प्रस्तावना :-
PM Kusum Solar Yojana 2024 भारत देश हा कृषिप्रधान देश आहे आणि त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकरी मानला जातो. शेतकरी हा शेतीवर अवलंबून असतो. असेही म्हणले जाते की शेती प्रगत तर राष्ट्र प्रगत आणि शेतकरी प्रगत करण्यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या योजना राबवत असतो त्यामधील अशीच एक योजना आपण आज जाणून घेऊन घेणार आहोत ती योजना म्हणजे कुसुम सोलर पंप योजना.
शेती करताना शेतकऱ्याला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते त्यापैकी सिंचन ही एक खूप मोठी समस्या आहे वाढत्या लोकसंख्येमुळे होणारा विजेचा अतिवापर याचा अप्रत्यक्षपणे सिंचनावर परिणाम झालेला आहे या समस्येवर पर्याय म्हणून राज्य सरकारने एक महत्त्वाची योजना चालू केली आहे ती म्हणजे पीएम कुसन योजना असे म्हणतात. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याच्या सिंचन समस्येवर निवारण करणे.
या योजनेमुळे शेतकऱ्याला योग्य त्यावेळी त्याला सिंचन देता येईल आणि त्याच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. या योजनेचा लाभ राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे स्पष्ट केले आहे की, या योजनेचा लाभ विदर्भातील शेतकऱ्यांना देण्यात यावा याचं मुख्य कारण म्हणजे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंपावर केंद्र सरकारकडून 30 टक्के तसेच राज्यसभाकडून 30 टक्के आणि इतर संस्थांकडून 30 टक्के अनुदान देण्याचे जा जाहीर केले आहे यामध्ये शेतकऱ्याला फक्त दहा टक्के खर्च भरावा लागणार आहे
Kusum Solar Pump Yojana Maharashtra Keypoints :- मुद्दे
प्रधानमंत्री प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना ही भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये लागू आहे, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कुसुम सौर पंप योजना बसवण्यासाठी शेतकऱ्याकडून अर्ज मागविले आहेत. या लेख च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लागणारे आवश्यक कागदपत्रे पात्रता, अर्ज कोठे करावा, कसे करावा याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे म्हणून हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा
अ. क्र. | योजनेचे नाव | कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र |
1 | योजने अंतर्गत | पीएम कुसुम योजना |
2 | संबंधित विभाग | कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग |
3 | योजनेचा उद्देश | अनुदानावर सौर पॅनेल उपलब्ध करून देणे |
4 | लाभार्थी | शेतकरी |
5 | अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन / ऑफलाइन |
6 | वर्ष | 2023/2024 |
7 | अधिकृत वेबसाइट | Kusum.mahaurja.com |
PM Kusum Yojana 2024 :- उद्दिष्टे
महाराष्ट्र कुसुम योजनेचे उद्दिष्ट
- शेतकऱ्यांना शेतात सिंचनासाठी पुरुषी वीज मिळावी
- शेतीवरील खर्च कमी करणे व उत्पादनात वाढ करणे
- सौर पंप द्वारे वीज तयार करून ती ग्रीड ला विकून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देणे.
PM Kusum Yojana 2024 :- ठळक निकष 2023-24
- शेततळे विहीर बोरवेल बारमाही वाहणारी नदी नाले याच्या शेजारी असणाऱ्या शाश्वत पाण्याचा स्त्रोत असा शेतकरी
- पारंपारिक वीज कनेक्शन नसलेला शेतकरी.
- अटल सौर कृषी पंप योजना टप्पा एक व दोन किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेले अर्जदार.
- अडीच एकर शेती धारकास तीन एचपी डीसी पाच एकर शेतकर्यासाठी पाच एचपी डीसी त्यापेक्षा जास्त जमीन धारकास म्हणजे साडेसात एचपी डीसी या क्षमतेचे सौर कृषी पंप मिळतील.
PM Kusum Yojana 2024 :- मुख्य घटक
देशामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे होणारा अतिरिक्त विजेचा वापर यामुळे शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा हा खंडित होत आहे. याचा विचार करता भारत सरकारने महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना लागू केली आहे व या योजनेचे नाव “प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाभियान” असे ठेवण्यात आले आहे हीयोजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे, ही योजना सुरू केल्यानंतर त्याचे स्वरूप काही घटक ठरवण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत महत्त्वाचे तीन घटक आहेत त्यापैकी सौरपंपासाठी जागा भाड्याने देणे, वीज तयार करून उत्पन्न मिळवणे आणि निर्मित झालेली वीज डिस्काउंट ला विकून उत्पन्न मिळवणे हे या योजनेचे मुख्य घटक आहे सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे बघुयात
Component A :- या घटकांमध्ये शेतकरी हा पडीक किंवा अनु उप जाऊ जमीन ऊर्जा उत्पादकाला भाड्याने देऊन त्याचे चांगले उत्पन्न मिळू शकतो हे करण्यासाठी तो एक ऊर्जा उत्पादक मालक आणि जमीन मालक यांच्यात करार करत असतो
Component B :- या घटकांमधील डिझेल व पेट्रोलवर चालणाऱ्या पंपांना सौर पंपात रूपांतर करण्यासाठी सरकारने 60 टक्के सबसिडी देण्याचे ठरले आहे म्हणजे जर आपल्याकडे डिझेल व पेट्रोल पंप असेल आणि त्याचा वापर आपण त्यांच्यासाठी करत असाल असाल तर आपण या घटकाद्वारे हरितसर माहिती देऊन त्या डिझेल व पेट्रोल पंपाचे रूपांतर हे सौर पंपात करून आपण त्या घटकाचा लाभ घेऊ शकतो.
Component C :- या घटकांमध्ये आपण स्वतःचे जमीन वापरून शेतामध्ये निर्मिती करून ती वीज डिस्काउंट ला विकू शकतो व त्यापासून आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो.
सौर पंपची क्षमता | सौर पंपाची किंमत | सर्वसाधारण गटाच्या लाभार्थीसाठी (सौर पंपाची किंमत) | अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या लाभार्थीसाठी (सौर पंपाची किंमत) |
3 HP | Rs. 1,93,803 | Rs. 19,380 | Rs. 9,690 |
5 HP | Rs. 2,69,746 | Rs. 26,975 | Rs. 13,488 |
7.5 HP | Rs. 3,74,402 | Rs. 37,440 | Rs. 18,720 |
25 वर्षातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नफ्याचा हिशोबाचा ताळेबंद
सौर ऊर्जा प्रकल्प क्षमता | 1 मेगावॅट |
अंदाजे गुंतवणूक | 3.5 ते 4.00 कोटी प्रति मेगावॅट |
अंदाजे वार्षिक वीज निर्मिती | 17 लाख युनिट्स |
अंदाजित दर | ₹3.14 प्रति युनिट |
कुल अंदाजित वार्षिक उत्पन्न | ₹53,00,000 |
अंदाजे वार्षिक खर्च | ₹50,0000 |
अंदाजे वार्षिक नफा | ₹48,00,000 |
PM Kusum Yojana 2024 :- कागदपत्रे / पात्रता
- अर्जदार हा शेतकरी असावा आणि तो महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- जमिनीची कागदपत्र म्हणजेच 7/12.(जमिनीच्या सातबारा विहीर किंवा एकापेक्षा जास्त भगवतीदार असल्यास त्यांचा ना हरकत प्रमाणपत्र व नोंद असणे नोंद असणे आवश्यक)
- बँकेचे पासबुक
- शेत जमीन विहीर सामायिक सामायिक असल्यास ना हरकत प्रमाणपत्र जोडणे
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
PM Kusum Yojana 2024 Online Apply :- ऑनलाईन अर्ज
कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज (PM Kusum Yojana Registration) करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करावी
- सर्वप्रथम, तुम्हाला कुसुम महाऊर्जा अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. खालील दिलेल्या लिंकला तुम्ही ओपन करून अधिकृत वेबसाईटवर (https://kusum.mahaurja.com) जाऊन शकता
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती योग्यरित्या प्रविष्ट करा.
- त्यानंतर फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
- आता शेवटी अर्ज फी भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमची महाराष्ट्र कुसुम सौर पंप योजना यशस्वीपणे लागू होईल.
अधिकृत सूचना पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.
PM Kusum Yojana 2024 FAQs
प्रश्न :- कुसुम सौर पंप योजना काय आहे?
कुसुम सौर पंप योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी एक फायदेशीर योजना आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर सौर पंपांचे वाटप केले जाते. या पंपाचा उपयोग शेताच्या चांगल्या सिंचनासाठी होतो.
प्रश्न :- कुसुम सौरपंप वितरण योजनेत शासनाकडून किती अनुदान दिले जाते?
कुसुम सौर योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान राज्यावर अवलंबून असते, या योजनेत तुम्हाला सरकारकडून 50% ते 90% पर्यंत अनुदान मिळू शकते.
प्रश्न :- कुसुम सोलर योजना चालू आहे का?
होय, कुसुम योजनेअंतर्गत 2022 पर्यंत देशातील तीन कोटी पंप वीज किंवा डिझेलऐवजी सौरऊर्जेने चालवले जातील. कुसुम योजनेचा एकूण खर्च 1.40 लाख कोटी असेल, ज्यामध्ये केंद्र सरकार 48 हजार कोटी देणार आहे, तर राज्य सरकार तेवढीच रक्कम देणार आहे.
प्रश्न :- कुसुम सोलार योजना कधी चालू होणार?
शेतकऱ्यांना ऊर्जा आणि जलसुरक्षा देण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, शेती क्षेत्र डिझेलपासून मुक्त करण्यासाठी आणि पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्यासाठी, भारत सरकारने 19/02/2019 रोजी पीएम-कुसुम योजनेला मान्यता दिली होती.
प्रश्न :- कुसुम योजनेत किती अनुदान मिळते?
पीएम कुसुम योजनेत, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी 60% पर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये केंद्राकडून 30 टक्के आणि राज्य सरकारकडून 30 टक्के रक्कम दिली जाते. बँकेकडून 30 टक्के कर्ज घेता येतो, तर उर्वरित 10 टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागते.
प्रश्न :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कोणती सौर योजना आहे?
राज्य सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana) सुरू केली आहे.या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचन करण्यासाठी राज्य सरकार सौरपंप उपलब्ध करून देईल.
प्रश्न :- सौर कृषीपंप म्हणजे काय ?
सौर पंप म्हणजे सौर उर्जेवर चालणारे पंप, यामध्ये फोटोव्होल्टाइक्स (PV) पॅनलव्दारे निर्माण होणाऱ्या विजेवर चालणारे पंप, पारंपारिक विजेवर किंवा डिझेलवर चालणाऱ्या पंपांच्या विरुद्ध हे पंप सूर्यप्रकाशापासून निर्माण होणाऱ्या विजेवर म्हणजेच थर्मल उर्जेवर काम करतात. सर्वसाधारणपणे सौर उर्जेवर चालणाऱ्या पंपांमध्ये सोलर पॅनल, सोलर चार्ज कंट्रोलर, डी.सी. वॉटरपंप इत्यादी उपकरण असतात.
प्रश्न :- महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना काय आहे आणि त्या योजनेचा हेतू काय ?
ही योजना राज्य सरकारच्या अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकरी बांधवासाठी शेती करण्यासाठी सोलर पंप उपलब्ध करणार आहे.या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार ने शेतकरीना 1,00,000 कृषी पंप प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.या सौर पंपामुळे तुमच्या वीज बिलाचा भार कमी होईल. या योजनेअंतर्गत, तुमचे जुने डिझेल पंप नवीन सौर पंपांनी बदलले जातील.
हे ही नक्की एकदा पाहा-👇
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Ladka Bhau Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Lek Ladki Yojana | येथे क्लिक करा |
Lakhpati Didi Yojana | येथे क्लिक करा |
Silai Machine Yojana | येथे क्लिक करा |
PM Awas Yojana | येथे क्लिक करा |
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Shravan Bal yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment