प्रस्तावना :-
PM Kisan Samman Nidhi 2024 नमस्कार मित्रांनो,आज आपण एका नवीन योजनेविषयी माहिती घेणार आहोत.भारत देश आपला कृषी प्रधान देश आहे. या देशांमध्ये बहुतांश वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हा एक महत्त्वाचा घटक आहे. हा घटक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम करत असतो. शेतकरी प्रवर्गातील लोक पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होण्यासाठी केंद्र शासनाने अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत, त्यापैकीच एक म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना.
पीएम किसान सन्मान योजना ही एक केंद्र शासनाचे योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकांना आर्थिक दृष्ट्या मदत करणे व त्यांच्या आर्थिक बाबींना वाव मिळवून देणे. पी एम किसान सन्मान निधी योजना ही योजना 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली ही योजना केंद्र शासनाकडून राबविण्यात आले आहे या योजनेमध्ये आपल्या देशामध्ये असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यामध्ये मिळतात, म्हणजेच 2000 दर चार महिन्याला दिले जातात.
तर चला मित्रांनो या योजनेअंतर्गत आपण योजनेची पात्रता अटी शर्ती अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टीची माहिती आपण घेणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत वाचणे गरजेचे आहे.
PM Kisan Samman Nidhi Yojana 2024 :- माहिती
आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती हा महत्वाचा घटक आहे आणि शेतकरी हा एक महत्त्वाचा प्रमुख भाग आहे. आपल्या देशामध्ये शेतकरी वर्ग आणि नोकरदार वर्ग असे दोन वर्ग आहेत त्यामुळे ग्रामीण भागात व शहरी भागात प्रचलित असलेल्या सामाजिक व आर्थिक विषमतेमुळे शेतकरी समाजाची आर्थिक दृष्ट्या समृद्धी कमी होते. त्यामुळे शेतकरी वर्ग हा आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतो. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने 1 डिसेंबर 2018 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली.
या योजनेअंतर्गत मागील चार वर्षांमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 11.78 करोड शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला होता.
PM Kisan Samman Nidhi 2024 :- योजनेचा तपशील
पी एम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत खालील काही तपशील स्पष्ट करण्यात आला आहे.
अ. क्र. | योजना | पीएम किसान सन्मान निधी योजना. |
1 | योजनेची अंमलबजावणी | श्री.नरेंद्र मोदी. |
2 | सरकारी मंत्रालय. | कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. |
3 | एकूण लाभार्थी | 12 कोटींहून अधिक. |
4 | हस्तांतरितकरण्यात आलेली रक्कम. | रु. 2.2 लाख कोटी. |
5 | अधिकृत संकेतस्थळ. | येथे क्लिक करा |
6 | आवश्यक कागदपत्रे. | नागरिकत्व प्रमाणपत्र, बँक खात्याचे तपशील जमिनीची कागदपत्रे आणि आधार कार्ड. |
7 | देय रक्कम | ६,000 /प्रति व्यक्ती वार्षिक वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये विभागले गेले (दर चार महिन्यांनी रु. 2,000) |
PM Kisan Samman Nidhi Eligibility 2024 :- पात्रता
या योजनेअंतर्गत खालील काही पात्रता व निकष आपण जाणून घेणार आहोत.
- लाभार्थी हा ग्रामीण भागात शेतकरी असावा.
- या योजनेत घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी हा शहरी भागातील शेतकरी असू शकतो.
- अल्पभूधारक शेतकरी.
- लहान शेतकरी.
PM Kisan Samman Nidhi 2024 :- अपात्र निकष
- अर्जदार हा संस्थात्मक जमीनधारक.
- अर्जदार हा सेवानिवृत्त किंवा वर्तमान अधिकारी तसेच केंद्र किंवा सरकारी कर्मचारी.
- मासिक पेन्शन असलेले सेवानिवृत्त लोक.
- व्यवसायिक,वकील,अभियंता,डॉक्टर.
- घटनात्मक पदे, भूषवलेली शेतकरी कुटुंबे.
- शेतकरी वर्गातील परंतु आर्थिक परिस्थिती उच्च असणारा.
- आयकर विभागात पैसे भरत असणारे.
PM Kisan Samman Nidhi 2024 E-KYC :- ई-केवायसी
PM Kisan Samman Nidhi Yojana या योजनेअंतर्गत शेतकरी हा अधिकृत पोर्टलवर स्वतःची नोंदणी करून इ-केवायसी करू शकतो. ही इ-केवायसीकरण्यासाठी शेतकऱ्याला कुठल्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही या इ केवायसी द्वारे तुम्ही तुमचे बँकेतील अकाउंट लिंक करून येणाऱ्या योजनेचा लाभ घेऊ शकता. एक केवायसी करण्यासाठी खालील काही गोष्टीचा अवलंब करावा लागेल.
- PM Kisan Samman Nidhi Yojana प्रथमतः शेतकऱ्याला या योजनेचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. येथे क्लिक करा.
- त्यानंतर फार्मर्स कॉर्नर वरील पर्याय निवडा.
- त्यानंतर इ केवायसी पर्याय निवडा.
- हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
- शोधा व क्लिक करा.
- ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत नोंदणीकृत तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत नोंदणीकृत मोबाईलवर क्रमांकावर एक ओटीपी मिळेल.
- मिळालेला ओटीपी टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचे आधार ही केवायसी पूर्णपणे यशस्वी होईल.
इ केवायसी प्रणालीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जलदरीत्या पैसे मिळण्यासाठी मदत होते. या ही केवायसी मुळे शेतकऱ्यांच्या तपशिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची गरज नाही. या केवायसी मुळे वाटप प्रक्रिया साठी लागणारा वेळ हा कमी आहे. त्याचबरोबर वितरणातील त्रुटीची शक्यताही कमी होते.
इ-केवायसी ही PM Kisan Samman Nidhi Yojana योजनेमध्ये महत्त्वाचा भाग आहे.
PM Kisan Samman Nidhi 2024 Online Apply :- ऑनलाइन अर्ज नोंदणी
या योजनेची नोंदणी करण्यासाठी खालील काही स्टेप आहेत. (PM Kisan Beneficiary status)
- प्रथमतः PM Kisan Samman Nidhi Yojana च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. (Pm kisan samman nidhi 2024 in maharashtra registration)
- खाली स्क्रोल करून फार्मर्स कॉर्नर वर क्लिक करा.
- विचारलेली माहिती व आवश्यक तो तपशील जोडावा लागेल.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी मिळेल.
- मिळालेला ओटीपी आणि कॅपच्या कोड टाका.
- शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या PM Kisan Samman Nidhi Yojana ची नोंदणी करू शकता.
PM Kisan Samman Nidhi 2024 Offline Apply :- ऑफलाइन नोंदणी
या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा लागतो.
- PM Kisan Samman Nidhi Yojana या योजनेअंतर्गत जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे असल्यास तुम्ही तुमच्या संबंधित तहसीलदार/ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क करावा.
- सध्या ऑफलाईन पद्धतीची प्रक्रिया ही फक्त गोवा या राज्यात सुरू करण्यात आली आहे त्याचबरोबर ही पद्धत लवकरात लवकर आपल्या राज्यांमध्येही सुरू होणार आहे.
PM Kisan Samman Nidhi 2024 Documents :- कागदपत्रे
- अर्जदाराकडे 2 हेक्टर पर्यंत जमीन असावी.
- जमिनीची कागदपत्रे हे त्या अर्जदाराच्या नावे असावीत.
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन
- मतदार ओळखपत्र
- बँक खाते पासबुक
- लिंक असलेला मोबाईल नंबर
- रहिवासी पुरावा
- शेतीची संपूर्ण माहिती
- पासपोर्ट साईजचा फोटो
PM Kisan Samman Nidhi :- वारसाला पुन्हा अर्ज करावा लागेल
PM Kisan Samman Nidhi Yojana या योजनेअंतर्गत जर लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्या योजनेचा सदरील लाभ हा त्यांच्या कुटुंबातील वारसाला मिळत होता, परंतु अलीकडे राज्य शासनाने या नियमात बदल करून नवीन नियमाचा केला आहे की लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास सदरील योजनेचा लाभा त्यांच्या कुटुंबातील वारसाला मिळणार नाही जर हा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याने नव्याने अर्ज दाखल करावा. दाखल केलेल्या अर्जाची पूर्तता झाल्यानंतर त्या योजनेच्या उत्तर अधिकाऱ्याला लाभ दिला जाईल त्यासाठी खालील काही बाबींची पूर्तता अर्जदाराने करायला हवी.
- मयत लाभार्थ्याच्या वारसाला महसूल निरीक्षकाचा अहवाल सादर करावा लागेल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मयत लाभार्थ्याची संपूर्ण माहिती देऊन या योजनेचा लाभ का मिळवायचा आहे हेही स्पष्ट केले पाहिजे.
PM Kisan Samman Nidhi kisan credit card :- किसान क्रेडिट कार्ड
- PM Kisan Samman Nidhi Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला क्रेडिट कार्ड बनवावे लागेल.
- हे कार्ड मिळण्यासाठी शेतकऱ्याला अर्ज करावा लागतो तो सर्वप्रथम आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन हवी ती रीतसर माहिती देऊन अर्ज करावा लागतो.
- हा भरलेला अर्ज सबमिट करावा लागेल.
PM Kisan Samman Nidhi 2024 KCC Form :- KCC फॉर्म डाउनलोड
या योजनेच्या अंतर्गत केसीसी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खालील काय प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा अवलंब करावा.
- या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुमच्या होम पेजवर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर अंतर्गत KCC फॉर्म डाऊनलोड करा या लिंक वर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर KCC फॉर्म उडेल.
- त्याच्यानंतर डाऊनलोड केलेला फॉर्म तुम्ही प्रिंट करू शकता.
PM Kisan Samman Nidhi 2024 Helpline :- हेल्प डेस्क / हेल्पलाइन
पीएम किसान योजना हेल्प डेस्क / हेल्पलाइन खालील प्रमाणे आहेत
पी एम किसान हेल्पलाइन नंबर | 555261 |
1800115526 | |
011-23381092 |
PM Kisan Samman Nidhi 2024 FAQs.
प्रश्न .प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे?
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी ही एक केंद्र शासनाची योजना आहे या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकरी वर्गातील कुटुंबांना आर्थिक दृष्ट्या मदत करणे.
प्रश्न. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा मुख्य फायदा काय आहे?
पी एम किसान सन्माननिधी योजनेचा मुख्य फायदा म्हणजे शेतकरी वर्गातील कुटुंबांना आर्थिक दृष्ट्या मदत करणे हा आहे.
प्रश्न.या योजनेंतर्गत लाभ मिळण्यास कोण पात्र आहे?
या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी लाभार्थी हा शेतकरी व जमीन धारक असावा.
प्रश्न.आम्ही किसान क्रेडिट कार्ड कसे डाउनलोड करू शकतो?
किसान क्रेडिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी प्रथमतः उमेदवाराला पी एम किसान सन्मान निधीच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन डाउनलोड करू शकतो.
हे ही नक्की वाचा 👇
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Shravan Bal yojana | येथे क्लिक करा |
Kishori Shakti Yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment