Ladka Bhau Yojana

Ladka Bhau Yojana 2024

Ladka Bhau Yojana 2024 लाडका भाऊ योजना काय आहे महाराष्ट्र शासनाने तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी एक महत्त्वकांक्षी योजना सुरू केली आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या नावाने ओळखली जाणारी ही योजना ज्याला आता लाडका भाऊ योजना असेही म्हटले जाते.ती महाराष्ट्रातील तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी अमलात आणली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रावर एकीकडे लाडकी बहीण योजना गाजत असताना दुसरीकडे आपल्या महाराष्ट्र शासनाने तरुणांच्या या विकासासाठी कौशल्य विकासासाठी व एका दिशेने त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी या रोजगार निर्मितीच्या उद्देशाच्या दृष्टीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या ठिकाणी ही योजना आणलेली आहे, यालाच या ठिकाणी लाडका भाऊ योजना असे देखील या ठिकाणी नाव देण्यात आलेला आहे.आहेत आणि या योजनेची अंमलबजावणी ही कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग आणि मुख्यमंत्री लोककल्याण कक्ष जिल्हा प्रशासन या ठिकाणी यांच्यामार्फत अंमलबजावणी केली जाते.

ही योजना दिनांक 3 डिसेंबर 1974 पासून राबविण्यात येत आहे. परंतु काही त्रुटी असल्यामुळे या योजनेचा लाभ घेता येत नव्हता, या योजनेतील त्रुटीत बदल  करण्यात आला असून या योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना घेता यावा यासाठी सरकार सर्व पद्धतीने प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे ही योजना केवळ कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीसाठीच नाही तर राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्त्वाचे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना in marathi. बघा तरुणांना व्यावहारिक प्रशिक्षण देऊन आणि उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन ही योजना महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार आणि निरंतर मूल्यांकनासह ही योजना महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करण्यास आणि राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यास मदत करू शकते.अशा पद्धतीने लाडका भाऊ योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणते आवश्यक आहेत आणि लाडका भाऊ योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या आपण  लेखाद्वारे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजक व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभ घेण्यासाठी उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे एकत्रपणे दिलेल्या योजनेच्या संकेतस्थळावर(https://rojgar.mahaswayam.gov.in) नोंदणी करू शकतात.

इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे एकत्रितपणे  नोंदणी करत असल्यामुळे ते एकमेकाशी जोडले जाणार आहेत त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार आणि उद्योजकांना मनुष्यबळ मिळण्यास वाव मिळेल.

  • या योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण मिळाल्यामुळे त्यांना कामाचा अनुभव मिळवून त्यांना नवनवीन  ठिकाणी रोजगार  मिळणार आहे.
  • उद्योजकांना प्रशिक्षित कुशल उमेदवार मिळाल्यामुळे मनुष्यबळाचा अभाव होणार नाही.
  •  इच्छुक उमेदवार आणि उद्योजक हे एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्यांना नोंदणी करणे अनिवार्य आहे.

योजनासुरुवात
योजनेचे नावमाझा लाडका भाऊ योजना/ युवा कार्य प्रशिक्षण योजना
कोणी सुरुवात केलीमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे
कधी सुरुवात केली17  जुलै 2024
लाभार्थी12वी पास,आयटीआय,डिप्लोमा, पदवीधर
Online Registration Date21 जुलै 2024
Official Website Linkhttps://rojgar.mahaswayam.gov.in
Helpline NumberToll Free – 18001208040
Ladka Bhau Yojana 2024

महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे सुशिक्षित बेरोजगार लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देणे हा आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे सुशिक्षित बेरोजगार लोकांची त्याच प्रमाणात संख्या वाढत आहे त्यामुळे हा वाढता दर लक्षात घेऊन ही योजना अमलात आली आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सन 2024-2025 या आर्थिक वर्षात या वर्षांमध्ये बेरोजगारांच्या 70 टक्के सुशिक्षित लोकांना नोकरी मिळवून देण्याचा मानस महाराष्ट्र राज्य सरकारचे आहे.

या योजनेची नेमकी उद्दिष्टे काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहणं हे तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचे आहे.

  • तरुणांना व्यावहारिक कौशल्य शिकवणे.
  • रोजगाराच्या संधी वाढवणे.
  • लाडका भाऊ योजनेचा उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे.
  • महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देणे.
  • ऑनलाइन प्लॅटफॉर्म म्हणजे नोकरी शोधणारे आणि रोजगार देणारे यांना जोडण्यासाठी विशेष वेबसाईट.
  • उमेदवार आणि उद्योजक सहज नोंदणी करू शकतात.
  • व्यावहारिक प्रशिक्षण रोजगारासाठी इच्छुक उमेदवारांना कौशल्य वाढवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव उद्योगांच्या गरजा नुसार प्रशिक्षण कार्यक्रम
  • आर्थिक सहाय्यक बारावी उत्तीर्ण यांना रक्कम 6000 रु प्रति महिना.
  • आयटीआय किंवा डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी 8000रु प्रति महिना.
  • पदवीधर किंवा पदवी उत्तरांसाठी 10000.रु प्रति महिना.
  • व्यापक समावेश म्हणजे खाजगी क्षेत्र सेवा क्षेत्र सरकारी आणि निमसरकारी संस्था सहभागी होऊ शकतात.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणया उपक्रमांतर्गत संकेतस्थळावर आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जनकल्याण कक्ष यांची आहे.वेळोवेळी येणाऱ्या समस्यावर मात करून वेळोवेळी बदल करून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

खालील प्रकारे काही जबाबदाऱ्याचा उल्लेख आपण केलेला आहे.

  • प्रत्यक्ष कामावर आधारित प्रशिक्षण उद्योगांमध्ये एंट्रन्स शिप सॉफ्ट.
  • स्किल डेव्हलपमेंट उद्योजकता विकास कार्यक्रम.
  • मूल्यांकन आणि प्रमाणपत्र.
  • नियमित मूल्यांकन प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र आणि रोजगार किंवा स्वयंरोजगारांसाठी शिफारस.
  • आव्हाने आणि संधी मोठ्या संख्येने तरुणांपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचं आवाहन आहे.
  • गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची खात्री उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय.
  • ग्रामीण भागातील तरुणांना समान संधी.
  • भविष्यातील योजना देखील काय असणार आहे त्यावरती देखील थोडक्यात प्रकाश टाकण्यात महत्त्वाचा आहे.
  • स्टार्टअप इको सिस्टमची जोडणे.
  • आंतरराष्ट्रीय संस्थांची सहयोग या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्थातच लाडका भाऊ योजना.
  • उमेदवार नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या समस्या सोडवणे.
  • अस्थापनाची म्हणजेच कंपनीची नोंदणी.
  • कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी.

वरील सर्व बाबीमध्ये काही त्रुटी किंवा बदल करावयाचा झाल्यास आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जनकल्याण कक्ष हे करू शकतात. त्यामुळे वेळोवेळी झालेल्या बदलामुळे उमेदवार किंवा उद्योजकांना ऑनलाईन प्रक्रिया करताना कसल्याही प्रकारे समस्या येणार नाहीत.

Ladka Bhau Yojana 2024 या योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवाराला व उद्योजकांना खालील प्रकारे फायदे होतात.

  • मोफत व्यवसाय प्रशिक्षण मिळते. 
  • मासिक स्टायपन मिळते.
  • उद्योगाशी थेट तुम्हाला संपर्क साधा येणार आहे.
  • रोजगाराची जी क्षमता आहे ते वाढवणे आणि आत्मविश्वास वाढवणे.
  • लाडका भाऊ योजनेचा कुशल मनुष्यबळाची उपलब्धता. 
  • प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची निवड करण्याची संधी.
  • प्रशिक्षण खर्चात बचत.
  • सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्याची संधी.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रकारचे शैक्षणिक शिक्षण झालेले असायला हवे.

अ. क्रशैक्षणिक पात्रतादरमहा लाभ
112 वी पास6,000 रु
2आयटीआय/ पदविका8,000 रु
3पदवीधर / पदवी10,000 रु

महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये वरील प्रमाणे दरमहा शुल्क देण्यात येणार आहे त्यासाठी सरकारने खालील काही बाबी सांगितले आहेत.

  • प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षणांतर्गत हजेरी ही 90% असणे अनिवार्य आहे.
  • प्रशिक्षण घेत असताना मासिक सुट्टीचा विचार केला जाणार नाही.
  •  दरमहा मिळणारे शुल्क हे उमेदवाराच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा केली जातील.
  •  उद्योजकाला उमेदवाराचे प्रशिक्षण अंतर्गत शासनाच्या शुल्काव्यतिरिक्त जादा पैसे देऊ शकतो.
  • उमेदवारांनी प्रशिक्षणाअंतर्गत कसल्याही प्रकारची गैरवर्तणूक केल्यास किंवा हजेरी न लावल्यास त्याला दरमहा या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • इच्छुक उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • लाभ घेणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 35 वर्षे असावे.
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास,आयटीआय,डिप्लोमा पास अथवा पदवीधर असणे गरजेचे आहे.
  • आधार कार्ड असणे आवश्यक अनिवार्य आहे.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेली असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक (Employment Number) अनिवार्य आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे किंवा लाभार्थ्याकडे खालील प्रकारची कागदपत्रे असणे अनिवार्य आहे

  • लाभ घेणाऱ्या उमेदवाराकडे किंवा अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे रहिवासी प्रमाणपत्र अथवा डोमासाईल.
  • उमेदवाराकडे शाळा सोडल्याचा दाखला.
  • उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता साठीलागणारे आवश्यक ती कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे..
  • मागासवर्गीय असल्यास संबंधित जात प्रमाणपत्रअसणे अनिवार्य आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी किंवा उमेदवारांनी खालील अर्ज प्रक्रियेचा अवलंब करावा.

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या रोजगार महास्वयम संकेतस्थळाला (https://rojgar.mahaswayam.gov.in)भेट द्यावी.
  • वरील दिलेल्या लिंक चा वापर करून तुम्ही रोजगार महास्वयम संकेतस्थळावर भेट द्यावी त्यानंतर अर्जदाराने विचारलेली सर्व माहिती ही अचूकपणे भरावी.
  • अर्जदाराने सर्वप्रथम स्वतःचे अकाउंट उघडण्यासाठी प्राथमिक माहिती भरणे गरजेचे आहे.
  • अर्जदारांनी प्राथमिक माहिती भरल्यानंतर त्याला नवीन पेज वरती शैक्षणिक माहिती विचारली जाईल, शैक्षणिक माहिती ही अचूक पद्धतीने भरण्यात यावी.
  • शैक्षणिक माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • तुम्ही शैक्षणिक माहिती भरताना जी काही शैक्षणिक पात्रता नमूद केली होती त्यांचे सर्वत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • सर्व प्रकारे अपलोड झाल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.
  • वरील सर्व माहिती भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार कसल्याही प्रकारची फीस आकारणी करत नाही.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज नमूना पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.

प्रश्न:- लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करावा?

उत्तर:- महाराष्ट्र शासनाने दिलेल्या रोजगार महास्वयेमुळे या संकेत स्थळाला भेट देऊन नवीन नोंदणी येथे क्लिक करून विचारलेली पूर्ण माहिती भरून अर्ज सादर करावा.

प्रश्न:- लाडका भाऊ योजनेअंतर्गत कोणाला लाभ मिळणार?

उत्तर:-लाडका भाऊ योजनेअंतर्गत उमेदवार हा सुशिक्षित बेरोजगार, शैक्षणिक पदवीधर, आयटीआय, 12 पास, पदविका, पदवीधर यांना मिळणार आहे.

प्रश्न:-महाराष्ट्र शासन लाडका भाऊ योजनेअंतर्गत  किती लाभ मिळतो?

उत्तर:-या योजनेअंतर्गत दरमहा 6000, 8,000 आणि 10,000 रु. शैक्षणिक पात्रतेनुसार मिळतात. 

प्रश्न:-माझा लाडका भाऊ योजनेमध्ये कोण पात्र आहे?

उत्तर:-माझा लाडका  भाऊ योजनेमध्ये ज्या उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 35 वर्षे आहे  असेच उमेदवार पात्र असतील त्याचबरोबर  त्यांची शैक्षणिक पात्रता असणे सुद्धा आवश्यक आहे.

प्रश्न:-अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे का?

उत्तर:-माझा लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. 

आज आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला Ladaka Bhau Yojana 2024 या योजनेविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने या योजनेअंतर्गतत दहा हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते त्याविषयी सर्व काही माहिती आम्ही या लेखा लेखाद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. जर काही संबंधित माहिती विषयी काही समस्या असल्यास तुम्ही आम्हाला खालील कमेंट द्वारे कळवू शकता आम्ही आपल्या समस्याचे लवकरात लवकर निवारण करण्याचा प्रयत्न करू. 

हे ही वाचा

Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024येथे क्लिक करा
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024येथे क्लिक करा
Ladka Bhau Yojana 2024येथे क्लिक करा
Lek Ladki Yojanaयेथे क्लिक करा
Lakhpati Didi Yojanaयेथे क्लिक करा
Silai Machine Yojanaयेथे क्लिक करा
PM Awas Yojanaयेथे क्लिक करा
Vishwakarma Shram Samman Yojanaयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment