Pink Rickshaw Yojana 2024

Pink Rickshaw Yojana 2024
Pink Rickshaw Yojana 2024

प्रस्तावना :-

Pink Rickshaw Yojana 2024, नमस्कार मित्रांनो महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे 8 जुलै 2024 रोजी पिंक रिक्षा गरजू महिलांना रोजगारासाठी उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश हा राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे त्याच बरोबर स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे आणि महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे.

गरजू महिलांना पिंक इ रिक्षा (Pink e-Rickshaw Scheme 2024 Maharashtra)उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत केली जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. 8 जुलै 2024 रोजी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देण्यात आली असून त्यासाठी एक स्वतंत्र जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे. ज्यामध्ये कोणत्या महिलांना या योजनेचा त्यामध्ये कोणत्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार पिंक इ रिक्षा घेण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार, कशाप्रकारे तुमचा अर्ज प्रोसेस केला जाणार, अर्ज कुठे करता येणार ही सर्व माहिती दिलेली आहे. 

Pink E-Rickshaw Yojana

Pink Rickshaw Yojana :- योजनेचा उद्देश

योजनेचा उद्देश खालील प्रमाणे स्पष्ट करण्यात आला आहे.

  • मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे 
  • आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे
  • स्वावलंबी आत्मनिर्भर करणे
  • सशक्तीकरणास चालना देण्यासाठी महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे 

यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर व सोलापूर इत्यादी. 

या 17 शहरातल्या इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो या 17 शहरांमध्ये एकूण दहा हजार लाभार्थ्यांना या पिंक इ रिक्षा खरेदीसाठी सरकारकडून मदत केली जाणार आहे प्रत्येक शहरामध्ये किती लाभार्थी असतील याची एक लिस्ट जीआर मध्ये दिलेली आहे. जसे मुंबई उपनगर मध्ये 1400 लाभार्थीना, कल्याण मध्ये 400, सोलापूर मध्ये 200 इत्यादि.

Pink Rickshaw Yojana 2024
Pink Rickshaw Yojana 2024

जर तुम्हाला जीआर वाचायचं असेल तर खाली लिंक वर क्लिक करून जीआर पाहू शकता :- Click Here

Pink Rickshaw Yojana :- स्वरूप

राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ही योजना आहे. तसेच राज्यातील महिला व मुलींना सुशिक्षित करण्यास चालना मिळणे याचे उद्दिष्ट आहे.

स्वरूप जर पाहिल (pink rickshaw yojana maharashtra online registration) तर सदर योजनेअंतर्गत गरजू महिला आहेत आशा महिलाना रिक्षा खरेदीसाठी खालील प्रमाणे अर्थसाह्यक व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

आता जी काही ई रिक्षाची किंमत आहे ती सर्व करासहित म्हणजेच जीएसटी असेल,रोड टॅक्सेशन आणि इन्शुरेंस इ। समावेश त्यामध्ये असणार आहे. नागरी सहकारी बँक असेल, मध्यवर्ती सहकारी बँक असेल अनुदेय असणार आहे म्हणजे अनुदान तुम्हाला या बँकेकडून मिळणारे जसं की खाजगी बँकांकडून ही रिक्षाच्या किमतीच्या 70% कर्ज तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे महिलांना जे काही कर्ज आहे ते 70% देण्यात येणार आहे. तसेच राज्य शासन 20% आर्थिक भार उचलते म्हणजे 70% आणि 20% झाले आणि 10% रक्कम ही तुम्हाला भरावी लागणार आहे. म्हणजेच योजनेचे लाभार्थी महिला किंवा मुले आहेत त्यांच्यावर 10% आर्थिक भार असणार आहे. आता यामध्ये कर्जाची जी काही परतफेड आहे म्हणजे 70% जे काही कर्ज तुम्हाला बँकेकडून मिळणार आहे त्याची 5 वर्ष परतफेड राहणार आहे अशा प्रकारची ही योजना आहे.

Pink Rickshaw Yojana :- पात्रता

  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणं अनिवार्य आहे म्हणजे महिला किंवा मुलीचे वय 18 ते 35 असेल या वयो गटात असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता.
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खातं असणं आवश्यक आहे
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख पेक्षा जास्त नसावे.
  • लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
  • विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित,अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युती, अनुरक्षा बालगृहातील आजी, माजी प्रवेशनांना प्राधान्य देण्यात येईल, म्हणजेच आता जे काही विधवा आहेत किंवा घटस्फोटीत महिला त्याचबरोबर बाकीचे जे काही इच्छुक प्रवेशक महिला आहेत. अनाथ,पिवळे रेशन कार्ड आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांना अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे असं सांगितलं आहे.

Pink Rickshaw Yojana :- कागदपत्रे

  • ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल सर्टिफिकेट).
  • कुटुंब प्रमुखाचे उत्पन्नाचा दाखला जो काही तुमचा कुटुंब प्रमुख असेल महिला असेल किंवा नसेल तरीही चालेल.
  • कुटुंबप्रमुख रेशन कार्ड वरती जे काही कुटुंब प्रमुख असेल त्याचे तीन लाखाच्या आतमध्येच उत्पन्नाचा दाखला असणे. 
  • बँकेचा पासबुक असणं गरजेचं आहे.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • रेशन कार्ड.
  • ड्रायव्हिंग लायसन्स.
  • सदर रिक्षाही लाभार्थी महिलाच चालवणार आहे याची हमीपत्र म्हणजे जी कोणी महिला लाभार्थी असेल तिच्या व्यतिरिक्त कोणीही चालवणार नाही असे हमीपत्र.

Pink Rickshaw Yojana :- लाभार्थ्यांची निवड

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. प्रत्येक शहरासाठी निश्चित करण्यात आलेला लाभार्थ्यांच्या संख्येपेक्षा पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आल्यास, प्राधान्य दिलेल्या लाभार्थ्यांमधून पारदर्शक लॉटरी पद्धतीचा अवलंब करून योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.

प्रत्येक शहरांमध्ये किती लाभार्थी असले पाहिजे व त्याच्यापेक्षाही जास्त अर्ज जर प्रत्येक शहरात प्राप्त झाले आणि त्यातून ज्या लोकांना प्राधान्य दिलेला आहे त्या लाभार्थ्यांमधून एक लॉटरी काढली जाते आणि त्यामध्ये निवड होणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

आता पिंक इ रिक्षा याची एकूण किंमत किती ? किमतीमध्ये 70% भाग हा कर्जाचा असेल २०% भाग हा शासन देणार आहे आणि 10 % भाग हा लाभार्थ्याला देय असेल.

Pink Rickshaw Yojana :- योजनेची कार्यपद्धती

रिक्षा (pink rickshaw yojana maharashtra in marathi) कशी दिली जाईल ही सर्व माहिती तुम्हाला योजनेची कार्यपद्धतीमध्ये जीआर मध्ये वाचता येईल. 

योजनेसाठी इच्छुक महिलांना ऑफलाइन पद्धतीने पिंक ई रिक्षासाठी अर्ज करायचा असेल, तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला करता येईल.

Pink Rickshaw Yojana :- अटी

  • सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येतो म्हणजे एक महिला एक रिक्षा यानुसार 
  • सदर लाभार्थी महिलांने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी आणि कर्ज फेडेची संपूर्ण जबाबदारी ही लाभार्थी महिलेची आहे.

Pink Rickshaw Yojana :- FAQs

पिंक रिक्षा योजना काय आहे?

पिंक रिक्षा योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक विशेष योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी होण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा वितरित केल्या जातात.

पिंक रिक्षा योजनेसाठी कोण पात्र आहे?

महिला अर्जदार पात्र आहेत. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, अर्जदाराची कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 3,00,000 मर्यादा देखील ठरलेली आहे.

अर्ज कसा करायचा?

पिंक रिक्षा योजनेसाठी अर्जदाराला ऑनलाईन करावा लागेल. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.

काय फायदे मिळतील?

पात्र महिलांना इलेक्ट्रिक रिक्षा कमी दराने दिली जाईल. याशिवाय, त्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि रिक्षाच्या देखभालीसाठी विशेष सहकार्य देखील दिले जाईल.

कोणती कागदपत्र आवश्यक आहेत?

  • ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल सर्टिफिकेट).
  • कुटुंब प्रमुखाचे उत्पन्नाचा दाखला जो काही तुमचा कुटुंब प्रमुख असेल महिला असेल किंवा नसेल तरीही चालेल.
  • कुटुंबप्रमुख रेशन कार्ड वरती जे काही कुटुंब प्रमुख असेल त्याचे तीन लाखाच्या आतमध्येच उत्पन्नाचा दाखला असणे. 
  • बँकेचा पासबुक असणं गरजेचं आहे.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • रेशन कार्ड.
  • ड्रायव्हिंग लायसन्स.
  • सदर रिक्षाही लाभार्थी महिलाच चालवणार आहे याची हमीपत्र म्हणजे जी कोणी महिला लाभार्थी असेल तिच्या व्यतिरिक्त कोणीही चालवणार नाही असे हमीपत्र.

हे ही नक्की वाचा….👇👇👇

Vishwakarma Shram Samman Yojanaयेथे क्लिक करा
PM Solar Yojanaयेथे क्लिक करा
Mukhyamantri Vayoshri Yojanaयेथे क्लिक करा
Shravan Bal yojanaयेथे क्लिक करा
Kishori Shakti Yojanaयेथे क्लिक करा

Leave a comment

Leave a comment