प्रस्तावना :-
Shravan Bal Yojana 2024 नमस्कार मित्रांनो, चला आज आपण एका नवीन योजने विषयी माहिती घेणार आहोत त्या योजनेचे नाव आहे. श्रावण बाळ योजना. आजही आपल्या भारत देशामध्ये असंख्य प्रकारचे वयस्कर व वृद्ध लोक राहत आहेत जे स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाहीत. त्याचबरोबर एकदा वृद्ध लोकांचे वय 65 वर झाल्यानंतर आपल्या देशातील बरेचसे नागरिक आहेत की जे त्यांचा सांभाळ करू शकत नाही किंवा त्यांना वाईट वागणूक देतात, याचा मुख्य कारण म्हणजे ते कसल्याही प्रकारचे काम करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचे ओझे वाटते व त्यांना ते वाईट पद्धतीची वागणूक देतात. याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने श्रावण बाळ ही योजना राबवण्याची ठरवले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जे वृद्ध लोक आर्थिक दृष्ट्या कमकुवत व शारीरिक दृष्ट्या हतबल आहेत अशा लोकांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे.
ही योजना महाराष्ट्र शासनाने 2024 रोजी सुरू केली आहे. ही योजना राज्य सरकारचा अंतर्गत असून या योजनेची अंमलबजावणी करण्याची पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची आहे.
चला मित्रांनो आज आपण या लेखाद्वारे श्रावण बाळ योजना याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचणे बंधनकारक आहे.
Shravan Bal yojana 2024 Highlights :- मुद्दे
श्रावण बाळ योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवण्याचे ठरवले आहे याचे कारण म्हणजे ज्या वृद्ध लोकांचे वय हे 65 च्या वर आहेत, त्यांना स्वतःच्या औषध उपचारासाठी किंवा आर्थिक दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे. म्हणजेच त्यांच्या वृद्ध काळामध्ये या योजनेअंतर्गत मिळालेल्या या आर्थिक मदतीमधून ते स्वतःचा खर्च स्वतः करू शकतील.
आजही आपल्या भारत देशामध्ये बरेच वृद्ध आश्रम आहेत जेथे असे हात बल व आर्थिक दृष्ट्या मागास असणारे लोक आहेत याचे मुख्य कारण म्हणजे वृद्ध लोकांना सांभाळून न शकणे. भारत देश आजही प्रगतशील राष्ट्र असला तरी आपल्या भारत देशामधील बरेच लोक हे नोकरीवर अवलंबून असतात व या धावपळीच्या जगामध्ये ते वृद्ध लोकांना सांभाळू शकत नाहीत, त्याचबरोबर बऱ्याच लोकांचा असाही मानस आहे की वृद्ध लोकांना वृद्धआप काळात औषध उपचारावर बऱ्याच खर्च करावा लागतो त्याच्या तुलनेमध्ये ती कसल्याही प्रकारचे काम करत नाहीत त्यामुळे ते सांभाळण्यासाठी टाळाटाळ करतात.
महाराष्ट्र शासनाने ही योजना लागू करून वृद्ध लोकांसाठी एक नवीन जगण्यासाठी आशा निर्माण केली आहे, या योजनेमुळे बरेच लोक स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे उर्वरित आयुष्य जगू शकतात. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे वृद्ध लोकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवणे हा आहे.
तर चला मग या योजनेची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहू.
अ. क्र. | योजनेचे नाव | Shravan Bal Yojana |
1 | योजनेचा मुख्य उद्देश | असे नागरिक ज्यांचे वय 65 पेक्षा जास्त आहे आणि आर्थिक दृष्ट्या निराधार आहेत अशा व्यक्तींना आर्थिक मदत पुरवून त्यांना स्वावलंबी बनवणे. |
2 | संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक | 1800-120-8040 |
3 | अर्जाची पद्धत | ऑफलाईन / ऑनलाइन |
4 | अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा. |
Shravan Bal Yojana 2024 Maharashtra :- उद्दिष्ट
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या योजने अंतर्गत राज्यातील ज्या नागरिकांचे वय 65 वर्षाच्या वर आहे अशा लोकांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या मदत करून त्यांना स्वावलंबून होणे हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास आणि शारीरिक दृष्ट्या हतबल नागरिक ज्यांचे वय 65 वर्षाच्या वर आहे अशा लोकांना स्वावलंब बनवणे.
- वृद्ध नागरिकांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांचा आर्थिक विकास करणे.
- वृद्ध नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
- आर्थिक दृष्ट्या पाठबळ देणे.
- आर्थिक दृष्ट्या मदत केल्यामुळे ते समाजामध्ये सन्मानाने जगू शकतात.
- महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे वृद्ध नागरिक आपल्या उर्वरित जीवनात आनंदी राहू शकतात.
- मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे ते त्यांच्या स्वतःच्या औषध उपचाराचा खर्च भाग होऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे वृद्ध लोक कोणावरही अवलंबून राहत नाहीत.
Shravan Bal Pension Yojana In Marathi :- प्रवर्ग
महाराष्ट्र शासनाने चालू केलेल्या Shravan Bal Yojana 2024 या योजने अंतर्गत खालील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आपण ते पाहुयात.
- श्रावणबाळ योजना ही राज्यातील सर्व प्रवर्गातील नागरिकांना लागू आहे.
- या योजनेमधील नागरिकाचे वय हे 65 वर्षाच्या वर असावे.
- या योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा झाल्यास नागरिक हा शहरी किंवा ग्रामीण भागातील असू शकतो.
Shravan Bal Pension Yojana Benefits :- लाभ
- श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभार्थ्याला लाभ घ्यावयाचा झाल्यास त्याला महिन्याला 400 ते 600 रुपये दरम्यान लाभ देता येईल.
- नागरिक हा कुठल्या श्रेणीतील आहे ते महत्त्वाचे आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत दोन श्रेणी आहेत.
- श्रेणी A:- या श्रेणीमध्ये असे नागरिक ज्यांचे नाव बीपीएल यादी मध्ये आहे त्यांना रुपये 600 मिळतील.
- श्रेणी B:- या श्रेणीमध्ये असे नागरिक ज्यांचे नाव बीपीएल यादी मध्ये नाही त्यांना दरमहा 400 रुपये राज्य सरकारकडून आणि 200 रुपये केंद्र शासनाकडून मिळतील.
Shravan Bal Yojana Marathi :- फायदे
या योजनेअंतर्गत होणारे फायदे हे खालील प्रमाणे आहे ते पाहुयात.
- महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 वर्ष व 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे.
- नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 21000 रुपयांच्या आत आहे, त्यांना या योजनेत लाभ घेता येईल.
- लाभार्थ्याला प्रति महिना 1500 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येईल.
- या मिळालेल्या आर्थिक मळतीमुळे वयोवृद्ध लोकांचे जीवन हे सुखमय होईल.
- आर्थिक मदतीमुळे वयोवृद्ध नागरिक हे सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- वयोवृद्ध लोकांना या योजनेमध्ये आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे ते स्वतःचा खर्च स्वतः भागवू शकतात.
- आपल्या राज्यातील वयोवृद्ध लोकांना मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे ते स्वतःचा औषध उपचार स्वतः करू शकतात त्याचबरोबर त्यांना खर्चासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.
- श्रावण बाळ योजना अंतर्गत जी आर्थिक मदत मिळते त्यामुळे ते वृद्धकाळात स्वाभिमानाने मानाने जगू शकतील.
- ज्या नागरिकांचे वय 65 किंवा 65 वर्षीयच्या वर आहे परंतु ते बीपीएलधारक नाही अशाही वृद्ध नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
Shravan Bal Yojana Maharashtra Eligibilty :- पात्रता
श्रावण बाळ निराधार योजना या योजनेअंतर्गत खालील काही आवश्यक पात्रता लाभार्थ्याकडे असायला हवी.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- त्याने महाराष्ट्र राज्यांमध्ये किमान 15 वर्षे रहिवासी असणे बंधनकारक आहे
- या योजनेअंतर्गत अर्जदाराचे वय किमान 65 व 65 वर्षीयच्या वर असावे.
- अर्जदार हा फक्त महाराष्ट्र राज्यातीलच असावा.
- अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यास लाभ घ्यावयाचे झाल्यास त्याने कुठल्याही प्रकारच्या कुटुंबाचे बँकेचे खाते देऊ नये.
- अर्जदार व्यक्ती आर्थिक दृष्ट्या मागास किंवा गरीब असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 21000 रुपयेच्या जास्त नसावे.
Shravan Bal yojana Documents In Marathi Documents :- कागदपत्रे
श्रावण बाळ योजना महाराष्ट्र 2024 या योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- पॅन कार्ड
- ज्येष्ठ नागरिक असलेले कार्ड
- वयाचा दाखला
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
- उत्पन्न दाखला
- बँक पासबुकची झेरॉक्स
- मतदान कार्ड
Shravan Bal yojana Online Apply :- अर्ज
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा असल्यास खालील बाबीचा विचार करावा.
- अर्जदाराने सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील संजय गांधी योजना, तलाठी कार्यालय यांना संपर्क साधावा.
- या अधिकाऱ्याकडून सदर योजनेचा अर्ज घेऊन त्या अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती व आवश्यक कागदपत्रे जोडावीत
- जोडले कागदपत्रे ही अधिकाऱ्याकडून तपासणी करून काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करून अर्ज भरून जमा करावा.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा असल्यास खालील पद्धतीचा अवलंब करावा.
- सर्वात प्रथम अर्जदाराला दिलेल्या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर( येथे क्लिक करावे ) जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला होम पेज ओपन झाल्यानंतर तेच रजिस्टर या बटनवर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही या दोन्हीपैकी कोणताही पर्याय निवडू शकता व नोंदणी करू शकता.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे व त्यामध्ये युजरनेम आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परत मुख्यपृष्ठावर जाऊन श्रावण बाळ योजना यावर क्लिक करायचे आहे.
- तुम्हाला तुमचा लॉगिन फॉर्म ओपन होईल तो जर नियम आणि पासवर्ड टाकून पुढे जावयाचे आहे.
- ओपन झालेला फॉर्म हा पूर्णपणे व्यवस्थित भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडायचे आहेत.
- त्यानंतर तुम्हाला बँकेचा तपशील पूर्णपणे भरायचा आहे.
- हा अर्ज यशस्वीरित्या भरल्यानंतर तुमची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल.
GR पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.
Shravan Bal yojana FAQs
प्रश्न :- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
श्रावण बाळ योजना ही महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब आणि मागास असे नागरिक.
प्रश्न :- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वयाची मर्यादा काय आहे?
श्रावण बाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 65 किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
प्रश्न :- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना अंतर्गत लाभार्थ्यास किती लाभ दिला जातो?
श्रावण बाळ योजना अंतर्गत प्रतिमा लाभार्थ्याला 1500 रुपये इतके आर्थिक मदत देण्यात येते.
हे ही वाचा 👇
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Ladka Bhau Yojana 2024 | येथे क्लिक करा |
Lek Ladki Yojana | येथे क्लिक करा |
Lakhpati Didi Yojana | येथे क्लिक करा |
Silai Machine Yojana | येथे क्लिक करा |
PM Awas Yojana | येथे क्लिक करा |
Vishwakarma Shram Samman Yojana | येथे क्लिक करा |
PM Solar Yojana | येथे क्लिक करा |
Mukhyamantri Vayoshri Yojana | येथे क्लिक करा |
Leave a comment