पक्षांच्या जाती नमूद केलेल्या आहेत.

  • आयआयआर
  • ब्लॅक
  • अस्ट्रॉलॉप
  • गिरीराज
  • वनराज
  • कडकनाथ
  • व इतर शासन मान्य जातीचे पक्षी

नाबार्ड कुक्कुट पालन योजने अंतर्गत लाभ घ्यावयाचे झाल्यास खालील पात्रता असणे आवश्यक आहे. 

  • दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी
  • भूमिहीन शेतमजूर
  • मागासवर्गीय
  • अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी


कुक्कुट पालन योजना अंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थ्याने खाली कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे

  • पासपोर्ट आकार फोटो
  • शिधापत्रिका
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • कुक्कुटपालन योजना अहवाल
  • बँक स्टेटमेंटची फोटो प्रत
  • मोबाईल क्रमांक
  • पोल्ट्री फार्म व्यवसाय परवाना
  • पिंजरा, पक्षी, उपकरणे इत्यादी खरेदीचे बिल.
  • विमा पॉलिसी
  • अ‍ॅनिमल केअर मानकांकडून परवानगी


कुकुट पालन योजना अंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थ्याला खालील पात्रतेची पूर्तता करावी लागेल. 

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदार हा गरीब, बेरोजगार, मजूर किंवा शेतकरी असावा.
  • महाराष्ट्रातील सहकारी संस्था 
  • संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार
  • अर्जदाराने कुक्कुटपालन संबंधी प्रशिक्षण घ्यावे लागेल.
  • अर्जदाराकडे पुरेशी जमीन असावी.
  • व्यक्ती किंवा उद्योजक देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.


ही योजना एक प्रभावशाली योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकरी आणि बेरोजगार तरुण यांना बरेच फायदे मिळणार आहेत.

1. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मांस आणि अंडी विक्री केली जाते त्यामुळे विक्री ही चांगल्या प्रमाणात होते.

2. कुकूटपालन योजनेअंतर्गत गुंतवणुक खूप कमी प्रमाणात आहेत, त्यामुळे कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्याची एक संधी आहे.

3. झालेल्या उत्पन्नाची विक्री केल्यानंतर मिळणारा नफा हा त्वरित मिळतो.

5. बेरोजगार तरुणांना कुक्कुट पालन योजना अंतर्गत अनुदान मिळाल्यामुळे त्यांना नवीन व्यवसाय करण्यास संधी मिळत आहे.

Kukut Palan Yojana In Marathi GR Click Here


कुक्कुटपालन योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास खालील प्रकारे अर्ज प्रक्रिया करणे आवश्यक आहे.(Kukut palan yojana maharashtra online registration)

1.या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जदारांनी आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयातील पशुसंवर्धन विभागात जाऊन अर्ज घ्यावा लागेल.

2.अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जामध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूकपणे भरून विचारलेली सर्व कागदपत्रे जोडावी.

3. सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर तो अर्ज व्यवस्थित तपासून घ्यावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जमा करावा.

4. आता प्राप्त झालेलला अर्ज हे जिल्हा अधिकारी तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची छाननी करून तुम्ही योजनेअंतर्गत पात्र लोकांची यादी जाहीर करण्यात येईल व ही यादी त्या त्या गावातील ग्रामपंचायत मध्ये देण्यात येईल.


कुक्कुटपालन योजना ही एक प्रभावशाली योजना आहे, ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत, तांत्रिक मार्गदर्शन, आणि प्रशिक्षण मिळते, ज्यामुळे ते कुक्कुटपालन व्यवसायात यशस्वी होऊ शकतात. या योजनेमुळे राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायाला चालना मिळाली आहे आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.


1. कुक्कुटपालन म्हणजे काय?

उत्तर: कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्यांचे संरक्षण करणे आणि मांस, अंडी यांची विक्री करून उत्पन्न मिळवणे.

2. कुक्कुटपालन योजनेसाठी कोण पात्र आहे?

उत्तर: कुकुट पालन योजनेसाठी पात्र होण्यासाठी गरीब अल्पभूधारक त्याचबरोबर शेतकरी किंवा बेरोजगार तरुण असणे आवश्यक आहे.

3. कुक्कुटपालन योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?

उत्तर: कुकुट पालन योजना अंतर्गत मिळणाऱ्या अनुदान हे 50 टक्के पर्यंत असते परंतु तेही ठरवून दिलेल्या शेडच्या त्याचबरोबर पक्षांच्या संगोपनावर अवलंबून असते.

4. कुकुट पालन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

उत्तर: कुक्कुटपालन योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज अधिकृत सरकारी पोर्टलवर भरता येतो, तर ऑफलाईन अर्ज स्थानिक कृषी कार्यालयात भरता येतो.

5. कुक्कुटपालन व्यवसायात कोणते प्रशिक्षण दिले जाते?

उत्तर: शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम दिले जातात. यात शेड व्यवस्थापन, पोषण व्यवस्थापन, आजारांचे निदान, आणि विपणन तंत्रज्ञान यांचा समावेश असतो.

सरकारी योजनायेथे क्लिक करा.
केंद्र शासन योजनायेथे क्लिक करा.
शासन निर्णययेथे क्लिक करा.
जॉइन टेलेग्रामयेथे क्लिक करा.


Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024येथे क्लिक करा
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024येथे क्लिक करा
Ladka Bhau Yojana 2024येथे क्लिक करा
Lek Ladki Yojanaयेथे क्लिक करा
Lakhpati Didi Yojanaयेथे क्लिक करा
Silai Machine Yojanaयेथे क्लिक करा
PM Awas Yojanaयेथे क्लिक करा
Vishwakarma Shram Samman Yojanaयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment