Ladki bahin yojana 3000₹ Check Online | लाडकी बहीण योजना | लाडकी बहीण योजनेचे 3000 रू. फक्त याच अकाउंट मध्ये येणार

Ladki bahin yojana 3000₹ Check Online
Ladki bahin yojana 3000₹ Check Online

प्रस्तावना :-

Ladki bahin yojana 3000₹ Check Online | लाडकी बहीण योजना | लाडकी बहीण योजनेचे 3000 रू. फक्त याच अकाउंट मध्ये येणार, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले नुकत्याच माझी लाडकी बहिण योजना या योजनेचा हप्ता हा लाडक्या बहिणीला 15 ऑगस्ट 2024 या दिवशी खात्यावर जमा करण्यात आला आहे. बऱ्याच लाडक्या बहिणीला हप्ता हा भेटलेला नसून तो का नाही भेटला? असे प्रश्न निर्माण होत आहेत. त्याच बरोबर 3000 रुपये सरकारने जमा केलेले आहेत. भरपूर जणांना तीन हजार रुपये सुद्धा आता आलेले आहेत. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पैसे भेटले नाही आमच्या काही प्रॉब्लेम आहे का? लक्षात ठेवा हे पैसे तुम्हाला 17 तारखेपर्यंत मिळणार आहेत. तर 17 तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे, कारण 27 लाख महिलांच्या जे काही आधार कार्ड आहेत ते बँकेला लिंक नाही आणि त्यामुळे भरपूर जणांना असा सुद्धा मेसेज आलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपला अर्ज प्राप्त झालेला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आदर्श संलग्न नाही आशा महिलानी तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करून घ्यावेत. 

तर चला मित्रांनो आज आपण सर्व प्रश्नांची चर्चा या लेखाद्वारे करणार आहोत यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. 

लाडकी बहीण योजना :- खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या (Ladaki Bahin Yojana) यादीनुसार बऱ्याच महिन्याला पैसे जमा केलेला संदेश प्राप्त झाला आहे पण पैसे मात्र खात्यावर जमा झाले नाहीत तर याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना केलेला गोंधळ तर काय असू शकतात निकष ते आपण पाहूयात. 

  • माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतेवेळी दिलेला खाते क्रमांक व आधार नंबर चुकीचा असणे. 
  • बँक खाते क्रमांक हा ज्या आधार कार्डशी संलग्न आहे त्या खात्यावर पैसे जमा होणार त्यामुळे तुम्ही दिलेला खाते क्रमांक जरी बरोबर असला तरी आधार कार्ड क्रमांक हा ज्या खातीशी लिंक असेल त्याच खात्यावर पैसे जमा होणार. 

लाडकी बहीण योजना :- माझी लाडकी बहीण योजना पैसे जमा होण्यासाठी काय दक्षता घ्यावी?

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी शासनाने ठरवून दिलेल्या आणि निकषावर आधारित आहे त्यामुळे खालील काही दक्षता घेणे आवश्यक आहे. 

  • बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे :-

ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे, अशा महिलांनी प्रथमतः आपले बँक खाते आधारशी लिंक आहे का नाही ते पहावे. 

  • आधार कार्ड बँकेचे संलग्न असणे:-

जर आधार कार्ड बँकेशी संलग्न असेल तर ती बँकेशी सीडींग करून घेणे अनिवार्य आहे, म्हणजेच फक्त आधार कार्ड बँकेची लिंक असून चालणार नाही ते बँकेशी सीडींग करणे गरजेचे आहे. म्हणजेच आधार डीबीटी लिंक करून घ्यावे. 

लाडकी बहीण योजना :- आधार कार्ड डीबीटी सीडी म्हणजे काय?

आता भरपूर जण म्हणतील आमचे जे आधार कार्ड आहे ते बँकेला आम्ही ते लिंक केलेले आहे, पण लक्षात ठेवा आधार कार्ड हे बँकेला डीबीटी सीडिंग असणे गरजेचे आहे. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. जर आधार कार्ड डीबीटीने सीडिंग असेल तुमचं तरच तुम्हाला पैसे मिळतील नाहीतर पैसे मिळणार नाहीत. भरपूर जण म्हणतात आमचे पैसे आले नाहीत तर तुमच असं सुद्धा कारण असू शकत की तुमचं आधार कार्ड बँकेला डीबीटी सीडिंग नाही तर आपला आधार कार्ड बँकेला डीबीटी लिंक आहे का नाही ते पहावे

लाडकी बहीण योजना :- आधार कार्ड डीबीटी सीडींग कसे पाहावे?

आधार कार्ड डीबीटी सीटिंग पाहण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा. 

  • महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर टाका आणि लॉगिन वर क्लिक करा. 
  • तुमचा आधार कार्ड वर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. 
  • तो ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये टाकून पुष्टी करा. 
  • त्यानंतर लॉगिन या बटनावर क्लिक करा.
  • लॉगिन झाल्यानंतर पर्यायांमध्ये बरेच 5 नंबर पर्याय दिसेल त्यातील बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक करा.
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील शेवटचे चार अक्षर आणि आधार कार्डशी लिंक असलेले बँकेचे नाव दिसेल जर त्या नावासमोर सक्रिय असे दिसले तर तुमचे बँक खाते हे बँक सीडिंग साठी लिंक आहे असे समजावे. 

तुमच्या ज्या कोणत्याही बँकेचं नाव आहे आणि खाली एक्टिव असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते 17 पर्यंत पैसे मिळून जातील, फक्त तुमचं डीबीटी लिंक असावं म्हणजेच तुमचे इथे बँकेचे नाव दिसले पाहिजे आणि ऍक्टिव्ह दिसले पाहिजे तरच तुम्हाला हे पैसे मिळतील. 

लाडकी बहीण योजना :- बँक सीडिंग स्टेटस जर सक्रिये नसेल तर काय करावे?

27 लाख महिला अशा आहेत की त्यांचं डीबीटी लिंक नाही काही जणांना इथे कोणतीही बँक दिसत नाही म्हणजेच नो रेकॉर्ड फॉर्म दाखवतो. काही जणांना बँक दिसते परंतु एक्टिव दाखवत नाही. लक्षात ठेवा इन ऍक्टिव्ह दाखवत असेल किंवा कोणतीही बँक दाखवत नसेल तर लगेच पोस्ट ऑफिस मध्ये जावून आणि एक आयपीपीबी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे एक डिजिटल अकाउंट उघडून घ्या. 

डिजिटल अकाउंट उघडून घ्या म्हणजे तुम्हाला येणारे पैसे या पोस्ट ऑफिस मध्ये मिळतील,आता भरपूर जण काय म्हणतात की आम्ही फॉर्म भरताना दुसरा अकाउंट नंबर दिला आहे आणि आधार कार्ड ला लिंक दुसराच दाखवतोय तर लक्षात ठेवा जे बँक अकाउंट तुम्ही फॉर्म भरताना दिलेले आहेत, त्याचा काही संबंध नाही तुमच्या आधार कार्ड ला जी बँक लिंक दाखवत असेल, ऍक्टिव्ह दाखवत असेल त्या बँकेच्या खात्यामध्ये डायरेक्ट तुमचे पैसे जमा होणार आहेत. (ladki bahin yojana online apply link)

बँक सीडिंग स्टेटस चेक करण्यासाठी आधिकृत संकेत स्थळाला भेट द्या :- येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजना फॉर्म पाहण्यासाठी:- येथे क्लिक करा.

लाडकी बहीण योजना FAQs

1. लाडकी बहीण योजना काय आहे?

महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलाना आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत दिली जाते त्यालाच लाडकी बहीण योजना असे नाव देण्यात आले आहे.

2. माझ्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत काय करावे?

माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतेवेळी दिलेला खाते क्रमांक व आधार नंबर चुकीचा आहे का हे चेक करा.. 

बँक खाते क्रमांक हा ज्या आधार कार्डशी संलग्न आहे त्या खात्यावर पैसे जमा होणार त्यामुळे तुम्ही दिलेला खाते क्रमांक जरी बरोबर असला तरी आधार कार्ड क्रमांक हा ज्या खातीशी लिंक असेल त्याच खात्यावर पैसे जमा होणार त्यामुळे आधार कार्ड हे बँकेला डीबीटी सीडिंग आहे का हे चेक करून घ्या. 

3. पैसे खात्यावर कधी जमा होतील व होण्यासाठी किती वेळ लागतो?

पैसे खात्यावर जमा होण्यासाठी किती काळ लागू शकतो हे सरकारी यंत्रणेवर अवलंबून आहे.

4. अर्जाची स्थिती कशी तपासावी?

तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर (येथे क्लिक करा) जाऊन तेथे लॉगिन करून तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती तुम्ही चेक करू शकता.

5. पैसे जमा न झालयास तक्रार कशी करावी?

जर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले नसतील तर तुम्ही-

ऑनलाइन तक्रार करणे अनिवर्य आहे :- योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर तक्रार नोंदवण्यासाठी तिथे पर्याय उपलब्ध आहे.किंवा तुमच्या नजीकच्या समाज कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देवून तक्रार दाखल करु शकता.

6. लाडकी बहीण योजनेविषयी अधिक माहिती कशी मिळवावी?

लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती घेऊ शकता किंवा जवळच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सुद्धा माहिती मिळवू शकतात.

हे ही नक्की वाचा..👇

Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024येथे क्लिक करा
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024येथे क्लिक करा
Ladka Bhau Yojana 2024येथे क्लिक करा
Lek Ladki Yojanaयेथे क्लिक करा
Lakhpati Didi Yojanaयेथे क्लिक करा
Silai Machine Yojanaयेथे क्लिक करा
PM Awas Yojanaयेथे क्लिक करा
Vishwakarma Shram Samman Yojanaयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा
Shravan Bal yojanaयेथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment