Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana
Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0

प्रस्तावना:-

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0, भारत देशा कृषी प्रधान देश असल्याकारणाने आपल्या भारत देशात आजही 60 टक्के लोक पूर्णतः शेतीवर अवलंबून आहेत. भारत देशामध्ये शेतीसाठी लागणारे विद्युत हे त्याच प्रमाणात वापरले जातात. विद्युत वापरामध्ये महाराष्ट्र राज्याचा महत्वाचा वाट आहे, म्हणजेच राज्यातील एकूण ऊर्जेच्या वापराच्या तुलनेत सुमारे 22 टक्के ऊर्जेचा वापर हा या महाराष्ट्र राज्यामध्ये केला जातो. विजेच्या वाढत्या वापरामुळे वीज पुरवठा कमी पडण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे. याच कारणामुळे राज्य सरकारने शेतकऱ्याला केला जाणारा वीजपुरवठा हा टप्प्याटप्प्याने म्हणजे चक्रीय पद्धतीने दिवसा व रात्री असा देण्यात येतो. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होत आहे. त्याचबरोबर निसर्गातील वाढत्या बदलामुळे व सततच्या अनियमितेमुळे त्याला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. अशा संकटामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती त्याचबरोबर आर्थिक बजेटचा ताळमेळ बसत नाही.

या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना माफक दरात वीज पुरवठा देण्याचे आश्वासन दिले आहे. तर चला मित्रांनो आपण अशाच एका नवीन योजनेविषयी माहिती घेणार आहोत.

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 :- योजनेचे स्वरूप

Mukhymantri Saur Krishi Vahini Yojana in Marathi
योजनाचे नावमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना
लाभार्थी कोण असतीलखाजगी जमीन धारक / शेतकरी
कोणता विभागमहावितरण
कोणाच्या अंतर्गतमहाराष्ट्र सरकार योजना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
आधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ई-मेल आय डीsolarmskvy2@mahadiscom.in

महाराष्ट्र शासनाने वीजेचे वाढते प्रमाण पाहून खंडित व चक्रीय पद्धतीचा वीज पुरवठा केला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना भरवशाची वीज मिळत नसल्या कारणाने त्याला आर्थिक संकटना सामोरे जावे लागते या गोष्टीचा विचार करून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करण्यात आला आहे.

दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतया योजनेला मान्यता देण्यात आली, ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्ष राबविण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 2025 पर्यंत सौर ऊर्जा निर्मितीसाठी 9000 मेगावॅट आणि 6000 मेगावॅट असे एकूण 16000 मेगावॅट विकेंद्रीत सौर ऊर्जा क्षमता निर्मिती करण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे. त्याचबरोबर या उद्दिष्टेमुळे राज्यातील शंभर टक्के कृषी पंप ग्राहकांना योजनेचा लाभ होणार आहे.

वीर उपकेंद्राची देखभाल व सुधारणा प्रोत्साहन आर्थिक सहाय्य देण्यात येणारा असून या आर्थिक प्रोत्सानासाठी सन 2024 ते 2025 आणि 2018 ते 29 या कालावधीसाठी 2891 कोटी इतका अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमधील 702 कोटी रुपयांचा अतिरिक्त देण्याची मान्यताही या बैठकीत पार पडली.

या योजनेमध्ये केंद्र सरकारकडून सहाय्य निधी म्हणून एकूण निधीच्या 30 टक्के रक्कम देण्यात येणार आहे.

अ. क्रवर्षनिधी
12024-2025 ते 2026-202720 हजार 41 कोटी
22025-20266 हजार 279 कोटी
32026-20273 हजार 762 कोटी

याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना सुद्धा राबवण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला माफक दरामध्ये वीजपुरवठा करण्यात येणार असून 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांची 7.5 एचपी पर्यंतचे संपूर्ण बिल हे माफ करण्यात येणार आहे त्यामुळे 14000761 कोटी रुपये इतका भार राज्य सरकार वर पडणार आहे.

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 :- सविस्तर माहिती

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना वीजपुरवठा हा अखंडित स्वरूपाचा व्हावा यासाठी दिनांक 14 जून 2017 च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही योजना सुरू करण्यात आली. ही या योजनेचे अंमलबजावणी केली असता त्या योजनेमध्ये बरेच बदल करण्याची आवश्यकता होती त्यामुळे 17 मार्च 2018 ला शासन निर्णयावर सुधारणा करण्यात आली.

सौर कृषी वाहिनी योजना 2024 या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही अमलात आणली.

महाराष्ट्रातील सौर ऊर्जा योजना या योजनेअंतर्गत वर्ष 2024 पर्यंत 30 टक्के कृषी वाढण्याचे सौरऊर्जीकरण करण्याची उद्दिष्ट हे मिशन 2025 म्हणून निश्चित करण्यात आले आहे.

जर तुमची जमीन ही नापिक किंवा पड असेल तर त्या जमिनीवर तुम्ही या सौर प्लांटची उभारणी करून सरकारकडून महिना 50,000 हजार रुपये भाडे मिळू शकतात.

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 :- उद्देश

महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेले(शेतकऱ्यांसाठी सौर पंप योजना) या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्याजवळ असणारे नापीक त्याचबरोबर मुरमाड जमीन यांच्यावर सौर प्लांट उभे करून त्यांना महिन्याला ठराविक भाडे देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करून देणे हा आहे. तर चला मित्रांनो खालील प्रमाणे काही उद्देश पाहूया.

1. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वस्त आणि अखंडित वीज पुरवठा देण्यात येईल

2. निसर्गाच्या अनियमित्येमुळे होणारा विजेचा अतिरिक्त वापर त्यामुळे ही वीज पुरवठा लवकरात लवकर संपुष्टात येईल म्हणून पारंपारिक ऊर्जा स्त्रोत्राला पर्याय म्हणून वापर करणे.

3. वाढते विजेच्या वापरामुळे पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होत आहेत त्यामुळे पर्यावरणाची संतुलन बिघडत आहे या गोष्टीचा विचार करून पर्यावरणाचे संरक्षण व्हावे. 

4. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना आता कमी वीज बिल येणार आहे त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

5. अखंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 :- पात्रता

सौर ऊर्जा कृषी पंप योजना लाभ या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

2. अर्जदराकडे स्वतःच्या नावे तीन एकर पासून ते दहा एकर पर्यंत शेती असणे बंधनकारक आहे.

3. शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावाचा सातबारा असणे आवश्यक आहे.

4. महावितरण उपकेंद्र पासून शेतकऱ्याची जमीन ही पाच किलोमीटरच्या आत असावी लागते.

6. शेतकऱ्याचे जमिनीवर कसल्याही प्रकारचा बोजा असता कामा नये.

7. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्थापित केलेल्या जमिनीवर कोणत्याही प्रकारची सरकारी बंद नसावी.

8. या योजनेसाठी शेतकरी बचत गट सहकारी संस्था साखर कारखानदार इत्यादी पात्र असतील.

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 :- कागदपत्रे

खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. अर्जदाराचे आधार कार्ड.

2. जमिनीचा 7/ 12 आणि 8/अ

3.जमिनीच्या खात्याचा नकाशा.

4. पुरेशी जागा.

5. शेतकरी नोंदणी प्रमाणपत्र.

6. पॅन कार्ड.

7. ई-मेल आयडी.

8. मोबाईल नंबर.

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana Online Apply :- अर्ज प्रक्रिया

मुख्यमंत्रि सौर कृषी योजना अर्ज प्रक्रिया लाभार्थ्याने अर्ज करण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करावा

1. लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी.

2. समोर तुम्हाला एक होमपेज ओपन होईल त्यानंतर सर्विसेस असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.

3. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन बटरवर क्लिक करून आपल्यासमोर जो अर्ज ओपन होईल त्यावरती सर्व माहिती अचूकपणे भरावयाची आहे.

4. समजा तुम्ही जर नवीन यूजर असाल तर तुम्हाला न्यू यूजर अशा एका बटन वरती क्लिक करायचे आहे आणि विचारलेली सर्व माहिती भरून नवीन यूजर बनवायचा आहे.

5. आता तुम्हाला कागदपत्रे निवडा असा एक पर्याय दिसेल तेव्हा सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

6. वरील सर्व माहिती पूर्णपणे वाचा आणि सबमिट या बटणावर क्लिक करा 

अशा पद्धतीने तुमचा अर्ज सादर होईल.

आधिकृत GR पाहण्यासाठी ;- येथे क्लिक करा.

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 :- सूचना व पालन

1.प्रत्येक अर्दारांनी प्रथम ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपल्या स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.

2.अर्जदारांनी जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज करण्याचा की ओझर आयडी आणि पासवर्ड हे लॉगिन करावे.

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 :- जागेची पात्रता

1.जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी तीन एकर पासून ते जास्तीत जास्त 50 एकर पर्यंत असावी.

2.महावितरणच्या 33/11 k.v उपकेंद्रजवळील जमिनीला प्राधान्य दिले जाईल म्हणजेच 5 किमीच्या आतील जमिनीस प्राधान्य देण्यात येईल.

सरकारी योजनाक्लिक करा
केंद्र शासन योजनाक्लिक करा
शासन निर्णयक्लिक करा
टेलाग्रामला जॉइनक्लिक करा

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 :- FAQs.

सौर कृषी वाहिनी योजना काय आहे?

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना म्हणजे कृषी कृषी पंप ग्राहकांना सौर ऊर्जा देण्यास साठी तयार करण्यात आलेली योजना म्हणजे सौर कृषी वाहिनी होय.

.प्रश्न :- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा काय लाभ मिळतो? 

solar krishi vahini yojana योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप त्याचबरोबर पडीक जमिनीवर हे सौर प्रकल्प उभारून त्यांना ठराविक उत्पन्न मिळवून दिले जाते.

प्रश्न :- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?

या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे ठराविक नसते.

प्रश्न :- योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता आहे? 

1.अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

2. तर दराकडे स्वतःच्या नावे तीन एकर पासून ते दहा एकर पर्यंत शेती असणे बंधनकारक आहे.

3. शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावाचा सातबारा असणे आवश्यक आहे.

4. महावितरण उपकेंद्र पासून शेतकऱ्याची जमीन ही पाच किलोमीटरच्या आत असावी लागते.

6. शेतकऱ्याचे जमिनीवर कसल्याही प्रकारचा बोजा असता कामा नये.

7. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्थापित केलेल्या जमिनीवर कोणत्याही प्रकारची सरकारी बंद नसावी.

8. या योजनेसाठी शेतकरी बचत गट सहकारी संस्था साखर कारखानदार इत्यादी पात्र असतील.

प्रश्न :- मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचा अर्ज कसा करावा?

 अर्जदारास या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्यावी.

हे ही नक्की वाचा…

Vishwakarma Shram Samman Yojanaयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा
Shravan Bal yojanaयेथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment