प्रस्तावना :-
Mazi Kanya Bhagyashree Yojana नमस्कार मित्रांनो चला आज आपण आणखीन एका नवीन महाराष्ट्र शासनाच्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत या योजनेचे नाव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. महाराष्ट्र शासनाने मुलींचे घटते प्रमाण पाहून त्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली आहे या योजनेअंतर्गत मुलींना शिक्षणामध्ये चालना मिळावी हा एक महत्त्वाचा उद्देश आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहणार आहोत म्हणजेच योजनेची माहिती, योजनेचे उद्दिष्ट, अटी, शर्ती, पात्रता, आवश्यक, कागदपत्रे आणि योजनेचे फायदे या सर्व गोष्टींचा विचार आपण या खालील एकत्र करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचणे गरजेचे आहे.
Mazi Kanya Bhagyashree Yojana :- माहिती
माझी कन्या भाग्यश्री योजना या योजने अंतर्गत जर मुलीच्या कुटुंबाला दुसरीही मुलगी झाली तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन्ही मुलीच्या नावे रुपये 2500, 2500 असे त्या मुलीचे नावे बँक खाते जमा केली जातील. ज्याच्यामुळे या मुली त्यांच्या भविष्य काळामध्ये आपले चांगले प्रकारचे शिक्षण करू शकतील.
जर एका कुटुंबामध्ये दोन मुली असतील तर त्या दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल, परंतु दोन पेक्षा जास्त मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. माझी कन्या भाग्यश्री योजना 2023-2024 या योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत पालकांनी नसबंदी करावी लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा दारिद्र रेषेखालील व आर्थिक दृष्ट्या गरीब किंवा मागास असला पाहिजे आणि त्याचे उत्पन्न एक लाखाच्या आत पाहिजे.
माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेअंतर्गत काढलेल्या नवीन धोरणानुसार मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपये वरून 7.5 लाख रुपये इतके करण्यात आले आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे डिटेल्स
अ. क्र. | योजनेचे नाव | माझी कन्या भाग्यश्री योजना |
1 | कोणाद्वारे सुरू केले | महाराष्ट्र सरकार |
2 | योजना सुरु करण्याची तारीख | 1 एप्रिल 2016 |
3 | लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील मुली |
4 | उद्दिष्ट | महाराष्ट्रातील मुलींचे जीवनमान उंचावणे |
Mazi Kanya Bhagyashree Yojana :- स्वरूप
“माझी कन्या भाग्यश्री योजना” या योजनेमध्ये खालील प्रकारे स्वरूप स्पष्ट केले आहे.
प्रकारे 1 चे लाभार्थी:- या प्रकारच्या लाभार्थ्याला एकुलती एक मुलगी आहे आणि त्या मुलीच्या मातीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे.
प्रकारे 1 चे लाभार्थी:- या प्रकारच्या लाभार्थ्याला एक मुलगी आणि मातीने दुसऱ्या मुलीचे नंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे, अशा परिस्थितीमध्ये दोन्ही मुलींना लाभ भेटेल परंतु एक मुलगा व एक मुलगी असे असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाभाचे स्वरूप
- माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना महाराष्ट्र मध्ये राबवली जाते, या योजनेमध्ये आर्थिक दृष्ट्या गरीब व मागास कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी मदत व्हावी हे या योजनेचे स्वरूप म्हणता येईल.
- या योजनांचा लाभ घ्यावयाचा असल्यास एखाद्या कुटुंबाला एक मुलगी एक मुलगा असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Mazi Kanya Bhagyashree Yojana :- उद्दिष्ट
एकविसाव्या शतकामध्ये आजही आपण पाहता मुलीचे प्रमाण हे घटत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मुलींची भ्रूणहत्या होय. मुलीचे प्रमाण घटल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुरू केली आहे.
या योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे मुलीच्या प्रमाणात वाढ करणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणे.
या योजनेअंतर्गत खालील काही महत्त्वाचे घटक आपण पाहणार आहोत.
- स्त्री भ्रूणहत्या थांबवणे
- स्त्रियांना समान दर्जा देणे
- शैक्षणिक बाबी मध्ये प्रोत्साहित करणे
- MKBY 2023-2024 च्या माध्यमातून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
- मुलींविषयी लोकांच्या मनातील नकारात्मक विचारसरणी बदलणे.
- मुलींचे भविष्य उज्वल करणे.
Mazi Kanya Bhagyashree Yojana :- अटी व शर्ती
योजनेसाठी सर्वसाधारण अटी व शर्ती
माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेअंतर्गत खालील प्रकारच्या काही सर्वसाधारण अटी व शर्ती आहे ते आपण पाहूयात.
- माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना सर्व गटातील दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेच्या वरील कुटुंबात जन्माला आलेल्या अपत्यापैकी दोन मुलीला लागू असेल म्हणजेच, आर्थिक दृष्ट्या गरीब व मागास असलेल्या कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो.
- माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराने आपल्या मुलीच्या जन्म दाखल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय हे 18 वर्षे पूर्ण असावे त्याचबरोबर तिने इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आणि 18 वर्षापर्यंत ती अविवाहित असणे गरजेचे आहे.
- योजनेअंतर्गत दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या दोन्ही मुलींना या योजनेत पात्र होता येईल परंतु त्या दोन्हीला मिळणारा लाभ हा रुपये 2500,2500 असा राहील.
- योजनेअंतर्गत एखाद्या परिवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतले असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल परंतु त्या मुलीचे वय 0 ते 6 वर्ष इतके असावे लागते.
- दुसऱ्या प्रसुतीच्या वेळ नंतर 6 महिन्याच्या आत कुटुंब नियोजन करणे हे अनिवार्य आहे.
- योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास मुलीला अठरा वर्षानंतर एलआयसी कडून जे एक लाख रुपये मिळणार आहेत त्यापैकी किमान रुपये दहा हजार हे मुलींच्या कौशल्य विकासावर खर्च करणे अनिवार्य आहे याचे मुख्य कारण म्हणजे मुलीला कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणे असे आहे.
- ज्या अर्जदाराचे खाते जनधन योजनेअंतर्गत असेल तर त्यांना जनधन योजनेअंतर्गत आपोआप लाभ मिळू शकतात.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी ही योजना आधार सोबत जोडली पाहिजे.
- योजनेअंतर्गत मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होण्या अगोदर मुलीचा विवाह किंवा मृत्यू झाल्यात तर त्या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेचा फायदा हा मुलींच्या पालकांना न होता तो महाराष्ट्र शासनाच्या नावे असणाऱ्या Surplus खात्यामध्ये जमा म्हणून दर्शविला जाईल.
- एलआयसी ऑफ इंडिया च्या माध्यमातून अर्जदार हा महाराष्ट्र शासनाची नावे एक नवीन पॉलिसी काढू शकतो ज्यामध्ये लाभार्थी मुलीसाठी स्वतंत्र खाते असेल.
- जर मुलीचे नावे असलेली एकत्रित रक्कम एक लाखापेक्षा अधिक झाल्यास जादाची रक्कम ही ती काढलेल्या खात्यात जमा होईल.
- मुदतीपूर्व विवाह अथवा मृत्यू झाल्यास मुलीच्या नावावर जमा रक्कम ही एकत्रित निधी मध्ये जमा होईल म्हणजेच काढलेल्या स्वतंत्र खात्यामध्ये जमा होईल.
Mazi Kanya Bhagyashree Yojana :- कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालील प्रकारची आवश्यकता कागदपत्रे देणे गरजेचे आहे.
- लाभार्थी मुलीचे पालक हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
- लाभार्थी मुलीचे पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या कुटुंबाने मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र दाखल करणे गरजेचे आहे.
- लाभार्थ्याच्या कुटुंबास दोन मुली असतील तर दोन मुलीच्या नंतर कुठून नियोजन शस्त्रक्रिया केलेले वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- बीपीएल कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्जदाराचा मोबाईल नंबर
- लाभार्थी मुलीचे व त्या मुलीच्या मातेचे बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
Mazi Kanya Bhagyashree Yojana Benifits :- योजनेचे फायदे
या योजनेअंतर्गत खालील प्रकारचे काही फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला लाभ घ्यायचा असल्यास त्याने प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत मुलीचा व तिच्या आईच्या नावे संयुक्त बचत खाते उघडणे अनिवार्य आहे त्यामुळे 1.00 रुपयेचा अपघात विमा व 5000 पर्यंत ओव्हरड्राफ्टचा लाभ घेता येईल..
- या योजनेअंतर्गत मुलीच्या नावावर शासनाकडून रुपये 21 हजार 210 विमा उतरवला जाईल व मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रुपये एक लाख विम्याची रक्कम त्या मुलीला देण्यात येईल.
- एलआयसी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या आम आदमी योजना अंतर्गत मुलीच्या नावे जमा केले रकमेतून मात्र रुपये 100 प्रति वर्षे इतका हप्ता जमा करून मुलीच्या पालकाचा विमा उतरता येतो. ज्यामध्ये मुलीच्या पालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास खालील प्रमाणे रक्कम मिळते
- नैसर्गिक मृत्यू रुपये 30,000
- अपघाती मृत्यू रुपये 75,000
- डोळे अथवा दोन अवयव यांना अपंगत्व आल्यास रुपये 75000.
- आम आदमी विमा योजना अंतर्गत समाविष्ट असलेल्या शिक्षा सहयोग योजना अंतर्गत मुलीला रुपये 600 इतकी शिष्यवृत्ती प्रति सहा महिने प्रमाणे इयत्ता नववी, दहावी,अकरावी आणि बारावी मध्ये मुलगी शिकत असताना दिली जाईल.
- मुलीचे वय 5 वर्षे होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी रुपये 2000. प्रमाणे देण्यात रक्कम 10,000 देण्यात येईल.
- दोन मुली असतील तर त्यांना पाच वर्षे होईपर्यंत प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे वर्षाच्या शेवटी 10,000 रक्कम देण्यात येईल.
- मुलींना पहिली ते पाचवी वर्गात शिकत असताना प्रतिवर्षी 2500 प्रमाणे 12,500 कृपया रक्कम देण्यात येईल.
- जर दोन मुली असतील तर प्रतिवर्षी दोघींना 1500 रुपये प्रमाणे पाच वर्षाकरिता 15000 रुपये देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत जर मुली माध्यमिक व उच्च माध्यमिक((इ.6 वी ते 12वी) शाळेत असतील तर त्यांना रुपये 3000 प्रति वर्ष प्रमाणे 21000 रुपये मिळतील.
- दोन्ही मुली असतील तर त्यांना प्रतिवर्षी 2000 रुपये प्रमाणे 7 वर्षाकरिता त्यांना 28000 रुपये देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रुपये 1.00 लाख रुपये देण्यात येतील .
Mazi Kanya Bhagyashree Yojana Online Apply :- अर्ज
माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला विहित नमुन्यात एक अर्ज सादर करा लागतो हा अर्ज मिळाल्यापासून त्या अर्जाची पूर्तता झाल्यास त्या अर्जदारास लाभ मिळू शकतो.
अर्जदाराने अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करावा.
- राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,विभागीय उपायुक्त यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट Official Website वर जाऊन “माझी कन्या भाग्यश्री योजना” एप्लीकेशन फॉर्म डाऊनलोड करून फॉर्म भरू शकता.
- विचारलेली माहिती ही पूर्णपणे भरणे आवश्यक आहे त्याचबरोबर विचारलेल्या आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करणे ही अर्जदाराची जबाबदारी आहे.
- आवश्यक त्या कार्य कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी अर्जदाराला एक महिन्याचा कालावधीला जाईल.
माझी कन्या भाग्यश्री योजना GR पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.
Mazi Kanya Bhagyashree Yojana FAQs.
प्रश्न :- माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे?
माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुलींसाठी एक योजना आहे या योजनेमध्ये मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक मदत देऊन त्यांना शिक्षणासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.
प्रश्न :- महाराष्ट्रात मुलींसाठी काय योजना आहे?
महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी खालील बऱ्याच काही योजना राबवल्या आहेत.
- सुकन्या समृद्धी योजना
- माझी कन्या भाग्यश्री योजना
- लेक लाडकी योजना
- बेटी बचाओ बेटी पढ़ाओ
- बालिका समृद्धि योजना
- CBSE उड़ान योजना
प्रश्न :- 2024 महाराष्ट्रातील मुलींसाठी नवीन योजना काय आहे?
2024 महाराष्ट्रातील मुलींसाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजनेची अंमलबजावणी केली आहे.
प्रश्न :- लेक लाडकी योजनेसाठी महाराष्ट्रात कोण अर्ज करू शकतो?
महाराष्ट्रातील नागरिक ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड आहेत आणि जे आर्थिक दृष्ट्या गरीब व मागास आहे असे लोक अर्ज करू शकतात.
प्रश्न :- माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कोण पात्र आहे?
या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एक किंवा दोन मुली असलेल्या कुटुंबांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या मातेने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
हे ही नाकी पाहा….👇
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Shravan Bal yojana | येथे क्लिक करा |
Kishori Shakti Yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment