प्रस्तावना :-
PM Internship Scheme 2024 In Marathi | PM Internship Scheme 2024 | पंतप्रधान इंटर्नशिप योजना | ही योजना केंद्र सरकारने सुरू करण्यात आलेली एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत आपल्या भारत देशातील विद्यार्थ्यांना सरकारी तसेच निमसरकारी त्याचबरोबर इतर विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये विद्यार्थी तसेच व्यावसायिक यांना सरकारी, निम सरकारी त्याचबरोबर खाजगी स्वरूपातील कंपन्या यामध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या संधीमुळे ते इंटर्नशिप संपल्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी तयार होतील व आपल्या देशातील सुशिक्षित बेरोजगार लोकांना एक नोकरीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
PM Internship Scheme 2024 In Marathi :- सविस्तर माहिती
PM Internship Yojana 2024 ही योजना आपल्या भारत देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-2025 च्या अर्थसंकल्पात घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत भारत देशातील एक कोटी तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या भारत देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक अधिक वाढत आहे. या गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने ही योजना राबवण्याचे ठरवले आहे. या योजनेचे मुख्य कारण म्हणजे या योजनेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला या योजनेअंतर्गत काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. त्याचबरोबर त्या अनुभवाच्या आधारे तो विद्यार्थी इंटर्नशिप संपल्यानंतर इतर सरकारी, खाजगी, निमसरकारी कंपन्यांमध्ये काम करू शकतो. या सर्व गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे आपल्या भारत देशातील बेरोजगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे. पीएम इंटरसिटी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्य शिकवले जातात, ज्याद्वारे त्यांना चांगला अनुभव येण्यास मदत होणार आहे.
तर चला मित्रांनो, आज आपण या योजने अंतर्गत कोण पात्र आहे? अर्ज कसा करावा? कोणती कागद लागणार आहेत? त्याचबरोबर इंटर्नशिप भत्ता किती मिळणार आहे? या सर्व गोष्टीचा विचार आपण या योजनेमध्ये करणार आहोत, त्यासाठी आपण हा लेख शेवटपर्यंत वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
PM Internship Scheme 2024 In Marathi :- मुद्दे
या योजनेचे खालील काही मुद्दे स्पष्ट केले आहेत ते आपण पाहूयात
योजना | PM Internship Scheme 2024(प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) |
योजनेची सुरुवात | केंद्र सरकार |
कोणत्या राज्यात लागू केली आहे | महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, उत्तराखंड |
मुख्य उद्देश | आपल्या भारत देशातील वाढती बेरोजगारी कमी करणे त्याचबरोबर नवनवीन कौशल्य विकसित करणे |
लाभार्थी | सुशिक्षित त्याचबरोबर व्यवसायिक आणि विद्यार्थी वर्ग |
लाभ | या योजनेअंतर्गत एक कोटी तरुणांना रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट(PM Internship Portal) | Click Here |
PM Internship Scheme 2024 In Marathi :- कंपनी
केंद्र सरकारने सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत आपल्या भारत देशातील 500 होऊन अधिक कंपन्यांचा समावेश केला जाणार आहे. या कंपनीमध्ये एक कोटी तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. ही योजना केंद्र सरकारने एकूण चार राज्यांमध्ये लागू केली आहे ती म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, उत्तराखंड.
PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे त्याचबरोबर ही योजना 12 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे म्हणजेच 12 ऑक्टोबर पासून विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया करता येणार आहे.(Pm internship scheme 2024 registration online)
PM Internship Scheme 2024 In Marathi :- फायदे
PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) या योजनेअंतर्गत खालील प्रकारे तरुणांना लाभ मिळणार आहे.
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 2024-2025 अर्थसंकल्पात असे जाहीर केले होते की पुढील पाच वर्षांमध्ये एक कोटी तरुणांना आपल्या भारत देशातील टॉप 500 कंपनीमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे बेरोजगार तरुणांना एक नवीन संधी निर्माण झाली आहे.
- या योजनेअंतर्गत तरुणांना नवनवीन कौशल्याची माहिती मिळणार आहे.
- पीएम इंटर्नशिपस्कीम 2024 या योजनेअंतर्गत तरुणांना रोजगार मिळाल्यामुळे बेरोजगारी कमी होणार आहे.
- योजनेअंतर्गत ज्या तरुणांचे निवड झाली आहे अशा तरुणांना दरमहा पाच हजार रुपये त्याचबरोबर सहभागी झाल्यानंतर त्यांना दरमहा सहा हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे त्यांना इंटर्नशिपमाध्यमातून आर्थिक मदत देखील होणार आहे.
PM Internship Scheme 2024 In Marathi :- पात्रता
pm internship scheme 2024 eligibility या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करायची असल्यास खालील पात्रतेचे पालन करावे लागेल.
- अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
- अर्जदाराच्या वयाची मर्यादा आहे 21 ते 24 वर्ष असणे बंद करावे
- अर्जदार हा सुशिक्षित बेरोजगार असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
PM Internship Scheme 2024 In Marathi :- कागदपत्रे
PM Internship Scheme 2024 Documents या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाराकडे खालील स्वरूपाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- ई-मेल आयडी
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
PM Internship Scheme 2024 In Marathi :- अर्ज
PM Internship Scheme 2024 Online Apply अर्जदाराला अर्ज करावयाचा असल्यास खालील पद्धतीचा अवलंब करावा.
- अर्जदाराने या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास शासनाने नमूद केलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला एक होमपेज दिसेल, त्यानंतर तुम्हाला नवीन यूजर अकाउंट यावरती क्लिक करावे लागेल, नवीन युजर अकाउंट तयार करताना विचारलेली सर्व माहिती तुम्ही भरणे आवश्यक आहे.
- हे नवीन अकाउंट बनवताना तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड टाकावे लागेल हा पासवर्ड व्यवस्थित नोंद करून ठेवा.
- आता तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर तुम्हाला अर्ज भरा असा एक नवीन पर्याय दिसेल तेथे तुम्ही क्लिक करावे.
- तुम्हाला विचारलेली सर्व माहिती ही अचूक पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
- आता तुम्हाला एक नवीन पर्याय दिसेल कागदपत्रे अपलोड करा या दिलेल्या पर्यायावरती तुम्ही क्लिक करून विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
- कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्ही भरलेला अर्ज व्यवस्थितपणे तपासून घ्यावा.
- तुम्ही भरलेली सर्व माहिती तपसल्यांतर तुम्हाला एक नवीन पर्याय दिसेल अर्ज सबमिट करा असा त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता.
- अशा पद्धतीने तुम्ही तुमची PM Internship Scheme 2024 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) ऑनलाइन प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे.(pm internship scheme 2024 apply)
सरकारी योजना | येथे क्लिक करा. |
केंद्र शासन योजना | येथे क्लिक करा. |
शासन निर्णय | येथे क्लिक करा. |
जॉइन टेलेग्राम | येथे क्लिक करा. |
PM Internship Scheme 2024 In Marathi :- निष्कर्ष
PM Internship Scheme 2024 In Marathi (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024) या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्या भारत देशातील वाढती बेरोजगारी कमी करणे, त्याचबरोबर नवनवीन कौशल्याचा अनुभव देणे. या योजनेअंतर्गत 20 ते 24 वयोगटातील विद्यार्थ्यांना कमी वयामध्ये एक नवीन संधी मिळणार आहे.
PM Internship Scheme 2024 In Marathi:- FAQs
1.PM Internship Scheme म्हणजे काय?
उत्तर: PM Internship Scheme ही एक केंद्र सरकारने सुरू करण्यात आलेली योजना आहे या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्यासाठी संधी दिली जाते व इंटर्नशिप संपल्यानंतर या विद्यार्थ्यांना सरकारी निमसरकारी त्याचबरोबर खाजगी कंपन्यामध्ये काम करण्यासाठी संधी मिळते.
2. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2024 पात्रता काय आहे?
उत्तर:
- अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
- अर्जदाराच्या वयाची मर्यादा आहे 21 ते 24 वर्ष असणे बंद करावे
- अर्जदार हा सुशिक्षित बेरोजगार असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
3. इंटर्नशिपची कालावधी किती आहे?
उत्तर: इंटर्नशिपची कालावधी 2 ते 6 महिन्यांपर्यंत असतो परंतु काही कारणास्तव हा कालावधी वाढवला ही जाणार आहे.
4. इंटर्नशिपसाठी निवड प्रक्रिया कशी आहे?
उत्तर: ज्या अर्जदाराची निवड झाली आहे अशा अर्जदाराचे नाव हे शॉर्टलिस्ट केले जाते त्याचबरोबर अर्जदाराने नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल नंबर वरती एक मेसेज पाठवला जातो की या योजनेअंतर्गत आपली निवड झालेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्याला अंतिम निवडीसाठी मुलाखत घेण्यात येते व मुलाखती दरम्यान त्याची अंतिम निवड करून त्याला कामावरती सहभागी केले जाते.
हे ही नक्की पाहा…..👇👇👇👇
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Ladka Bhau Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Lek Ladki Yojana | येथे क्लिक करा |
Lakhpati Didi Yojana | येथे क्लिक करा |
Silai Machine Yojana | येथे क्लिक करा |
PM Awas Yojana | येथे क्लिक करा |
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Shravan Bal yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment